सूट - भाग 6

Submitted by चिन्नु on 31 January, 2019 - 22:50

सूट भाग 5-
https://www.maayboli.com/node/68929

काय झालं तिलु? अशी झोपून का आहेस? बरं नाहीये का?', विनुने कपाळावर हात लावून पाहिला.
'मी ठीक आहे रे. ते दादा आणि संजूदादा- '
'काय? स्वप्न पडलं का काही? मग दादा दादा काय करतेस तिलु? आठवण आली का घरची?'
'हो. दादाची खूप आठवण येतेय मला आज'
'थोड्या वेळाने फोन करून बोल. बरं वाटेल तुला. खाल्लं का काही? काही order करू का? पिझ्झा मागवू का?'
'ए नको नको. दुपारी मी तेच मागवलं होतं. लुनाने मला मदत पण केली'.
'लुना काय? कोण? असं नाव आहे का कुणाचं?'
तिलुने घडलेल्या गोष्टी सांगितल्या बरोबर विनू काळजीत पडला. 'तिलु, मग मला फोन नाही का करायचा?'
'तू कामात व्यस्त असशील म्हणून नाही केला अरे. जाऊ दे. मी बरी आहे आता. सांग बरं काय program आहे?'
'चल मस्त पैकी डिनरला जाऊ या. इकडे जवळच ताजमहाल रेस्टॉरंट आहे. तिथं जाऊ या का?'
'हो. मी रिसेप्शनमधल्या computer वर search केले जवळपासच्या indian restaurant बद्दल. चक्क 2-3 ताज आहेत. त्यापैकी कुठलं?', तिलुने विचारलं.
'अगं ती एक गंमत आहे. कसं असतं ना की ताजमहाल म्हणजे इंडिया हे इथल्या लोकांच्या पक्कं डोक्यात बसलेलं असतं. त्यामुळे झाडून सगळ्या भारतीय रेस्टॉरंट्सची नावं ताजमहाल असंच ठेवलेलं असतं. तेही आपल्या मारवाडी, पंजाबी किंवा गुज्जुभाईचंच असतं!', विनूने माहिती पुरवली.
'आपलीच भारतीय माणसं ना? मग जाऊ या की'.
तिलु तयार होत होती. विनूला मात्र तिलुची काळजी लागली.
'ही लुना आहे तरी कोण?', तो स्वतःशीच म्हणाला.
*****
रात्रभर तिलुने दादाशी पोटभर गप्पा मारल्या. कुठं फिरलो, काय केलं, काय खाल्लं आणि पाहिलं-काय सांगू काय नको असं झालं होतं तिला. दादानेपण दोन तीन ठिकाणांची नावं सांगून त्यांच्या भटकंतीचं वेळापत्रक परस्पर ठरवून टाकलं होतं. पुन्हा विनूकडून तसं वदवूनपण घेतलं! सगळं काही तुम्ही भाऊ बहीण ठरवत आहात तर उद्या मी ऑफिसला जाऊ की नको ते पण सांगा- असं विनूनं पण पिडून घेतलं होतं.
झोपेत असताना तिच्या चेहर्यावर असलेलं मंद हास्य विनू आपल्या डोळ्यात साठवत होता.
*****
'कशी आहेस?', लुनाने विचारलं. तिलुने हसून मान डोलावली. 'काय तुम्ही Indians? Oscillating heads?', लुना म्हणाली. आज तिचा काही काम करायचा मूड दिसत नव्हता.
'Oscillating heads? म्हणजे? ', तिलुने प्रश्न टाकला.
'हेच. नेहमी डोकं हलवत असतात. असं असं', लुनाने action करून दाखवली. तिलुला हसायला आलं पण रागही आला. 'मग काय तुमच्या सारखं गंभीर चेहरा करून फिरायचं?'. तिलुने वार परतवला.
लुना खाली मान घालून खुर्चीवर शेजारी येऊन बसली.
'परिस्थिती गंभीर व्हायला भाग पाडते'. मोठा सुस्कारा सोडून लुना म्हणाली.
'का? काय झालं?', तिलुला तिच्या बोलण्याचं वाईट वाटलं.
'मी hurricane Katrina ची survivor आहे', लुना हळूहळू म्हणाली.
'काय?'
'तुला new orleans माहित आहे का? कतरीनाच्या हैदोसाच्या आधी आमची फॅमिली तिथंच रहात होतो. मी, विली आणि माझी गोड मुलगी- jade. तिचा जन्म झाल्यावर तिला पाहताक्षणी मी उद्गारले होते- OMG! She just looks like Jade!!
पण कतरीनाच्या पुढे आमचे सूख टिकलं नाही. सगळं काही उध्वस्त झालं. सगळीकडे फक्त लूटपाट आणि लचके तोडणे हेच चाललं होतं. तिथल्या एका refugee camp मधल्या एका माणसाने हा रस्ता दाखवला किंमत वसूल करूनच. Jade ला घेऊन पळून आले मी इथे', लुना संथपणे बोलत होती. तिलु आश्चर्याने आणि खेदाने ऐकत होती.
'I am extremely sorry!', तिलु म्हणाली.
लुना पुढे बोलू लागली.
'माणसं पाहता पाहता श्वापदासारखी केव्हा वागतील ते सांगता येत नाही. त्या दिवशी तू पियानो वाजवत असताना आलेला तरूण मला बरोबर वाटला नाही. थॅक गाॅड तू निघून गेलीस. दुसर्या दिवशी तू पियानो न वाजायचं कारण शोधत होतीस ना? हा तरूण तुझ्याकडे येत होता. तुला मदत करायला. बहुतेक ती wire पण त्यानेच काढली होती. म्हणून मी त्याला अडवले'.
'पण मला कुणीच कसं दिसलं नाही?', तिलुने विचारलं.
'Training मध्ये होता staff', लुनाने सांगितले.
'आणि तू? तू नाही का गेलीस training ला?'
'ह्या! मला काय कोण training देणार? मला त्यांच्यापेक्षा चांगलं माहिती आहे सगळं!', लुना चिडली होती.
'एकदा का मी jade ला माझ्या आईकडे सोडून आले की बघतेच मी सर्वांना. तुला आवडेल माझ्या jade ला भेटायला?'
'हो. चालेल ना', तिलु म्हणाली.
'5 वर्षांची गोड मुलगी आहे बरं माझी jade. तिला भेटून तुला खूप आनंद होईल'.
तिलुने यावर सौम्य हसून स्विकृती दर्शविली.

सूट भाग 7-
https://www.maayboli.com/node/68950

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके,
तर लुना भूत
आणि वादळात सगळं गेलं तीच विद मुलगी

_//\\_

Indians? Oscillating heads? >>> खूप हसलो हे वाचून.

OMG! She just looks like Jade!! >>> हे नाही समजले. त्या मुलीचे नाव जेड ना? मग ती जेडसारखीच दिसणार ना?

अजूनही कथेच्या नावाची लिंक लागत नाहीये पण मस्त चालू आहे कथा.

>>OMG! She just looks like Jade!! >>> हे नाही समजले. त्या मुलीचे नाव जेड ना? मग ती जेडसारखीच दिसणार ना?
माधव, जेड जन्मल्यावर आणि तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ती 'Jade' सारखी दिसत असल्यामुळे तिचं नाव जेड ठेवलं, असं लुना सांगतेय.
Jade हा एक precious stone आहे. त्याला powerful healing properties असल्यामुळे परदेशस्थांमध्ये याचं बरंच प्रस्थ आढळलं.
बदल करत आहे. सांगितल्याबद्दल धन्यवाद!