सूट - भाग 5

Submitted by चिन्नु on 30 January, 2019 - 22:22

सूट भाग 4-
https://www.maayboli.com/node/68917

हॅलो रूम सर्व्हिस? मला पिझ्झा ऑर्डर करायचाय. आताच करता येत नाही म्हणजे? ओह, 11.30 नंतर होय. हो, तसा उल्लेख आहे मेनू मध्ये, पण मला ब्रेकफास्ट मेनू मधलं ऑर्डर करायचे नाहीये. मला बरं नाही-'
तिकडून फोन कट झाला होता.
तिलुला बरं वाटत नव्हतं. ब्रेकफास्ट मधले तेच ते options try करून तिला कंटाळा आला होता. त्यात ती बर्याच उशीरा उठली होती.
'काय झालं? बरी आहेस का?', लुनाने काम थांबवून विचारलं.
'नाही ना. डोकं दुखतंय. त्यात ही रूम सर्व्हिसवाली बाई माझी order घेत नाहीये. लंच मेनू 11.30 नंतर म्हणे. अजून चांगली 20 मिनिटं आहेत त्याला. माझा भूकबळी जाणार तोवर.', तिलु वैतागून म्हणाली.
'May I? ', लुनाने फोन हातात घेतला.
'हो. जसं काही हीचं ऐकून घेणार आहेत', तिलुने मनात म्हटलं. तोवर रूम सर्व्हिसवालीबाई आणि लुना मध्ये जुंपली होती.
'हे पहा रोज आम्ही ब्रेकफास्ट ऑर्डर करतो पण आज पिझ्झा हवाय. तसंही तुम्ही पिझ्झा तयार करून आणेपर्यंत लंच टाईम होईलच. Why do you want lose customer just for few minutes? '
तिकडून नरमाईचे सूर ऐकू आलेत.
'Done!', फोन ठेवून लुना विजयी मुद्रेने म्हणाली. तिलुला ती देवासमान भासली!
'धन्यवाद लुना'.
'तुला काही मेडिसीन हवं असेल तर रिसेप्शनवर सांग. तो माणूस मदत करू शकतो', लुना कोर्या चेहरा ठेवून बोलत होती.
'नको. थोडं झोपलं की बरं वाटेल मला', तिलु म्हणाली.
'आज पियानो session नाही का मग?', लुनाने हसून विचारलं.
'तुला हसायला पण येतं? आणि तू चक्क जोक केलास?', तिलु हसून म्हणाली.
'याह sometimes, तू विश्रांती घे'. लुनाचा चेहरा परत गंभीर झाला.
तिलु तिला न्याहाळत होती. उंच, गोरी, नाकेली, पिंगे केस..किती छान आहे ही दिसायला! थोडं हसली की छान दिसते, पण फार कमी हसते ही. आणि ती भर्रकन निघून गेली, नेहमीप्रमाणेच.
*****
तिलुला आज दादाची खूपच आठवण येत होती. त्या विकेंडला संजूदादा आला होता. दादाचा मित्र. 'बाॅर्डर' मूव्ही बघायला निघालो. बसस्टॉपवर बस समोरून येत असतानाच दादानं भूक लागली आहे का असं विचारलं. तिलुने थोडीश्शी भूक आहे म्हणताच ती बस सोडून तडक समोरच्या रेस्टॉरंट मध्ये घेऊन गेला. तिच्यासाठी ऑर्डर केलेला उत्तप्पा समोर येताच त्याने त्याचे bite size चे तुकडे करून प्लेट तिलुसमोर ठेवली. 'खा बेटा!, काही घाई नाही. सावकाश होऊ दे'.
'अरे ती काय लहानसं बाळ आहे का तुकडे करून द्यायला? नशीब भरवत नाहीयेस!', संजू म्हणाला.
'अरे लहान बाळीच आहे ती माझी. आता आता पर्यंत माझ्या खांद्यावर बसवून फिरवायचो मी तिला', दादा मायेने म्हणाला.
काॅफी रिचवून तिन्ही बसस्टॉपकडे निघालेच होते. मध्येच संजू हा मी आलोच म्हणत गायबला आणि आईस्क्रीमचे कोन घेऊन परतला.
'एवढ्या थंडी मध्ये आईस्क्रीम?', तिलुला आश्चर्य वाटले.
'खाऊन तर बघ'. असं संजूने म्हणताच बस आली. घाई घाईत कोन वाटप झाले.
'चल आपण वर बसू', दादानं तिलुला खुणावलं. एका हातात कोन सांभाळत ते डबलडेकर बसच्या वरच्या भागात आले.
पहिल्या सीट वर बस काचेसमोर, मजा येते', असं म्हणून संजू आणि तो एका बाजूला आणि तिलु दुसरीकडे बसले. वरून बसच्या काचेतून समोर रस्ता स्पष्ट दिसत होता.
'काय झालं तिलु? आवडलं नाही का आईस्क्रीम? '
'दादा, मला चाॅकलेट फ्लेवर आवडत नाही', तिलुने कोन दाखवला.
'आण इकडे मला. हा रोलीपोली फ्लेवर मस्त आहे. आवडेल तुला'.
असू दे म्हणाल्यावरही दादानं बळेच त्याचा कोन तिच्या हातात दिला. संजूदादा तिकडून बस चालवण्याची समरसून अॅक्टींग करत होता. रस्त्यावरच्या दिव्यांनी मुंबई उजळून निघाली होती.
सूट भाग 6-
https://www.maayboli.com/node/68942

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॉटेल suite मधे बसून आठवणीत रमणे हे कथानक आहे का?
मला आधी भयकथा किंवा पुनर्जन्मकथा आहे वाटलेलं.

अरर, मी तर पूर्ण गंडलो म्हणायचं मग!
स्वीट असा उच्चार होतो लेखक महोदय, तसं काही असेल तर!

थीम लक्षात येत नाहीये, पण चांगल लिहीताय >> मला पण हॉरर वाटली होती , त्या चर्च चा उल्लेख झाला तेन्व्हा

थीम लक्षात येत नाहीये, पण चांगल लिहीताय >> मला पण हॉरर वाटली होती , त्या चर्च चा उल्लेख झाला तेन्व्हा >>>+१

लिहिताय चांगलं पण ५ भागामधे तेच तेच सुरु आहे.
कथा पुढे सरकत नाहीये. की अ‍ॅमीने लिहिल्याप्रमाणे हॉटेल suite मधे बसून आठवणीत रमणे हीच कथा आहे.
मलाही हॉरर काही असेल किंवा तिलुमधे काही डीफेक्ट आहे असं वाटलं होतं.

> तिलुमधे काही डीफेक्ट आहे असं वाटलं होतं. > या भागात तर ती घरच्यांनी अती लाड/पॅम्पर केल्याने मंद 'झाली' आहे असं वाटलं Lol

<<थीम लक्षात येत नाहीये, पण चांगल लिहीताय >> मला पण हॉरर वाटली होती , त्या चर्च चा उल्लेख झाला तेन्व्हा >>>+१ - +१००

शीर्षक "सूट" आहे
आणि ते परफेक्ट आहे असे माझे मत आहे.

माझ्या मनात २ऱ्या भागावेळी डोकावलेला स्पॉयलर म्हणजे हिचा नवरा वेळ जाण्यासाठी / घालवण्यासाठी जी काही परमिशन देईल काहीही करायला (नोकरी/छंद जोपासणे/ क्लासेस घेणे असे काहीही) त्यानंतर कथानक कदाचीत असे वळण घेईल की आता जो रिकाम्या वेळेत हिला काय करू असा प्रश्न पडतो आणि नवऱ्याची वाट बघण्या व्यतिरक्त काहीच काम नाही ती परिस्थिति पुढे उलट होवून हीच इतकी बिझी आणि पॉप्युलर होईल की नवऱ्याला हिची वाट पहात रहावे लागेल.

ही एक पॉझिटिव्ह स्त्रीकथा बनु शकेल आणि ह्याच्यात दुसरा भाग शक्य आहे तो जरा निगेटिव्ह आहे ज्यात हिला जी मोकळेपणाने वागण्याची सूट मिळेल आणि हिचा भिडस्त स्वभाव जावून जीवन जगण्याचा बिनधास्तपणा येईल त्या वळणावर हिला कोणी आवडु लागेल आणि नवऱ्याच्या नकळत एक विबासं सुरु होईल. सरते शेवटी त्याला ही सूट दिल्याचा पश्चाताप होईल.

येत्या काही भागात नक्की कथानक स्पष्ट होईलच. तोवर आपण लेखकास नाउमेद न करता सबुरीने घेणे हेच श्रेयस्कर !

नाउमेद नाही करत पण तुम्ही म्हणताय त्या दोन शक्यता यायला २०-२५ भाग लागतील. तर लेखकांना फक्त असं सांगणं आहे की कथेत ट्विस्ट (जर काही असेलच तर) लवकर येउद्या. ५ भागातही तुलुचं वागणंच आलंय. ह्या भागात तेवढं दादाबद्दल आलंय. त्यावरुन मला परत तिलु डीफेक्टीव असेल असं वाटलं. Happy

सुरुवातीचे 3 भाग वाचेपर्यत कथेंबद्दल उत्सुकता होती, पण आता 5व्या भागातही हाऊसकिपिंग, हॉटेल रूम आणि 'मंद' तिलू यापुढे कथा सरकली नाही. आता 6व्या भागात काही घडलं नाही तर शुभेच्छा आणि बाय

तिलुमधे काही डीफेक्ट आहे असं वाटलं होतं.>>>> डिफेक्ट? नाही नाही गं. डिफेक्टस आहेत. पहिल्या भागापासूनच नायिका डिफेकटीव पीस वाटते आहे. खूप सुंदर एवढा एक प्लस पॉईंट दिसला. पियानो वाजवता येतो म्हणून अजून एक गुण दिला असता, पण प्लग पिन काढली आहे हे सुद्धा न कळल्यामुळे मायनस पॉइंट

विनिता, स्वस्ति,कोमल, ॲमी, मेघना, अज्ञातवासी, योगेश, नमोकर, मीरा.. खूप खूप धन्यवाद!
योगेश, तुम्ही तर पुढच्या कथा लिहायला बेगमीच दिलीत! खरंच खूप छान वाटलं.
पुढचा भाग पोस्ट केलाय.