ग्रामीण बोली भाषांतील शब्द.

Submitted by कोदंडपाणी on 30 January, 2019 - 06:04

शालींच्या मैत्रचे भाग वाचताना त्यातील पात्रांच्या तोंडात अनेक ग्रामीण शब्द वाचले. काही मजेशीर वाटले. प्रत्येक प्रांताची जशी आपली एक खाद्यसंस्कृती असते तशी एक भाषाही असते. त्यातल्या त्यात ग्रामीण भाषा तर अतिशय गोड असते. त्यात वापरले जाणारे शब्द रोजच्या व्यवहारात वापरले जात असले तरी ते प्रमाण मराठी भाषेत नसल्याने सहसा लिखानात येत नाही. शहरांमधे तर ते बोलण्यातही येत नाही. तर असेच वेगवेगळ्या प्रांतातील ग्रामीण भाषेतील मजेदार, वेगळे शब्द वाचायला मजा येईल. सांगली, कोल्हापुर, नागपुर, नगर, कोकण आणि महाराष्ट्रातील अनेक भागात वेगवेगळे शब्द वापरले जातात ते येथे लिहिले तर सर्वांना ते वाचण्यातला आनंद मिळेल तसेच त्यांचे अर्थही कळतील. उदा. आमच्या जुन्नर भागात वापरले जाणारे काही शब्द:

यळोमाळ: येथे तेथे किंवा दिवसभर
कव्हर: किती वेळ
उलसक किंवा उलीशीक: अत्यंत थोडे.
फिंद्री: खोडकर मुलगी
पाठ: शेळी

तुमच्याकडेही असे काही शब्द असतील तर अर्थासहीत व जमल्यास वाक्यासहीत येथे लिहा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@आसा
जुन्नर - मंचर भागात “ वला “

काहीय सान्गत्याय वले तुम्हीतं, कोनच नाय म्हन्ती वले आम्च्याकं आसं येऊनजाऊन वले वले Wink Wink

कित्येकदा येरवाळी शब्द ऐकतो पण मुळ शब्द आज कळाला.
वेळेवर=येळेवर=येळंवर=येरवळ. छान आहे हे.
धन्यवाद टोच्या!

काहीय सान्गत्याय वले तुम्हीतं, कोनच नाय म्हन्ती वले आम्च्याकं आसं येऊनजाऊन वले वले
>>>>> माझे २-३ मित्र वला वला च करतात Wink

वले आजच ऐकतोय

आबा कायपण नको सांगु वला तू.
आमच्या जुन्नर भागात सर्रास आढळतो हा शब्द.
म्हटला तर काहीच अर्थ नाही या शब्दाला किंवा मग वाक्या पाहुन अर्थ घ्यायचा.
‘नाही रे’ आणि ‘नाय वला’ सेम आहे.

वले आजच ऐकतोय

तुम्ही आणि मी जोडीदार असतो तर जाऊदे वला
आणि
तुम्ही आणि मी जोडीदारनी असतो तर जाऊदे वली

कोल्हापूर भागात
वज्ज / वझं : ओझं /वजन
चावी : पाण्याचा नळ
पण मी कोकणात पण ऐकलं आहे बऱ्याच बायकांकडून.
गावच्या सार्वजनिक नळाला साधारणपणे चावी म्हणत असावेत ..असा माझा समज आहे .

कोकणात
फाटी : चुलीत जाळण्यासाठी घालायची लाकडं (लाकूडफाटा )
बोजा : भार /वजन
भुशाड : घराभोवतीचं नको असलेलं झुडुपांचं /गवताचं जंगल
मासक्या : माश्या (माशी चं अनेकवचन )

कोकणात
पाकाट धरणे : पाठीस सांगणे
झिमटणे : गाठणे / पळताना पकडणे
ती मला झिमटायला आली .. पकडायला आली
कंमेंट्स मध्ये मस्त नवीन नवीन शब्द आणि संदर्भ कळतायत ! छान धागा

लग्नासंदर्भातील आठ्वणारे काही शब्द

झोळना
परण्या
धेडवा
मळवट
मांडवपरातनी
मांडवडघळ्या
वरओवाळनं
मुर्‍हाळी

आमच्याकडची/ आमच्यातली मंगलाष्टकं गाण्याची पद्धत फारच भारी आहे. Wink @शाली @ कोदंडपाणी बरोबर ना

पाचच मंगल म्हणायची पद्धत आहे आमच्याकडे

कोकणातलं फाटी त्याच अर्थाने होतं आमच्याकडे.

फाट्याला जाणं हे एक कामच असायचं
मग नंतर इष्टूल आले
आणि आता पंधरा वीस वर्षं तर घॅसच आहेत

पाचच मंगल म्हणायची पद्धत आहे आमच्याकडे>>> अगोदर होती. आता एखादेच मंगल पारंपारीक घेऊन बाकीची सगळी (म्हणजे कितीही) मुलीची लाडकी मावशी किंवा मुलाची हुश्शार आत्या या स्वरचित मंगलाष्टके म्हणतात. कितीही वेळ आणि कोणत्याही सुरात. बरं, पाहुण्यांना अगोदरच जेवायला घातलेले असते त्यामुळे ती चिंता नाही. Lol
पुर्वी सर्वप्रथम मुहुर्तमेढ रोवली जायची. तिला औजारे बांधली जायची. दारात मांडव पडायचा, त्यासाठी मांडवपरातण्या मिरवत आणायच्या. नवरदेव घरोघरी जाऊन दुध शेवया खाऊन यायचा. कलवऱ्या मिरवायच्या. मांडवात रुखवत मांडला जायचा. लग्नानंतर(च) शेतात पंगत बसायची. बुंदी, शाक असला मेन्यु असायचा. रात्री धेडवा नाचवायचा. त्यात दोन तिन जन पितामह असणारच. मग धेडवा नाचवायला धमाल यायची. नुसती मज्जा!
परत एकदा लग्न करावे असं वाटायला लागलय आता हे सर्व आठवून. Lol

आमच्या सातारच्या पूर्व भागातील काही शब्द
एखादा मुलगा मोठ्यांचे ऐकत नाही - लयच रगील हाय राव...
खूप खूश होणे- नादवणे
पातेले- तप्याली
वयात आलेला पण काम न करता निवांत फिरणारा- वळू हाय निवांत खाऊन पिऊन
पळून जाणे - टांग मारणे
दाखव बरं - दाव बर
धुरळा - फुफाटा
शेजारी - बगलत

धेडवा वेगवेगळ्या भागात वेगवेगळा नाचवतात.
आमच्या भागात अंगणात बैठक टाकतात व त्यावर नवरा नवरी बसते. घरातील उत्साही सदस्य एका हातात दिवटी किंवा मशाल व दुसऱ्या हातात देव किंवा फक्त सुपारी (कुणी पितामह असले तर) ठेवलेली ताम्हण घेऊन स्वत:भोवती गरगर फिरत बेभान नाचतात नाचतात. सुफी स्टाईल डोळ्यापुढे आणा. मध्यरात्रीनंतर नवरा नवरी पेंगुळलेले असतात. वडीलधारी दमुन लवंडलेली असतात आणि पितामह लोक फुल्ल चार्ज असतात. त्यामुळे धमाल खरी मध्यरात्रीनंतरच. Wink

. घरातील उत्साही सदस्य एका हातात दिवटी किंवा मशाल व दुसऱ्या हातात देव किंवा फक्त सुपारी (कुणी पितामह असले तर) ठेवलेली ताम्हण घेऊन स्वत:भोवती गरगर फिरत बेभान नाचतात नाचतात

भरलेले हंडे दातांनी उचलायचे हे राहिले की शाली

लग्नात बुंदीचं जेवण म्हणजे कार्यमालक लईच तालेवार असं गणित असायचं माझ्या लहानपणी .
आमटी भात हे सर्रास जेवण असायचं
शिवाय तांब्या पितळी आपली आपण न्यायची

लग्नात बुंदीचं जेवण म्हणजे कार्यमालक लईच तालेवार असं गणित असायचं माझ्या लहानपणी .
आमटी भात हे सर्रास जेवण असायचं
शिवाय तांब्या पितळी आपली आपण न्यायची

गावी गेलो की मी ही पितो अजुन पितळीतुनच चहा.
प्रसाचरक हंड्यांचे राहीलेच. आपण या सगळ्या गोष्टी विलुप्त झाल्यात अशा पध्दतिने बोलतो आहोत पण खरं तर यातल्या कितीतरी गोष्टी अजुनही आहेत गावाकडे. आपण त्या वातावरणातुन बाहेर पडल्याने आपल्याला दिसत नाही इतकेच. अर्थात बदल मोठ्या प्रमाणावर झालाय हे खरे आहे.

'मेकुड' हा शब्द कुणीच नाही दिला येथे. हा प्रकारही बंद झालाय आता पण पुर्वी सर्रास असायचा.
आता आता हे सॉल्टेट चॉकलेटचे फॅड आलय. आम्हाला लहानपणीच माहीत झाले होते की किंचीत खारट चॉकलेट जास्त चांगलं लागतं.
Rofl Rofl Rofl

आमच्याकडे ' म्हणजे कोणत्या प्रांतात/ भागात हें कळणंही महत्वाचं.
>>>> सॉरी भाऊ, ते वला- वले च्या नादात हे राहीलचं

पुणे जिल्ह्यात पुरंदर- बारामती तालुक्यात

असाचं एक शब्द - पाक
माळशिरस तालुका जिल्हा सोलापुर

ह्या टोकापासून पाक त्या टोकापर्यंत आपलचं वावार हाय

पाहुण्यांनी त्याला पाक कंगाल केला

१. दोडा: म्हाताऱ्या बायकांच्या बोलण्यात विरामचिन्हांसारखा 'दोडा' येतो. 'द्वाडा'चा अपभ्रंश. दमांच्या भोकरवाडीतील सुताराची आन्शी नाना चेंगटाला कवा कवा दोडा म्हणती. दमा आमच्या इंदापूरशेजारील अकलूजचे.
"कुटला दोडा शाळंत जातूय. नुसता खायला कहार हाय दोडा.'
२. ठेपा: प्लान, ठरवलेली गोष्ट, उसने घ्यायचे पैसे, व्यवस्था
'अरे काय पुस्तकाचा ठेपा झाला का?'

मालवणी भाषेमध्ये देवरणो/देवरना असा काहीसा एक शब्द आहे. देवरना म्हणजे रानात जमिनीची मोजणी करून हिस्से दाखवण्यासाठी माध्यम दगड एकमेकांवर रचून उभी केलेली खूण.
काहीवेळा हा शब्द एखाद्या आळशी माणसासाठी देखील वापरतात जसे 'देवरण्यासारखो काय बसलंहस?'

Pages