Submitted by मन-कवडा on 31 March, 2009 - 01:22
फक्त कोल्हापुरचे असे काही विशेष शब्द आहेत आणि अतिशय फेमस आहेत.
त्यासाठीचा हा शब्दकोश!!!
कृपया, फक्त सेंसाँर्ड शब्द आणि त्यांचे अर्थ [आँप्शनल] सुचवावे!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लइ उशीर - म्हणजे खूप लवकर
लइ उशीर - म्हणजे खूप लवकर किंवा खुप वेळापुर्वी
डांब म्हणजे खांब - आणि अनेकवचन 'डांब्स'
लै वांड - म्हणजे smart किंवा over smart
अनेकवचन 'डांब्स' >> डांबावर
अनेकवचन 'डांब्स' >>
डांबावर लटकून.. नेहेमी वापरतात.
माझा कोल्हापुरात राहणारा चुलत
माझा कोल्हापुरात राहणारा चुलत भाऊ माझ्या ताईला म्हणे कि आमच्याकडं ये की आता तुझ्या मिष्टरास्नी घेऊन... वय बर्षे १३....
जिजाजींच्या चक्कीत जाळ..
नंतर आम्ही जिजुला चिडवत होतो.. काय मिष्टर कसं काय.. कोल्लापुरास्ला जायाचं का?
अजुन एक आठवला.. वाक्यप्रचार..
अजुन एक आठवला.. वाक्यप्रचार.. "ते तर्राट गेलं".. "ते ८० नी गेलं"व म्हणजे तो जोरात पळाला

अडग्या टाळक्याचं म्हणजे वेडा किवा अडाणी
लइ उशीर = उश्शेर
लइ उशीर = उश्शेर
ईस्स्स्स्स्स्स्स घंतार्डा =
ईस्स्स्स्स्स्स्स घंतार्डा = ईईईईई घाणेरडा...
चिन्गुडी .. तुमी बी
चिन्गुडी :हहगलो:..
तुमी बी कोल्लपुरच्या नव्ह का ? मग हिकड बी डोकावुन जावा वाइच
http://www.maayboli.com/node/1660
म्हापूर ... महापूर म्हसरं
म्हापूर ... महापूर
म्हसरं .... म्हशी
घंताडा
घंताडा
केदार... गीलो बगा.. तिकडबी
केदार... गीलो बगा.. तिकडबी डोकुन...
कोळसा ओढणे - कोणतिहि गोश्ट
कोळसा ओढणे - कोणतिहि गोश्ट आधि हो म्हणुन नन्तर करणे
सांगली आकाशवाणीवरील एक
सांगली आकाशवाणीवरील एक जाहीरातः ( मी ल्हान असताना लागायची सकाळी. आता लागते का माहीत नाही.. )
रामराम पाटील.
रामराम. सखू च्या टाक जरा.
नगं.
का वो? अवो, सुवासिनीनी कुकवाला आन मर्दानी च्याला नगं म्हनू ने.
व्हय, पन आमी न्हेमी कडक आन लज्जतदार मगदुम च्याच पितो.
आन आमी काय ऊन पानी पितो व्होय? आमी मी आमच्या आबा आज्ज्यापास्नं मगदुम च्याच पितो!
आस्सं? मग होऊन जाऊ द्या!
आत्ता कसं बोललात!
बल्ब ला बल आणि ट्यूब लाइट ला
बल्ब ला बल
आणि
ट्यूब लाइट ला पाइप किंवा पायपा
जागो, भारी अॅड होती ती
जागो,
भारी अॅड होती ती
फिनोलेक्स ची पण असायची १
फिनोलेक्सन आणल पाणी, शेतं पीकली सोन्यावाणी....
बल्ब ला बल >> किंवा
बल्ब ला बल >> किंवा गोळा
ट्यूब लाइट >> कांडी, नळी
'हुडकणे'- शोधणे आला की नाही
'हुडकणे'- शोधणे आला की नाही अजुन?
"कवाचा हुडकायला लागलोय तुला...."
कोकणात गुरांच्या गोठ्याला वाडा म्हणतात. आमच्या एक शिक्षिका कोल्हापूरच्या होत्या. त्या कोकणात आल्या तेव्हा इथले लोक म्हणायचे वाड्यातुन आलो, आणि हातात शेणाची टोपली! त्या गोंधळुन जायच्या....वाड्यातुन आले,आणि हातात शेण कसे??
काय मर्दा ....सोड रे.....काय
काय मर्दा ....सोड रे.....काय माल होता....फोड रे.....नाद नाही करायचा !
अरं बाटग्या...
अरं बाटग्या...
कोल्हापुर ला एका फॅमिली
कोल्हापुर ला एका फॅमिली फ्रेंड कड़े फोन केला की नेहमीची वाक्यं आहेत..
काय बर्र हाय नव्हे??
गमतयं नव्हे अम्रिकेत?.. म्हणजे .. US मधे वेळ जातोय ना?
हीक्डं येन्या चा कदी ईचार हाय? .. म्हणजे... कोल्हापुर ला कधि येणार आहात?
एक से एक असतात वाक्यं....
बाटग्या >> लै भारी... रुतु,..
बाटग्या >> लै भारी...
रुतु,..
हा कोल्हापुरी भाषेचा बीबी मला
हा कोल्हापुरी भाषेचा बीबी मला फार आवडतो.
विशेषत: पुण्यात या बाजाची बोली ऐकायला मिळत नाही.
इथे पुण्यात आमची संस्कृतोद्भव मराठी !
राजू शेट्टी आधी आमदार होते.
राजू शेट्टी आधी आमदार होते. मग खासदारकीला राहिले... तेंव्हा त्यांच्या जाहिरातीत त्यांचा फोटो आणि एकच वाक्य असायचं..
आमदार ?... अं हं खासदारच!
ते निवडणूक जिंकले आणि लगेच जाहिराती झळकल्या:
व्हय व्हय, पटलं पटलं, खासदारच !!
कोणी इंग्रजी फाडायला लागलं की
कोणी इंग्रजी फाडायला लागलं की राजाराम कॉलेजमधला हमखास शेरा " आयला झग्यातनं पडलयस क्काय ?
शिफ्फारस करु नगं"
गौरी.
अामच्यावेळी - इंग्रजाच इमान
अामच्यावेळी - इंग्रजाच इमान घरावर्न गेलं असल...
वड पाचची आणी हुंदे राडा, अशी
वड पाचची आणी हुंदे राडा, अशी स्लोगन वारणेला कॉलेजात असताना फेमस होती.
हुंदे राडा >>> हुंदे हा शब्द
हुंदे राडा >>> हुंदे हा शब्द आपल्या खेरिज कुठ अजुन तर ऐकायला मिळाला नाही.
नमस्कार... नवीन आहे मी
नमस्कार...
नवीन आहे मी कोल्हापुरात...
३-४ महिन्यांपूर्वीच लग्न झालाय...
मूळची नगरची असल्याने खूप शब्द नवीन होते... कळायचेच नाहीत सुरुवातीला
आता सवय झालीय...
एकदा साबांनी नवऱ्याला सांगितलं, अंगणातला दिवा काढ..
मला वाटला बहुतेक इथे रोज रात्री bulb काढून घरात आणत असतील आणि सकाळी परत लावत असतील...
नंतर कळल कि दिवा काढणे म्हणजे दिवा बंद करणे....
शिकरण म्हणजे आमरस हे सुद्धा आत्ताच कळाल...
(शिकरण म्हणजे केळे आणि दुध एवढंच माहिती होत...)
divaa kaaDh,
divaa kaaDh, shikaraN???
payalyaaMdaach aikal he.
ओळख ना पाळख अन लोकमान्य
ओळख ना पाळख अन लोकमान्य टिळक....
*वांडर *लय फुरफुरत होतं रे..
*वांडर
*लय फुरफुरत होतं रे.. गल्लीत आलेलं. एकटंच.. पोत्यात घालुन हाग्या मारला त्याला.
*"संज्याची बॉलींग रे.. असा बाद केला त्याला बघ.. मॅच सपेस्तवर परत आनलाच नाई कॅप्टननं तेला." ..... "बाद केला" चा हा एक अर्थ आहे...
* इ---स. इ----स. (लहान पोरं )
* अगायायायायायाया (सार्वजनिक)
Pages