आम्ही कोल्हापुरी

कोल्हापुरचे मायबोलीकर


मराठी साठी भांडणारा नेता हवाच..
पण स्वरूप्..कोणत्याही चळवळीची
सुरूवात आपल्या घरापासून करावी लागते.. 'मराठी वाचवा..'मराठी वाचवा..' किंवा 'मराठी माणसा जागा हो' अशा आरोळ्या ठोकणार्‍या या नेत्यांची मुले सध्या 'कॉन्व्हेंट' मध्ये शिकत आहे..त्यांनी आधी मुलांना मराठी माध्यमात टाकले तर मराठी अस्मिता जपणारे नेते आम्हालांही आवडतील...
समीर, नितीन यांचे स्वागत.. या मित्रांनो..रोज या.
-- सुभाष



स्वागताबद्दल धन्यवाद, सुभाष.
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे..... सुरुवात आपल्या घरापासुन करावी लागते. पण...
प्रत्येकाला वाटते शिवाजी जन्माला यावा पन तो दुसर्‍याच्या घरी, माझ्या नको, कारण तो त्रास कोण सहन करणार?
आयते काही मिळाले तर द्या, आम्ही भांडणार नाही.
"मी मराठी "च्या वादात राजकारण जास्त आहे, मराठी बद्दल चे प्रेम कमी आहे. तरीही त्याचे महत्त्व कमी होत नाही. उद्या मराठी शाळा शोधुन ही सापडणार नाही.
नेहमीच महाराष्ट्रावर सर्वांनी अन्याय केलाय. आणि याला आपलेच पुढारी जबाबदार आहेत. श्रेष्ठींच्या पुढे शेपुट पायात घालणारे जोपर्यंत या राज्यात आहेत तोपर्यंत हे असेच चालणार.
उद्या एखादा युपी - बिहारी माणुस आपला मुख्यमंत्री झाला तर आश्च्रर्य वाटायला नको.
आणि याला जबाबदार आपण आहोत, सो कॉल्ड व्हाईट कॉलर......
मतदानादिवशी सुट्टी चा उपभोग घेत कुठेतरी फिरायला जायचे आणि नंतर पाच वर्षे वांझोटा संताप करायचा..... काय उपयोग?



शुभ प्रभात कोल्हापूरकर,
संख्या वाढू लागली जणू. स्मित
झकास, दसर्‍याला जाणार आहेस का कोल्हापूरला?
गेलास तर कृपया, झेंडूच्या फुलाच्या राशीचे फोटो काढ.
आय ऍम बॅडली मिसिंग कोल्हापूर. जमलं तर मी ही चक्कर टाकेनच, पण अजून नक्की नाही.



सुप्रभात कोल्हापूरकर, स्मित
स्वरूप आम्ही येतच राहू आता.. स्मित
राज ठाकर्‍यांची चर्चा रंगल्ये. मला पण आवडतो राज ठाकरे.
पण काही काकी गोष्टीत त्याने उगाच इश्यू केले असं वाटतं मला. उदा. जया बच्चन. बंदी उठवल्यानंतर जी भाषणं झाली त्य बद्दल काही वाद नाही.. अफलातुन..



समीर,

राज ठाकरे जे काही करतोय सध्या ते कायम प्रसिद्धी च्या झोतात राहण्यासाठी. जीव ओतून (??) भाषणं आणि आंदोलनं करण्यामागं सुद्धा एक राजकारण आहे. शिवसेनेतून बाहेर पडून एक वेगळा पक्ष स्थापन करून देशात सर्व्हाईव्ह होणं म्हणजे खाण्याचं काम नाही हे राज जाणून आहे. शिवसेनेतून बाहेर पडताना ही तो योग्य ती वेळ आणि संधी पाहूनच बाहेर पडला. शिवाय जसं बालकथांमध्ये राजकुमाराला राक्षसाचा प्राण कशात आहे हे बरोब्बर ठाऊक असतं, तसं राजलाही देशाची शक्ती म्हणजे तरूणवर्ग, मग त्यांना आपल्याकडे वळवून त्यांच्याकडून देशकार्य (??) करून घेण्यात त्याचा हातखंडा आहे. त्यामूळे सध्या तो गाजतो आहे एकदम. त्याचा तडफदारपणा आणि परखड भाषा मला जाम आवडते. तसं तो जे काही करतो ते सर्वंच योग्य आहे असं नाही. पण तरिही मला तो खूप आवडतो.



मग आवडत नाही असं को म्हणालय दक्षिणा..
फक्त अती करु नये एवढाच मुद्दा आहे माझा.. मराठी माणुस पाय खेचण्यात पुढे आहे. आज उदो उदो करतील आणि मग शिव्या द्यायला पण मागे-पुढे बघणार नाहित.
बाकी कोल्हापूर्कर कुठे गायब झालेत?



दक्षिणा आणि समीर.....
राज जे बोलतो ते सर्वांनाच भावते कारण तो आपल्या मनातले बोलतो. आपण सामान्य माणसाला नेहमी एक डोके (दुसर्‍याचे) लागते ज्यावर आपण आपला सगळा भार टाकुन मोकळे होतो. आज जर राज ने हे केले नाही तर उद्या खरोखरच परिस्थिती गंभीर होईल. पण हे सगळे बिहारि, यु.पी. वाले ईथेच येऊन दादागिरी का करतात? म्हणजे नक्कीच आपले काहीतरी चुकत आहे, असे नाही का वाटत?
कालच्या (रविवार) लोकसत्ता मध्ये राजचे पत्र आले आहे ते वाचा.



>>मराठी माणुस पाय खेचण्यात पुढे आहे.
या वाक्याला माझा जोरदार आक्षेप.

राज ठाकरे आणि मराठी/अमराठी वादासाठी इकडे जरुर भेट द्या :
http://www.maayboli.com/node/2025

बाकी लोक्स काय म्हणताय?
निवासी कोल्हापुरकर जरा नवरात्राचे अपडेटस द्या पाहू!



होय नितिन, जे राज करतोय ते करायलाच हवय. नाहीतर खरच डोक्यावर बसतील परप्रांतीय. पण मला काही गोष्टींमध्ये थोडा व्यक्तिगत रोश वाटला, म्हणुन मी तसं लिहिलय. बाकी तो जे बोलतो ते मनातलंच बोलतो आणि बर्‍याच भाषणांमधे त्याने पुराव्यांचाही खुलासा केलेला आहे. तश्या व्यक्तिमत्वाची आपल्याला खरच गरज आहे.
पत्र मी नक्की वाचीन नितिन..



अरे वा! चांगलीच जमलिए कोल्हापूरकरांची (राजप्रेमींची) मैफिल स्मित



..माझे असे म्हणणे आहे मित्रांनो..
परप्रांतीयावर आपण हल्ले केल्यास आपले
मराठी बांधव जे इतर राज्यात नोकरी - व्यवसायानिमित्त राहतात त्यांना पण त्या राज्यातल्या लोकांचा रोष पत्करावा लागणारच..त्यांच्या द्रुष्टीने आपण परप्रांतीयच .. मग इकडची परप्रांतीय लोक तिकडे जाणार.. तिकडची महाराष्ट्रीयन इकडे येणार्..मग अर्थ काय
उरला एकसंध भारत देशाचा ?
माझ्या मते बिचार्‍या लालूला छटपूजा करू
द्यायला हवी होती..आंघोळ न करताच
बिचारा पुजेला आला होता..



सुभाष,
राज चा लढा हा परप्रांतीयांच्या दादागिरी आणि त्यांच्या इथल्या वास्तव्या विरूद्ध आहे. आपले म्हणजे मराठी लोक इतर प्रांतात असले तरिही तिथले बनून राहतात, पण हे लोक इथे राहून तिथल्यासारखे वागतात.



आणि मुख्य म्हणजे झुंडशाही करुन इथल्या मराठी माणसावर दादागिरी करतात.....
आहे का टाप मराठी माणसाची युपी मध्ये राहुन तिथल्या लोकांविरुद्ध काही बोलण्याची?
ते लोक घेउ देतील का राज ला बिहार मध्ये सभा?
पण आमचे आदरणीय मुख्यमंत्री लालुसाठी पायघड्या घालतायत!

>>आंघोळ न करताच
बिचारा पुजेला आला होता.. <<
तो असाही कधी आंघोळ वगैरे करत असेल हे पटायला जरा अवघडच आहे फिदीफिदी



स्वरूप हाहा



एवढा द्वेष बघुन बरं वाटलं स्वरूप आणि परिस्थिती तशीच आहे..
छट पुजेला विरोध केला त्या बद्दल माझं काही म्हणण नाही.
फक्त एवढच वाटत की जे राजला साध्य करायचय त्यात त्याला यश मिळो, अर्थात आपल्या सगळ्यांचा पाठिंबा आवश्यक आहे त्यासाठी.



समीर, हा काही द्वेष नाहिये... ही काळजी आहे जिथे आपण जन्मलो, जिथे शिकलो-वाढलो, जिथे रहातोय त्या आपल्या राज्याबद्दल वाटणारी....

विरार - चर्चगेट लोकलमधला गर्दीच्या वेळचा एक प्रवास, समाजवादी पक्षाच्या सभेतील टिपीकल उत्तर भारतीय नेत्याच टिपीकल उत्तर भारतीय भाषण किंवा अगदी गेला बाजार पुण्या-मुंबईच्या डीवाय किंवा भारती सारख्या कोणत्याही कॉलेजच्या कॅम्पस मधुन एक चक्कर....

यातली एक जरी गोष्ट केली तरी पटेल कोणालाही की ही 'काळजी' करायची गरज का आहे म्हणुन!



अरे स्वरूप, विराट - चर्चगेट किंवा पुण्या - मुंबईतले कॉलेज कशाला? अगदी सातार्‍यातील के.बी.पी. किंवा कोल्हापुरातले सायबर घे...
या परप्रांतीय पोरांनी काय वाट लावलिय ते बघा....
माजुर्डे साले.........



नमस्कार कोल्हापूरकर्स,.. स्मित

स्वरूप द्वेष परप्रांतीयांबद्दल म्हंटलं मी.
अजुन एक म्हणजे विरारच्या आधी सर्व पहाटेच्या वेळेची दुधवाल्यांची दादागिरी.. अरेरे



))तो असाही कधी आंघोळ वगैरे करत असेल हे पटायला जरा अवघडच आहे (( स्वरूप.. त्याची तुला खरी बातमी त्याचे निकटवर्ती सांगतील (राबडी नव्हे) आंघोळ न केल्यामुळे त्याच्या अंगाला घाण वास येत असणार..
नितिन,
सायबर मध्ये काय चालले आहे हे जरा खुलासेवार सांग्..आपण दोघे प्रत्यक्ष जाऊन बघु व त्यानंतर काय करायचे ते मी तुला सांगतो..
सुभाष



राम राम गाववाले!
दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा स्मित
मी पुण्यातच असणार दसर्‍याला. दिवाळीला जाइन कोल्हापुरला.
चर्चा ज्वलंत विषयावर सुरु आहे की.
मी ही लिहिन पण वेळ सध्या नाहिये.



सर्व करवीरवासियांना दसर्‍याच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! स्मित

सोनं घ्या... सोन्यासारखे रहा !

dasara.jpg



सर्व कोल्हापूरकर्स, स्मित

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Dasara.jpg



सर्वांना दसर्‍याच्या शुभेच्छा..
सीमोल्लंघनादिवशी सीमांचा वाद नको भावा. बाकी माज , गलिच्छ्पणा वगैरे कोण्या एका प्रांताची मक्तेदारी नाही आहे. आपल्या कडे पण ही पिकं प्रचंड प्रमाणात येतात.
कोल्हापुरातच (किंवा प्रत्येक गावात) बर्‍याच ठिकाणी हे सर्व होलसेल मध्ये मिळेल.

||||||||पु||||||||ष्क||||||||||र|||||||||||||||||||||||||||
काय डेंजर वारा सुटलाय
डोस्क्यात कचरा, धूळ धूळ डोळ्यात...



तुम्हाला सर्वाना पण विजयादशमीच्या लाखो शुभेच्छा!



"मायबोलीवाले ने हितगुज दिवाली अंक में लिखना चाहा, तो उसे क्या मिला ? तारीख.... लिखने के लिये ढेर सारे विषय होते हुए जब मायबोलीकर सिर्फ़ सोच में डूबा रहा, तो उसे क्या मिला ? तारीख ! तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख ! मायबोलीकर ने संपादकों के दर पे दस्तक दी, तो उसे क्या मिला ? सिर्फ़ एक तारीख !"
"एऽऽऽऽ सायडी-सनी, एक तारीख नाही बे, १५ तारीख.... १५ ऑक्टोबर ! समझा क्या ? एवढे सगळे विषय आहेत... तर लवकर लिही आणि धाडून दे ते लिखाण दिवाळी अंकाच्या संपादकांकडे."
....
मंडळी, तुम्हीसुद्धा आता घाई करायला हवी.