कोल्हापुरी पेशल शब्दकोष

Submitted by मन-कवडा on 31 March, 2009 - 01:22

फक्त कोल्हापुरचे असे काही विशेष शब्द आहेत आणि अतिशय फेमस आहेत.
त्यासाठीचा हा शब्दकोश!!!

कृपया, फक्त सेंसाँर्ड शब्द आणि त्यांचे अर्थ [आँप्शनल] सुचवावे!!!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लइ उशीर - म्हणजे खूप लवकर किंवा खुप वेळापुर्वी Happy

डांब म्हणजे खांब - आणि अनेकवचन 'डांब्स'

लै वांड - म्हणजे smart किंवा over smart

माझा कोल्हापुरात राहणारा चुलत भाऊ माझ्या ताईला म्हणे कि आमच्याकडं ये की आता तुझ्या मिष्टरास्नी घेऊन... वय बर्षे १३.... Uhoh जिजाजींच्या चक्कीत जाळ.. Biggrin नंतर आम्ही जिजुला चिडवत होतो.. काय मिष्टर कसं काय.. कोल्लापुरास्ला जायाचं का?

अजुन एक आठवला.. वाक्यप्रचार.. "ते तर्राट गेलं".. "ते ८० नी गेलं"व म्हणजे तो जोरात पळाला Rofl
अडग्या टाळक्याचं म्हणजे वेडा किवा अडाणी Biggrin

सांगली आकाशवाणीवरील एक जाहीरातः ( मी ल्हान असताना लागायची सकाळी. आता लागते का माहीत नाही.. )

रामराम पाटील.

रामराम. सखू च्या टाक जरा.

नगं.

का वो? अवो, सुवासिनीनी कुकवाला आन मर्दानी च्याला नगं म्हनू ने.

व्हय, पन आमी न्हेमी कडक आन लज्जतदार मगदुम च्याच पितो.

आन आमी काय ऊन पानी पितो व्होय? आमी मी आमच्या आबा आज्ज्यापास्नं मगदुम च्याच पितो!

आस्सं? मग होऊन जाऊ द्या!

आत्ता कसं बोललात!

Happy

जागो,
भारी अ‍ॅड होती ती Happy
फिनोलेक्स ची पण असायची १
फिनोलेक्सन आणल पाणी, शेतं पीकली सोन्यावाणी....

'हुडकणे'- शोधणे आला की नाही अजुन?

"कवाचा हुडकायला लागलोय तुला...."

कोकणात गुरांच्या गोठ्याला वाडा म्हणतात. आमच्या एक शिक्षिका कोल्हापूरच्या होत्या. त्या कोकणात आल्या तेव्हा इथले लोक म्हणायचे वाड्यातुन आलो, आणि हातात शेणाची टोपली! त्या गोंधळुन जायच्या....वाड्यातुन आले,आणि हातात शेण कसे?? Happy

कोल्हापुर ला एका फॅमिली फ्रेंड कड़े फोन केला की नेहमीची वाक्यं आहेत..

काय बर्र हाय नव्हे??
गमतयं नव्हे अम्रिकेत?.. म्हणजे .. US मधे वेळ जातोय ना?
हीक्डं येन्या चा कदी ईचार हाय? .. म्हणजे... कोल्हापुर ला कधि येणार आहात?

एक से एक असतात वाक्यं....

हा कोल्हापुरी भाषेचा बीबी मला फार आवडतो.
विशेषत: पुण्यात या बाजाची बोली ऐकायला मिळत नाही.
इथे पुण्यात आमची संस्कृतोद्भव मराठी !

राजू शेट्टी आधी आमदार होते. मग खासदारकीला राहिले... तेंव्हा त्यांच्या जाहिरातीत त्यांचा फोटो आणि एकच वाक्य असायचं..

आमदार ?... अं हं खासदारच!

ते निवडणूक जिंकले आणि लगेच जाहिराती झळकल्या:

व्हय व्हय, पटलं पटलं, खासदारच !!

नमस्कार...
नवीन आहे मी कोल्हापुरात...
३-४ महिन्यांपूर्वीच लग्न झालाय...
मूळची नगरची असल्याने खूप शब्द नवीन होते... कळायचेच नाहीत सुरुवातीला
आता सवय झालीय...
एकदा साबांनी नवऱ्याला सांगितलं, अंगणातला दिवा काढ..
मला वाटला बहुतेक इथे रोज रात्री bulb काढून घरात आणत असतील आणि सकाळी परत लावत असतील... Uhoh
नंतर कळल कि दिवा काढणे म्हणजे दिवा बंद करणे....

शिकरण म्हणजे आमरस हे सुद्धा आत्ताच कळाल... Happy
(शिकरण म्हणजे केळे आणि दुध एवढंच माहिती होत...)

divaa kaaDh, shikaraN???
payalyaaMdaach aikal he.

*वांडर
*लय फुरफुरत होतं रे.. गल्लीत आलेलं. एकटंच.. पोत्यात घालुन हाग्या मारला त्याला.

*"संज्याची बॉलींग रे.. असा बाद केला त्याला बघ.. मॅच सपेस्तवर परत आनलाच नाई कॅप्टननं तेला." ..... "बाद केला" चा हा एक अर्थ आहे...

* इ---स. इ----स. (लहान पोरं )
* अगायायायायायाया (सार्वजनिक)

Pages