कोल्हापुरी पेशल शब्दकोष

Submitted by मन-कवडा on 31 March, 2009 - 01:22

फक्त कोल्हापुरचे असे काही विशेष शब्द आहेत आणि अतिशय फेमस आहेत.
त्यासाठीचा हा शब्दकोश!!!

कृपया, फक्त सेंसाँर्ड शब्द आणि त्यांचे अर्थ [आँप्शनल] सुचवावे!!!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टवळं: रिमोट कंट्रोल/ मोबाईल
पोटात काहिली झाली: असिडीटी झाली
कान्शिला खाली मारतंय बघ!

कोल्हापूर ला "कोल्ल्हापूर" असे म्हणतात

" आयला हा शब्द्कोश वाचताना चक्कीत जाळ व्हतोय लेको."

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
"शेक नाय बरंका श्याक म्हण्त्यात त्याला ह्योच शब्द सांगलीत आटपाडी, तासगांव, कवठे महांकाळ या भागात वापरत्यात. लग्नाच्या जेवणात याला लई मागनी असतीया. "

रामराम मंडळी

म्या सांगलीचा...लई भारी...जुने दिवस आणि शब्द आठवले...यातील बरेच शब्द आता ईतिहासजमा झाले असावेत

१. सिगारेटच्या पाकीटाने खेळताना वापरल्या जाणार्या दगडाला "वश्टर" असा शब्द होता

२. गोट्या खेळताना वापरले जाणारे शब्द - "ढोक", "अट्ट", "ताण काढणे", "पिल्लू पाडणे"

३. विटी-दांडू ला चिनी-दांडू असा शब्द होता

४. गेलतो - गेलो होतो , आलतो - आलो होतो, उभारलाय - उभा राहीला आहे

५. सिटी हायस्कूलमधील काही शब्द :
टेक्सास - दिसायला चांगली
कापायला उपयोग नाही - निरूपयोगी आहेस
हवा करणे - उगाच भाव खाणे

६. क्रिकेट खेळताना लवकर आऊट झाल्यावर - "तुझा बा तरी असा खेळत होता का?"

७. वाटेल तसे क्रिकेट खेळणार्याला "आडवा पट्टा" म्हणत

८. रा, फो आणि चु कारान्त शिव्या ही तर सांगली-कोल्हापूर ची खासियत्...त्यासाठी वय, ठिकाण, प्रसंग आणि वेळेचे बंधन नाही..मी तर तिरडीच्या प्रसंगावेळी "सुतळी घट (घट्ट या अर्थाने) बांध रे फो**" अशी वाक्ये ऐकली आहेत

आणि जाता जाता ल़क्षात आलेले शब्द -
अडगा - बावळट
पिंडकराम - दारु पिऊन टाईट

कपडे घेतले=कापड घेतलि
इस्कोट झाला

राज,
वश्टर ला आम्ही वड्डू म्हणायचो....
आणि चिंचोक्यांच्या खेळातल्या मोठ्या चिंचोक्याला (ज्याने मारतात त्याला) टोंब्या.. Lol

अडगा म्हणजे बावळट पेक्षा आडमुठेपणा करणार्‍याला म्हणतात.

त्या मोठ्या गोटीला आम्ही व्हंटेल म्हणायचो.

उभारलोय वरुन एक गम्मत - आमचे धनी हायेत म्हमईचे. तर म्या जवा तिकडं काय उभारलाय असं म्हणलं की त्ये म्हणत्यात. मी काय गुढी हाय का उभारायला. नायतर एक टावेल दे अन एक तांब्या. डोक्यावर टावेल ठिवुन तांब्या उपडा टाकतो. तु बत्ताश्याची माळ घाल म्हंजे झाली गुढी!

दक्षिणा >> टोंब्या.. Rofl
वश्टरला आमच्या ईथे वड्डर म्हणतात..:-)

आणखी काही शब्द...

खटक्यावर बोट..जाग्यावर पलटी !! (याचा मला अर्थ माहीत नाही..जाणकारांनी अर्थबोध करुन द्यावा ;-))
परसाकडला जाणे -- शौचाला जाणे
लई बेस / लई झ्याक-- खुप छान
वडाप -- पुण्यातील टमटम / डुगडुगी
किरयानिस्टिक -- वेडपट ( याचा उगम कसा झाला..काही माहीत नाही..जाणकारांनी अर्थबोध करुन द्यावा Wink )
झिंगलयस काय? -- थकलास काय?
पेटलायस काय -- चिडलास काय?
तटतय -- अडलय
लाईन -- गर्लफ्रेंड
लाईनी -- गर्लफ्रेंड्स Rofl
(यावरुनच लाईन टाकणे, लाईन मारणे, लाईन देने अशा अनेक वाक्यप्रचारांचा उगम झाला आहे Wink )
वंगाळ -- खराब
दाल्ला -- नवरा
न्हानगा -- छोटा
पायतान -- चप्पल
येडच्याप -- वेडा

क्रमशः Wink
----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

"कुनाच्यात उठाय बसाय अस्तोय माहित हाय न्हव."

माझ्या नादाला लागु नकोस नाहीतर दाढ्वान काढुन हातात देइन.

त्येला आता असा तंगीवतो बघ.

काय लइ शायनिंग माराय लागलइस.

मुंबैला जावुन आल्यावर लइ शानं म्हनत नाहीत.

लइ शाना हाइस झोप जा.

एका गुच्चीत गार करीन बघ.

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

ऊंडगा - ...
केंटस (१९८०-९०)
वंटास (१९८०-९०)
पेंडि (१९८०-९०) - सुंदर मुलगी
अंदमान - निकोबार (१९७०-८०) - शिवाजी, मंगळवार, ई. पेठा ( का: सुंदर मुली फक्त राजारामपुरीत, रुईकर, ताराबाई पार्क वैगेरे भागात रहायच्या...). अाम्ही मग या पेठेतल्या पोरींना पॅरॅश्युट म्हणायचो. का: परकर झंपर किती जणांना माहिती अाहे?

अामच्यावेळी कोणत्याही गाण्याला झंकार बीट्स लावले की रिमीक्स व्हायचे...
वश्टर, राज-वश्टर वैगेरे प्रकार अामच्यावेळीदेखील होते.

>>लइ शाना हाइस झोप जा.
एका गुच्चीत गार करीन बघ. Lol

>>पेंडि

पहिल्यांदाच ऐकतोय!! Happy

----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

Certified: U/A
तुंम्ब्या - ...

Certified: A
तुंम्बलाया (१९८० - ) - use your imagination

@मोकाट:
किरयानिस्टिक -- वेडपट ( याचा उगम कसा झाला..काही माहीत नाही..जाणकारांनी अर्थबोध करुन द्यावा )
<<
हा शब्द क्रिया-नष्ट या वरुन घेतलेला अाहे असा एक समज रूढ अाहे. नतद्रष्ट असाहि एक अर्थ होऊ शकतो.

खटक्यावर बोट..जाग्यावर पलटी !! (याचा मला अर्थ माहीत नाही..जाणकारांनी अर्थबोध करुन द्यावा )
<<
हा काही स्पेशल शब्द वैगेरे नाही, एक खेळणे अाहे, जे एक माकड अाहे ते खटका दाबला की जागीच पलटी मारते.

सान्ग्ली चे लोक पैश्याची जुलनी कर्तात. आनि वत्त म्हन्तात.

कीट्स,
तुमच्या
कपडे घेतले=कापड घेतलि
वरून आठवलं
कोल्हापूर मध्ये लग्नाचा बस्ता बांधायला जाताना असे म्हणायची पध्दत आहे..
"आमी नवरा नवरीची कापडं काडायला जानार आहोत.."
:-):-)

काय विचित्र अर्थ निघतो याचा Wink

निवांत पाटील,
मस्त मस्त मस्त च लिहिली आहेत वाक्ये .. मला आम्ही जिथे राह्तो कोल्हापुरात - जुन्या कोठीशाळेजवळ .. तिथला आणि शिवाजी पेठेचा भाग अगदी डोळयांपुढे उभा राहिला
हे ''उभारला" प्रकरण पुण्यात खूप फेमस आहे हं आणि ''लेडिज बायका" पण !
Happy

गुदस्ता / मागिंद्या म्हणजे गेल्या वर्षी. Happy

गिरिश...धन्यवाद..:-)
तुंम्बलाया (१९८० - ) - use your imagination >>> हे काय आहे??

----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

(ठिकाण : हॉटेलमध्ये)
(पात्रे : अा= अाम्ही मा= मालक वे= वेटर)
...
अा: गरम काय हाय? (जणुकाही तिथे थंड पदार्थ विकण्यास बंदी अाहे...)
मा: (तिकडे गल्ल्यावर बसुन ) ट्रींग ...
वे: हां २ इस्सम् १४ रुपै...वडा-पाव, मिस्सळ, कट-वडा, काय घेणार बोला...
वे: (गायब)
अा: अो बॉस्स...अो...श्शु...बॉस्स...
वे: ...
अा: २ वडा-पाव
वे: (मख्खपणे) खाणार का बान्धुन देवु... (दाण्ण्‌कन पाण्याचे ग्लास अापटत...लक्ष कौंटरवरऊभ्या गिह्ाईकाकडे...)

खौन्या.....

गब्रू.......

कातीला आलयसं काय रं...

पाय काढून खुट्टीला आड्कीन.....

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

बोदगा - बोगदा, tunnel

अा. स.मंडलिक जेव्हा अांदोलकांसमोर भाषण करायला उभे राहिले, जोरदार घोषणा झाल्या - गैबी बोदगा झालाच पाहिजे... इथ पासुन ... बोदगा नाही कोणाच्या बापाचा... वैगेरे...

@मोकाट

तुंम्बलाया (१९८० - ) - use your imagination >>> हे काय आहे??
<<
लग्नेच्छुक ...
certification: U/A

ईद्दरकल्याणि.. अर्थ कोणाला माहित आहे का?

लेडिज बायका>>>>.एकदम भन्नाट
किवन्डी = बहिरी
जिकिरी = भाव करणे/घासाघिस करणे

Pages