तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिलबरो - राझी
मेरे रश्के कमर
ये हसी वादियां - रोझा हे तर जवळपास रोजच ऐकते. मूड बन जाता है

करीब करीब सिंगल - -
वो जो था ख्वाब सा
क्या कहें जाने दें
ये जो है कम से कम
ये रहे के जाने दे
>>>>>
खूप सुंदर आहेत ओळी!

आजचं माझं फाईंड:

चुपके चुपके रात दिन, आंसू बहाणा याद है! न जाने का अस वाटतं, हे गाणं रुतून बसतंय!

तुझ्या पिरतीचा हा विंचू मला चावला- सैराट>>>> हे सैराट मधल नाही.फॅंड्री मधल आहे.
हो खरंच कि गोंधळ झाला दोघांमध्ये

हिंदी:
कुछ ना काहो, कुछ भी ना काहो..>१९४७ लव्ह स्टोरी
तेरे मी हँठो पे> चांदणी
मेरे रंग मी रंगणे वली , मैने प्यार किया >मैने प्यार किया
होशवालो को खबर क्या >सरफरोश

मराठी:
कधी तू..>मुंबई-पुणे-मुंबई
पहिले ना मी तुला > गुपचूप

सध्या इतकेच

किशोरी आमोणकरांचं "बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल"
कुमार गंधर्वांचं "उड जायेगा हंस अकेला, जग दर्शन का मेला"
गमन सिनेमातलं छाया गांगुली यांनी गायलेलं "आपकी याद आती रही....रातभर"

कोई शहरी बाबू, दिल लहरी बाबू - लोफर. यातलं मेरे रब्बा मै कि करा नंतर जो ठेका आहे तो कितीही वेळा सलग ऐकला तरी कंटाळा येत नाही.

पंख होते तो - सेहरा.

गमन सिनेमातलं छाया गांगुली यांनी गायलेलं "आपकी याद आती रही....रातभर". >>>>>>. व्यत्यय, हे गाणं मलाही खूप आवडतं, थोडंस विस्मृतीत गेलं होतं. आता परत ऐकते.

चुपके चुपके रात दिन, आंसू बहाणा याद है! न जाने का अस वाटतं, हे गाणं रुतून बसतंय!
>>> दिल तुटा है क्या... बस ट्रेन और लडकी/लडका - एक गयी दुसरी आती है !!!!

गमनची गाणी छानच आहेत. सीनेमे जलन पण मस्त आहे आणि अजीब सानेहा पण.. जयदेवच म्युझिक मस्त असतं. एकदम रिलॅक्सिंग..

अगदी लेटेस्ट : शरयू दाते - रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. -- सूर नवा ध्यास नवा . यू ट्यूब वर आहे . अवश्य ऐका. त्यावर अवधूत गुप्तेच्या कॉमेण्टही ऐका. ही मुलगी हे गाण गायली या आठवड्यात (७ जानेवारी). त्यानंतर मी कित्येक वेळा ऐकलय. केवळ दैवी अनुभव. ही मुलगी खूप मोठी होणार. Happy आत्ताच हे लिहिताना मी तिनदा ऐकल. Happy (मुख्य म्हणजे हे गाणे यापूर्वी मी कधीच ऐकले नव्हते.)

तसेही मी कितीतरी गायकांची गाणी पुन:पुनः ऐकतो. एकदा एखादा चालू झाला तर सारखा तोच .. असा माझा कार्यक्रम असतो. मग किशोर असो, म्हमद्या असो (कित्येक), हेमंत कुमार असो, सुमन कल्याणपूर असो, लता असो, आशा असो, गुलाम महमद असो, जगजीत असो, आबा असो, बॉनी एम असो, डॉक्टर हूक्स असो, ऑलिव्हिया न्युटन जॉन असो, बीटलस असो, विन्सेंटे फर्नांडीस असो ( El Ray) वा आपले, सुधीर फडके, भीमसेन आणि लता, आशा, सुमन कल्याणपूर असोत.... किंवा आपले नसलेले पण मराठी गाणे गायलेले कुमार गंधर्व, वाणी जयराम असोत, मला या महान कलाकारांची गाणी एकदा ऐकून समाधानच होत नाही. आणि कुणाच एक गाण म्हणून देता येत नाही. Happy

बरिश (half girlfriend)
हंसी (हमारी अधुरी कहानी)
अवघा रंग एक झाला
सोहनेया

(मुख्य म्हणजे हे गाणे यापूर्वी मी कधीच ऐकले नव्हते.)>> अवघा रंग हे किशोरी ताईंच ऐकून ट्रांस लागतो. थेट कनेक्शन.

मुडके ना देखो दिलबरो
शेप ऑफ यु
परफेक्ट
बाकी बरीच नवी गाणी ऐकतो, पण रिपीट वर लावली गेली नाहीयेत कुठलीच.

Pages