आपण या (कवितां) ना वाचलंत का

Submitted by हर्पेन on 5 January, 2019 - 05:28

आपण यांना वाचलंत का अर्थात मायबोलीवरच्या मला आवडलेल्या कविता

कविता हा आपल्या मायबोलीत/वरच नव्हे तर आख्ख्या जगात सगळ्यात जास्त प्रमाणावर लिहिला जाणारा साहित्य प्रकार असावा.

आजच्या घडीला मायबोलीबाहेरही प्रथितयश ठरलेल्या अनेक रचनाकारांनी, आपल्या कारकीर्दी च्या सुरुवातीच्या काळात व नंतरही अनेक रचना मायबोलीच्या व्यासपीठावरून प्रसिद्ध केल्या आहेत. कित्येक अप्रसिद्ध किंवा हौशी रचनाकारही अनेकदा असे काही लिहून जातात की लगेच तोंडून वाहवा निघावी.

पण आजच्या घडीला आपल्या आवडत्या कविता मायबोलीवर शोधणे हे जणू महासागरामधून शिंपल्यातले मोती वेचण्यासारखे (मोठेच जिकीरीचे)
झाले आहे.

आपल्याला परत परत वाचायला आवडतील अशा कविता एका धाग्यात गुंफून ठेवल्या असता त्यांचा आस्वाद घेणे सोयीचे पडेल म्हणून हा प्रपंच.

तळटीप - ही कल्पना https://www.maayboli.com/node/68381 इथून उचलली आहे. धन्यवाद दत्तात्रय साळुंके

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार मस्त धागा आहे. वाचनखूण म्हणुन साठविला आहे. जया एम म्हणुन कोणाच्या तरी भरपूर कविता परवा वाचल्या - https://www.maayboli.com/user/29557/created
गूढ आणि तरल आहेत.
या धाग्यावरची एकेके कविता वाचेन आता.

धन्यवाद सामो, जया एम यांच्या लेखनदुव्याकरता.
एक दोन वाचल्या आता सगळ्याच वाचायला हव्या.
मायबोली सुखद धक्के देत राहते कितीही वाचले (असे आ प ल्याला वाटत असले ) तरी न वाचलेले सुंदर काही अचानक समोर येते तेव्हा होणारा आनंद अवर्णनिय.

Pages