नवीन मराठी म्हण: अंबानीच्या लग्नात बच्चन वाढपी

Submitted by Parichit on 20 December, 2018 - 01:07

घटनाच अशी घडली कि जीने एका नवीन मराठी म्हणीला जन्म दिला

म्हण: अंबानीच्या लग्नात बच्चन वाढपी

अर्थ: एखाद्याचे कितीही मोठे नाव आणि कर्तृत्व असले तरी त्याच्याहून श्रेष्ठ असलेला कोणीतरी त्याचा कचरा करतोच.

कधी वापरायची: समजा तुमच्या एखादया ऑफिसमधल्या सहकाऱ्याला अनेक वर्षाच्या मेहनतीचे फळ म्हणून बढती मिळाली. आणि काही दिवसांनी एखाद्या मोठ्या क्लायेंटने त्याला आपल्या घरी पाणी भरायचे काम सांगितले. अगदी विहिरीतून पाणी शेंदायचे आणि घागरी खांद्यावरून आणून त्याच्या घरी पाणी भरायचे. तर या मित्राला प्रचंड वाईट वाटेल ना? पण प्रोजेक्ट हातचा जाऊ नये म्हणून ते तो करणार. मग त्याला घेऊन त्याचे दु:ख हलके करण्यासाठी म्हणून बीअर प्यायला न्या आणि पिता पिता सांगा...

"नको रे वाईट वाटून घेऊ इतके. आम्हाला माहित आहे प्रमोशन मिळाल्याने तू साहेब झाला आहेस. पण हे बघ काही झाले तरी म्हणतात ना 'अंबानीच्या लग्नात बच्चन वाढपी'. त्यामुळे चालायचेच. नको मनाला लावून घेऊस. क्लायेंट तुला आपल्या घरचाच आहेस असे समजतो. म्हणून तर तुला पाणी भरायला बोलावले ना"

असे म्हटल्यावर त्याचे दु:ख नक्की हलके होणार म्हणजे होणार.

तर हे एक उदाहरण झाले. हि म्हण अशा अनेक प्रसंगी वापरता येईल. आता या म्हणी मागची घटना काय यावर जरा विचार करू.

घटना: काही दिवसांपूर्वी झालेल्या अंबानी कुलोत्पन्न कन्या इशा अंबानी हिच्या शाही विवाह प्रसंगी झालेल्या मेजवानी प्रसंगी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अमीर खान वगैरे हे वाढप्याचे काम करत असल्याची बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाली. बाकी सुपर डुपर हिरो हिरोईन मंडळींना अंबानींनी नाचून उपस्थितांचे मनोरंजन करायच्या कामाला लावले होते. ह्या प्रकाराची सोशल मिडीयावर खूपच चर्चा रंगली. याचे समर्थन करणारे म्हणाले "वाढप्याचे काम मुलीच्या घरचे आनंदाने करतात. अंबानी हे या दिग्गज कलाकारांना घरच्यासारखेच समजतात. म्हणून त्यांनी वाढप्याचे काम केले तर बिघडले कुठे?"

पण माझ्यासारख्या सर्वसामान्य पामरांना प्रश्न पडतात कि हे सगळे इतके मोठे मोठे कलाकार आहेत. जनतेमध्ये यांनी खूप आदर कमावला आहे. यांना इतके मिंधे बनायची काय गरज आहे. अशी कोणती मजबुरी असते यांची कि ह्यांना हि कामे करावी लागतात. जी जनता यांचा आदर करते त्यांचा सुद्धा हा अवमानच नाही का. बर "घरच्यासारखे समजतात" हे लॉजिक असेल तर अंबानी यांनी मोदी किंवा राहुल गांधी किंवा इतर मोठ्या नेत्याला घरचे समजून कामाला का नाही लावले. किंवा अंबानी स्वत: बच्चन परिवारातल्या लग्नात वाढप्याचे काम करतील का. असे प्रश्न आहेत.

भारतात एखादा/दी कलाकार कितीही जेष्ठ श्रेष्ठ असेल आणि लोकांच्या मनात आदराचे स्थान मिळवले असले तरी उद्योगपती राजकारणी बिल्डर डॉन इत्यादी लोकांच्या मते त्यांना फार आदर नसतो हेच अनेकदा दिसून आले आहे. कारण अशा घटना आधी पण घडल्या आहेत.

१. बॉलीवूडच्या कलाकारांना दुबईला नेऊन तिथल्या शहांनी किंवा डॉननी आपल्या कार्यक्रमात नाचवणे हे प्रकार फार पूर्वीपासून घडले आहेत.
२. भारतात उद्योगपतीच्या घरच्या लग्नात बॉलीवूडच्या कलाकारांना नाचवणे हे तर कॉमन आहे.
३. काही वर्षांपूर्वी एका प्रख्यात उद्योगपतीच्या घरच्या लग्नात व्हिडीओ शुटींग करण्याचे काम बॉलीवूड मधील एका प्रसिद्ध दिग्दर्शकाला दिले होते.
४. अजून एका बलाढ्य व्यावसायिकाच्या लग्नात बॉलीवूडच्या प्रख्यात कोरिओग्राफरला लग्नातले नाच बसवायला सांगितले होते.

तर मंडळी तुमचे काय मत आहे यावर?

765448-00-ambanis.jpg

Group content visibility: 
Use group defaults

शाहरुखला नाचता येतं. आणि नसतं नाचता येत तरी त्याला मोठमोठ्या उद्योगपतींनी बोलावलंच असतं कारण तो शाहरुख आहे.
>>>>

टेक्निकली ही ईज नॉट ग्रेट डान्सर. पण त्याच्या नाचातही एक एक्स फॅक्टर आहे आणि त्याचा तो अमर्याद एनर्जीचा धबधबा तिथेही कायम ओसंडून वाहत असतो. त्यामुळे त्याच्यावर चित्रिकरण झालेली गाणी असो वा स्टेज शो असो, तो नेहमीच आवडीने बघणेबल असतो.

सॉफ्ट मेलोडियस रोमांटीक गाण्यांवर नाचण्यात मात्र अखंड ब्रह्मांडात गेल्या लक्ष वर्षात आणि येणारया करोडो वर्षात त्याच्याशी स्पर्धा करणारा जवळपासही नसेल!

> त्याने दुय्यम भुमिका साकारलेल्या चित्रपटाच्या परीक्षणाने मायबोलीवर पन्नास पोस्ट तरी खेचल्या आहेत का?

मी जॉनचा fan वगैरे नाही. पण त्याने हि जी भूमिका मांडली मी त्याशी अगदी सहमत आहे इतकेच. आणि फक्त मी आणि जॉन नव्हे, जरा नेटवर सर्च करून बघा माझ्यासारखे कोट्यावधी लोक आहेत ज्यांना हा प्रकार रुचलेला नाही. मायबोली म्हणजे जग नव्हे. पण तुमच्या विधानाचा प्रतिवादच करायचा म्हटले तर मी हि म्हणू शकतो कि शाहरूखची चर्चा आजकाल केवळ त्याच्या फ्लोप चित्रपटामुळे होते तर बच्चन ची चर्चा कादर खान च्या मृत्यूमुळे होत आहे. खरा बच्चन काय आहे ते हवे असेल तर कादर खान यांची २०११/१२ च्या आसपास दिलेले इंटरव्यू पहा यूट्यूब वर आहेत. ज्या कदर खानने बच्चन चे करिअर घडवले त्याला बच्चनने नंतर कसे ट्रीट केले ते पहा. आणि वरती एका प्रतिक्रियेत कोणीतरी लिंक दिली आहे बच्चन थोरल्या अंबानीचे (मुकेशचे पप्पा) कौतुक करताना. कृत्रिम आसवे आणून रडत आहे. शिसारी येते ते बघताना अक्षरशः. अरे हे कसले नौटंकी कलाकार जे पैशासाठी स्वभिमान सुद्धा विकतात आणि नंतर जवळचे संबंध वगैरे शेळपट समर्थन करत बसतात. मी मानतो राज दिलीप देव यांना. भले जुने असतील ते पण पैशासठी धनिकांच्या लग्नात नाचायची छचौरगिरी केल्याचे कधी वाचले नाही. बिस्मिल्ला खान सनई साठी जगात प्रसिद्ध होते, कुमार गंधर्व वसंतराव देशपांडे हे शास्त्रीय गाण्यासाठी प्रसिद्ध होते. ह्या लोकांना कोण्या टंबानी ने हवे तितके पैसे देतो लग्नात गायला वाजवायला या म्हणून बोलवले असते तर "जवळचे संबंध"च्या नावाखाली गेले असते का ते? पैसा तर सगळेच कमवत असतात, पण पैशासाठी आत्मा विकणाऱ्यातले ते नव्हते. पण मी हे कुणाला सांगतोय? जाउद्या इथे कोणाला पोचणार नाही माझे म्हणणे.

खरा बच्चन काय आहे? खरा जॉन काय आहे? बच्चन-आमीर वाढप्याची कामं करतात. जयाबच्चन- ऐश्वर्या भांडी घासतात.
प्रियांका-करीना पाणी भरतात. अंबानीचे पाय पण कुणी चेपत असेल? जॉनला नाचता येत नाही. शाहरुखला येतं का? शाहरुखने किती पैसे घेतले नाचायचे? जॉनला लग्नाचं आमंत्रण नव्हतं का? त्याला अभिनय येतो का? नाचता येतं का? बच्चन नाचत नाही का? कादर खान-बच्चन ह्यांचं काय भांडण होतं? बच्चन नौटंकी आहे? दिलिप-देव ह्यांना कुणी पैसे देउन नाचायला बोलावलेलं का? ते गेले होते का? गेले असते का? पैश्यासाठी आत्मा कुणी विकलाय?

हुश्श्य!!! गो गेट सम लाईफ लोकहो Lol
(आता मी पळते )

आता मी पळते - सस्मित
देर आये दुरुस्त आये. पळणे चांगले असते तब्येतीला. सध्या हवामानही पोषक आहे.
'दुखापत न होता कसे पळावे' ह्याबाबत काही मदत लागली तर मी आहे. Happy

इतक्यात पळू नका. मी अजून कुसुमाग्रजांचे उदाहरण दिलेले नाही. अशी कल्पना करा...

अंबानीने त्या काळात मुलाच्या लग्नात कुसुमाग्रजांना चार पाच कोटी चिल्लर पुढ्यात टाकून लग्नाच्या अक्षता लिहायला सांगितले. त्यांनी लिहिल्या. पब्लिकला सांगितले आमचे जुने जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आणि मायबोलीवर समर्थन सुरु आहे "काय चुकीचे केले? त्यांचे आयुष्य त्यांनी काय करायचे ते ते ठरवतील"

आता पळा.

वरती एका प्रतिक्रियेत कोणीतरी लिंक दिली आहे बच्चन थोरल्या अंबानीचे (मुकेशचे पप्पा) कौतुक करताना. >>> मीच दिली आहे. अहो तो १९९० मधे कर्जबाजारी झालेला असताना त्याला जर त्यांनी त्यातून बाहेर यायला मदत केली असेल तर त्यांच्या लग्नात तो घरचे कार्य असल्यासारखा जाईलच ना. त्यात काय स्वाभिमान विकला त्याने. आणि बाकीच्यांना त्यात पडायचीच काय गरज आहे. हे सगळे वरती पण लिहीले होते की. ९० साली बच्चन पूर्ण झोपला होता. सिनेमे पडत होते, इमेज हास्यास्पद झाली होती. एबीसीएल दिवाळखोरीत गेली होती. अशा स्थितीतून बाहेर येणार्‍यांबद्दल मला तरी आदर वाटतो.

बाकी त्याचे कादर खान बरोबर काय संबंध होते आपल्याला त्याने स्वतः सांगितल्याशिवाय आता पूर्णपणे कळणार नाही. काहीतरी म्य्च्युअल झाले असेल. नाहीतर बच्चन चे एकूण वागणे पाहता तो नेहमी पॉलिटिकली करेक्ट राहतो, कसल्याही वादात पडत नाही, उगाच कोणाशी भांडणे काढत नाही. किंबहुना आपली इमेज आणि सर्वांशी संबंध राखण्याच्या नादात तो आपले सेलेब्रिटी वजन तो एखाद्या योग्य कारणाकरताही वापरत नाही ही त्याच्याविरूद्धची रास्त तक्रार आहे. तसे काही जर तुम्ही म्हंटला असता तर १००% सहमत झालो असतो. पण इथे तसाही काही मुद्दा नाही.

एक जनरल लॉजिक आहे. अनेक ठिकाणी लागू पडते. एखाद्या क्षेत्रातले, एखाद्या मोठ्या सामाजिक गटातले अनेक थोर्थोर लोक आपल्याला अनाकलनीय पद्धतीने वागत असतील तर एकतर ते सगळे मूर्ख, बिकाउ वगैरे असतात, नाहीतर आपण त्या क्षेत्रात, त्या गटात नसल्याने आपल्याला ते वागणे समजत नाही, पण त्या लोकांच्या दृष्टीने ते नॉर्मल असते.

शाहरूखची चर्चा आजकाल केवळ त्याच्या फ्लोप चित्रपटामुळे होते
>>>>

मुळात शाहरूखला तुम्ही चित्रपटात काम करणारा एक अभिनेता म्हणूनच ओळखत असाल तर तुम्हाला सात ते आठ टक्केच शाहरूख माहीत आहे असे बोलू शकतो.

शाहरूख म्हणजे हत्ती आणि चार आंघळ्यांच्या गोष्टीसारखा आहे. ज्याने जितका शाहरूख पाहिला त्याला तितकाच तो वाटला.

शाहरूखचे ओळीने अजून दहा चित्रपट फ्लॉप गेले तरी दहा वर्षानीही बॉलीवूडचा सुपर्रस्टार शाहरूखच असेल.

आणि म्हणूनच त्याच्या फ्लॉप चित्रपटांवरही ५०० पोस्टची चर्चा होते. तर एखाद्या रणबीरसिंगच्या हिट चित्रपटाला ५० पोस्ट जमवणे अवघड जाते.

मी आधीच पळाल्ले आहे Lol>>>>> Proud कुठे पळतेस ? थांब थांब, जाऊ नको लांब.......................मला पण यायचेय. Biggrin या धाग्यामध्ये पण शाहरुखला धरुन सोडलं की वो..काही दिवसांनी सगळ्या धाग्यांवर शाहरुख आला की सगळ्या मायबोलीकरांची अवस्था अशी होईल.Walking Zombie

Lol

http://www.sherv.net/ अगं रात्रीस खेळ चाले मागे सुरु होतं तेव्हा ही साईट मनालीने दिली होती.

अंबानीने त्या काळात मुलाच्या लग्नात कुसुमाग्रजांना चार पाच कोटी चिल्लर पुढ्यात टाकून लग्नाच्या अक्षता लिहायला सांगितले. त्यांनी लिहिल्या. पब्लिकला सांगितले आमचे जुने जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आणि मायबोलीवर समर्थन सुरु आहे "काय चुकीचे केले? त्यांचे आयुष्य त्यांनी काय करायचे ते ते ठरवतील">>>>
मी तर नक्कीच करेन. कलेपायी भणंग आयुष्य जगत बसण्यापेक्षा, तीच सोनं केलेलं अतिउत्तम. प्रतिष्ठा जपताना पैशाला लाथ मारावी असं कुणी लिहिलंय! उलट मी तर अभिमानाने म्हणेन, कुसुमाग्रजांनी फक्त लग्नाच्या अक्षता लिहाव्यात म्हणून अंबानींनी पाच कोटी मोजले होते! आत्मा वगैरे नाही विकला.
अनेक महान कलाकार शेवटी हलाखीत गेले, तेव्हा कुणी निस्सीम वगैरे चाहता आला नाही त्यांची मदत करायला!
अमिताभ जेव्हा दिवाळखोरीत गेला, तेव्हा कुणी जीवापाड प्रेम करणाऱ्या लाखो चाहत्यांनी वर्गणी नाही काढली!
बात करते हो!!!!

परवानगी असली तर जरा धाग्याशी सुसंगत प्रतिसाद देऊ का?

(चौथ्या पानापर्यंतचे प्रतिसाद वाचून हा प्रतिसाद देत आहे, नंतर ताकीद आलेली असली तर ती अजून वाचली नाही, कृपया गैरसमज नसावा)

अंबानींकडच्या लग्नात अमिताभ बच्चन वाढपी झाला ह्यामागे छत्तीसगडचा कडकनाथ कोंबडा महागात विकला जाणे, बारा लाखाची चार मांडुळे घेऊन फिरणार्‍यांना अटक होणे, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होणे, व्हायब्रोमेकॅनिक्स ही नवीन शाखा विकसित होणे, हेल्मेटसक्ती ह्या विषयाचा ओंकारेश्वरावर दशक्रिया विधी होणे अश्या अनेक घटना कारणीभूत आहेत.

अनेक महान कलाकार शेवटी हलाखीत गेले, तेव्हा कुणी निस्सीम वगैरे चाहता आला नाही त्यांची मदत करायला!>>>>> भगवान दादा, अचला सचदेव ( वक्त सिनेमात ), ललिता पवार खूप हलाखीत गेले हे सर्व. Sad

Rofl

जाहीरात कसली? उलट धन्यवाद लिंक व लेख दोन्हीबद्दल. तुफान हसले. लेख लिहावा बेफिकीर यांनीच. जाम बारीक निरीक्षण आहे.

धाग्यामध्ये पण शाहरुखला धरुन सोडलं की वो..
>>>>

हो पण हा धागा शाहरूखसंदर्भातच आहे.
किंवा या विषयाचा मूळपुरुष शाहरूखच आहे.
हे लग्नात नाचून पैअए कमावणे किंवा आपल्या कलेची आणि स्टार्डमची किंमत वसूल करणे हे खरया अर्थाने आणि मोठ्या स्केलवर शाहरूखनेच सुरु केले. त्यासाठी टिकाही झेलली. आणि टिकाकारांना उडवूनही लावले. एवढा मोठा सुपर्रस्टार हे बिनधास्त करतोय हे बघून मग अमिताभ वा तत्सम कलाकारांना बळ मिळाले आणि हे रूढ झाले. वर जे कोणी लिहिलेय की कित्येक मोठे कलाकार हलाखीत मेले. तर ते यापुढे जाऊ नयेत यासाठी शाहरूखनेच उत्तम पायंडा पाडला आहे. हे त्याचे टिकाकारही मान्य करतील !

दिग्गज कलाकाराचे शेवटचे दिवस हलाखीत जाणे याचे अजून एक उदाहरण आहे.

एम एस शिंदे - नाव ऐकून काही क्लू लागतो का? यांच्या इतका भन्नाट तंत्रज्ञ बॉलीवूड मधे दुर्मिळ असेल. त्यांनी संकलन केलेल्या चित्रपटाला ४० वर्षे उलटून गेली तरी अजूनही त्यातील संकलनाची चूक सापडत नाही. आता सर्व तर्‍हेचे व्हिडीओ रिप्ले, स्लो-मो, झूमिंग, पॉजिंग टेक्निक उपलब्ध असताना सुद्धा. हे मी "शोले" बद्दल लिहीतोय. मध्यंतरी ठाकूर चा एक पॉज केलेला सीन व त्यातून दिसणारा हात सोशल नेटवर्क वर फिरत होता. नंतर निष्पन्न झाले की तो ही रिलीज केलेल्या व्हर्जनमधे नव्हता. संकलनातूनच काढलेल्या सीन्स मधून तो कोणीतरी आणला होता. संकलनातील ब्लूपर्स अगदी आत्ताच्या चित्रपटांतही सहज सापडत असताना १९७५ मधे ही करामत केलेल्या व्यक्तीची शेवट्ची वर्षे हलाखीत गेली. यात वैयक्तिक आर्थिक नियोजन वगैरे धरले, तरी ज्या इण्डस्ट्रीमधे कोट्यावधी रूपये फालतू चित्रपट आणि लोक कमावतात त्यात दिग्गज कलाकार असे उपेक्षित राहतात यात काहीतरी नक्कीच चुकीचे आहे.

हो पण हा धागा शाहरूखसंदर्भातच आहे.>> तुला जिकडे तिकडे शाहरुख खान दिसतोय.
धाग्याचं शीर्षक अंबानीच्या लग्नात बच्चन वाढपी असं आहे.
अंबानीच्या लग्नात शाहरुख डॅन्सर असं नाहीये Happy

धाग्याचं शीर्षक अंबानीच्या लग्नात बच्चन वाढपी असं आहे.
>>>>
पण मतितार्थ काय आहे याचा? त्या मतितार्थाचा जनक शाहरूखच नाही का...

> कलेपायी भणंग आयुष्य जगत बसण्यापेक्षा, तीच सोनं केलेलं अतिउत्तम.
> Submitted by अज्ञातवासी on 9 January, 2019 - 16:18

तुम्हाला अज्ञातवासी माफ करा जरा स्पष्ट बोलतो पण तुम्हाला आयुष्यच कळलेलं नाही. अन्यथा "गरजा जयजयकार क्रांतीचा" लिहिणारे हात विकाऊ होऊ शकत नाहीत पैशासाठी कविता लिहू शकत नाहीत हे तुम्हाला कळलं असतं. पैशासाठी कलेची विक्री केल्यानं कलेचं सोनं होतं अशी तुमची कल्पना असेल तर तुम्हाला म्हणून सांगतो, एक कवी आहेत. कोल्हापुरात लग्नाच्या अक्षता लिहिण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पोटासाठी लिहित असतील. हरकत नाही. पण का नाही त्यांच्या अक्षतारुपी कवितांचं सोनं झालं? का नाही त्यांना कुणी कोणत्या साहित्य सम्मेलनात बोलवून थोर कवी म्हणून सन्मान केला आजवर? का नाही त्यांना ज्ञानपीठ मिळाला? आणि राहिली बात हलाखीत गेलेल्या कलाकारांची. जर कोणी आलाच असेल ह्या कलाकारांच्या मदतीला तर तो त्यांचा निस्सीम चाहताच आला असेल. तुमचा अंबानी त्यांच्या मदतीला कधीही आलेला नाही हे लक्षात घ्या. बनिया आहे. विकत घेतो. समाजसेवा करायला बसलेला नाही. जेंव्हा हे लोक कलाकारांना आपल्या खाजगी कामासाठी पैसे देतात तेंव्हा ते त्यांना व त्यांच्या कलेला"विकत घेतात" इतकाच त्याचा अर्थ असतो. त्या कलाकारांच्या कलेचं सोनं वगेरे करतात असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा निव्वळ भ्रम आहे.

Pages