नवीन मराठी म्हण: अंबानीच्या लग्नात बच्चन वाढपी

Submitted by Parichit on 20 December, 2018 - 01:07

घटनाच अशी घडली कि जीने एका नवीन मराठी म्हणीला जन्म दिला

म्हण: अंबानीच्या लग्नात बच्चन वाढपी

अर्थ: एखाद्याचे कितीही मोठे नाव आणि कर्तृत्व असले तरी त्याच्याहून श्रेष्ठ असलेला कोणीतरी त्याचा कचरा करतोच.

कधी वापरायची: समजा तुमच्या एखादया ऑफिसमधल्या सहकाऱ्याला अनेक वर्षाच्या मेहनतीचे फळ म्हणून बढती मिळाली. आणि काही दिवसांनी एखाद्या मोठ्या क्लायेंटने त्याला आपल्या घरी पाणी भरायचे काम सांगितले. अगदी विहिरीतून पाणी शेंदायचे आणि घागरी खांद्यावरून आणून त्याच्या घरी पाणी भरायचे. तर या मित्राला प्रचंड वाईट वाटेल ना? पण प्रोजेक्ट हातचा जाऊ नये म्हणून ते तो करणार. मग त्याला घेऊन त्याचे दु:ख हलके करण्यासाठी म्हणून बीअर प्यायला न्या आणि पिता पिता सांगा...

"नको रे वाईट वाटून घेऊ इतके. आम्हाला माहित आहे प्रमोशन मिळाल्याने तू साहेब झाला आहेस. पण हे बघ काही झाले तरी म्हणतात ना 'अंबानीच्या लग्नात बच्चन वाढपी'. त्यामुळे चालायचेच. नको मनाला लावून घेऊस. क्लायेंट तुला आपल्या घरचाच आहेस असे समजतो. म्हणून तर तुला पाणी भरायला बोलावले ना"

असे म्हटल्यावर त्याचे दु:ख नक्की हलके होणार म्हणजे होणार.

तर हे एक उदाहरण झाले. हि म्हण अशा अनेक प्रसंगी वापरता येईल. आता या म्हणी मागची घटना काय यावर जरा विचार करू.

घटना: काही दिवसांपूर्वी झालेल्या अंबानी कुलोत्पन्न कन्या इशा अंबानी हिच्या शाही विवाह प्रसंगी झालेल्या मेजवानी प्रसंगी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अमीर खान वगैरे हे वाढप्याचे काम करत असल्याची बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाली. बाकी सुपर डुपर हिरो हिरोईन मंडळींना अंबानींनी नाचून उपस्थितांचे मनोरंजन करायच्या कामाला लावले होते. ह्या प्रकाराची सोशल मिडीयावर खूपच चर्चा रंगली. याचे समर्थन करणारे म्हणाले "वाढप्याचे काम मुलीच्या घरचे आनंदाने करतात. अंबानी हे या दिग्गज कलाकारांना घरच्यासारखेच समजतात. म्हणून त्यांनी वाढप्याचे काम केले तर बिघडले कुठे?"

पण माझ्यासारख्या सर्वसामान्य पामरांना प्रश्न पडतात कि हे सगळे इतके मोठे मोठे कलाकार आहेत. जनतेमध्ये यांनी खूप आदर कमावला आहे. यांना इतके मिंधे बनायची काय गरज आहे. अशी कोणती मजबुरी असते यांची कि ह्यांना हि कामे करावी लागतात. जी जनता यांचा आदर करते त्यांचा सुद्धा हा अवमानच नाही का. बर "घरच्यासारखे समजतात" हे लॉजिक असेल तर अंबानी यांनी मोदी किंवा राहुल गांधी किंवा इतर मोठ्या नेत्याला घरचे समजून कामाला का नाही लावले. किंवा अंबानी स्वत: बच्चन परिवारातल्या लग्नात वाढप्याचे काम करतील का. असे प्रश्न आहेत.

भारतात एखादा/दी कलाकार कितीही जेष्ठ श्रेष्ठ असेल आणि लोकांच्या मनात आदराचे स्थान मिळवले असले तरी उद्योगपती राजकारणी बिल्डर डॉन इत्यादी लोकांच्या मते त्यांना फार आदर नसतो हेच अनेकदा दिसून आले आहे. कारण अशा घटना आधी पण घडल्या आहेत.

१. बॉलीवूडच्या कलाकारांना दुबईला नेऊन तिथल्या शहांनी किंवा डॉननी आपल्या कार्यक्रमात नाचवणे हे प्रकार फार पूर्वीपासून घडले आहेत.
२. भारतात उद्योगपतीच्या घरच्या लग्नात बॉलीवूडच्या कलाकारांना नाचवणे हे तर कॉमन आहे.
३. काही वर्षांपूर्वी एका प्रख्यात उद्योगपतीच्या घरच्या लग्नात व्हिडीओ शुटींग करण्याचे काम बॉलीवूड मधील एका प्रसिद्ध दिग्दर्शकाला दिले होते.
४. अजून एका बलाढ्य व्यावसायिकाच्या लग्नात बॉलीवूडच्या प्रख्यात कोरिओग्राफरला लग्नातले नाच बसवायला सांगितले होते.

तर मंडळी तुमचे काय मत आहे यावर?

765448-00-ambanis.jpg

Group content visibility: 
Use group defaults

तरी ज्या इण्डस्ट्रीमधे कोट्यावधी रूपये फालतू चित्रपट आणि लोक कमावतात त्यात दिग्गज कलाकार असे उपेक्षित राहतात यात काहीतरी नक्कीच चुकीचे आहे.
>>>>

क्रिकेट आयपीएलमध्ये एखादा साधारण खेळाडू ईतर खेळांतील दिग्गजांच्या तोडीची कमाई करतो याचे उत्तर शोधले की वरच्या प्रश्नाचेही उत्तर मिळेल.

पब्लिक डिमांड.
जे लोकांन हवे आहे ते देण्यात तुम्ही बेस्ट असाल तर तुम्ही तितकेच कमावता.
पण जो गुण तुमच्या अंगात आहे त्याला मार्केटमध्ये तितका डिमांड नाही तर निदान पैश्याच्या स्वरुपात तरी तो मोबदला सहजी मिळणार नाही.

पण ईथे एक लक्षात ठेवायला हवे की अश्या पैसे मिळवून देणारया क्षेत्रात कॉम्पिटीशनही मग तितकेच तगडे असते. बहुतांश लोकांना तेच बनायचे असते. जिथे देशाच्या दर गल्लीत दहाबारा पोर क्रिकेट खेळणारे असतात त्यातून आयपीएल संघात जागा मिळवणेही तितकेच अवघड असते. वा शाहरूख वा सलमानची जागा घेणे तितकेच अशक्य. शेकडो लोकं दर आठवड्याला हिरो बनायला येतात ईथे आणि लुप्त होऊन जातात. यातून तालून सुखावून निघालेल्यांनी कमावलेले पैसे तेवढे आपल्याला दिसतात. पण ते डिजर्व्ह करतात.

पण का नाही त्यांच्या अक्षतारुपी कवितांचं सोनं झालं? का नाही त्यांना कुणी कोणत्या साहित्य सम्मेलनात बोलवून थोर कवी म्हणून सन्मान केला आजवर? का नाही त्यांना ज्ञानपीठ मिळाला?
>>>>>

अहो पण शाहरूख आणि अमिताभला तर कित्येक बहुधा सर्वाधिक फिल्मफेअर पुरस्कार आहेत. आमीर ऑस्करलाही जाऊन आलाय.
तो सचिन तेंडुलकर पैसे घेऊन अंबानीच्या मुंबई ईण्डियन्ससोबत तंबूत बसून असतो. तो तर भारतरत्न आहे. यापेक्षा सर्वोच्च पुरस्कार आहे का या देशात Happy

> ज्या इण्डस्ट्रीमधे कोट्यावधी रूपये फालतू चित्रपट आणि लोक कमावतात त्यात दिग्गज कलाकार असे उपेक्षित राहतात

हा पूर्ण वेगळा विषय आहे. प्लीज. अनेक व्यावसयिक कलाकार शेवटी उपेक्षित राहून गेलेत. हे दुर्दैव आहे. पण त्यासाठी बाकीची कारणे आहेत. पैशासाठी कला विकली नाही म्हणून उपाशी गेले असा अर्थ कोणी काढू नये. भगवानदादाच्या सात गाड्या अनेक खोल्यांचा बंगला नोकरचाकर सगळे होते. काहीही कमी नव्हते. शेवटी भणंग अवस्थेत गेला. एकेकाळी बॉलीवूड गाजवणारी परवीन बाबी भयाण अवस्थेत एकटी गेली. अशी उदाहरणे आहेत. पण त्याचा आणि ह्या विषयाचा संबंध नाही.

> तो सचिन तेंडुलकर पैसे घेऊन अंबानीच्या मुंबई ईण्डियन्ससोबत तंबूत बसून असतो

हे खरे असेल तर न बोललेले बरे Happy

या सृष्टीचा निर्माताच शाहरुख आहे.
Submitted by भरत. on 9 January, 2019 - 16:45
>>>>>

निर्मात नाही
पण निर्मात्याने घडवलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती तो नक्कीच आहे.

हे खरे असेल तर न बोललेले बरे Happy
>>>>

बोला की.. आज क्रिकेटमध्ये ईतका पैसा आहे की कोच, कॉमेंटेटर, आयपीएल सपोर्ट स्टाफ, मेंटर अश्या विविध माध्यमातून जो तो क्रिकेटर आपल्या ऐपतीनुसार कमावत आहे. आणि यात गैर काय आहे. क्रिकेटर हा ४० वर्षांच्या आतच निवृत्त होतो. त्याने मग काय भणंग अवस्थेत मरावे अशी ईच्छा आहे का?

> त्याने मग काय भणंग अवस्थेत मरावे अशी ईच्छा आहे का?

माझा आधीचा प्रतिसाद वाचा. भणंग अवस्थेत गेलेले कलाकार हा वेगळा विषय आहे. त्याची कारणे वेगळी आहेत. (बादवे कोणी खेळाडू भणंग अवस्थेत गेल्याचे ऐकिवात नाही) पैशासाठी कला विकली नाही म्हणून उपाशी गेले असा अर्थ कोणी काढू नये.

कलाकारांनी योग्य त्या व्यासपीठावरच कलाप्रदर्शनास करावे व स्वेच्छेने दिलेले वाजवी मानधन तेवढे घ्यावे अथवा ते ही न घेतलेले उत्तम.

योग्य ती व्यासपीठे कुठली हे खऱ्या कलापारखींनी ठरवावे.

खरे कलापारखी तेच जे अशी व्यासपीठे निवडतील, जिथे कलेचे व्यावसायिकरण होणार नाही.

कलेचे व्यावसायिकरण होतेय की नाही हे संकृतीची जाण असणारे आणि ती टिकवण्यासाठी झटणारे ठरवतील.

संस्कृतीची जाण कुणाला आहे आणि नाही हे मान्यवर जाणकार मंडळी ठरवतील.

मान्यवर जाणकार मंडळी कोण हे....

...

...

...

(कृपया पुढे भर घालावी.)

बादवे कोणी खेळाडू भणंग अवस्थेत गेल्याचे ऐकिवात नाही
>>>>>

तुमच्या ऐकिवात नसतील.
पण जग भरलेय अश्या खेळाडूंनी.
क्रिकेटबाहेरच्या खेळाडूंचे हाल बघा. निवृत्ती नंतरचे सोडा. खेळत असतानाच कित्येक नॅशनल लेव्हल खेळाडू आर्थिक हलाखीत जगत असतात.

कलाकारांचे सोडा
आपण जे ऑफिसला जाऊन काम करतो वा बिजनेस करतो ते देखील स्वतामध्ये असलेले कौशल्य विकूनच पैसा कमावत असतो ना?
पगार न घेता आपण ते कौशल्य विकू का?

धागा मूळ पदावर आला. धाग्याच्या विषयात मी हेच उदाहरण दिले आहे. आपण ऑफिसला जाऊन काम करतो. मेहनतीने प्रमोशन मिळते. आणि एकदिवस क्लायंटचा बॉस चिल्लर काम लावतो आणि प्रोजेक्ट हातचा जाऊ नये म्हणून आपण ते करतो. आणि इकडे आपल्या कंपनीतल्या लोकांना सांगतो क्लायंटचे खूप चांगले संबंध आहेत म्हणून. (प्रत्यक्षात चार पैशासाठी आपण आपला आत्मा मारून जगत असतो) Happy

चार पैशासाठी आपण आपला आत्मा मारून जगत असतो
>>>

हा निशर्क्ष चुकीचा आहे.

एक म्हणजे चार पैसे जेमतेम कलाकौशल्य असलेल्या सामान्य लोकांना मिळतात. मोठ्या कलाकारांना चार ते चाळीस कोटींचा फायदा होतो यातून.

दुसरे म्हणजे कला विकली, तिचा मोबदला घेतला की आत्मा मरतो हे आपले आपणच ठरवत आहोत.

अवो अपरिचित त्या पावट्याच्या नादी लागू नका..तुम्ही नक्की कशावर वाद घालत होते आणि कुठ्ल्या स्टँडवर होते हे सुद्धा विसरून जाल .रोज महाशिवरात्री अस्तेय त्याची ..झोकूनच हिकडं येतंय बेनं,

तुमचा स्टँद इंट्रेस्टिंग आहे ..तिकडे जरा जास्त लक्ष द्या बघू Lol
(वि. सू.- मला उत्तर देण्यात वेळ घालवू नका ..मला आपलाच समजा),,

जर कोणी आलाच असेल ह्या कलाकारांच्या मदतीला तर तो त्यांचा निस्सीम चाहताच आला असेल. तुमचा अंबानी त्यांच्या मदतीला कधीही आलेला नाही हे लक्षात घ्या. >>> ऑ? मग अमिताभ जे सांगतोय ते रचलेला बनाव आहे का? पुढे मागे अंबानीच्या मुलीचे लग्न ठरले व आपल्याला तेथे जावे लागले तर आधीच एक ष्टोरी तयार असावी म्हणून त्याने ४-५ वर्षे आधी ते रचून ठेवले का?

अंबानी पैसेवाला आहे. त्यांच्याकडच्या लग्नात अमिताभ लोकांना आग्रह करताना दिसला. म्हणजे त्याने आत्मा विकला. दुसरे काही कारण असूच शकत नाही असे लॉजिक लावले आहे तुम्ही, आणि इतर कितीही शक्यता सुचवल्या तरी त्याची दखल घेण्याची तुमची इच्छा नाही असे दिसते.

मला ही आत्मा विकण्याची कन्सेप्ट फारच आवडली आहे, वैचारिक धागे वाचताना हसूच येतं काय करणार..
जनरल्ली अशा विषयावर मी प्रतिसाद देत नाही, पण आज आत्म्याने द्ययला लावला Lol
वाचतेय धागा Lol

तुम्हाला अज्ञातवासी माफ करा जरा स्पष्ट बोलतो पण तुम्हाला आयुष्यच कळलेलं नाही.>>>>>
मी तसा दावाही करत नाही. असा दावा कुणी करत असेल तर तो भोंदू समजावा, त्याच्या नादी लागू नये.
इथे कुणाला आयुष्य कळलं असेल, तर प्लिज कन्सेप्ट क्लियर करा. तुम्हाला कळलं असेल तर नक्कीच करा. आणि माफी मागू नका हो! सांगोपांग चर्चेसाठी वैचारिक मतभेद गरजेचे असतात.

अन्यथा "गरजा जयजयकार क्रांतीचा" लिहिणारे हात विकाऊ होऊ शकत नाहीत पैशासाठी कविता लिहू शकत नाहीत हे तुम्हाला कळलं असतं. >>>>>>
एक मिनिट, कुणी काय लिहू शकतं, किंवा नाही हा विषय नव्हता. नीट वाचा,
'अशी कल्पना करा...
अंबानीने त्या काळात मुलाच्या लग्नात कुसुमाग्रजांना चार पाच कोटी चिल्लर पुढ्यात टाकून लग्नाच्या अक्षता लिहायला सांगितले. त्यांनी लिहिल्या. पब्लिकला सांगितले आमचे जुने जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आणि मायबोलीवर समर्थन सुरु आहे "काय चुकीचे केले? त्यांचे आयुष्य त्यांनी काय करायचे ते ते ठरवतील"
विषय हा होता. अरे म्हणजे तुम्हीच कल्पना करायला लावतायेत, त्यावर प्रतिसाद अपेक्षित आहेत, आणि आता म्हणतात की ती कल्पना करणंच चुकीचं आहे...
म्हणून मी आधीच म्हटलं, डिस्क्लेमर टाका, प्रतिसादकांनी फक्त धागलेखकाशी सहमत असणारे प्रतिसाद टाका....

पैशासाठी कलेची विक्री केल्यानं कलेचं सोनं होतं अशी तुमची कल्पना असेल तर तुम्हाला म्हणून सांगतो, एक कवी आहेत. कोल्हापुरात लग्नाच्या अक्षता लिहिण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पोटासाठी लिहित असतील. हरकत नाही. पण का नाही त्यांच्या अक्षतारुपी कवितांचं सोनं झालं? का नाही त्यांना कुणी कोणत्या साहित्य सम्मेलनात बोलवून थोर कवी म्हणून सन्मान केला आजवर? का नाही त्यांना ज्ञानपीठ मिळाला? >>>>>>
माय फ्रेंड लिसन, त्या कवींची आणि कुसुमाग्रजांची प्रतिभेच्या आणि प्रसिद्धीच्या बाबतीत बरोबरी होतेय का? त्या अक्षता चांगल्या की वाईट यावर अंबानींनी पाच कोटी नसते मोजले, 'कुसुमाग्रजानी' लिहिलेल्या आहेत, यावर मोजले असते.(मला त्या कविंच नाव नाहीत नाही, पण यातून ते वाईट लिहितात असं अजिबात म्हणायचं नाहीये.)

आणि राहिली बात हलाखीत गेलेल्या कलाकारांची. जर कोणी आलाच असेल ह्या कलाकारांच्या मदतीला तर तो त्यांचा निस्सीम चाहताच आला असेल. >>>>>
उदाहरण द्या... कन्सेप्ट क्लियर करण्यासाठी. मला कुणी ऐकिवात नाही.

तुमचा अंबानी त्यांच्या मदतीला कधीही आलेला नाही हे लक्षात घ्या. >>>
माझा अंबानी.... शब्दच नाहीये सुचत. आयेंगे, मेरे मुकेस अनिल आयेंगे.

बनिया आहे. विकत घेतो. समाजसेवा करायला बसलेला नाही.>>>>
कोण बसलंय? सगळे समाजसेवा करायला बसले ना, अर्थव्यवस्था खड्यात जाईल. पैसा कमवतोय, हजारो लोकांना रोजगार देतोय, टॅक्स भरतोय, कर्ज बुडवून पळत नाहीये, याशिवाय मोठी समाजसेवा कोणती. एकदा रिलायन्स चा CSR रिपोर्ट वाचा. जगात पैसा कमावण्याइतकी समाजसेवा कुठली नाही, समाजसेवेसाठी पैसा लागतो, आणि तो कमावणार्याकडूनच येतो.
जेंव्हा हे लोक कलाकारांना आपल्या खाजगी कामासाठी पैसे देतात तेंव्हा ते त्यांना व त्यांच्या कलेला "विकत घेतात" इतकाच त्याचा अर्थ असतो.>>>>
कलेसाठी पैसे मोजले, कलाकाराने कला सादर केली, यात कला विकली असं कुठे होतं? उद्या तुम्ही सवाईच तिकीट काढून पहिल्या लायनीत आस्वाद घेतला, तर गायकांनी कला विकली वाटतं? विकणे याचा अर्थ त्या मालकीचे हस्तांतरण होणे. म्हणजे उद्यापासून त्या गायकांच्या कलेवर तुमची मालकी वाटतं. प्लिज... प्रॉडक्ट्सचे दोन भाग पडतात, गुड्स आणि सर्विस, त्यापैकी सेलिंग हा पार्ट कशा प्रकारे अंमलात येतो हे वाचा! रेफरन्स साठी विपु करा! तुम्हाला मदत करायला नक्की आवडेल!

एखादी वस्तू याचा अर्थ कला व त्या कलाकारांच्या कलेचं सोनं वगेरे करतात असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा निव्वळ भ्रम आहे.>>>>
कला ही वस्तू आहे की सेवा? आधी ठरवा. आणि यावरील मुद्दा आधीच मांडला आहे, कला सादर करण्याचा योग्य मोबदला मिळाला, तर तिचं सोनंच करावं. उगाच निस्सीम वगैरे चाहत्यांना काय वाटेल, याच्या भानगडीत पडू नये. चाहत्यांना दिवसेंदिवस नवीन ऑप्शन मिळतात. आणि एखादा खरोखर निष्ठावान असेल, तर त्याची तुमची मदत करण्याइतकी ऐपत असेल, असं अजिबात नाही... जमेल तितका पैसा गाठीशी ठेवावा, सुखात आयुष्य कंठाव, वारे फिरल्यावर जुन्या आठवणीत रमाव.

आपण जे ऑफिसला जाऊन काम करतो वा बिजनेस करतो ते देखील स्वतामध्ये असलेले कौशल्य विकूनच पैसा कमावत असतो ना?>>>> हे बाकी बरोबर बोललात, सकाळ ते संध्याकाळ कॉम्प्युटरसमोर बसून ctrl+c ctrl+v सारखं दाबत राहणं हे कौशल्याचंच काम म्हणायला पाहिजे. तसेच बॉसची नजर चुकवून मोबाइलवर विविध गेम्स खेळणं, व्हाट्सअप चॅटिंग करणं,मायबोलीवर टाईप करणं हे सुद्धा कौशल्याचं काम आहे, तसेच अर्ध्या तासाचा लंच ब्रेक तासाचा करणे याला सुद्धा कौशल्याचं काम म्हणतात, तसेच बॉसच्या सुरात सूर मिसळून हांजी हांजी करणं याला पण कौशल्य लागतं

इशा सासरी जाऊन तिथे रमली सुद्धा.
>>>

ईशा आणि विक्रांतचा साखरपुडाच झाला आहे. लग्न व्हायचे बाकी आहे. त्याआधीच सासरी रमावे ही आपली संस्कृती नाही.

> Submitted by मानव पृथ्वीकर on 9 January, 2019 - 17:18

ठराविक मान्यवर जाणकार मंडळींनी कलाकारांचे व्यासपीठ ठरवावे असा आपण अर्थ काढला आहे. हरकत नाही. हे मान्यवर म्हणजे ते स्वत:च कलाकार आहेत. फक्त ते व्यासपीठ ठरवताना त्याची बुद्धी गहाण पडू नये इतकीच माफक अपेक्षा त्यांचे चाहते म्हणून लाखो रसिकांची असते.

> दुसरे म्हणजे कला विकली, तिचा मोबदला घेतला की आत्मा मरतो हे आपले आपणच ठरवत आहोत.
> Submitted by ऋन्मेऽऽष on 9 January, 2019 - 18:12

नाही कळले तुम्हाला. कला कौशल्य जरूर विका पण स्वत:ला विकू नका. केवळ आर्थिक/व्यावसायिक फायदा मिळतो म्हणून कोणत्याही थराला जाऊन काहीही करायचे म्हणजे स्वत:ला विकणे.

> मग अमिताभ जे सांगतोय ते रचलेला बनाव आहे का?
> Submitted by फारएण्ड on 9 January, 2019 - 19:08

बनाव नाही. पण अंबानींनी त्या काळात त्याला देऊ केलेली मदत केवळ "भणंग अवस्थेत गेलेल्या कलाकाराला" देऊ केलेली मदत नव्हती हे लक्षात घ्या. अंबानींच्या दृष्टीने ती "इन्वेस्टमेंट" होती. कारण तेंव्हा जरी तो आर्थिक डबघाईला आला असला तरी बच्चन हा करिष्मा असलेला कलाकार आहे शिवाय नेहरू-गांधी घराण्याशी त्याचे अत्यंत निकटचे संबंध होते ह्या गोष्टी अंबानींनी नक्कीच विचारात घेतल्या असणार.

> मला ही आत्मा विकण्याची कन्सेप्ट फारच आवडली आहे
> Submitted by किल्ली on 9 January, 2019 - 19:23

साहित्यिक वसंत बापट यांचा हा शब्दप्रयोग आहे. एखाद्याकडून लाभ मिळतोय म्हणून त्याला खुष ठेवण्यासाठी काहीही करायचे (मग भले ते आपल्या वयाला स्टेट्सला साजेसे नसेना का) म्हणजे आत्मा विकणे.

> Submitted by अज्ञातवासी on 9 January, 2019 - 20:06

१. अंबानीने कुसुमाग्रजांना पैसे देऊन लग्नाच्या अक्षता लिहायला सांगणे आणि त्यांनी त्या लिहिणे आणि मायबोलीवर त्याचे समर्थन होणे हे सगळे मी उपरोधाने लिहिले होते. सस्मित यांना पळून जाण्यासाठी (आणि त्यांनाच काय मला सुद्धा) आधीचे मुद्दे कमी पडले असतील तर हे वाचून तर नक्कीच पळून जायची इच्छा होणार असा गर्भितअर्थ त्यात होता. पण तुम्ही त्याही पुढे जाऊन "मी तर नक्कीच करेन. कलेपायी भणंग आयुष्य जगत बसण्यापेक्षा..." वगैरे विधाने करत कुसुमाग्रजांसारख्या ज्ञानपीठप्राप्त कवीने पैशासाठी उद्योगपतीच्या घरच्या लग्नाच्या अक्षता लिहिण्यात काहीच गैर नाही असे थेट सुचवलेत. आता मी पामर काय बोलणार यावर? याच न्यायाने उद्या "पैसे मिळत असतील तर राष्ट्रपतीनी अंबानीच्या लग्नाच्या इवेन्ट म्यानेजर पदाची जबाबदारी घ्यावी" असा मुद्दा आला तर त्याचे सुद्धा समर्थन कराल. आयुष्य कळलेले नाही कुणालाच. मान्य. पण तुम्ही तर हद्दच गाठली ब्वा.

२. कोल्हापुरातल्या त्या कवीमहोदयांचा उल्लेख मी हे उदाहरण देण्यासाठी केला कि एखाद्याने पैशाच्या नादात स्वत:च आपली किंमत कमी करून घेतली कि नंतर ती कायमचीच कमी होते. अक्षता लिहून द्यायचे दुकान टाकण्यापूर्वी त्यांना मराठी कवी म्हणून ओळखले जात होते. बहुधा त्यांची एखादी कविता पण पाठ्यपुस्तकात होती माझ्या आठवणी नुसार. शिवाय पूर्वी त्यांनी मराठी चित्रपटांसाठी सुद्धा गाणी लिहिली आहेत. पण सध्या कोल्हापुरात "अक्षता लिहून देणारे" इतकीच त्यांची सर्वाधिक ओळख आहे. (अर्थात अक्षता लिहून देण्याच्या जाहिरातीत ते स्वत:चा कवी म्हणून उल्लेख करतात. पण तो भाग निराळा)

३. > आणि राहिली बात हलाखीत गेलेल्या कलाकारांची. जर कोणी आलाच असेल ह्या कलाकारांच्या मदतीला तर तो त्यांचा निस्सीम चाहताच आला असेल. >>>>>
> उदाहरण द्या... कन्सेप्ट क्लियर करण्यासाठी. मला कुणी ऐकिवात नाही.

कोणीही त्यांची मदत करत नाही हे कटुसत्य आहे. पण जर चुकून कधी कोणी केलीच तर तो एखाद्या उद्योगपती पेक्षा त्याचा चाहताच असेल... असा मुद्दा आहे.

४. > एकदा रिलायन्स चा CSR रिपोर्ट वाचा. जगात पैसा कमावण्याइतकी समाजसेवा कुठली नाही, समाजसेवेसाठी पैसा लागतो, आणि तो कमावणार्याकडूनच येतो.

अंबानी बाबत फारच थोर कल्पना आहेत तुमच्या. रिलायन्सच्या CSR रिपोर्ट ऐवजी जरा टाटां विषयी वाचा. पैसा कमावणे आणि समाजसेवा करणे या दोन्ही गोष्टींचे शुद्ध अर्थ समजून येतील. आणि जमल्यास रिलायन्स मध्ये काम करणाऱ्या एक दोघांना ते काम काय करतात आणि त्याचा पगार किती मिळतो याविषयी पण विचारा. पिळवणूक म्हणजे काय याचा सुद्धा शुद्ध अर्थ समजून जाईल.

५. > उद्या तुम्ही सवाईच तिकीट काढून पहिल्या लायनीत आस्वाद घेतला, तर गायकांनी कला विकली वाटतं?

मी काय लिहिलंय ते कृपया पुन्हा एकदा वाचा. "जेंव्हा हे लोक कलाकारांना आपल्या खाजगी कामासाठी पैसे देतात तेंव्हा ते त्यांना व त्यांच्या कलेला विकत घेतात" असं मी स्पष्ट लिहिलंय. आपण तिकीट काढतो म्हणजे सवाईच्या कलाकारांना आपल्या खाजगी कामासाठी पैसे देत नाही किंवा आपल्यासाठी वाढप्याचे काम करण्याचे किंवा आपल्या तालावर नाचण्यासाठी पैसे देत नाही. ते पुण्यकर्म आपले आदर्शवत अंबानीच करू जाणोत.

६. > कला ही वस्तू आहे की सेवा? आधी ठरवा.

वस्तू? वस्तू हा शब्द माझ्या लिखाणात कुठेच नाही. तो तुम्ही वापरलात. त्यामुळे तुम्हीच ठरवा तुम्हाला काय म्हणयचे आहे.

> कला सादर करण्याचा योग्य मोबदला मिळाला, तर तिचं सोनंच करावं. उगाच निस्सीम वगैरे चाहत्यांना काय वाटेल, याच्या भानगडीत पडू नये.

मान्य आहे. पण वाढप्याचे काम करून अमीर खान पासून बच्चन पर्यंत थोर्थोर कलाकारांनी कोणती कला सादर केली हे जरा सांगता येईल का?

जरा किस्स पाडतोय इथे.

१. मतिथार्थ = मतित + अर्थ. माझ्या मतिनुसार लागला, तो अर्थ. हा १००% वेळा प्रिज्युडिस उर्फ पूर्वमताग्रह असतो. रुन्म्या प्रत्येक वेळी मुद्दाम हाच शब्द लिहितो, लिहील व लिहीत राहील. १००% ग्यारंटी.

२. मथितार्थ. = खरा शब्द, उर्फ, योग्य अर्थ, = मथित, अर्थात मंथन करून - चर्चा, समुद्रमंथन करून वर लोण्यासारखा आलेला अर्थ. हा लोक शक्यतो टाळतात.

या धाग्याचे मंथन सुर-असुरांनी करून, मधेच बेफि उर्फ कासवाने पाठीवर मेरूपर्वताची रवी धरून, ऋनम्या सारख्या धाग्याला विळखा घालणार्‍या शाहरूख भुजंगाची दोरी करून वर जे लोणी उर्फ मेद उर्फ जे काय आलं असेल, ते हे, की इथे फक्त में.मा. (हा इंग्रजी शब्द आहे.) सुरू आहे.

तेव्हा लोकहो, आवरा.

अंबानीने कुसुमाग्रजांना पैसे देऊन लग्नाच्या अक्षता लिहायला सांगणे आणि त्यांनी त्या लिहिणे आणि मायबोलीवर त्याचे समर्थन होणे हे सगळे मी उपरोधाने लिहिले होते. सस्मित यांना पळून जाण्यासाठी (आणि त्यांनाच काय मला सुद्धा) आधीचे मुद्दे कमी पडले असतील तर हे वाचून तर नक्कीच पळून जायची इच्छा होणार असा गर्भितअर्थ त्यात होता. >>>>>
पर्सनल अटॅक का करतायेत? मागेही तुम्ही सस्मित याना एक असाच प्रतिसाद दिला होता.

पण तुम्ही त्याही पुढे जाऊन "मी तर नक्कीच करेन. कलेपायी भणंग आयुष्य जगत बसण्यापेक्षा..." वगैरे विधाने करत कुसुमाग्रजांसारख्या ज्ञानपीठप्राप्त कवीने पैशासाठी उद्योगपतीच्या घरच्या लग्नाच्या अक्षता लिहिण्यात काहीच गैर नाही असे थेट सुचवलेत. आता मी पामर काय बोलणार यावर?>>>>>
एक मिनिट, मग ज्ञानपीठ प्राप्त कवीने, स्वतःच्या कलेचा वापर करून काहिच अर्थार्जन करू नये? निस्सीम सो कोल्ड चाहत्यांच्या अहंगंडापायी गरिबीत जगावं? प्रत्येकाला अर्थार्जन करण्याचा पूर्ण हक्क आहे.

याच न्यायाने उद्या "पैसे मिळत असतील तर राष्ट्रपतीनी अंबानीच्या लग्नाच्या इवेन्ट म्यानेजर पदाची जबाबदारी घ्यावी" >>>>>
कन्सेप्ट क्लियर करा, राष्ट्रपती हे पद आहे, अमिताभ बच्चन हे पद नाही.

असा मुद्दा आला तर त्याचे सुद्धा समर्थन कराल. >>>>
वर समजावलं आहे!

आयुष्य कळलेले नाही कुणालाच. मान्य. पण तुम्ही तर हद्दच गाठली ब्वा.>>>>
अरे तुमचा सो कॉल्ड अहं माझ्या प्रतिसादाने सुखावला नाही, तर मी हद्द गाठली. कमाल आहे. मी तर आयुष्य कसे कळून घ्यावे यावर लेखाची वाट बघत होतो.

२. कोल्हापुरातल्या त्या कवीमहोदयांचा उल्लेख मी हे उदाहरण देण्यासाठी केला कि एखाद्याने पैशाच्या नादात स्वत:च आपली किंमत कमी करून घेतली कि नंतर ती कायमचीच कमी होते.>>>>>>
वा रे वा, आता लगेच संदर्भासहित स्पष्टीकरण! कन्सेप्ट क्लियर नसताना प्रतिसाद दिला तर असं होतं

अक्षता लिहून द्यायचे दुकान टाकण्यापूर्वी त्यांना मराठी कवी म्हणून ओळखले जात होते. बहुधा त्यांची एखादी कविता पण पाठ्यपुस्तकात होती माझ्या आठवणी नुसार.>>>>>
ओळखले जात होते - कुसुमाग्रज अजरामर आहेत.
बहुधा त्यांची एखादी कविता पण - स्टील कनफुज्ड? कुसुमाग्रज इथे लोकांच्या हृदयात घर करून आहेत.
आणि दुकान टाकले हे आता लिहिले. तो त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न आहे. नाहीतर तुम्ही का नाही त्यांची सुखासमाधानाने राहण्याची व्यवस्था करत? तुम्ही तर चाहते. ते पुन्हा नव्या जोमाने लिहू लागतील!

शिवाय पूर्वी त्यांनी मराठी चित्रपटांसाठी सुद्धा गाणी लिहिली आहेत. पण सध्या कोल्हापुरात "अक्षता लिहून देणारे" इतकीच त्यांची सर्वाधिक ओळख आहे. (अर्थात अक्षता लिहून देण्याच्या जाहिरातीत ते स्वत:चा कवी म्हणून उल्लेख करतात. पण तो भाग निराळा)>>>>>
इतना प्यार मत करो कोल्हापूरसे. उसके बाहर भी दुनिया है! आणि साहेब, इतक्या प्रतिभावंत कविवर अक्षता लिहून देण्याची वेळ यावी? कुठे गेला होता निस्सीम चाहत्या तुझा धर्म

३. > आणि राहिली बात हलाखीत गेलेल्या कलाकारांची. जर कोणी आलाच असेल ह्या कलाकारांच्या मदतीला तर तो त्यांचा निस्सीम चाहताच आला असेल. >>>>>
> उदाहरण द्या... कन्सेप्ट क्लियर करण्यासाठी. मला कुणी ऐकिवात नाही.

कोणीही त्यांची मदत करत नाही हे कटुसत्य आहे. पण जर चुकून कधी कोणी केलीच तर तो एखाद्या उद्योगपती पेक्षा त्याचा चाहताच असेल... असा मुद्दा आहे.>>>>>
पुन्हा फिरवाफिरवी. असेल, नसेल... शब्दच्छल बंद करा
पुरावा, कोण पुढे आलं!
https://www.google.com/amp/s/www.moneycontrol.com/news/business/dhirubha...

४. > एकदा रिलायन्स चा CSR रिपोर्ट वाचा. जगात पैसा कमावण्याइतकी समाजसेवा कुठली नाही, समाजसेवेसाठी पैसा लागतो, आणि तो कमावणार्याकडूनच येतो.

अंबानी बाबत फारच थोर कल्पना आहेत तुमच्या. रिलायन्सच्या CSR रिपोर्ट ऐवजी जरा टाटां विषयी वाचा.>>>>>
मी काय वाचावं हे सांगितलं थँक्स... आता तुम्ही जरा वाचा CSR रिपोर्ट!

पैसा कमावणे आणि समाजसेवा करणे या दोन्ही गोष्टींचे शुद्ध अर्थ समजून येतील.>>>>>
एकच अर्थ होतो, समाजसेवेसाठी पैसा लागतो. गरजवंताला विचार करायचा नसतो, पैसा कुठून आला. टाटाने दिला की अंबानींने. गरज भागण्याशी मतलब!

आणि जमल्यास रिलायन्स मध्ये काम करणाऱ्या एक दोघांना ते काम काय करतात आणि त्याचा पगार किती मिळतो याविषयी पण विचारा. पिळवणूक म्हणजे काय याचा सुद्धा शुद्ध अर्थ समजून जाईल.>>>>>
अरे वा, मुद्दा राहिला नाही तर आता रिलायन्सच्या एम्प्लॉईज चे कैवारी बनलाय तुम्ही. प्लिज तुम्ही एक जनहित याचिका दाखल कराच अंबानीविरुद्ध. आणि बोलवा रिलायन्सच्या कर्मचार्यांना. पुण्य लागेल हो, आणि तुमचा फोटो पेपर मध्ये आला तर मीही भरल्या डोळ्यांनी बघेन!

अंबाणीच्या लग्नात बच्चन वाढपी हा मुद्दा होता ना. मग कुसुमाग्रज आणलेत, कोल्हापुरी अक्षता आल्यात, कैवारी झालात. सस्मित बिचाऱ्या पळत होत्या कंटाळून, पण तुम्ही तर बेडुकुडया मारतायेत!

५. > उद्या तुम्ही सवाईच तिकीट काढून पहिल्या लायनीत आस्वाद घेतला, तर गायकांनी कला विकली वाटतं?

मी काय लिहिलंय ते कृपया पुन्हा एकदा वाचा. "जेंव्हा हे लोक कलाकारांना आपल्या खाजगी कामासाठी पैसे देतात तेंव्हा ते त्यांना व त्यांच्या कलेला विकत घेतात" असं मी स्पष्ट लिहिलंय. आपण तिकीट काढतो म्हणजे सवाईच्या कलाकारांना आपल्या खाजगी कामासाठी पैसे देत नाही किंवा आपल्यासाठी वाढप्याचे काम करण्याचे किंवा आपल्या तालावर नाचण्यासाठी पैसे देत नाही. ते पुण्यकर्म आपले आदर्शवत अंबानीच करू जाणोत.
>>>>>>
सवाईला तिकीट काढून जाणं, हे सार्वजनिक काम आहे, खाजगी नाही. छान माहिती पुरवलीत. हे सार्वजनिक काम करणं आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.
आणि अंबानींनी पैसे पुरवलेत याची मस्त माहिती आज मला मिळाली.
पुन्हा चिकटवतोय!
विकणे याचा अर्थ त्या मालकीचे हस्तांतरण होणे. म्हणजे उद्यापासून त्या गायकांच्या कलेवर तुमची मालकी वाटतं. प्लिज... प्रॉडक्ट्सचे दोन भाग पडतात, गुड्स आणि सर्विस, त्यापैकी सेलिंग हा पार्ट कशा प्रकारे अंमलात येतो हे वाचा! रेफरन्स साठी विपु करा! तुम्हाला मदत करायला नक्की आवडेल!

६. > कला ही वस्तू आहे की सेवा? आधी ठरवा.

वस्तू? वस्तू हा शब्द माझ्या लिखाणात कुठेच नाही.तो तुम्ही वापरलात. त्यामुळे तुम्हीच ठरवा तुम्हाला काय म्हणयचे आहे.
>>>>>
छपरी चाळे करू नका. मूळ प्रतिसाद हा होता.
'एखादी वस्तू याचा अर्थ कला व त्या कलाकारांच्या कलेचं सोनं वगेरे करतात असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा निव्वळ भ्रम आहे.:>>>>

> कला सादर करण्याचा योग्य मोबदला मिळाला, तर तिचं सोनंच करावं. उगाच निस्सीम वगैरे चाहत्यांना काय वाटेल, याच्या भानगडीत पडू नये.

मान्य आहे. पण वाढप्याचे काम करून अमीर खान पासून बच्चन पर्यंत थोर्थोर कलाकारांनी कोणती कला सादर केली हे जरा सांगता येईल का?>>>>
साहेब मग तिथे ते थोर्थोर कलाकार म्हणून नाही, आणि कला सादर करण्यासाठी नव्हे, तर आपल्यासारखे हाडामांसाचे, भावभावना असलेले, एक जवळचे संबंधीत अथवा परिचित म्हणून गेले होते, आणि कला, कलाकार आणि आतला माणूस याची गल्लत करू नये हे कधी समजून घेणार?
मी गेल्यावर? (धाग्यावरून)

जरा छोट्या पोस्ट लिहा लोकहो
मजा घालवू नका.

शाहरूख नाचतो आणि करोडो कमावतो आणि आपण त्याने आत्मा विकला पण आपला शाबूत आहे याचा जल्लोष करत राहतो.

असो,
मला माझा आत्मा विकायचा आहे.
कोणी चार.पाच करोड दिले तर आजपासून माझा आत्मा त्याचा !...

आहे का ईथे कोणी जो माझा आत्मा विकत घ्यायची ईच्छा बाळगून आहे.... मायबोलीकरांना साडेबारा टक्के कन्सेशन !

मी आजपर्यन्त आलेले धाग्यावरचे प्रतिसाद व मूळ धागा वाचले. त्यापैकी मला फक्त म्हण च आवडली. एखाद्या कलाकाराने आपल्या भविश्यातील कमाईवर लक्श ठेवून काही काम केले तर त्यात वाईट काय झाले. प्रत्येक व्यक्ती आपल्या फायद्याचे पहात असते. असे माझे मत आहे. अमिताभ वा शाहरुख यानी लग्नात जी कामे केली त्यामुळे त्यान्चा काही अपमान झाला असे मला वाटत नाही. शिवाय या कलाकारान्चे व अम्बानी कुटुम्बियान्चे सम्बन्ध कसे आहेत हे फक्त त्यानाच महित आहे नाही का?

बाबा आमट्यांच्या लग्नात मला वाटतं कुसुमाग्रज (का माडगुळकर ? ) यांनी मंगलाष्टके लिहिलेली, पुलंनी चाल लावलेली आणि (बहुतेक वसंतरावां बरोबर) गायलेली.
इथे कोणाचिही तुलना करण्याचा यःकिंचितही उद्देश नाही. पण कोणी कोणाला काय प्रेमाने केलं असेल ते करु द्या. तुम्ही ही प्रेम देत रहा. आनंद वाढेल. आणि देअर ईज नो सेल्फ लेस डीड - फिबी बुफे

तपशिल पुढे मागे होत असेल. कन्फर्म करायला पुस्तक सध्या हाताशी नाही.

Pages