नवीन मराठी म्हण: अंबानीच्या लग्नात बच्चन वाढपी

Submitted by Parichit on 20 December, 2018 - 01:07

घटनाच अशी घडली कि जीने एका नवीन मराठी म्हणीला जन्म दिला

म्हण: अंबानीच्या लग्नात बच्चन वाढपी

अर्थ: एखाद्याचे कितीही मोठे नाव आणि कर्तृत्व असले तरी त्याच्याहून श्रेष्ठ असलेला कोणीतरी त्याचा कचरा करतोच.

कधी वापरायची: समजा तुमच्या एखादया ऑफिसमधल्या सहकाऱ्याला अनेक वर्षाच्या मेहनतीचे फळ म्हणून बढती मिळाली. आणि काही दिवसांनी एखाद्या मोठ्या क्लायेंटने त्याला आपल्या घरी पाणी भरायचे काम सांगितले. अगदी विहिरीतून पाणी शेंदायचे आणि घागरी खांद्यावरून आणून त्याच्या घरी पाणी भरायचे. तर या मित्राला प्रचंड वाईट वाटेल ना? पण प्रोजेक्ट हातचा जाऊ नये म्हणून ते तो करणार. मग त्याला घेऊन त्याचे दु:ख हलके करण्यासाठी म्हणून बीअर प्यायला न्या आणि पिता पिता सांगा...

"नको रे वाईट वाटून घेऊ इतके. आम्हाला माहित आहे प्रमोशन मिळाल्याने तू साहेब झाला आहेस. पण हे बघ काही झाले तरी म्हणतात ना 'अंबानीच्या लग्नात बच्चन वाढपी'. त्यामुळे चालायचेच. नको मनाला लावून घेऊस. क्लायेंट तुला आपल्या घरचाच आहेस असे समजतो. म्हणून तर तुला पाणी भरायला बोलावले ना"

असे म्हटल्यावर त्याचे दु:ख नक्की हलके होणार म्हणजे होणार.

तर हे एक उदाहरण झाले. हि म्हण अशा अनेक प्रसंगी वापरता येईल. आता या म्हणी मागची घटना काय यावर जरा विचार करू.

घटना: काही दिवसांपूर्वी झालेल्या अंबानी कुलोत्पन्न कन्या इशा अंबानी हिच्या शाही विवाह प्रसंगी झालेल्या मेजवानी प्रसंगी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अमीर खान वगैरे हे वाढप्याचे काम करत असल्याची बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाली. बाकी सुपर डुपर हिरो हिरोईन मंडळींना अंबानींनी नाचून उपस्थितांचे मनोरंजन करायच्या कामाला लावले होते. ह्या प्रकाराची सोशल मिडीयावर खूपच चर्चा रंगली. याचे समर्थन करणारे म्हणाले "वाढप्याचे काम मुलीच्या घरचे आनंदाने करतात. अंबानी हे या दिग्गज कलाकारांना घरच्यासारखेच समजतात. म्हणून त्यांनी वाढप्याचे काम केले तर बिघडले कुठे?"

पण माझ्यासारख्या सर्वसामान्य पामरांना प्रश्न पडतात कि हे सगळे इतके मोठे मोठे कलाकार आहेत. जनतेमध्ये यांनी खूप आदर कमावला आहे. यांना इतके मिंधे बनायची काय गरज आहे. अशी कोणती मजबुरी असते यांची कि ह्यांना हि कामे करावी लागतात. जी जनता यांचा आदर करते त्यांचा सुद्धा हा अवमानच नाही का. बर "घरच्यासारखे समजतात" हे लॉजिक असेल तर अंबानी यांनी मोदी किंवा राहुल गांधी किंवा इतर मोठ्या नेत्याला घरचे समजून कामाला का नाही लावले. किंवा अंबानी स्वत: बच्चन परिवारातल्या लग्नात वाढप्याचे काम करतील का. असे प्रश्न आहेत.

भारतात एखादा/दी कलाकार कितीही जेष्ठ श्रेष्ठ असेल आणि लोकांच्या मनात आदराचे स्थान मिळवले असले तरी उद्योगपती राजकारणी बिल्डर डॉन इत्यादी लोकांच्या मते त्यांना फार आदर नसतो हेच अनेकदा दिसून आले आहे. कारण अशा घटना आधी पण घडल्या आहेत.

१. बॉलीवूडच्या कलाकारांना दुबईला नेऊन तिथल्या शहांनी किंवा डॉननी आपल्या कार्यक्रमात नाचवणे हे प्रकार फार पूर्वीपासून घडले आहेत.
२. भारतात उद्योगपतीच्या घरच्या लग्नात बॉलीवूडच्या कलाकारांना नाचवणे हे तर कॉमन आहे.
३. काही वर्षांपूर्वी एका प्रख्यात उद्योगपतीच्या घरच्या लग्नात व्हिडीओ शुटींग करण्याचे काम बॉलीवूड मधील एका प्रसिद्ध दिग्दर्शकाला दिले होते.
४. अजून एका बलाढ्य व्यावसायिकाच्या लग्नात बॉलीवूडच्या प्रख्यात कोरिओग्राफरला लग्नातले नाच बसवायला सांगितले होते.

तर मंडळी तुमचे काय मत आहे यावर?

765448-00-ambanis.jpg

Group content visibility: 
Use group defaults

हा अजून एक "मूर्ख". अगदी माझ्यासारखा. अशा भूमिकेला मूर्ख म्हणत असतील तर हरकत नाही आम्ही मूर्ख आहोत तेच बरे.

पैशांसाठी लग्नात नाचणाऱ्यांपैकी मी नाही, जॉनचा बड्या कलाकारांना टोला
https://www.loksatta.com/manoranjan-news/john-abraham-attacked-highest-p...

पैशांसाठी लग्नात नाचणाऱ्यांपैकी मी नाही, जॉनचा बड्या कलाकारांना टोला
>>>>

पब्लिसिटी स्टंट
मोठ्यांना नावे ठेवा स्टृटेजी
राखी हुशार आहे यात...

अभिनेत्यानं केवळ अभिनयाकडे लक्ष द्यावं हे जॉन ने म्हणणं म्हणजे फारच विनोदी आहे.
जॉनला कुणी नाचायला बोलावतं का आधी? मुळात त्याला नाचता येतं का?

हो.

हल्लीची गाणी लावून त्यावर दोन तरी स्टेप्स घेता येतात का पहा, म्हणजे फरक कळेल.

मुळात लग्नात नाचायला नाचता यावं लागतं का ?>> >> नाचता यावं लागतं म्हणजे अगदी स्टेप्स वैगेरे नसतील येत तरी चालतं पण ठेक्यावर बीटवर जोशात नाचता तर आलं पाहिजे ना. Happy

नाचता यावं लागतं म्हणजे अगदी स्टेप्स वैगेरे नसतील येत तरी चालतं पण ठेक्यावर बीटवर जोशात नाचता तर आलं पाहिजे ना. Happy>>>> असं काही नाही बरं का. ठेक्यावर नाचता नाही आले तरी ग्यानबा तुकारामच्या तालात नाचायचे. किंवा मग बजने दे धडक धडक च्या चालीवर मागे पुढे हहह हहह करुन नाचायचे. Proud ( स्वानुभव नाही, पण मैत्रिणीच्या लग्नात हे बघीतले मध्यंतरी )

> पब्लिसिटी स्टंट मोठ्यांना नावे ठेवा स्टृटेजी राखी हुशार आहे यात...
> Submitted by ऋन्मेऽऽष on 7 January, 2019 - 21:31

अशा पब्लिसिटीची जॉन सारख्याला गरज आहे असे वाटत नाही. प्रुव केलंय त्याने आधीच स्वत:ला.

> तो टोला सलमानवर आहे. या लग्नाशी त्याचा संबंध नाही.
> Submitted by फारएण्ड on 7 January, 2019 - 21:50

पूर्ण बातमी वाचा. शेवटी स्पष्ट उल्लेख आहे.

> अभिनेत्यानं केवळ अभिनयाकडे लक्ष द्यावं हे जॉन ने म्हणणं म्हणजे फारच विनोदी आहे. जॉनला कुणी नाचायला बोलावतं का आधी? मुळात त्याला नाचता येतं का?
> Submitted by सस्मित on 8 January, 2019 - 11:59

अभिनेत्याने अभिनयाकडे लक्ष देऊ नये असे म्हणयचे आहे का आपल्याला? लग्नात नाचण्यासाठी नाचायला यावे लागते हा आपला गोड गैरसमज आहे. नाचता येते म्हणून लग्नात नाचायला बोलावतात (किंवा बोलवले कि जातात) अशी भाबडी समजूत असावी बहुतेक आपली. हेमा मालिनी, वैजयंतीमाला ह्या नाचण्यासाठी प्रसिद्ध होत्या. ती प्रसिद्धी त्यांना त्याकाळातल्या उद्योगपतींच्या लग्नात नाचून मिळाली असे वाटते का? "टाटांच्या लग्नात वैजयंतीमाला नाचत होती" असे चुकून अथवा विनोदाने तरी कुठे ऐकायला मिळते का? कन्सेप्ट क्लीअर नसल्या कि अशा प्रतिक्रिया येतात.

@परिचित - तुम्ही धागा उघडण्याआधी डिस्क्लेमर टाका, की इथे येणारे प्रतिसाद फक्त लेखकांशी सहमत असावेत. लेखकाच्या मताची री ओढणारे किंवा ते मत अजून अधोरेखीत करणारे हवेत.
धागा काढण्याची इतकी घाई होते, तर विरोधातील प्रतिसादही पचवायची ताकद ठेवा.
तुमच्या धाग्यावर प्रतिसाद देण्याआधी काय कन्सेप्ट क्लियर कराव्यात, कुठून कराव्यात, त्यासाठी रेफरन्स बुक कुठून मिळतील, पब्लिषड रिसर्च पेपर, जर्नल्स, त्यावरील कोंफेरेन्स, सेमिनार, वर्कशॉप, ट्रेनिंग प्रोग्रॅम कुठे असतील याचीही माहिती द्यावी. धागा उघडण्याआधी तुम्ही स्वतः हे सगळं केलंय असं धरून चालतो...

पूर्ण बातमी वाचा. शेवटी स्पष्ट उल्लेख आहे. >>> वाचली आहे. ते बाकीचे बातमी देणार्‍याचे गेसवर्क आहे.

मी जॉन ला मूर्ख वगैरे म्हणत नाही. त्याचे मत त्याने सांगितले. अमिताभचे अंबानी कुटुंबाशी काय नाते आहे व त्यामुळे तो त्यांच्या लग्नात कसा सहभाग घेतो याच्याशी जॉनचा काही संबंध नाही.

मुळात लग्नात नाचायला नाचता यावं लागतं का?
>>>>

त्याबदल्यात पैसे हवे असतील, जसे शाहरूख घेतो, तर येस्स!

आता कोणी शाहरूखला तरी नाचता येते का म्हणावे म्हणजे मी त्याच्या गुडघ्याला स्पर्श करून आत्महत्या करतो.

अशा पब्लिसिटीची जॉन सारख्याला गरज आहे असे वाटत नाही. प्रुव केलंय त्याने आधीच स्वत:ला.
>>>>

पब्लिसिटीची गरज या क्षेत्रात अमिताभपासून शाहरूखपर्यंत सर्वांना असते. जॉन यांच्यापेक्षा मोठा आहे का?

हे गाणं बघा
नाच बघा
५० वर्षे झालेल्या या माणसाची एनर्जी बघा
थक्क व्हाल !
ज्यांचे मन पूर्वग्रहदूषित असेल त्यांनी तर झरूर बघा Happy

https://youtu.be/d4_szl5EEww

शाहरुखला नाचता येतं. आणि नसतं नाचता येत तरी त्याला मोठमोठ्या उद्योगपतींनी बोलावलंच असतं कारण तो शाहरुख आहे.

> Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 19:43

अहो इतके मनावर घेऊ नका. या धाग्यावर शंभरावर प्रतिसाद आलेत बहुतेक सगळे लेखकांशी असहमत असणारेच आहेत. पण हो मी सस्मित यांना तुमच्या कन्सेप्ट क्लीअर नाहीत अशा प्रकारचा व्यक्तिगत शेरा मारायला नको होता. पण यातूनच तर आपण शिकतो. पुढच्या वेळी काळजी घेईन. बाकी धाग्याव्रचा पहिलाच प्रतिसाद बघा. हाणलेच आहे त्यांनी मला धरून आपली असहमती दाखवण्यासाठी. पण असो.

> अमिताभचे अंबानी कुटुंबाशी काय नाते आहे व त्यामुळे तो त्यांच्या लग्नात कसा सहभाग घेतो...

फक्त अमिताभ नाही करेक्शन करा अमिताभ, अमीर, शाहरुख, अभिषेक, ऐश्वर्या इत्यादी यांचे अंबानी कुटुंबाशी नाते आहे. (बाकी जया बच्चन, गौरी खान, आलीय भट, प्रियंका, करीना वगैरे वाढताना दिसत नाहीत कदाचित त्या आत भांडी घासून घेत असतील. पिरामल कुटुंबात ती सुद्धा परंपरा असेल कदाचित. असू दे ब्वा. सन्मान असतो)

> पब्लिसिटीची गरज या क्षेत्रात अमिताभपासून शाहरूखपर्यंत सर्वांना असते

अशा पब्लिसिटीची जॉन सारख्याला गरज नाही असे म्हटले मी. म्हणजे मोठ्यांना नावे ठेवून वगैरे (ज्याचा तुम्ही आधी उल्लेख केला होता)

> इशा सासरी जाऊन तिथे रमली सुद्धा. तरी इथे कवित्व सुरूच.

प्रश्न तत्वाचा आहे आणि मी पुण्याचा आहे. Happy

बरं. तुम्ही तुमच्या घरच्या लग्नात अमिताभ , शाहरुख, अमीर कुण्णाकुण्णाला नाचायला किंवा वाढायला बोलवू नका. हे आणि यांच्यासारखे ज्या लग्नांत असतील, तिथे जाऊही नका.

बाकी जया बच्चन, गौरी खान, आलीय भट, प्रियंका, करीना वगैरे वाढताना दिसत नाहीत कदाचित त्या आत भांडी घासून घेत असतील. >>>>>>> मानलं ब्वा तुम्हाला. _/\_

बाकी जया बच्चन, गौरी खान, आलीय भट, प्रियंका, करीना वगैरे वाढताना दिसत नाहीत कदाचित त्या आत भांडी घासून घेत असतील>>
हे ग्रहदूषीत विचार आहेत असं तुम्हाला वाटत नाही?
यातून जॉनच का वेगळा, केवळ त्याने मीडियात एक स्टेटमेंट केले म्हणून? तो पण आत भांडी घासत असेल /घासणाऱ्यांना पाणी शेंदून देत असेल वगैरे वाटत नाही का?

https://youtu.be/d4_szl5EEww
Submitted by ऋन्मेऽऽष on 9 January, 2019 - 08:09

प्रश्न शाहरुखला व्यायाम करता येतो का असा नाहीये.
नवीन Submitted by मानव पृथ्वीकर on 9 January, 2019 - 08:16

#####
स्स्स्स्स्स्स्स्स्स्

तुम्हाला खरेच तो जबरा फॅन नाच व्यायामाचा प्रकार वाटतो?
म्हणजे मला नाच म्हणजे काय असतो यावर एक धागा काढावा लागणार तर ....

अशा पब्लिसिटीची जॉन सारख्याला गरज नाही असे म्हटले मी. म्हणजे मोठ्यांना नावे ठेवून वगैरे
>>>>>>>

पब्लिसिटीची गरज सर्वांना असते. फक्त मार्ग वेगवेगळे असतात.
जॉन सारखे बी ग्रेड कलाकारांकडे मोठ्यांना नावे ठेवा हा उत्तम पर्याय असतो. जेणे करून त्या मोठ्या लोकांवर जळणारी काही लोकं सुखावतील तर ती मोठी लोक आवडणारी काही लोक चिडतील. अन्यथा जॉनला उगाह ही उठाठेव करायची काय गरज होती.

आता मलाच सांगा गेल्या चार वर्षात मायबोलीवर जॉनचे नाव मोजून चार वेळा घेतले गेले असेल. त्याने दुय्यम भुमिका साकारलेल्या चित्रपटाच्या परीक्षणाने मायबोलीवर पन्नास पोस्ट तरी खेचल्या आहेत का?

तरीहा आज एक सिरपैर नसलेले विधान फेकताच त्याच्या नावाच्या दहाबारा पोस्ट पडल्या मायबोलीवर..

शाहरूख अमिताभ हे स्वत: मोठे सुपर्रस्टार आहेत. यांना प्रसिद्धीसाठी वेगळे फंडे वापरावे लागतात. अंबानीच्या लग्नातील सहभाग हा त्यातील एक फंडाही असू शकतो. लोकं चर्चा करतात आणि यांचे सुपर्रस्टारडम टिकून राहते Happy

Pages