पतिचे extra marital affair

Submitted by अनामिक... on 4 November, 2018 - 20:10

मी सध्या एका मोठ्या त्रासातून जात आहे. मी व माझा नवरा दोघे इंजिनिअर आहोत. आम्ही दोघे 44 वर्षांचे आहोत आणि लग्नाला 21 वर्षे पूर्ण झाली आणि आमचा प्रेमविवाह झालेला आहे. माझ्या घरच्यांचा विरोध पत्करून मी हे लग्न केले होते. आजही ती decision मला चूक वाटत नाही.
एक आम्हाला 7 वर्षांचा मुलगा आहे. पति मोठ्या कंपनीत CEO आहेत. मागच्या चार वर्षांपूर्वी पतिची नोकरी व शहर बदलले, म्हणून मला माझी चांगल्या पदावरची, मोठ्या कंपनीतली नोकरी सोडावी लागली. पती खूप busy असल्याने आणि मुलगा लहान असल्याने मी घरी राह्यचा निर्णय घेतला.

मुलगा सहा महिन्यांचा असतांना मी पुन्हा ऑफिस join केले होते व आमच्या कडे live-in maid होती. एक दिवस काही कामासाठी address proof म्हणून माझ्याकडे माझ्या पतिचे call records आले आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझी maid एक महिनाभर सुट्टीवर गावी गेली होती, तिच्याशी महिनाभर रोजचे 3-4 calls आणि total 2-3 तास दिवसाला असे call record दिसले. ऑफिस ची वेळ वेगळी असल्याने माझे पति 1.5 तास माझ्याआधी घरी पोचत असत. मुलगा तेंव्हा 3 वर्षांचा होता.
पतिचे असे म्हणणे आहे की तो त्या मेडच्या मुलाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी फोन करायचा. तेंव्हा तो मुलगा 14-15 वर्षांचा होता आणि ती मेड विधवा होती. तर हा त्यांची मदत म्हणून हे सगळे करत होता. हे reasoning मला कधीच पटले नाही. ह्या घटने नंतरही त्यांनी मला मेडलाच continue करण्यास भाग पाडले. नंतर शहर बदलल्यावर पण सहा महिने तिनी काम केले पण मग मी हट्टानी तिला काढून टाकले.

मी कसंबसं स्वतःला सावरत त्या प्रकरणातून बाहेर आले. त्यानंतर साधारण तीन वर्षांनी म्हणजे आजच्या काळात.
मला माझ्या पतिचे एका महिला सहकारीशी जरा वेगळे संबंध असावेत अशी शंका आली तर त्यांचे call records बघितले. त्यात मला एक संशयास्पद नंबर सापडला. फोन करुन बघितला तर जुन्या मेडचा. तर पुन्हा तेच सांगितले की त्या मेडच्या भावाशी तिच्या मुलाच्या नोकरी साठी फोन केला होता.

आता तिसरी फसवणुकीची गोष्ट सांगते जिच्या बद्दल मला जरा शंका आली होती. अहोंनी HR GM म्हणून एक महिलेला hire केले होते. ही महिला separated आहे. आम्ही आमच्या एका सुट्टीवर असतांना मी त्यांना दबक्या आवाजात तिच्याशी रोज दोन दोन तास बाथरूममध्ये बोलतांना ऐकले. Time zone वेगळा असल्याने पहाटे चार ते सहा असे बोलायचे. आम्ही ज्या दिवशी युरोप ट्रीपहून परतलो, त्याच्या दुसर्याच दिवशी हे पुन्हा त्या महिले बरोबर official trip ला युरोपात गेले, प्रवासात आणखी दोन लोक ही होते. पण मला ते नक्कीच strange वाटले. नंतर दोन महिन्यात पतिला company नी force resign करायला सांगितले without giving any reason. मग मी notice करायला सुरुवात केली की ते फोनवर किंवा WA continuous chat वर त्या महिलेशी contact मध्ये असतात. आणि फोन कायम लपवतात. एका संध्याकाळी माझा patience सुटला आणि मी त्यांना फोन मागितला. पहिले नाही म्हणाले पण मग मी forcefully घ्यायला गेले तर त्यानी मला दोनदा ढकलले आणि मी पडले. (पती अमराठी आहेत पण सुसंस्कृत घरातले आहेत, म्हणून मला हे push करणे अजिबातच पचनी पडले नाही) त्यांनी मग मला काही delete करुन मला mobile बघायला दिला, फक्त दोन मिनिटांसाठी. नंतर मी त्या महिलेला WA वर ह्या प्रकरणाबाबत विचारले तर ती म्हणाली मी काही तुम्हाला ओळखत नाही म्हणून मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही.
मी त्यांना म्हणाले की तुम्ही नक्की गुंतले आहात अजूनही contact zero करा मी सगळे विसरायचा प्रयत्न करते. पण ते म्हणतात मला आता नविन नोकरी लागे पर्यंत तिच्या मदतीची गरज आहे, जुन्या कंपनीतून काही document लागतील आणि दुसरे कोणीही supportive नाहीये. मला काही महिन्यांचा वेळ दे मी ह्या सगळ्यातून बाहेर येईन. आणि नंतर कधी तिचा कधी क्वचित फोन आला तरी ते घेतील कारण तिला खरोखर माझ्या मदतीची गरज असेल. त्यांचे म्हणणे आहे की आमची फक्त शुद्ध मैत्री आहे. पण ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सारखे तिच्याशी WA असतात. प्रत्यक्ष फोन मात्र कमी आहे (माझ्यासमोर तरी).

तर मला असा सल्ला हवा आहे की माझे काही चुकते आहे का? मी ह्या लग्नातून बाहेर पडावे की राहावे ह्याचे analysis मी केले आहे पण मला आणखी काही मते हवी आहेत.
पतिचा angle ही सांगते. त्यांचे म्हणणे आहे की काहीही चुकीचे झाले नाहीये, मी कदाचित थोडा overboard गेलो असेन lady colleague बाबत, पण मला हे लग्न मोडायची अजिबातही इच्छा नव्हती, नाहीये आणि नसेल. पण त्यांच्या मते मी जरा संकुचित प्रवृत्तीची असल्याने ही सगळी लपवाछपवी झाली. काही महिन्यांत सगळे पूर्ववत होईल. मुलाशी ते कुठल्याही बाबांसारखे, किंबहुना जास्तच emotionally attached आणि caring आहेत. पण मला आपण वेगळे होण्याचा प्रश्नच येत नाही हे सांगताना ते माझ्या कडे त्यांच्या पत्नी पेक्षा त्यांच्या मुलाची आई म्हणून बघतात, तेच मला टोचते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कठीण आहे हा त्रास सहन करणं. तुम्ही काय suffer करत असाल मी समजु शकते.
आजकाल पुरूषांसाठी हे कॉमन झालयं. काही सोडले तर जिकडे तिकडे हेच चित्र दिसते. तुम्हाला समजलं बाकी बायकांना माहित नसतं इतकाच काय तो फरक.
एकजात सर्व सारखेच. मी तुम्हाला निर्णय घेण्यात मदत तर करु शकत नाही. इतकचं सांगेण जो निर्णय घ्याल तो सर्व बाजुंनी विचार करुन घ्या.

एकजात सर्व सारखेच.

एकजात सर्व सारखेच. Uhoh
एवढं जनरायलेझन नका हो करू.

आपली विवाह संस्था टिकून आहे परस्पर विश्वासावर आणि त्यालाच तड़ा गेला तर संशयाची बीजे काही संसार नीट पार पडू देत नाहीत. त्यामुळे पहिल्या वेळी काही विपरीत जाणवते तेव्हाच एकमेकांशी तो विषय बोलून क्लिअर करायला हवा होता. पण दुर्दैवाने आता ती वेळ निघुन गेलीय अन् प्रकरण फार पुढे गेलय. ह्यातुन बाहेर पडणे हे तुम्हाला काही ठाम निर्णय घेवूनच फक्त शक्य होईल. मिस्टर काही स्वखुशीने तयार होतील असे वाटत नाही.

सर्व खात्रीशिर पुरावे नीट गोळा करुन जवळच्या नातलगांकडे विषय मांडला तर मिस्टर किमान नातलगांची भीड़ बाळगत तरी त्या बाईशी संबध तोड़तील ही एक भोळी अपेक्षा आहे.

ह्यातून काही साध्य नाही होत असेल तर कायदेशीर मार्गाने जाणे योग्य आहे. मनस्ताप खूप होईल आणि वेळ पैसा दोन्ही खर्च होतील. पण किमान उर्वरित आयुष्याची घुसमट तरी टाळता येवू शकेल. मुलांची कस्टडी आणि मेनटेनन्स चार्जेस तुम्हाला मिळतील. सिंगल पेरेंटिंग कठीण निर्णय असला तरी पुढे होऊ शकणाऱ्या नित्याच्या वाद विवाद भांडण हात उगारण्यापेक्षा नक्कीच कमी मनस्ताप देईल आणि त्याचा तुमच्या व मुलाच्या पुढील आयुष्यास फायदाच् होईल.

विवाह बाह्य संबध आता कायदेशीर गुन्हा नसले तरी त्यातून उद्भवु शकणारे एसटी डी कसे कोण टाळू शकेल हां एक प्रश्न आहेच. आणि मिस्टर चुकीचे वागत असताना त्या गोष्टीची मानसिक शारीरिक आणि वैद्यकीय आरोग्य विषयक अश्या सर्व स्तरावर तुम्ही त्रास करुन घेणे नक्कीच योग्य नाही.

प्रेम विवाह आहे म्हणजे काही जुन्या छान आठवणी नक्कीच त्यांच्याही मनात फिक्स असणार पण इतक्या वर्षात कदाचित तुमच्याकडून संसार आईपण अणि नोकरी ह्यामुळे पतिच्या रोमांटिक आयुष्यासाठी दिला गेलेला वेळ क्वालिटी / क्वांटिटी दोन्ही जर उतरत्या क्रमाने असतील तर त्याचे स्व परीक्षण आवश्यक आहे आणि त्यातून सुधारणा घडवत, प्रसंगी आवश्यक ते काउंसलर गाठून दोघाना तुमच्या आयुष्याची नवी सुरुवात नक्कीच करता येवू शकते.

ह्या ३ पर्याय पैकी कुठला क्रम आधी निवडायचा ह्याचा निर्णय मात्र सर्वस्वी तुम्हाला एकट्यानेच घ्यायला हवा.

ह्या सर्वातून सुखरूप बाहेर पडून पुन्हा सुदृढ़ आनंदी जीवनासाठी शुभेच्छा !

अनामिक, आपणास या परिस्थितीतून व्यवस्थित बाहेर येण्यासाठी शुभेच्छा.
सल्ला काही नाही, कारण निर्णय मुलाची नवऱ्यात भावनिक गुंतवणूक, माहेर चा सपोर्ट, आर्थिक स्थिती, नवऱ्याची आयुष्यात थोड्या विरंगुळा मिळवण्यासाठी असलेलं सगळं उधळून लावायची तयारी आहे/नाही, प्रेमपात्राचा प्रकरणाकडे बघण्याचा अँगल(टाईमपास/गोल्डडिगिंग/फक्त इगो सुखावणे/शारीरिक भूक/खरं प्रेम/फक्त लिव्हइन काही काळासाठी) काय आहे यावर अवलंबून.
पतीशी हे सर्व मुद्दे नीट बसून बोलून बघता येतील.

Dshraddha धन्यवाद.
कुकर, तुमच्या सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद.
शेवटी आपले निर्णय आपल्यालाच घ्यावे लागतात फक्त माझ्याकडून काही point miss होताहेत का हे समजावे इतकीच ह्या पोस्ट लिहिण्यामागची अपेक्षा आहे.

एक आणखी सांगते, पतिंच्या मते मी समजते तसे काहीही झालेले नाही. तो फक एक चांगली मैत्रीण आहे. ते तिच्याशी काही महिन्यांत संबंध तोडतील आणि आपले जीवन पूर्ववत होईल. पण ते म्हणतात की जर तिचा कधी मला फोन आला तर मी घेईन कारण तिला काहीतरी genuine problem professional problem असल्याशिवाय ती फोन करणार नाही (जे मला मान्य नाही, at least today).

पतिंच्या मते मी समजते तसे काहीही झालेले नाही. ती फक्त एक चांगली मैत्रीण आहे >>>
अगदीच सर्व पितळ उघडे पाडायचे आणि तेहि त्यांचा फोन प्रत्यक्ष न तपासता; तर प्रायव्हेट डिटेक्टिव हां पर्याय परवडु शकत असल्यास नक्की विचार करा. पुढील कारवाईसाठी उपयोग होईल.

--------------+

सुरुवातीस मेड कोण आहे तिच्या सोबत अफेयर झाले असे धरले तर त्यमागिल थोड़ा पुरुष दृष्टीने विचार करता खालील मुद्दे लक्षात येतात -
१) विधवा आहे. वैवाहिक / शारीरिक संबध पासून वंचित.
थोड़ी जवळीक साधत रिस्पॉन्स मिळाला तर हे सॉफ्ट टारगेट म्हणून ट्राय केले असेल

२) तिच्या मुलाला काही आवश्यक गोष्टी पुरवत अपुलकी निर्माण करत ओब्लाइज ठेवून आपला पुढील हेतु साध्य केला असेल

३) मेड घरी काम करताना स्पेशली लादी पुसणे वगैरे तेव्हा तिच्या कडून मुद्दाम काही आकर्षण निर्माण केले गेले असेल आणि मिस्टर त्याला भुलले असतील आणि सर्वकाही राजी खुशीने मिळते म्हणजे कसला बोभाटा होणार नाही ह्या विचाराने कंटिन्यू केलें असेल.

---------

कुठल्याही परिस्थितीत अनैतिक संबध हे चूकच आहेत.

आजकालची लाइफस्टाइल पाहता अशी नाती/अफेअर्स थोड्याफार प्रमाणात अनेक ठिकाणी होत असतात. आजकाल हे फारसे कोणी मनावरही घेत नाही (ऐशीच्या दशकात मात्र अशा विषयांवर जितेंद्रला घेऊन अख्खे चित्रपट निघत). इथे 'थोड्याफार प्रमाणात' या शब्दाला खूप महत्व आहे. आणि तुमच्या मिस्टरांच्या बाबत हे प्रमाण थोडेफारच आहे असे दिसून येते. कारण काही प्रश्न स्वत:ला विचारा: त्याचं तुमच्यावरचे प्रेम कमी झालेय का? घरी तुमच्याकडे दुर्लक्ष करतात का किंवा तुम्हाला किंमत नसल्यासारखे वागतात का? तुमच्याबरोबर संसार करण्यात रस नाही असे त्यांनी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष तुम्हाला जाणवून दिले आहे का? संसारिक जबाबदाऱ्या टाळत आहेत का? तसे असेल तर मात्र ते काळजी करण्यासारखे आहे.

शरीराने बाहेरच्या व्यक्तीच्या जवळ गेलेल्या जोडीदारापेक्षा मनाने बाहेर गुंतलेला जोडीदार फार वेदनादाई असतो हे लक्षात घ्या. तुम्ही जितके सांगितले आहे त्यावरून तुमच्या मिस्टरांची बाहेरची ओढ हि शारीरिक आणि तात्पुरती (Temptation) असावी असा माझा अंदाज आहे. एकमेकाला जखडून ठेवून किंवा नजरकैदेत ठेवून किंवा एकमेकांवर पाळत ठेऊन जगणे म्हणजे प्रेम नाही. प्रेम त्यापलीकडे आहे. जोडीदाराला स्वत:ची स्पेस देणे हे सुद्धा महत्वाचे आहे.

माझ्या जवळून पाहण्यात दोन उदाहरणे आहेत (आणि अनेकांच्या पाहण्यात असतील) तेवढी सांगून खाली बसतो.

१. एक मित्र आहे. अतिशय तल्लख आणि करियर ओरीएंटेड आहे. तुमच्या मिस्टरांप्रमाणे हा सुद्धा एका कंपनीची जबाबदारी सांभाळतो आहे. पत्नीवर (जी त्याची पूर्वी क्लासमेट होती व प्रेमविवाह झालाय) प्रचंड प्रेम आहे. मानसिक स्तरावर आहे. कुठेही असला कितीही व्यस्त असला तरी तिच्या फोनला याची प्रायोरिटी असते. पण तरीही याला बाहेरचा नाद आहे. अर्थात केवळ शारीरिक आकर्षण. आणि सुरक्षिततेचे भान ठेवून लैंगिक संबंध ठेवतो. कितीही विश्वासाचे नाते असले तरी अशा गोष्टी उघडपणे जोडीदाराला सांगितल्या जाऊ शकत नाहीत. पण म्हणून काय हे त्याच्या पत्नीला माहित नसेल असे वाटते का. कारण अशा गोष्टी कळतातच. पण त्यांचे नाते त्यापलीकडचे आहे. तितका स्पेस तिने त्याला दिला आहे.

२. एक सहकारी होती. हि सुद्धा तेंव्हा म्यानेजर होती. तिचे लग्न झालेले होते. तरीही ऑफिसमध्ये काही जणांशी तिचे संबंध होते. आणि हे तिने मला स्वत:च सांगितले होते (त्याला कारण एक घटना घडली होती. पण तो तपशील अवांतर होईल). तेंव्हा मला प्रचंड धक्का बसला होता. अमेरिकेत गेली असता तिच्या बरोबर गेलेल्या पुरुष सहकाऱ्याशी तिची कशी जवळीक वाढली आणि त्यांनी तिथे काय काय केले याचे साग्रसंगीत वर्णन करून तिने मला सांगितले होते (चाट वर). ते वाचून माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला होता. पण ते तिचे संबंध तेवढ्यापुरतेच. इंग्रजीत No strings attached असा शब्दप्रयोग आहे. आता तिच्या नवऱ्याला तिच्या या सगळ्या उपद्व्यापांची कल्पना नसेल असे तुम्हाला वाटते का? पण त्यांच्या संसारावर याचा काहीही परिणाम झाला नाही. या गोष्टी दहाएक वर्षांपूर्वीच्या. सध्या ती माझ्या संपर्कात नाही. पण सध्या या सगळ्यातून ती अलिप्त आहे आणि आता तर ती एका मेजर ब्रांड ची भारतातली जबाबदारी सांभाळत आहे असे कळले.

तात्पर्य: जोडीदारावर नियंत्रण जरूर ठेवा पण थोडाफार स्पेस सुद्धा द्या. विश्वास ठेवा. आणि काही गोष्टींवर फार विचार करू नका. आयुष्य सुंदर आहे.

(वाक्य जनरीक आहे, कोणाला उद्देशून नाही.)
जुनाट मोड ऑन:
लग्न करण्याच्या आधी किंवा डिव्होर्स घेतल्या नंतर जे काय आणि जे किती विना बंधा चे एक रात्रीय संबंध करायचे ते करा.लग्न आणि मुलं झाल्यावर कृपा करून आपल्या पार्टनरशी कमिटेड असा.लग्न या संकल्पनेला काहीतरी अर्थ आहे.अगदी डेटिंग मुक्तपणे होणाऱ्या परदेशातही लग्न केल्यावर आपल्या पार्टनर शी एकनिष्ठ राहतात.तसे राहायचे नसेल तर पटापट निर्णय घेऊन वेगळे होतात.
जुनाट मोड ऑफ.

एक वेगळा विचार मांडू?

तुमचा पती इतर स्त्रियांशी तासन्तास बोलण्यात वेळ घालवतोय. खरेतर मेड म्हणून काम करणाऱ्या स्त्रीची बौद्धिक क्षमता व तुमच्या पतीची बौध्दिक क्षमता यात जमीन अस्मानाचे अंतर असावे. तरीही तो तिच्याशी दोन दोन तास कसल्या गप्पा मारत होता, त्याला माराव्याश्या वाटत होत्या. केवळ शरीरसुखासाठी माणूस तासनतास गप्पा मारणार नाही.

ऑफिसातल्या कलीगशीही तो बोलण्यात वेळ घालवतोय. बाकी तुमच्याशी त्याचे वागणे बदललेले नसावे, तुमच्यातला इंटरेस्ट टिकून आहे, नाहीतर तुम्ही लिहिले असते.

त्याची ही कसली गरज आहे याचा शोध घ्या. याचा अर्थ तुम्ही चूक आहात, तुम्ही कमी पडताहात म्हणून पती बाहेर जातोय असे नाही. कधीकधी कुणीही चूक नसताना नाती बिघडतात कारण प्रत्येकजण स्वतःच्या चष्म्यातून घटनांकडे पाहतो. समोरच्याच्या दृष्टिकोनातून पाहिले की आजवर लक्षात न आलेले कंगोरे लक्षात येतात.

या प्रश्नाच्या योग्य सोडवणुकीसाठी तुम्हाला शुभेच्छा!

मी अनु, १००% 'अनु' मोदन तुम्हाला!

जुनाट मोड ऑन:
लग्न करण्याच्या आधी किंवा डिव्होर्स घेतल्या नंतर जे काय आणि जे किती विना बंधा चे एक रात्रीय संबंध करायचे ते करा.लग्न आणि मुलं झाल्यावर कृपा करून आपल्या पार्टनरशी कमिटेड असा.लग्न या संकल्पनेला काहीतरी अर्थ आहे.अगदी डेटिंग मुक्तपणे होणाऱ्या परदेशातही लग्न केल्यावर आपल्या पार्टनर शी एकनिष्ठ राहतात.तसे राहायचे नसेल तर पटापट निर्णय घेऊन वेगळे होतात.
जुनाट मोड ऑफ.+१११११११११११११११११११११११११११

मी_अनु, यांच्या दोन्ही प्रतिसादाला +१
कुठल्याही परिस्थितीत अनैतिक संबध हे चूकच आहेत. >>> +१११११

आजकाल पुरूषांसाठी हे कॉमन झालयं. काही सोडले तर जिकडे तिकडे हेच चित्र दिसते. तुम्हाला समजलं बाकी बायकांना माहित नसतं इतकाच काय तो फरक.
एकजात सर्व सारखेच. >> सर्व = "स्त्रिया + पुरुष" असे म्हणायचे असेल असेच गृहीत धरतो. पुरुषाच्या एका हाताने टाळी तर वाजणार नाही ना !! (अपवाद : कलम ३७७)

होता है ....

अनामिक हा सल्ला कदाचित एकांगी वाटेल, तुमचे पण मत जरूर कळवा..

कदाचित तुमचे पती खरंच अडचणीत असतील किंवा त्यांचे प्रेम संबंध असतील. याची एका मर्यादेपर्यंतच तुम्ही शहानिशा करू शकता आणि ते करतानाही तुमचे वैवाहिक जीवन निश्चित संघर्षमय होईल.

तुमचे पती कदाचित मर्यादा सोडत असतील किंवा नसतील ते आत्ता नक्क्की माहीत नाही परंतु आता तुम्ही ४४ वर्षाच्या आहात म्हणजे नवरा बायकोचे नव्या नवलाईचे गुलाबी दिवस नैसर्गिकपणे सरले असतील किंवा सरत आले असतील जे बहुसंख्य व्यक्तींमध्ये होते. अशावेळी नवीन मित्र-मैत्रिणी, नवीन सामाजिक जीवन असावे असे दोघांनाही वाटणे नैसर्गिक आहे.

आता तुमचे भविष्य आणि तुमच्या मुलाचे भवितव्य हे महत्वाचे आहे. या बाबतीत तुमचे पती योग्य ती जबाबदारी घेतात का ते बघा. तसे ते घेत नसतील तर तशा घेण्यासाठी तुम्ही पतीकडे मागणी केली पाहिजे आणि तरीही ते घेत नसल्यास तुम्हाला कायदेशीर पावले उचलण्याचा, विश्वासू नातेवाइकांची मदत घेण्याचा हक्क आहे.

जर तुमची आणि तुमच्या मुलाची किंवा कुटुंबाची जबाबदारी (आर्थिक, मुलाच्या संगोपनाची भावनिक काळजी घेणे, त्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक सकारात्मक वाढीसाठी प्रयत्न करणे, तुमच्या आर्थिक, भावनिक, सामाजिक हिताची काळजी घेणे इत्यादी) ते घेत असतील (कदाचित आत्ता नोकरी नसेल तर आर्थिक जबाबदारी घ्यायला अवघड जाईल पण तरीही), तर या मध्ये कोणत्याही प्रकार ची प्रतारणा किंवा फसवणूक आहे असं मला वाटत नाही. अशा वेळी तुमच्या भावनिक आणि नैतिक धारणांवर हे अवलंबून आहे कि तुम्ही तुमच्या पतीचे आणि दुसऱ्या स्त्रीचे संबंध (मग ते कदाचित खरंच सामाजिक जबाबदारीचे असतील, मैत्रीचे असतील, व्यावसायिक असतील किंवा प्रेम संबंध असतील) कशा प्रकारे घेता ते.

तसेच ज्या स्त्रियांशी तुमच्या नवर्याचे प्रेम संबंध आहेत असा तुम्हाला संशय आहे ती पैसे, मालमत्ता किंवा इतर काही प्रकारच्या कायदेबाह्य गोष्टी याची मागणी करत आहे का ते शोधायचा प्रयत्न करा. किंवा तुमचे पती तुमच्या कडे यापैकी काही अनाठायी मागण्या करतात का ते बघा. त्यावरून त्यांच्या संबंधांचे स्वरूप तुमच्या लक्षात येईल. कदाचित एखादी स्त्री, अशा कोणत्याही ऐहिक गोष्टींची मागणी न करता खरखरच तुमच्या पतीवर प्रेम करत असेल तर कदाचित ही तुमच्याही भावनिक, वैचारिक आणि नैतिक प्रगल्भतेची एक काळाने घेतलेली परीक्षाच आहे.

Mi_anu, दोन्हीही उत्तरे पटली. प्रेमपात्राचा (म्हणजे त्या महिलेचाच म्हणता आहात ना) ह्या सगळ्या कडे बघायचा दृष्टीकोन लक्षात यावा, म्हणूनच तिला मेसेज केला होता. पण तिने ह्या विषयावर काहीही भाष्य करण्यास नकार दिला. आणि मी अपेक्षित अर्थ काढला.

कुकर, तुम्ही म्हणता आहात तशा character चा खरं तर माझा नवरा नाहीये. पण तुम्ही तिसरा point जो मांडलात अगदी तसंच काहीतरी घडले होते आणि मी त्या मेडला तशी warning पण दिली होती. पण मी पतीशी हे बोलले हे कदाचित माझे चुकले.

Parichit, तुमची post पुन्हा वाचली. त्यातली काही उत्तरे अशी - हो, मला त्यांचे प्रेम कमी झाले आहे हे नक्कीच जाणवते. ते कधीच वेगळे होण्या बद्दल किंवा जबाबदारी झटकण्याबद्दल बोलतच नाहीयेत. पण ते हे सगळे मुलाच्या काळजीपोटी करत आहेत, असे मला वाटते. म्हणजे तिथे माझी individual काहीच किंमत नाहीये.

तुम्ही जी दोन्ही उदाहरणे दिली आहेत तसली मी सुद्धा माझ्या office मध्ये 10-15 वर्षांपूर्वी बघितली आहेत. पण मला तेंव्हाही पटले नाही आणि आजही नाही. त्यामुळे कदाचित माझ्या बाबतीतही मला ते accept करायला इतके अवघड जात आहे. स्पेस द्या - मान्य आहे पण त्याची पण प्रत्येकाची definition वेगळी असावी.
Mi_anu, "जुनाट मोड" ला खूप खूप मोदक.

(रच्याक, मी खरंतर जवळ जवळ 15 वर्ष जुनी माबोकरीण आहे पण काही जणांना personally ओळखत असल्याने ड्युआयडी घेऊन हा problem मांडला आहे. )

एवढं जनरायलेझन नका हो करू.>> करावं लागतयं
आधीपासून हे मत नव्हतं माझं पण आजुबाजुला जे सुरू आहे त्याचा खुप राग येतो. अनैतिकतेचा कहर होऊ लागलाय. त्रास होतो याचा.
एका हाताने टाळी तर वाजणार नाही ना !! >> अगदी मान्य.
आणि यात स्त्रीया सुद्धा मागे नाहीयेत. त्यांनी पण ठरवलयं वाटतं याही बाबतीत पुरूषांची बरोबरी करायची.
हे शब्द कुणाला टोचु शकतात पण हे बोचरं सत्य आहे.
एक स्त्री दुसरीच्या संसाराचं वाटोलं करायला कचरत नाही आजकाल.

साधना, तुमच्या प्रतिक्रियेची मी खरं तर वाटच बघत होते.
माझ्या original post वरुन हे लक्षात नाही येत की त्यांचे माझ्या बद्दल काही प्रेम कमी झाले आहे की नाही, मान्य आहे. पण मला खरं तर तुमची पोस्ट नक्की कळली नाही किंवा पटली नाही. पुन्हा एकदा वाचते.
पण माझी immediate (immature म्हणा हवे तर) reaction - माझे पति मेडशी म्हणा किंवा सध्या त्या colleague शी म्हणा का बोलत असतील ह्याची मला absolutely काहीच कल्पना येत नाहीये. माझ्या मते त्यांना जर आमच्या relationship मध्ये काही गोष्टींची कमतरता जाणवत होती तर he should have had worked on that after speaking with me. Instead, he chose to fulfil his needs by some other means - हीच गोष्ट मला पटली नाहीये. मग लग्नाला अर्थच काय राहिला. तुम्ही म्हणता तसे त्यांची काय गरज आहे हे मला आता हे सगळे घडल्यावर लक्षात घ्यायला हवे पण right in the first place, was it possible (rather feasible) for me?
तुमच्या पोस्ट बद्दल धन्यवाद.

हो, मला त्यांचे प्रेम कमी झाले आहे हे नक्कीच जाणवते. ते कधीच वेगळे होण्या बद्दल किंवा जबाबदारी झटकण्याबद्दल बोलतच नाहीयेत. >> हे होतचं असं. पुरूषांना वाटतं आम्ही जबाबदारी झटकत नाही ना मग काय झालं थोडं अॅडजस्ट करायला.
पण बाईसाठी हे खुप त्रासदायक असतं. सर्व माहित असुनही नॉरमल कसं राहु शकेल ती?
तिचं कालीज काय दगडाचं असतं का?
Sorry मी जास्तचं emotional होतेय कारण मी fwwl करू शकते हा त्रास.

अननस, सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद. पण sorry, तुमची पोस्ट खरंच एकांगी वाटली. Rather, विवाह ह्या संस्थेच्या पायावरच तुम्ही घाव घातलात.

नविन मित्र-मैत्रिणी , नविन सामाजिक जीवन <<<< म्हणजे मग प्रत्येक जोडप्यांनी काही वर्षांनंतर जोडीदार बदलावा असा याचा अर्थ होतो का?
नाही पटले.

आणि तुम्ही म्हणता तसे जर पति खरोखर प्रेमात असतील तर त्यांनी ते आणि तेच जबाबदारीने करावे. इकडे माझ्याशी superficial संसार करायचा, मनात नसून आणि मनात दुसरेच कोणीतरी. माझी कसलीच जबरदस्ती नाही. माझे एकच म्हणणे आहे, अर्धे इकडे अन् अर्धे तिकडे, हे मला मान्य नाही.

माझ्या मते त्यांना जर आमच्या relationship मध्ये काही गोष्टींची कमतरता जाणवत होती तर he should have had worked on that after speaking with me. Instead, he chose to fulfil his needs by some other means>>>>>

बरोबर. त्यांनी बाहेर संबंध प्रस्थापित करण्याआधी तुमच्याशी बोलायला हवे होते.

पण हे नेहमीच असे होते असे नाही. माझ्या मुलीला काही कारणांमुळे counsellor ची मदत घ्यावी लागली, तीच्या कॉलेजची तिन्ही वर्षे ती ही मदत घेत होती. वर्गात/बाहेर, घडणारी बारीक सारीक गोष्ट घरात येऊन सांगणाऱ्या माझ्या मुलीला हे counsellar प्रकरण मला सांगावेसे वाटले नाही याचा मला जबर धक्का बसला होता. तिच्या वयात बॉयफ्रेंड, ब्रेकअप कॉमन आहेत, त्यामुळे तिला counsellor लागला असता तर मी समजून घेतले असते. पण तिला घरातील काही गोष्टींचा त्रास होत होता व तो त्रास माझ्याशी न बोलता ती बाहेर मदत शोधत होती. एरवी ती प्रत्येक गोष्ट शेअर करते, मग हेच का नाही केले? आई म्हणून मग मी तिच्यासाठी काय केले? वगैरे विचार करून मला खूप त्रास मी करन घेतला. पण हे असे होते, असे आहे हे मला ऍक्सेप्ट करावे लागलेच. आपल्या जवळची व्यक्ती असे का वागते याचे त्यांच्या बाजूचे स्पष्टीकरण असते, आपल्याला ते पटेलच असे नाही.

१८+ वय असणाऱ्यांसाठीच :

"Anamik" मी माझा 'DarkSide' हा आय-डी फक्त तुम्हाला उत्तर देण्यासाठी तयार केलेला आहे. मी पण बरीच वर्षे मायबोलीवर आहे.
इथले ऍडमिन आय पी ऍड्रेस वापरून मी कोण आहे ह्याचा शोध घेऊ शकतात ह्याची मला जाणीव आहे पण त्याची गरज न पडावी.

मी पुरुष आहे. माझे वय सध्या, तुमच्या नवऱ्याचे ७ वर्षापुर्वी होते तेवढे आता आहे. माझापण प्रेमविवाह झालेला आहे. मुलाबाळांच्या बाबतीत तुमच्यासारखीच कंडिशन आहे माझी. जवळपास सगळंच जुळतंय आणि सगळ्यात महत्वाचे मी पण तुमच्या नवऱ्यासारखं बाहेरील उद्योग करण्याचा निर्णय सहा महिन्यापूर्वी घेतलेला आहे अजुन संपुर्ण यश आलेलं नाही पण प्रयत्न चालु आहेत.
मी इथे जे काही सांगणार आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला निर्णय घ्यायला मदत होईल आणि मलापण कुठेतरी कन्फेशन दिल्यासारखे वाटेल म्हणुन मी एवढे लिहितोय.

माझ्याबद्दल :
शिक्षित कौटुंबिक पार्श्वभुमी. अतिशय उत्तम शैक्षणिक कामगिरी. करियरमध्ये यशस्वी. आयुष्यात एकदाच प्रेमात पडलो आणि तिच्याशी लग्न केलं. कधीही दुसऱ्या स्त्रीकडे वाकड्या / तिरक्या नजरेने बघितले नाही, चुकून सुध्दा नाही. मी बघतो कि आपल्याकडे, पुरुष जवळुन जाणाऱ्या स्त्रीवर एक तरी नजर टाकतोच (अपवाद असतात), पण मी कटाक्षाने असे प्रकार सहा महिन्यापूर्वीपर्यंत टाळले. आता मी एवढेतरी बघतो कि ती माझ्याकडे बघते आहे काय.

काय होतं :
आम्ही दोघेपण अतिशय उच्चशिक्षित आहोत (नुसतंच म्हणायला नव्हे तर खरोखर). कायम मेरिटमध्ये येणारे आणि टॉपक्लास मध्ये राहणारे. जेंव्हा एकमेकांच्या प्रेमात पडलो तेंव्हा असं वाटायचं कि एकदम 'मेड फॉर इच आदर'. आज १४ वर्षांनी अगदी तसंच वाटत नाहीये पण काही वाद पण नाहीयेत. लौकिक अर्थाने सगळं एकदम व्यवस्थित चालु आहे.

काय झालंय :
सगळं काही नॉर्मल चालु आहे. म्हणजे रोज जॉब करणे, मुलांना सांभाळणे, घरच्यांची दुखणी खुपणी, छोटी छोटी भांडणे, आनंदाचे प्रसंग अगदी सगळ्यांच्या घरात असतं तसंच चालु आहे फक्त "एक गोष्ट" सोडुन. चारचौघात चर्चा करण्याचा विषय नाही पण आता इथे प्रस्तुत करणे गरजेचे वाटते. कारण एकाची गरज हि दुसऱ्याला "अरे फक्त हे नाही मिळालं तर त्यात दंगा करण्यासारखं काय आहे?" असं वाटतं असतं.
आणि माझ्या केसमध्ये ती गोष्ट आहे 'सेक्स". येस.
आमच्या दोघांच्या "लिबिडो" मध्ये फरक आहे. सुरुवातीच्या काळात तिला एक दोन महिन्यातून एकदा इच्छा व्हायची आणि मग मी ते करू शकायचो सध्या हा काळ वाढत वाढत पाच ते सहा महिन्यापर्यंत गेलेला आहे. माझं म्हणालं, तर मी अजूनही दिवसातुन दोन वेळातरी हस्तमैथुन करतो. घरी एकटा असेन तर तीन ते चार वेळा. पण गेल्या चौदा वर्षात मी एकदाही जबरदस्ती केलेली नाही आणि मी तसे करणे चुकीचे ठरेल. मधल्या काळात अनेकदा सुचवून पहिले. दोन तीन वेळातर कॉऊन्सिलर / डॉक्टर ची मदत घेऊ असेही सुचविले पण तिने काही प्रतिसाद दिला नाही. विषय टाळला.

नात्याच्या सुरुवातीच्या काळात हि गोष्ट फार महत्वाची वाटली नाही. पण साधारण एक वर्षांपूर्वीपासून असं वाटायला लागलं कि आपल्या शारीरिक गरजा जाणीवपूर्वक नाकारल्या जाताहेत कारण तिच्यासाठी हि गोष्ट म्हणजे फार लहान आहे. म्हणजे हळू हळू का होईना हा फील आलाच.
मग मी उपाय शोधण्यासाठी गुगलची मदत घेतली. वेगळे वेगळे व्यायाम, योगाचे प्रकार ध्यानधारणा हे सगळं करून इच्छा शांत होत नाही असं लक्षात आलं. कदाचित हे सगळं मानसिक असेल पण हि "सेक्स" गोष्ट मला हवी होती, मोकळेपणानं हवी होती. हि गोष्ट उपभोगताना मला माझ्यावर कुठल्याही प्रकारचे उपकार केले जाताहेत हि भावना नको होती. मग मी गुगलचा वेगळ्या पद्धतीने वापर करून बाकी लोकं काय करतात ह्याचा शोध घेतला आणि लक्षात आलं कि लग्नाबाहेर संबंध ठेवणे हा एक उपाय असू शकतो. मग tinder आणि happn हि अँप्लिकेशन माझ्या मोबाईलवर आली. बऱ्याच दिवसानंतरपण ह्या अँप वर यश काही आले नाही.
शेवटी हा विषय सहा महिन्यापूर्वी एका जुन्या मित्राकडे मांडला आणि आश्चर्यकारकरित्या त्याच्याकडेपण हीच परिस्थिती होती हे उघड झाले. ह्याच्यावर त्याने मार्ग शोधला होता. स्पा मध्ये जाणे. सध्या पुण्यात बरेच थाई स्पा उघडले आहेत. प्रत्येक मॉल मध्ये एकतरी स्पा आहेच. महिन्यातुन एकदा त्यातल्यात्यात चांगल्या (म्हणजे महाग ?) स्पामध्ये जायचे. आत स्पा रूममध्ये गेल्यावर काही एक्सट्रा सर्व्हिसेस (direct सेक्स is not involved)घ्यायच्या आणि बाहेर पडायचे. ह्यात धोके बरेच आहेत जसे कि "लपवलेले कॅमेरे" वगैरे वगैरे पण म्हणतात ना "कामातुराणां न भयं न लज्जा । " तसा प्रकार आहे. गेल्या चार महिन्यात दोनदा जाऊन आलोय. खरं सांगतो स्ट्रेस लेवल एव्हडी कमी झालीये कि असं वाटतंय मी ह्या पूर्वी कसा जगत होतो ?
माझ्या गरजा तिथे पूर्णपणे भागलेल्या नाहीत पण आराम नक्कीच मिळाला आहे.
ह्या पुढील पायरी म्हणजे तुमच्या नवऱ्यासारखे अफेअर. येस. करणार आहे. प्रयत्न चालु आहे. सगळयात महत्वाचे म्हणजे मला अजिबात गिल्टी वाटत नाहीये. का ते तुम्हीच ठरवा.

हे सगळं करताना बऱ्याच लोकांना असं वाटत असेल कि पार्टनरला एकदा हे सांगायला पाहिजे होत. मला असा वाटतं कि मी प्रयत्न केला. पुर्ण प्रयत्न केला. पण पार्टनर समजुन घेण्यात कमी पडली ऑर whaatever.
मग काही लोकं अस म्हणतील कि घटस्फोट का घेत नाही ? मला अस वाटते कि ह्या गोष्टीसाठी सेपरेट होणे म्हणजे दोघान्च्या सगळ्या कुटुंबियांवर अन्याय करणे होईल. त्यापेक्षा बायको भांडेल चिडेल, हे परवडतंय. फक्त तिने मला सोडलं तर नाही परवडायचे आणि तेवढी रिस्क मी घेतोय

नवीन Submitted by DarkSide on 5 November, 2018 - 17:13

हा प्रतिसाद आता इतर प्रतिसादकांकडून शंभर शतकं मिळवणार.

अनामिक ताई
चर्चा भरकटू नये म्हणून हा प्रतिसाद.
संशयावरून नवरा बायकोचं वाजलेली एक केस (मित्राची ) ठाऊक आहे. त्या मित्राच्या ग्रुपमधल्या मैत्रिणीवरून बायकोने संशय घेतला. पण तसे काही नव्हते हे मला चांगले ठाऊक आहे.

अनामिक, अनेक व्यक्तींचे किंवा तुमचे स्वतःचे पण विवाह संस्थेचे पावित्र्य टिकविण्याचे प्रयत्न आणि इच्छा वाचून, 'काही फळे रसाळ गोमटी ' आहेत याचा आनंद वाटला.

काही वर्षांनी जोडीदार बदलावा का? याचे सर्व समावेशक उत्तर माझ्याकडे नाही. कदाचित एखाद्या जोडप्यासाठी ते योग्य असेल एखाद्या जोडप्यासाठी नसेल. प्रत्येक वेळी बदलावा असा म्हणून प्रत्येक लग्न मोडले पाहिजे असंही मला वाटत नाही आणि पती किंवा पत्नी सोडून अधिक भावनिक आणि वैचारिक जवळचा दुसरा जोडीदार असू नये किंवा असू शकत नाही असे स्वप्नमय प्रेम किन्वा लग्न पण मला खरं वाटत नाही.

जस एक हळदीचे कांड सगळ्या काळ्या सावल्या मुला - मुलींना गोरं बनवू शकत नाही तसा एकटा आंबट, खरबरीत अननस पण सगळ्या ' विवाह संस्थेच्या पायावर घाव' घालू शकत नाही. त्याच्यासाठी अनेक आंबट, खरबरीत अननसाची बीजे पेरून अनेक वर्ष माशागत करावी लागते.

आणि तुम्ही म्हणता तसे जर पति खरोखर प्रेमात असतील तर त्यांनी ते आणि तेच जबाबदारीने करावे. इकडे माझ्याशी superficial संसार करायचा, मनात नसून आणि मनात दुसरेच कोणीतरी. माझी कसलीच जबरदस्ती नाही. माझे एकच म्हणणे आहे, अर्धे इकडे अन् अर्धे तिकडे, हे मला मान्य नाही.

>> तुमचे हे मत कदाचीत तुमच्या मुलाला मान्य नसेल... ज्याला आई आणि बाबा दोघ ही हवे आहेत.. किंवा नवऱ्या ला मान्य नसेल....ज्याला प्रेयसी (?) साठी मुलाला सोडायचे नसेल... हीच तर सगळ्यात मोठी गोष्ट मला मी प्रौढत्वाकडे झुकायला लागल्यावर शिकायला मिळाली आणि ते म्हणजे, मला न पटणाऱ्या अनेक गोष्टी जगात चालू असतात ज्याच्यावर माझा काही ताबा नसतो आणि त्या सगळ्या प्रत्येक वेळी चूक असतात असेही नाही.

बाहेरच्या स्त्रीशी काहीकाळ संबंध ठेवल्याने नवर्याचे बायकोवरचे प्रेम कमी होते असे मला नाही वाटत. तुम्ही फारसा विचार करु नका याचा. कमीअधिक प्रमाणात सर्वच बायका यातून जातात. विसरणे महत्वाचे.
तुमच्या मिस्टरांना तुम्ही विश्वासात घ्या,त्यांना तुम्ही आकर्षक दिसाल अशा प्रकारे रहाण्याचा प्रयत्न करा,त्यांच्या आवडीचे काहीतरी करा पदार्थ वगैरे. मुलाकडे लक्ष द्या .स्वतःला गुंतवा. You need to come out of this constant mind chatter business. वेड्या व्हाल तुम्ही अतिविचाराने. थांबवा हे. माझ्या शुभेच्छा!!

सार्वत्रिक अनुभव असा आहे की, आपल्या मनाचा निर्णय झालेला असतो, पण तोच खरा आहे हे सिद्ध करण्यासाठी /मनाला पटवण्यासाठी कोणाच्यातरी समर्थनाची गरज असते. असे समर्थन न मिळाल्याने पाऊल मागे पडू शकते.

कोतबो तून समर्थन शोधण्याऐवजी आतला आवाज ओळखा आणि पुढे जा. तुमचा निर्णय नक्कीच यशस्वी ठरेल.

पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

@ DarkSide, तुमची घुसमट मी समजू शकतो , पण माझ्या मते जर विवाहबाह्य संबंध अगदीच अपरिहार्य असतील, तर परस्पर सहमतीनं (यात पती, पत्नी और वो तिघेही आले) झालेले सगळ्यात उत्तम. माझ्या अविवाहित मित्राचा एक अनुभव सांगतो.

>>>
पहिल्यावहिल्या नोकरीनंतर त्याचं त्याच्याच सोसायटीमधल्या एका ट्रक ड्रायव्हरच्या बायकोशी सूत जुळलं. सुरुवातीला फक्त शारीरिक भूक भागवण्यापुरतं ते जवळ आले, पण दिवसागणिक दोघांची मनं एकमेकांत गुंतली. गोष्टी इतक्या थराला पोचल्या, की दोघांनी पळून जायचा निर्णय घेतला. एक दिवस अचानक दोघे दिसेनासे झाल्यावर संशयापोटी बायकोच्या पतीने पोलीस तक्रार दाखल केली.

मित्राच्या घरच्यांची अवस्था इकडे त्राही भगवान झालेली. तब्बल २ महिन्याच्या शोधाशोधीनंतर, बऱ्याच मुश्किलीनं घरच्यांनी त्याचा फोन नंबर मिळवला. बऱ्याच भावनिक मिनातवाऱ्या करून दोघांना आपापल्या घरी बोलावलं खरं, पण तिचा पती एव्हाना बदल्याच्या भावनेने इरेला पेटला होता. त्यानं आपलं वजन आणि ओळखी वापरून मित्रावर अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा पोलिसात नोंदवला.
मित्राचं नशीब बलवत्तर म्हणून बाईनं आपला जबाबात प्रेमप्रकरण असल्याची कबुली दिली, अन मित्र कोर्टकचेरीविना सुटला.

पण या सगळ्या प्रकारात मित्राची, त्याच्या घरच्यांची नाचक्की झाली ती वेगळीच , वर नोकरीशी हात धुवावे लागले ते वेगळेच. आजूबाजूला मित्रांच्या, शेजाऱ्यांच्या सगळ्यांच्या त्याच्याकडे पाहण्याच्या नजरा आता बदलल्या होत्या. सगळ्या समारंभातून त्याचं अख्ख कुटुंब अघोषीतपणे वाळीत टाकलं गेलं. नव्या नोकरीसाठी त्याला राहती जागा बदलावी लागली. आता त्याच्या लग्नाची बोलणी चालू आहेत, पण त्यात या गोष्टी मोडता घालताहेत.
>>>

आता कोर्टानं विवाहबाह्य संबंध कायदेशीर ठरवले असले, याचा अर्थ तुम्ही बाकीच्या कलमातून सुटलात असा होत नाही. या संबंधामुळं एखादी व्यक्ती जरी दुखावली तरी सुडापोटी ती कुठल्याही थराला जाऊ शकते, अन त्यातून जे नुकसान होतं ते सात जन्म पुरून उरेल.
वर कोर्टानं एखादी गोष्ट कायदेशीर करणे , अन तिला समाजात, किमान भारतीय समाजात, सर्व स्तरांवर मान्यता मिळणे यात जमीन अस्मानाचं अंतर आहे.

आता तुमची शारीरिक गरज आहे हे मान्य आहे, अन त्यासाठी, फक्त शरीरसुखासाठी तुम्ही विवाहबाह्य संबंध ठेवलेत,असं एकवेळ मानून चालू. तरीही नंतर त्यात तुमची भावनिक गुंतवणूक होणार नाही, याची खात्री काय ? शेवटी निसर्गनियमापुढं कुणाचं काय चाललंय ?
या लपवाछपवीमुळं, अन पुढंमागं भावनिक गुंतवणुक झालीच, तर तुमची पत्नी, मुलं यांना जो मानसिक त्रास झेलावा लागेल, तो तुम्ही कसा काय हॅन्डल करणार आहात ?

किमान आधी संबंधित लोकांना कल्पना असेल तर हा त्रास कमीत कमी होईल अशी आशा बाळगू शकतो. आता ही कल्पना कशी द्यायची हेपण एक कोडंच आहे म्हणा. एकूण काय , इथे कुठल्याही मार्गाने गेलात तरी वाट निसरडीच आहे, फक्त पहिलं पाऊल टाकणं तुमच्या हातात आहे. पुढच्या घटनांचा लगाम तुमच्या हातात राहील याची कवडीची गॅरंटी नाही. विचारपूर्वक निर्णय घ्याल अशी आशा आहे.

बाहेरच्या स्त्रीशी काहीकाळ संबंध ठेवल्याने नवर्याचे बायकोवरचे प्रेम कमी होते असे मला नाही वाटत. तुम्ही फारसा विचार करु नका याचा. कमीअधिक प्रमाणात सर्वच बायका यातून जातात. विसरणे महत्वाचे.
>>>>>> असले महान विचार वाचून धक्काच बसला. अशा पुरुषांना त्यांच्या बायकांनी अशा भानगडी केल्या तर चालतील का? का प्रत्येक वेळी तेही विसरणे महत्त्वाचे???
अनामिक ताई तुम्हाला सगळ्या गोष्टी खूप धीराने घ्याव्या लागतील. स्वतः आत्मनिर्भर असणे खूप महत्वाचे आहे त्याच प्रमाणे वयानुसार आकर्षक रहाणे हेही (सेल्फ गृमिंग) खूप महत्वाचे आहे. प्रायव्हेट डिटेक्टिव नेमण्याची युक्ती चांगली आहे जेणेकरून तुम्ही आपली बाजू खंबीरपणे मांडू शकाल.

@DarkSide, तुमच्या प्रामाणिक प्रतिसादाबद्दल काय लिहू समजत नाहीये. But I appreciate it.

@अननस, हो तुमचा हा प्रतिसाद, पुष्कळ अंशी पटला.
तुमचे हे मत कदाचीत तुमच्या मुलाला मान्य नसेल... ज्याला आई आणि बाबा दोघ ही हवे आहेत.. <<<< पण जसे माझा निर्णय मुलाला आणि पतिला मान्य नाही म्हणून मी तो घेऊच नाही किंवा मी त्यांच्यासाठी तो निर्णय घेतला आणि स्वतःला त्यागमूर्ती समजू लागले, ह्या दोन्ही गोष्टी फार टोकाच्या आहेत. असो. प्रौढत्वाकडे झुकताना येणारी प्रगल्भता ह्यावर नक्की विचार करीन. धन्यवाद.

@pathfinder - सहमत.

@ अनामिका,
>>>>>> असले महान विचार वाचून धक्काच बसला. <<<< अनुमोदन.

व्यक्ती तितक्या प्रकृती, न्यायाने एक माणसाचा विचार दुसऱ्या माणसास पूर्ण पाहण्याची शक्यता खूपच कमी आहे.
अनामिक ताईंनी, काय निर्णय मनाशी योजला आहे, हे सांगितले तर त्यावर चर्चा करणे सोपे जाईल,
या चर्चेतून कदाचित त्यांनी विचार न केलेला एखादा पैलू समोर येईल.

बाकी चर्चा वाचतोय.

बाहेरच्या स्त्रीशी काहीकाळ संबंध ठेवल्याने नवर्याचे बायकोवरचे प्रेम कमी होते असे मला नाही वाटत. तुम्ही फारसा विचार करु नका याचा. कमीअधिक प्रमाणात सर्वच बायका यातून जातात. विसरणे महत्वाचे.
>>>>>> असले महान विचार वाचून धक्काच बसला. अशा पुरुषांना त्यांच्या बायकांनी अशा भानगडी केल्या तर चालतील का? का प्रत्येक वेळी तेही विसरणे महत्त्वाचे???
>>>
न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे, स्त्रियांना आपला नवरा सोडून इतर पुरुषांशी सम्बद्न ठेवायचा अधिकार आहे... बायकांनी अशा भानगडी केल्या तर का? याचे उत्तर कायद्याने 'हो' असे आहे !! कदाचित हे 'इस्लाम' च्या विरूध्द आहे असे काही लोक म्हणले तरी.

<न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे, स्त्रियांना आपला नवरा सोडून इतर पुरुषांशी सम्बद्न ठेवायचा अधिकार आहे... बायकांनी अशा भानगडी केल्या तर का? याचे उत्तर कायद्याने 'हो' असे आहे !!>

आपण धन्य आहात, याचा पुनःपुन्हा प्रत्यय येत राहतो.

@ सिम्बा, तेच तर, मी अजून निर्णयच घेऊ शकत नाहीये. माझ्यातली आई सांगते वेगळे होणे मुलावर मोठा अन्याय होईल. आणि लग्नात तसंच continue करणे म्हणजे स्वतःचा self-respect किंवा self-esteem बद्दल विसरून जाणे.

अनामिक ताई, तुम्ही याविषयी काही निर्णय घेण्या आधी brainstorming करताय ही खूप चांगली गोष्ट आहे. keep doing that until you get clarity of what You want. निर्णय घेण्याची घाई करूच नका . कसं आहे आम्ही इथे फक्त आमची मतं सांगू. पण प्रत्येकाची परिस्थिती आणि मनश मनस्थिती निरनिराळी असते. त्यामुळे तुमचा निर्णय नक्की तुम्हालाच घ्यावा लागेल.
नवर्याचे बाहेर संबंध असणं ही खूप संतापजनक गोष्ट आहे. त्या प्रकाराची पूर्ण आणि खात्रीलायक माहिती काढून analysis करत रहा. तुमचा मार्ग तुम्हाला नक्कीच सापडेल. शुभेच्छा असं तर नाही म्हणणार, पण we feel your pain and we are with you.

धन्यवाद सुलक्षणा.
Obviously, माझे मन हे जाणण्याचा सारखे प्रयत्न करते आहे की मी जे समजते आहे तसेच नक्की आहे की नाही. पण नवरा म्हणतो you are doing lil too much. Spying is not acceptable to me. Just believe me. I have not done anything wrong. You give me few months. Once I start my new job, everything will be fine.
ती महिला सहकारी HR GM आहे आणि नविन नोकरीच्या ठिकाणी त्यांना काही जी कागदपत्रं लागतात, त्यामुळे आणि त्या colleague नी त्यांना कायम support केल्याने, तिच्याशी सध्या एकदम संबंध तोडता येत नाहीयेत.

अनामिक ताई तुम्हाला सगळ्या गोष्टी खूप धीराने घ्याव्या लागतील. स्वतः आत्मनिर्भर असणे खूप महत्वाचे आहे >>> +१
असेच काहिसे सांगायचे होते.
तुम्ही वर दिलेली सर्व माहीती वाचली. त्यात तुम्ही स्वत्:ला जास्त त्रास करुन घेताय असे दिसते. तुम्ही जितकी जास्त चिडचिड कराल तितके प्रकरण हाताबाहेर जाऊ शकते. त्यामुळै शांत राहुन या सर्व बाबींचा विचार करा. एखाद्या वकिल कम कौन्सलरचा सल्ला घ्या. मिस्टरांच्या ऒफिस मधील सहकार्यांशी ओळख करुन घ्या. कदाचित याबद्दल ऒफिस मधे कल्पना असेल. आणि तुम्हाला माहिती देण्यासही काहिजण उत्सुक असु शकतील. (आतापर्यंत पाहिलेल्या ऒफिस मधील वातावरणावरुन निष्कर्ष )
अजुन एक जर समजा (देव करो आणि असे न होवो) खरेच तुम्ही म्हणताय तसे तुमव्या मिस्टरांचे काही अफेअर वैगेरे असेल आणि याबाबतीत ती मेड आणि मैत्रीण यांच्याबद्दल भक्कम पुरावे सापडले तर निसंकोचपणे आळीपाळीने तिघांच्याही दारात जाउन ययेच्छ शाब्दिक धुलाई करा.

> पहिले नाही म्हणाले पण मग मी forcefully घ्यायला गेले तर त्यानी मला दोनदा ढकलले आणि मी पडले. (पती अमराठी आहेत पण सुसंस्कृत घरातले आहेत, म्हणून मला हे push करणे अजिबातच पचनी पडले नाही) > याबद्दल कोणालाच काहीच म्हणायचे नाही??

===
DarkSide चा प्रतिसाद चांगला आहे. स्त्री आणि पुरुष यांच्या लिबिडोमधे नैसर्गिकरित्याच फार फरक आहे आणि त्यातपरत व्यक्तीनुसार अजून फरक पडत रहाणार. सध्याची विवाहसंस्था हा फरक लक्षात घेत नाही. मी पूर्वी इतरत्र लिहील्याप्रमाणे स्त्रियांकडे दोनच पर्याय आहेत. स्वतःची इच्छा नसताना नवर्याच्या लैंगिक गरजा पूर्ण करत राहणे किंवा त्याला बाहेर जाऊ देणे. धागालेखिकेला स्वतःच निर्णय स्वतः घ्यावा लागेल.

===
विलभचा प्रतिसाद वाचून 'देवमाणसं' आठवली https://www.maayboli.com/node/54584.

स्त्री आणि पुरुष यांच्या लिबिडोमधे नैसर्गिकरित्याच फार फरक आहे आणि त्यातपरत व्यक्तीनुसार अजून फरक पडत रहाणार. सध्याची विवाहसंस्था हा फरक लक्षात घेत नाही.>>

मागे एकदा इनामदारांच्या धाग्यावर अशीच चर्चा करून झालीय.घुसमटीला पर्याय म्हणून लोकांनी लिव्ह इन, ओपन मॅरेज वैगरे उपाय आपापल्या परीने शोधलेत.
या गोष्टी जितक्या लवकर कायदेशीर होतील तितके असे तिढे सोडवणं सोपं जाईल.
मुख्य मुद्दा आहे तो मान्यतेचाच. जर माणसंच दारू पिणं सोडत नसतील, तेव्हा ती सरकारमान्य केलेली केव्हाही चांगली.
कायदेशीर गोष्टी कालांतराने सगळ्यांच्या गळी उतरल्या, तर किमान गैरफायदा किंवा सूड घेण्याचे प्रमाण कमी होईल.

बाकी निर्णय तुमचा आहे पण मुलासाठी म्हणून सगळे सहन करत एकत्र राहणार असाल तर 'मुलासाठी म्हणून' म्हणजे नक्की काय याचा परत विचार करा.
यामधे एक बाजू आर्थिक आहे. मुलाला वडिलांचे आर्थिक स्थैर्य मिळावे अशी अपेक्षा असेल तर ती वेगळे होतानाही कायदेशीरपणे पूर्ण होऊ शकते. वकिलांचा सल्ला घ्या नीट याबाबतीत.

मुलांना आईबाप दोघेही हवे असतात मोठे होताना हे खरेय पण आईवडिलांच्यामधे ताण, धुसफूस, बोलाचाली नाही हे वातावरण मुलाच्या वाढण्यासाठी अजून घातक.
कुणा तरी एकाबद्दल किंवा एकूण लग्नसंस्थेबद्दलच मुलाला अढी निर्माण होऊ शकते.
तसेच एवढे सगळे सहन करून तुम्ही मुलासाठी राहणार. मग तुमच्याही नकळत हौतात्म्याची भावना येऊ शकते. मग मुलाच्या आयुष्यावर अधिकार सांगणे, इमोशनल ब्लॅकमेल, मी तुझ्यासाठी इतके केले!, अपेक्षाभंग वगैरे गोष्टीही येऊ शकतातच.

तर केवळ मुलासाठी म्हणून राहायचा निर्णय घेत असाल तर या मुद्द्यांचा जरूर विचार करा.

चांगला सल्ला निधप.

मुलांना आईबाप दोघेही हवे असतात मोठे होताना हे खरेय पण आईवडिलांच्यामधे ताण, धुसफूस, बोलाचाली नाही हे वातावरण मुलाच्या वाढण्यासाठी अजून घातक.>>> अगदी बरोबर. याचे केवळ दीर्घकालीन नव्हे तर आयुष्यभर पुरणारे परिणाम होऊ शकतात मुलांवर.

वेगळे व्हायचे नसेल तर मुलांसमोर आई वडिलांमधील भांडण, तणाव उघड होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. हे केवळ एकट्याच्या हाती नसल्याने अवघड होऊ शकते.

नीधपच्या संपुर्ण पोस्टला अनुमोदन. खूप छान प्रॅक्टिकल पोस्ट आहे.

पूर्वी इतरत्र लिहील्याप्रमाणे स्त्रियांकडे दोनच पर्याय आहेत. स्वतःची इच्छा नसताना नवर्याच्या लैंगिक गरजा पूर्ण करत राहणे किंवा त्याला बाहेर जाऊ देणे. >>>>> अँमीच्या या स्टेटमेंटशी सहमत. मी पण स्वयंपाक करणार नाही आणि तू पण बाहेर जेवायचं नाहीस, हे चूकच ना. सगळेच काही इंद्रियदमन करू शकणारे संन्यासी नसतात ( रादर किती तरी पौराणिक किंवा कथा कादंबऱ्यामध्ये वाचलं आहे की मोठंमोठया योग्यांचा सुद्धा या बाबतीत तोल ढळला होता). थोडक्यात कित्येक जणांसाठी किंवा जणींसाठी (सुद्धा म्हणायला हरकत नाही, नैसर्गिक आणि सामाजिक कारणांमुळे प्रमाण पुरुषांपेक्षा कदाचित कमी असेल) सेक्स पोटाच्या भुकेखालोखाल मोठी गरज असू शकते.
अर्थात हे चर्चेच्या ओघात लिहिलं आहे, अनामिकसाठी विशिष्ट लिहिलेलं नाही.

याबद्दल कोणालाच काहीच म्हणायचे नाही? >>>> अँमी, तुला नक्की काय म्हणायचं आहे ते तू लिहिलं नाहीस. माझ्या मते कोणी फिजिकल व्हायला लागलं की ती प्रतिक्षिप्त क्रिया असते. अनलेस तो पुरुष नेहमीच हात उगारणारा असेल तर चूक, पण अनामिकने स्पेसिफिकली लिहिलं आहे की तो सुसंकृत कुटुंबातला आहे, म्हणजे तो नेहमीच बायकोला मारून काढणारा नवरा नाही हे ती मान्य करते आहे. त्याच्या दृष्टीने तिने चॅट वाचणं त्याच्यासाठी अगदीच लाजिरवाणे किंवा गोत्यात आणणार असणार आणि ती तर फोर्सफुली मोबाईल घेते आहे, अशा वेळेस धक्का देण किंवा फोर्सफुली दूर करणे ही प्रतिक्षिप्त क्रिया झाली. अर्थात हे सगळं 'जर तर' दुसऱ्या किनाऱ्यावर बसून केलेले गेसेस आहेत.

बाकी एक छोटासा धागा वाचून त्यावर सल्ला किंवा मत देणं योग्य नाही, म्हणून मी फक्त सहानुभूती दाखवते. बाकी जे पॉइंट्स लिहिले ते केवळ वेगवेगळ्या पोस्टवरच्या चर्चेसाठी आहेत. सल्ला नाही.

मुलांबरोबर भांडणं, धुसफूस करत किंवा लपवत राहणं घातक.
मुलं विवाह संस्थे बद्दलची आपली मतं जवळच्या उदाहरणांवरून बनवतात.शिवाय अगदी मुलांसमोर भांडलं नाही तरी ती वादळापूर्वीची शांतता 5+ वयाची मुलं सेन्स करतात.आपल्या घरात इतर घरांपेक्षा वेगळं वातावरण आहे हे कळून बाहेर काही शेअर करायला नको म्हणून थोडी आयसोलेटेड होत जातात.आपलं घर 'नॉर्मल' नाही हे या वयातलं सर्वात लाजिरवाणं फिलिंग असतं.मुलं व्हिडीओ गेम, इतर सोशल नेटवर्क अडिक्शन आणि मुली अटेंशन सिकिंग (आपण कोणाला आवडतोय का, कोणी आपल्या कडे बघतंय का हे चाचपत राहणं, थोड्याही दाखवलेल्या इंटरेस्ट ला भरपूर प्रतिसाद देणं, कधीकधी चुकीचे प्रेम/लग्न फक्त सध्याच्या सिच्युएशन मधून चेंज म्हणून करणं) कडे वळतात.
ही सर्व विधानं जनरलाईज्ड आहेत, पाहिलेल्या उदाहरणांवर बेस्ड आहेत.मुद्दा हा की लहान मुलं आपल्याला वाटतं त्यापेक्षा हुशार असतात.भांडणं समोर झाली नाहीत तरी ती बरोबर ओळखतात.त्यातल्या त्यात सर्वांना प्रिय गोष्टी मुलांबरोबर करणं, त्यांच्याकडे काही चांगल्या आठवणी बनवून ठेवणं(पुढे थोड्या अप्रिय आठवणी असतील तरी या चांगल्या आठवणींच्या शिदोरी वर मुलं आत्मविश्वास आणि पॉझिटिव्ह स्पिरिट कायम ठेवू शकतील.)

नीधप, अगदी उत्तम मुद्दा मांडलात. त्यापैकी माझ्या साठी आर्थिक स्थैर्य हा अजिबातच मुद्दा नाहीये. ती काळजी नवरा 100% घेईल ह्याची खात्री आहे किंवा मी स्वतःही समर्थ आहे. नवरा आणि मुलगा यांचा एकमेकांशी असलेला खूप strong bond हा मुद्दा आहे.
एकमेकांबद्दलचे ताण व त्याचा मुलाच्या मनावर होणारा परिणाम, हौतात्म्याची भावना सगळं अगदी मनोमन पटले.
Rather, आता सध्याही त्याच्या समोर वाद नको हा विचार करुनही आम्हाला दोघांनीही कधी कधी control नाही झालेले. तेंव्हा त्या पिल्लूच्या डोळ्यात पाणी बघितले आहे मी. तीच अपराधी भावना जात नाहीये, तर पुढे प्रचंड अवघड होईल. खूप धन्यवाद.

  माझ्यातली आई सांगते वेगळे होणे मुलावर मोठा अन्याय होईल. >>>>

आपल्याकडे जोडप्यात विसंवाद असला तरी मुलांच्या भविष्याचा विचार करून पालक वेगळे न होता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत, भांडत रखडत संसार सुरू ठेवण्याचा प्रघात आहे. पण खरं म्हणजे जोडप्याने वेगळे न होणे हेच त्यांच्या मुलांवर अन्याय करणारे ठरते. पालकांनी जरी मुलांसमोर सर्वकाही आलबेल असल्याची वर्तवणूक ठेवली तरी मुलांना ते तसे नसल्याची पुरेपूर जाणीव असते.

आपल्या अस्तित्वामुळेच आपले आईवडील एकमेकांपासून वेगळे होऊन सुखाने जगू शकत नाहीत याचेच मुलाला कायम वैषम्य वाटत रहाते. पालकांचे मुलांसमोर घरात रोज होणारे भांडण, प्रसंगी होणारी हाणामारी आणि रडारड, त्यांनी एकमेकांशी धरलेला अबोला, मुलांना मध्यस्थी घालून एकमेकांशी साधलेला संवाद ह्या सर्वांना मुल स्वतःलाच जबाबदार समजू लागते. घरात होणाऱ्या विसंवादाला ते स्वतःला दोषी मानून मनाने कुढत जगू लागते. अशा मोडलेल्या संसारात त्याच्या बालमनावर परिणाम होऊन त्याची होणारी मानसिक, सामाजिक वाढ खुंटू लागते.

पालकसुद्धा मुलांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करू लागतात. ज्याचा परिणाम हरलेली पार्टी स्वतःच्याच मुलांशी फटकून वागू लागते. मुलांवर राग ठेऊन त्यांच्या पालनपोषणात कमतरता करू पहाते. मुलंही त्यांच्या बालमनाला आपल्या पालकांपैकी ज्याची चूक वाटेल त्याच्यापासून मनाने आयुष्यभराकरिता दूर होतात.

नीधप, मानव पृथ्वीकर, mi_anu आणि सचिन काळे सगळ्यांना +१

===
मीरा,
> पहिले नाही म्हणाले पण मग मी forcefully घ्यायला गेले तर त्यानी मला दोनदा ढकलले आणि मी पडले. (पती अमराठी आहेत पण सुसंस्कृत घरातले आहेत, म्हणून मला हे push करणे अजिबातच पचनी पडले नाही)> हे मला फारच भीतीदायक वाटले. या एका मुद्यावरच मी 'मुलाला घेऊन त्या घरातून बाहेर पड' सांगितल असत. माझे जेवढे थोडेफार निरिक्षण आहे त्यावरून असे म्हणेन की 'एकदा हे चालू झालं (भांडण, मारणे) तर ते बंद/कमी अजिबात होत नाही, वाढतच जाते; जोपर्यंत 'कारण' resolve होत नाही तोपर्यंत. आणि त्या वाढत गेलेल्या तीव्रतेच्या भांडण, मारहाणसाठीचा victimचा tolerance आणि finding excusesदेखील वाढतो.

त्यामुळे सध्या वेगवेगळे रहा, कधीतरी भेटून/फोनवर बोलून पुढचा निर्णय घ्या असा सल्ला मी देईन.

तुम्हाला जवळचे विश्वासार्ह नातेवाईक असतीलच. तुमचे भाऊ , वडील, आई, काका वगैरेंना हे सगळं सांगा. सासरच्यांनाही वेळेतच सांगा. पुरावे असतील तर द्या. दोन्हीकडच्यांची मीटिंग बसवा. एव्हढ्या लोकांसमोर नव-याकडून वर्तणुकीची हमी घ्या. प्रकरण जोपर्यंत दोघातच आहे आणि फक्त बायकोला तोंड द्यायचे आहे, ती काय समजून घेईल असा समज झाला असेल तोपर्यंत पतीला गांभीर्य समजणार नाही. एकदा समाजाला तोंड द्यावे लागणार आहे याची जाणीव झाली की गाडी वळणावर येईल. गावाकडचा उपाय आहे हा.

Pages