पतिचे extra marital affair

Submitted by अनामिक... on 4 November, 2018 - 20:10

मी सध्या एका मोठ्या त्रासातून जात आहे. मी व माझा नवरा दोघे इंजिनिअर आहोत. आम्ही दोघे 44 वर्षांचे आहोत आणि लग्नाला 21 वर्षे पूर्ण झाली आणि आमचा प्रेमविवाह झालेला आहे. माझ्या घरच्यांचा विरोध पत्करून मी हे लग्न केले होते. आजही ती decision मला चूक वाटत नाही.
एक आम्हाला 7 वर्षांचा मुलगा आहे. पति मोठ्या कंपनीत CEO आहेत. मागच्या चार वर्षांपूर्वी पतिची नोकरी व शहर बदलले, म्हणून मला माझी चांगल्या पदावरची, मोठ्या कंपनीतली नोकरी सोडावी लागली. पती खूप busy असल्याने आणि मुलगा लहान असल्याने मी घरी राह्यचा निर्णय घेतला.

मुलगा सहा महिन्यांचा असतांना मी पुन्हा ऑफिस join केले होते व आमच्या कडे live-in maid होती. एक दिवस काही कामासाठी address proof म्हणून माझ्याकडे माझ्या पतिचे call records आले आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझी maid एक महिनाभर सुट्टीवर गावी गेली होती, तिच्याशी महिनाभर रोजचे 3-4 calls आणि total 2-3 तास दिवसाला असे call record दिसले. ऑफिस ची वेळ वेगळी असल्याने माझे पति 1.5 तास माझ्याआधी घरी पोचत असत. मुलगा तेंव्हा 3 वर्षांचा होता.
पतिचे असे म्हणणे आहे की तो त्या मेडच्या मुलाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी फोन करायचा. तेंव्हा तो मुलगा 14-15 वर्षांचा होता आणि ती मेड विधवा होती. तर हा त्यांची मदत म्हणून हे सगळे करत होता. हे reasoning मला कधीच पटले नाही. ह्या घटने नंतरही त्यांनी मला मेडलाच continue करण्यास भाग पाडले. नंतर शहर बदलल्यावर पण सहा महिने तिनी काम केले पण मग मी हट्टानी तिला काढून टाकले.

मी कसंबसं स्वतःला सावरत त्या प्रकरणातून बाहेर आले. त्यानंतर साधारण तीन वर्षांनी म्हणजे आजच्या काळात.
मला माझ्या पतिचे एका महिला सहकारीशी जरा वेगळे संबंध असावेत अशी शंका आली तर त्यांचे call records बघितले. त्यात मला एक संशयास्पद नंबर सापडला. फोन करुन बघितला तर जुन्या मेडचा. तर पुन्हा तेच सांगितले की त्या मेडच्या भावाशी तिच्या मुलाच्या नोकरी साठी फोन केला होता.

आता तिसरी फसवणुकीची गोष्ट सांगते जिच्या बद्दल मला जरा शंका आली होती. अहोंनी HR GM म्हणून एक महिलेला hire केले होते. ही महिला separated आहे. आम्ही आमच्या एका सुट्टीवर असतांना मी त्यांना दबक्या आवाजात तिच्याशी रोज दोन दोन तास बाथरूममध्ये बोलतांना ऐकले. Time zone वेगळा असल्याने पहाटे चार ते सहा असे बोलायचे. आम्ही ज्या दिवशी युरोप ट्रीपहून परतलो, त्याच्या दुसर्याच दिवशी हे पुन्हा त्या महिले बरोबर official trip ला युरोपात गेले, प्रवासात आणखी दोन लोक ही होते. पण मला ते नक्कीच strange वाटले. नंतर दोन महिन्यात पतिला company नी force resign करायला सांगितले without giving any reason. मग मी notice करायला सुरुवात केली की ते फोनवर किंवा WA continuous chat वर त्या महिलेशी contact मध्ये असतात. आणि फोन कायम लपवतात. एका संध्याकाळी माझा patience सुटला आणि मी त्यांना फोन मागितला. पहिले नाही म्हणाले पण मग मी forcefully घ्यायला गेले तर त्यानी मला दोनदा ढकलले आणि मी पडले. (पती अमराठी आहेत पण सुसंस्कृत घरातले आहेत, म्हणून मला हे push करणे अजिबातच पचनी पडले नाही) त्यांनी मग मला काही delete करुन मला mobile बघायला दिला, फक्त दोन मिनिटांसाठी. नंतर मी त्या महिलेला WA वर ह्या प्रकरणाबाबत विचारले तर ती म्हणाली मी काही तुम्हाला ओळखत नाही म्हणून मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही.
मी त्यांना म्हणाले की तुम्ही नक्की गुंतले आहात अजूनही contact zero करा मी सगळे विसरायचा प्रयत्न करते. पण ते म्हणतात मला आता नविन नोकरी लागे पर्यंत तिच्या मदतीची गरज आहे, जुन्या कंपनीतून काही document लागतील आणि दुसरे कोणीही supportive नाहीये. मला काही महिन्यांचा वेळ दे मी ह्या सगळ्यातून बाहेर येईन. आणि नंतर कधी तिचा कधी क्वचित फोन आला तरी ते घेतील कारण तिला खरोखर माझ्या मदतीची गरज असेल. त्यांचे म्हणणे आहे की आमची फक्त शुद्ध मैत्री आहे. पण ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सारखे तिच्याशी WA असतात. प्रत्यक्ष फोन मात्र कमी आहे (माझ्यासमोर तरी).

तर मला असा सल्ला हवा आहे की माझे काही चुकते आहे का? मी ह्या लग्नातून बाहेर पडावे की राहावे ह्याचे analysis मी केले आहे पण मला आणखी काही मते हवी आहेत.
पतिचा angle ही सांगते. त्यांचे म्हणणे आहे की काहीही चुकीचे झाले नाहीये, मी कदाचित थोडा overboard गेलो असेन lady colleague बाबत, पण मला हे लग्न मोडायची अजिबातही इच्छा नव्हती, नाहीये आणि नसेल. पण त्यांच्या मते मी जरा संकुचित प्रवृत्तीची असल्याने ही सगळी लपवाछपवी झाली. काही महिन्यांत सगळे पूर्ववत होईल. मुलाशी ते कुठल्याही बाबांसारखे, किंबहुना जास्तच emotionally attached आणि caring आहेत. पण मला आपण वेगळे होण्याचा प्रश्नच येत नाही हे सांगताना ते माझ्या कडे त्यांच्या पत्नी पेक्षा त्यांच्या मुलाची आई म्हणून बघतात, तेच मला टोचते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

गावाकडचा उपाय आहे हा. >> हा उपाय मलातरी योग्य वाटत नाही. म्हंजे खरंतर ह्या विषयावर मी जास्त न बोलणे बरे तरीपण मला असं वाटतं कि ..... नातेवाईकांमध्ये सांगुन हा फक्त एक चर्चेचा विषय (गॉसिप ) ठरेल. समजा काही दिवसांनी सगळं काही नॉर्मल झालं तरी नातेवाईकांचा दृष्टिकोन हा 'तऱ्हेवाईक' च असेल. समाज वगैरेची फिकीर मिस्टरांना असती तर अशी वेळच आली नसती. माझंच उदाहरण बघा सध्या मी स्वतःला
आधुनिक "निळु फुले" (व्यक्तिरेखा/character) समजतोय..अगदी 'बाई वाड्यावर या' टाईप'. समाज गेला उडत असंच सध्यातरी डोक्यात आहे माझ्या.
व्यसनाधीन माणसाला माहिती असतं कि व्यसनाने त्याला टेक-ओव्हर केलेले आहे फक्त त्याची स्वतःची इच्छाशक्ती नसते त्यातून बाहेर पडण्याची. असंच काहीसं आहे ते. इट्स जस्ट मॅटर ऑफ टाइम.
मी असा उपाय सुचवीन कि :
त्रास तुम्हाला होतोय. मग आधी ठरवा कि तुम्हाला काय हवंय ? ऑपशन्सची लिस्ट तयार करा. ह्याची वेगवेगळी तीन -चार उत्तरं तरी मिळतील तुम्हाला.
१. नवरा बाहेर जाऊच नये असे वाटत असेल तर आधी नवऱ्याने आधी 'आपण बाहेर जातो हे मान्य करायला हवे'. हे मान्य कसं करून घ्यायचे हे तुमचे स्किल आहे. समजा नवऱ्याने मान्य केले तर त्याला ह्यातुन बाहेर कसे काढता येईल ह्याच्यावर काम करता येईल. ते 'अल्कोहोलिक अनालिसीस AA' or whatever वाले करतात तसंच. त्यानंतर नवरा बाहेर गेलाच कशामुळे हे शोधणे गरजेचं असेल मग त्याच्यावर वर्कआऊट करावं लागेल.
२. समजा नवऱ्याने मान्यच केले नाही तरीपण तुम्हाला असं वाटतंय कि कुठेतरी पाणी मुरतंय मग नवऱ्याला रेडहॅन्डेड पकडा. जास्त काही नाही आधी मोबाइल हॅक करा. प्ले-स्टोअर मध्ये बरेच अँप मिळतात. नुसतं व्हाट्सअँप सुद्धा हॅक करता येतंय. ज्या मोबाईलचा करायचंय त्याच्यावर एक OTP येतो तेवढा मिळवला कि झालं. डिटेक्टिव्ह ची गरज नाही पडणार ( खर्च वाचेल आणि भविष्यात डिटेक्टिव्हने ब्लॅकमेल करायची पण भीती नाही राहणार). टेक सॅव्ही बना.
३. वरच्या दोन्ही गोष्टी करायच्या नसतील तर मात्र तुम्हाला स्वतःवर जास्त काम करणे गरजेचं आहे. म्हणजे आधी व्यवस्थित नवर्याच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेऊन, अभ्यास करून त्याच्याही नकळत त्याचे मतपरिवर्तन कसे करता येईल ते बघा. लई वेळ जाईल तुमचा ह्याच्यात पण नवऱ्याला स्वतःहुन जर गिल्टी वाटायला लागले तर तो स्वतःच ह्यातून बाहेर पडेल. तुम्हाला पेशन्स, परफेक्शन, टाईमिंग, हिम्मत आणि ताकत सगळं एकाच वेळी आजमावावे लागेल. हे अवघड असेल पण अशक्य नाही. स्मार्ट आणि ऍक्टिव्ह बना.

मुलांचं फार टेन्शन घेऊ नका. मुलं हुशार असतात. त्यांना बऱ्यापैकी गोष्टी समजतात. तुमच्याकडं बघुन मुलं तशीच शिकणार आहेत. त्यामुळं काय करायचं आहे हे तुम्ही ठरवायचय आणि अमलात आणायचंय. असं समजा हे मुलांचं 'सिच्युएशन हॅण्डल' करायचं एक ट्रेनिंगच आहे. कॉन्फिडन्ट बना. इंटेलिजन्ट रहा. मुलं एकदम पक्की तयार होतील.

जास्त बोललो असेन तर मला माफ करा.

Dark Side यांच्याशी सहमत.आधी तुम्ही त्या माणसा सोबत रहाणार आहात का याचा विचार करा.मग त्याप्रमाणे इतरांना( जवळच्या नातेवाईकांना) सांगायचे किंवा नाही ते ठरवा.councillor हा पर्याय जास्त योग्य.त्यांना अशाप्रकारच्या केसेसचा अनुभव असतो आणि तटस्थेतेने ते सल्ला देऊ शकतात.तुम्ही स्वतःचा विचार करून निर्णय घ्यावा ( मुलाचा देखील नको) असे सुचवेन.मात्र तुमचा कोणताही निर्णय असला तरी त्याला समजेल अशा भाषेत विश्वासात घेऊन सांगा.आपल्याला वाटतं त्यापेक्षा ती खूप हुशार असतात

माझी ताई एकदा मला म्हणाली होती कि प्रत्येक माणसाकडे दोन पर्याय असतात...दोन्ही ठिकाणी सुख
दुःख सारखीच असतात कारण आपण आपलं विधिलिखित तर नाही बदलू शकत..पण
आपण एक पर्याय निवडून ठाम निर्णय घेऊ शकतो...कारण निराश होऊन किती आणि का
बसायचं? मी जेव्हा तुमचा प्रश्न आणि माबो वरची
उत्तर,मदत,सुझाव वाचले तेव्हा मला ताईचे वाक्य आठवले.

स्त्री आणि पुरुष दोन स्वतंत्र व्यक्ती आहेत नंतर नवरा बायको .
नवरा लायकीचा नसेल तर प्रॉपर्टी मध्ये अर्ध्या हिस्सा घेवून मूल नवऱ्या कडे sodun दूसरा जोडीदार shodh .
नाही तर मूल स्वता कडे ठेवुन खर्च वसूल करा .
जास्त विचार करायची गरज नाही

भावनिक व्यक्ती ह्या जगात राहण्या च्या बिलकुल लायकीचा नाही .
आभासी प्रेम भावनेच्या आहारी जावू नका
व्यवहारी जगा

Pages