अंधाधुन - *** इथे स्पॉयलर्स असतील***

Submitted by maitreyee on 13 October, 2018 - 10:58

'अंधाधुन'पाहिला काल.
मला आवडला. एक प्रेडिक्टेबल नसलेला स्मार्ट थ्रिलर + डार्क कॉमेडी बघितल्याची मजा आली.
आयुष्मान चे सिनेमे बहुतेक आवडतात. तब्बू हे सरप्राइज होतं माझ्यासाठी. ती दिसलीय सुरेख आणि काम पण जबरी केले आहे. तिला रोल पण भारी मिळाला आहे.
लूपहोल्स यातही आहेत काही. काही गोष्टी प्रेक्षकांना इंटरप्रेट करायला सोडलेल्या आहेत. त्यावर गप्पा मारायला हा धागा. कोणी काढला नाही म्हणून मीच काढला Happy शीर्षकातच सावधगिरीचा इशारा दिलेला आहे त्यामुळे इथे स्पॉयलर आले तरी हरकत नसावी.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मी तुनळी वर पाहिला होता, भलत्याच नावाने होता .. आता दिसत नाहीये
सध्या वरती लिंक दिलीये तिथे पाहता येईल
अनु 100 रुपये मला दिले असते तर लिंक दिली असती की हो, गरीबाचं कल्याण झालं असतं Proud

डॉ शी आकाश ची ओळख असण्याचा काही सीन सुरुवातीला आहे का? >>>> नाही

की तो फक्त रिक्षावाला आणि लॉटरी वालीच्या ओळखीचा आहे?>>>> हो

डॉ केबल काटल्याचे फोनवर सारखं सांगत असतो त्याला कथेत काही महत्व आहे का?की फक्त हॉस्पिटल तोट्यात गेले, ओस पडले, पैसे कोणत्याही मार्गाने मिळवायला हवेत अशी हिंट द्यायला? >>>>> असही असेल. बाकी हिंट नाही मिळत

इन्स्पेक्टर बंद लिफ्टमध्ये गोळी झाडतो ती आपटून परत त्यालाच लागते असा काही अर्थ काढायचा आहे का?
>>>>>कन्सस्ट्क्शन सुरू असलेल्या कुणाचा वावर नसलेल्या इमारतीतील बंद पडलेल्या लिफ्ट मध्ये अडकून पडतो तो

बेशुद्ध पडताना आयुष्यमान ने शिवा चा टॅटू मेंशन केला याने रिक्षावाला आणि लॉटरी बाई चे मनःपरिवर्तन व्हायचे काय कारण?

>>>> आंधळ्याला टॅटू कसा दिसला हा धक्का ऑपरेशन थांबवायला

नंतर त्याचा प्लान ऐअकुन त्याला ऐन वेळी कल्टी देऊन सगळे पैसे हडप करण्याचा विचार

आता पाहिला नेटफ्लिक्सवर.
मस्त पिक्चर आहे.
एण्ड पुन्हा बघावा लागला.

शेवटी २ वर्षानंतर राधिका आपटे भेटल्यावर जे आयुष्यमान सांगतो ती स्टोरी आहे.

ते २ वर्षानंतर दाखवायच्या आधी लाईफ मतलब क्या लीवर ही तो है म्हणत एका झाडाजवळून गाडी पुढे निघून जाते.
पण जेव्हा राधिका आपटेला तो स्टोरी सांगतो तेव्हा त्या झाडाजवळ गाडी थांबलेली दाखवली आहे. म्हणजे ईथून तो स्टोरी रचतो ती फक्त राधिका आपटेला वा कोणाला गरज पडल्यास सांगायला. आणि ती खरी वाटावी म्हणून सश्याने जीव वाचवला म्हणत सश्याची काठी जवळ बाळगतोय. प्रत्यक्षात गाडी पुढे निघून गेली आहे आणि डॉक्टरच्या प्लाननुसार घडले आहे.

अंधाधून..मागच्या आठवड्यात पाहिला.मस्त आहे.
आवडला.
वर काही प्रतिसादात उल्लेख केलेले सीन्स खिळवून ठेवणारे आहेत..अगदी बापरे,आता काय??असं वाटत राहतं बर्याचदा..
शेवटी माझे पण कनफ्युजन झाले होते.
इथले कमेंट्स वाचून क्लीअर झाले बरंच.

Pages