अंधाधुन - *** इथे स्पॉयलर्स असतील***

Submitted by maitreyee on 13 October, 2018 - 10:58

'अंधाधुन'पाहिला काल.
मला आवडला. एक प्रेडिक्टेबल नसलेला स्मार्ट थ्रिलर + डार्क कॉमेडी बघितल्याची मजा आली.
आयुष्मान चे सिनेमे बहुतेक आवडतात. तब्बू हे सरप्राइज होतं माझ्यासाठी. ती दिसलीय सुरेख आणि काम पण जबरी केले आहे. तिला रोल पण भारी मिळाला आहे.
लूपहोल्स यातही आहेत काही. काही गोष्टी प्रेक्षकांना इंटरप्रेट करायला सोडलेल्या आहेत. त्यावर गप्पा मारायला हा धागा. कोणी काढला नाही म्हणून मीच काढला Happy शीर्षकातच सावधगिरीचा इशारा दिलेला आहे त्यामुळे इथे स्पॉयलर आले तरी हरकत नसावी.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

बर्फी खाऊन तो फक्त बेशुद्ध झालेला असतो. आंधळे त्याला तबू दुसर्‍या काही पद्धतीने करते. ते आंधळेपण खरे असावे कारण नाहीतर दुसर्‍या हाफ ला काही अर्थच नाही.
डीजे - सशाच्या मुठीची काठी आणि त्यावरून त्याला ती स्टोरी सुचली हे पॉसिबल वाटले.
पूनम - युरोप ला जाऊन पण तो आंधळ्याची अ‍ॅक्टिंग करतो त्याचे कारण पण सुरुवातीपासून जे होते तेच. फोकस ( असे तो सुरुवातीला म्हणतो ही) आणि एकूणच 'आंधळ्या' पियानो आर्टिस्ट म्हटल्यावर मिळणार्‍या बेटर रिस्पोन्स मुळे.

आजच्या काळानुसार विचार केला तर काही गोष्टी खटकतात.
१. आयुष्मान खुराणा एके ठिकाणी तब्बूकडून १० लाख रुपयांची मागणी करतो. खुनाचे बिंग फुटू नये म्हणून एका जुन्या नटाची (नंतर तो नट बांधकाम क्षेत्रांत पण आलेला असतो) बायको त्याला माझ्याकडे एवढे पैसे नाही असे सांगते हे पटत नाही.
२. इलेक्ट्रॉनिक / सोशल मीडियाच्या जमान्यात तब्बूचे आणि आयुषमानचे नंतर काय झाले याची थोडीफार तरी माहिती राधिका आपटेला असायला हवी. म्हणजे तब्बू अपघातात मेली किंवा अचानक गायब झाली (डॉ.ने लिव्हर/ ऑर्गनसाठी तिला गायब केले) याची मीडियात/लोकांत जी खबर आहे तेवढी तरी खबर तिला असायला हवी. मात्र ती या बाबतीत अगदीच अनभिज्ञ आहे असे वाटते.
तसेच एक तरुण ज्याचा काही आगापिछा दाखवला नाही, तो बेमालूमपणे आपण आंधळे आहोत असे भासवतो, पेपरमध्ये त्याच्यावर आर्टिकल वगैरे येते आणि कुणीच त्याचे बिंग (जुने मित्र, नातेवाईक ) फोडायला असत नाहीत हेदेखील जरा खटकते.

इलेक्ट्रॉनिक / सोशल मीडियाच्या जमान्यात तब्बूचे आणि आयुषमानचे नंतर काय झाले याची थोडीफार तरी माहिती राधिका आपटेला असायला हवी >>> मिडिया मधे न्यूज आलेली दाखवली आहे की. या लोकांनी तबू ला किडनॅप केले असते तेव्हाच मुद्दाम तिची कार त्या पुलावर सोडलेली असते चप्पल आणि पर्स पण तिथे फेकलेली असते. मिडिया त्यातून अर्थ काढते की तब्बू ने जिथे नवर्‍याचे प्रेत सापडले तिथेच जाऊन आत्महत्या केली. सो तिची स्टोरी तिथेच संपली मिडियाच्या दृष्टीने. ती न्यूज पहाताना राधिका आपटे असे स्वतःशी म्हणताना पण दाखवलीये की नक्की ते दोघे ( आयुष्मान आणि तबू) पळून गेलेत.

राधिका आपटे असे स्वतःशी म्हणताना पण दाखवलीये की नक्की ते दोघे ( आयुष्मान आणि तबू) पळून गेलेत.

हो हे पाहिले आहे . म्हणूनच मी लिहिले की त्या पुढची काहीच खबरबात कित्येक दिवसांनी देखील राधिकाला नसते. तब्बूची बॉडी मिळाली नसेल तर आजकालचा अनुभव पाहता मीडिया एवढ्यात असले प्रकरण सहज सोडणार नाही.जर तब्बू शेवटच्या दृश्यात अपघात होऊन मेली असेल तर राधिकाला ते न्यूजवरून तरी नक्कीच समजले असते. तिला ते माहीत नाही म्हणजे सश्याची धडक आणि अपघात हि रचलेली कहाणीच वाटते. किंवा असे म्हणायचे आहे का कि अपघातात बॉडी पूर्ण डॅमेज होऊन ओळख मिटली गेली ? गाडी तर त्या डॉची असल्यामुळे नुसत्या गाडीवरून तब्बूची ओळख पटणार नव्हती.

ससा समोर पडल्याने तब्बुचा तोल जाऊन गाडी पलटी होते
>>>>> कि सशाला मारलेली गोळी किमी च्या नंबरला लागून गाडीची काच फोडून तबूला लागते ??

खूप धक्कादायक चित्रपट. मला आयुषमान पियानो वाजवत असताना त्याला प्रेत दिसल्यावर छातीत जे धडधडायला लागलं ते चित्रपट संपून तास झाला तरी थांबेचना. अजून किती धक्के बाकी आहेत.. कधी एकदा संपतोय असं झालं शेवटी शेवटी.

बादवे.. सिमीने डॉ ला डिक्कीत बंद केले आणि ती द्रायव्हिंग करायला येऊन बसली हे आयुषमान ला कळलं / कळतं असं कितीजणांना वाटतं?

मला तो सीन बघितल्यापासून असं वाटतंय की त्याला कळतं की ती ड्रॅइव्ह करतेय. पण त्याच्या हातात काहीच करणं नसतं. म्हणून तो मुद्दाम तिला वाचवण्याविषयी बोलतो.. मला पुढे उतरवून द्या.. माझा मी जाईन टाईप सूर लावतो इ.इ.

असं वाटण्याचं कारण म्हणजे आंधळ्या व्यक्तीचे इतर सेन्सर्स फार स्ट्रॉंग असतात असं ऐकून आहे.

धक्यांवर धक्के आहे हा पिक्चर म्हणजे. सतत माझ्या तोंडून अरे बापरे, ओह नो, आईग्ग.. असंच होत होतं Proud

तब्बूचं पण काम अफलातून झालंय. तो रिक्षावरचं पोस्टर क्शाचे आहे ते सांगतो तेव्हा ती तुम फिरसे देख सकते हो? म्हणते तेव्हा मी हसून फुटलेच. बाकी ती त्याच्या घरी येते त्या पुढचे सगळे सीन्स जबरी आहेत. पोलिस स्टेशन मधे त्याचं स्वप्न पण Proud वो ऊंगली टुक करके तोडी.... हहपुवा सीन

शेवटचा ससा सीन जिगसॉ पझल सारखा बसला असं वाटलं. पण पुढचे बरेच प्रश्न अनुत्तरित्च राहिले.

सुरवातीला काळोख्या पार्श्वभूमीवर त्याचे संवाद आहेत तयावरुन तो लंडन किंवा कुठेतरी परदेशी कॅफेमध्ये बसून राधिकेला सुरवातीपासून कथा सांगतोय हे दाखवले असे समजायचे का? माझ्या तेव्हा लक्षात नाही आले. सुरवातीलाच तो आंधळा नाही हे लक्षात आल्यावर बाकी गोष्टीत किती खरेखोटे असू शकेल? माझ्या मते राधिका ज्या भागात होती तितके खरे, कारण ते घडले ह्याचा प्रत्यक्षदर्शी कुणी दुसरा आहे. बाकी सारे खोटे. तो अंधळा नाही म्हटल्यावर लंडनला जाऊन डोळे नीट करायची गरज उरत नाही. तब्बूने खरेच आत्महत्या केली असावी, नाहीतर पोलिसांना गाडीत काहीतरी झटापटीच्या खुणा सापडल्या असत्या.

मात्र एकदा आकाश सत्य व कल्पना एकत्रित करून सांगतोय हे गृहीत धरले की काय खरे व काय खोटे याबद्दल भरपूर अनुमाने लावता येतील. चित्रपट त्या दृष्टीने मस्त बनलाय.

तब्बूने चांगले काम केले आहे. आवडले.

Kay bhankas picture aahe. Paise waste
>>
हेच आई आणि बहिण म्हणाल्या. वरती आई - आजकाल लोकांना काहीही आवडतं हे ही म्हणाली Proud
आईकडुन आलेल्या प्रतिक्रियेबद्दल फार विशेष नाही वातलं पण बहिणीने पण सेमच प्रतिक्रिया दिली तेंव्हा मला Uhoh असं झालं.

मला स्वतःला दिल धडकने दो, पिके, तमाशा, पिकु वगैरे नावाजलेले सिनेमे आवडले नव्हते त्यामुळे असं होउ शकतं Proud

रीये, मला ही पिके, तमाशा, पिकु आवडले नव्हते.
दिल धडकने दो> >>>>> चांगला वाटलेला. जासकरुन प्रिचो चा पार्ट.
पण मला अंधाधुन आवडला Happy

तमाशा आणि रॉय हे सिनेमे समजायला कठीण होते,. ज्यांना समजले त्यांना आवडले. रॉय तर महाराष्ट्र टाईम्स मध्ये समीक्षण लिहिणार्‍याला देखील कळला नसावा. त्याने चक्क लिहिले होते की जॅकलीनचा डबल रोल आहे. एक रणबीरची नायिका आणि दुसरी रामपालची. सिनेमा पाहताना मटाची कीव येत होती.

त्याने चक्क लिहिले होते की जॅकलीनचा डबल रोल आहे. एक रणबीरची नायिका आणि दुसरी रामपालची. >>>>>> पण चित्रपटात तसेच होते ना? Uhoh जॅकलीनचा डबल रोल असतो. एक रणबीरची नायिका आणि दुसरी रामपालची. अस वाचल होत मी. चित्रपट बघितला नाहीये. मेबी वाचलेल चुकीच असेल.

Kay bhankas picture aahe. Paise waste >>>>>>> अन्धा धून चान्गला पिक्चर ते भन्कस पिक्चर अशी प्रगती झालीये धाग्याची. Lol

{{{ जॅकलीनचा डबल रोल असतो. एक रणबीरची नायिका आणि दुसरी रामपालची. अस वाचल होत मी. चित्रपट बघितला नाहीये. मेबी वाचलेल चुकीच असेल. }}}

तुमच्या वाचण्यात चूक झालेली नाहीये. मटाच्या समीक्षकानेच चूकीचं लिहिलंय. तुम्ही सिनेमा पाहा म्हणजे खरी गंमत काय आहे ते कळेल.

पाहणार नसल्यास हे वाचा.

अर्जुन रामपाल एक चित्रकर्मी असून रणबीर कपूर हे त्याच्या कल्पनेतले पात्र आहे आणि त्या पात्राची नायिका जॅकलीन (कल्पनेतलीच) आहे. तशीच एक प्रत्यक्षातलीही जॅकलीन आहे. कल्पनेतली आणि प्रत्यक्षातली अशा दोन्ही मिळून डबल रोल होऊ शकतात का?

Raajasee ++
Bakawas.
Everything is driven by why. That is lacking.
Cant think why he wud eat what she gives, when he has seen what she is capable of.
When so many killings happen, common denominator pakadala jaat nahi he kahichya kahi vatate.
When u see a deadbody, unless u r a psycho, its nt possible to continue, to go on playing piano, to go to bathroom. To see a person with revolver and not to react.

Yes, thr were many twists, acting was good, frames were good - but i felt it was like body without soul..

Cant think why he wud eat what she gives, when he has seen what she is capable of.
>>
So according to you what he should have done? Tell her that, "I know you are capable of so many murders, so I won't eat this Prasad because guess what, by not eating this Prasad I am avoiding getting killed by you.
That too When I am alone at home. And that too when I know what you are capable of."

When so many killings happen, common denominator pakadala jaat nahi he kahichya kahi vatate
>>
खरे काही सापडलेच नाही असे दाखवलेले नाही. त्याएवजी भलामण करणारे दुसरेच काही सापडले असे दाखवलेले आहे. जसे की सिमीने स्वतःहुन पुलावरुन कार नदीत पाडुन आत्महत्या केली. अजुन काही महिन्यांनी त्यांना कदाचीत खरे कारण सापडलेही असेल. पण तोपर्यंत हा परदेशात निघुन आला ना? यापेक्षा जास्त तपशील किंवा प्रश्नांच्या उत्तरांसाठी पुढचा भाग येऊ शकतो!

When u see a deadbody, unless u r a psycho, its nt possible to continue, to go on playing piano, to go to bathroom. To see a person with revolver and not to react.
>>
Right. Now only if this film had some non-psycho character who was deep into acting of blind person because he felt he gets inspiration and improved focus due to blindness....

He is at that extra level of awareness of surroundings. Its in his best interest to continue blind acting when he sees dead body and stranger person in bathroom. A slight mistake and he will be next...
and btw, he stopped after seeing dead body and immediately processed all that information. Now after this incident he is into self defense mode and taking note of his surroundings. That may be the reason he is not surprised by seeing stranger person in bathroom.

राजसी व नानबाशी अंशतः सहमत. चित्रपट पाहिल्यावर पैसे फुकट गेल्याची भावना मनात आली. नंतर छोट्या पडद्यावर, नेफ्लि, प्राईम, झी कुठेही पाहिला असता तरी काही बिघडले नसते. तुलनेत तुंबाड जास्त चांगला वाटला.

पहिला भाग बरा आहे पण दुसरा पार ढेपाळलाय. अगदीच कैच्याकै वाटते. इतके की तब्बू डॉक्टरला मारून गाडीत येऊन बसणार हे मी डॉक्टर मागे गेल्यावर लगेच प्रेडिक्ट करू शकले.

आंधळ्याची बेमालूम एकटिंग करणार्याने घराच्या खाली येताच ते बेअरिंग का सोडावे, तेही तो पोरगा लक्ष ठेऊन आहे हे माहीत असताना? केवळ कथेची गरज म्हणून? तब्बूच्या बिल्डिंगखाली पोर्चमध्येही असेच. तिथे cctv असण्याची शक्यता आहे.

मी त्याच्या जागी असते तर 2 खून पचवलेली तब्बू आपल्या घरी आपल्याला मारायला आलीय हे तात्काळ ओळखून प्रसाद खायचे टाळले असते. ती काय आधी प्रसाद खाच म्हणून मागे लागली नव्हती. कॉफी करायला आत गेल्यावर खिडकीतून सहज प्रसाद बाहेर फेकता आला असता. हा चवीचवीने खाताना दाखवलाय.

Sadhana, barobar.
Esp. First half was ok. Doc. Dole kashane, lever kahichya kahi hoin gele.

मला अजून एक कळले नाहीये की हिंदीतला धून शब्द स्त्रीलिंगी असायला हवा ना? मग अंधाधून कसे अंधीधून हवे ना?

फिक्शन आहे ना? का क्राईम्पेट्रोल चा एपिसोड आहे? कहि लोकांचे म्हणजे ना अगदि काहीही सुरु असते.

कॉमन डेनॉमिनटेर कसा पकडणार? पकडणाराच सामील आहे ना? शिवाय, त्या नटाचा खून घरात झालाय हे आपल्याला माहिती आहे. पोलिसांना नाही. कारण त्याची बॉडी नदीकिनारी मिळाली आहे परत पो इं तब्बू ला सामील आहेच.

चालला सिनेमा तर सिक्वेल काढण्यासाठी स्कोप ठेवण्याची जी पद्धत हल्ली रूढ होते आहे त्या पठडीतला वाटला. कितीतरी लूप होल्स असलेला हा चित्रपट मलापण बकवास वाटला. तब्बू मात्र दिसली पण छान आहे आणि तिचा अभिनय पण भारीच.

तब्बूशी पंगा घेणं परवडलं असतं आयुष्यमानला? ते पण तिचे कॉन्टॅक्ट्स कुठवर आहेत हे माहित असताना? त्यापेक्षा तिला आपण अंध आहोत अशी खात्री करून देणंच योग्य होतं.
मला सिसीटिव्ही हा अँगल तपासात कुठेच न येणं आणि अतिशय सोपं दाखवलेलं बॉडी डिस्पोजल हे दोन खटकणारे इश्ञुज वाटले. बाकी, सिनेमा फस्क्लास.

aho, jagachya patheevar ekach police ahe ka?
Actor marato, samorachi bai marate, tabbu gayab hote, tya prakaranat asalela, actor la baghanara gayab hoto, police inspector gayab hoto.
Isnt it too much.
Doctor cha track tar farach acharat ahe.

Paravadanyacha prashnach yet nahi.
Normally andhalyache natak karane ani ase samor disalyavar na dachakata chalu thevane vegale.
Once body is seen, one would try to escape and hot go to bathroom
In bus right senses he will nt go their again to teach his daughter.

डॉ. स्वामी यांची गाडी गोष्ट युरोपात जाण्यापूर्वी थांबली नाही. ती पुढे जात राहिली. आकाश सोफीला गोष्ट सांगताना ती गाडी एका झाडापाशी थांबते. म्हणजे,
शक्यता १ - ससा आणि तबूला झालेला अपघात हे खोटं. तो तबूच्या अवयवांमुळे मिळालेल्या पैशातून परदेशी आला. डोळेही मिळाले.

शक्यता २ - त्याला दानीनं मदत केली परदेशी यायला. तबूला पळवण्याआधी तो दानीला 'कीप इन टच' म्हणतो. तबूचे डोळे त्याला मिळतात. राधिका जेव्हा त्याला म्हणते, तू तबूचे डोळे घ्यायला हवे होतेस, तेव्हा तो तिच्याकडे 'बघतो'.

In bus right senses he will nt go their again to teach his daughter.

>>>> त्याने प्लान केलेला असतो ना तिला किडनॅप करण्याचा.
ती अपेक्षेप्रमाणे त्याला तुला ड्रॉप करते म्हणून त्याला घेऊन जाते

Pages