अंधाधुन - *** इथे स्पॉयलर्स असतील***

Submitted by maitreyee on 13 October, 2018 - 10:58

'अंधाधुन'पाहिला काल.
मला आवडला. एक प्रेडिक्टेबल नसलेला स्मार्ट थ्रिलर + डार्क कॉमेडी बघितल्याची मजा आली.
आयुष्मान चे सिनेमे बहुतेक आवडतात. तब्बू हे सरप्राइज होतं माझ्यासाठी. ती दिसलीय सुरेख आणि काम पण जबरी केले आहे. तिला रोल पण भारी मिळाला आहे.
लूपहोल्स यातही आहेत काही. काही गोष्टी प्रेक्षकांना इंटरप्रेट करायला सोडलेल्या आहेत. त्यावर गप्पा मारायला हा धागा. कोणी काढला नाही म्हणून मीच काढला Happy शीर्षकातच सावधगिरीचा इशारा दिलेला आहे त्यामुळे इथे स्पॉयलर आले तरी हरकत नसावी.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मागे तिकिटं काढली असताना अचानक टूरवर जावे लागले म्हणून हळहळलो होतो. नेटफलिक्सवर आलाय म्हणुन उत्साहाने बघितला.
न जमलेला सस्पेन्स, न जमलेला डार्क ह्युमर. चित्रपटाने निराशा केली.

ताबडतोप नेटफ्लिक्सवर लावलाय. पहिला भाग पहायचाय पुन्हा. पाहिल्यांदा बघताना ‘ओ नो, अरे बापरे, काय सॉलीडेगं, आँ, नुसताच आ वासणे...... असे बरेच काही करताना बारकावे सुटले. ते आता पहाते.

Maanav ++
Kamdev, thats not true. I would like to interpret. Pan tarihi nirarthak, far fetched and without d purpose vatala mala.

मी अर्धा थेट्रात बघितलाय. उरलेला अर्धा बोअर आहे म्हणून लेकीने बाहेर काढले. तिने आधीच बघितलेला. ते होम वर्क आता पुरे करायचे आहे.
तब्बू, लफ डे मर्डर पार्ट मजेशीर आहे. पुढे काय होते? राधिका आपटे आता डिलीट मारले आहे ती रजिस्टरच होत नाही. सर्वत्र एक चेहरा. एक एक्स्प्रेशन. तिच्या बद्दल चे कौतूक मरून गेले आहे. आयुश्मान आवडतो म्हणून बघे न उरलेला भाग. प्लस पुणे शहर. सबसे बडा हिरो.

मी युट्युबच्या बेक्कार प्रिन्ट वर पाहिला होता त्यामुळे मधले काही पार्ट निट काय ते कळलच नव्हते, मधे मधे काही लिन्क्स लागल्या नव्हत्या, आता नेटफ्लिक्स वर पाहिला .पहिला पार्ट जास्त आवडला
अन्ध असण्याच्या नाटकाचे फायदे ( सदाशिव पेठेत ५०० रु भाड्यात घर ) परफेक्ट उचलत असत आयुशमान..काही डिटेलिन्ग परत बघताना आत्ता जाणवले जस तबु तो स्केअरी मास्क घालुन बसते तेव्हा अटकलेला श्वास सोडताना दाखवणे, इन्स्पेक्टर येतो तेव्हा लेन्सच्या डब्या उचलणे,,

कामदेव म्हणताहेत अगदी तेच वाटतं.
वरची स्क्रोल ची लिंक चांगली आहे. लेखक दिग्दर्शक चित्रपट बनवताना काय काय विचार करत होते, जे दाखवलंय त्याशिवाय इतर काय काय शेवट करायचे यावर विचार केलेला आणि अनेक डिसिजन कसे घेतले यावर वाचायला जाम आवडलं.
हे सगळं वाचून आज रात्री नक्की परत बघणार..

>>त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परिने घटनाक्रमाचा अर्थ लावतो. <<

यामध्ये दोन डिस्टिंक्ट कॅटेगोरीज आहेत. एकातले दिग्दर्शक (अंधाधुन) सगळं प्रेक्षकांवर सोडुन देतात तर ब्रिल्यंट (ए-प्लेयर्स) दिग्दर्शक चित्रपटात एकच शेवट्/मार्ग वगैरे दाखवतात पण तो इतका ट्विस्टेड/कांवलुटेड असतो कि प्रेक्षकांचा गोंधळ उडुन ते स्वतःच्या कुवतीनुसार तर्क लढवत रहातात. जाणकार प्रेक्षकांनी नीट सगळ्या सीन्स/सिक्वेंन्सचा मेळ बसवला तर डायरेक्टरचा मेसेज थेट पोचतो. (एकवेळ, गणितात उत्तर एकच अस्लं तरिहि त्याकडे पोहचायच्या स्टेप्स निराळ्या असु शकतात, चित्रपटांमध्ये हे लागु होत नाहि... Proud )

थोडक्यात हा चित्रपट फसलेला आहे. अतिशय प्रेडिक्टेबल, अगदि त्या बंड्याने फोनवर रेकॉर्ड करण्यापासुन, आकाशने शेवटी लाथेने कॅन उडवण्यापर्यंत. काहि सीन्स जमले आहेत पण ओवरॉल प्लॉट जमता-जमता बिघडलेला आहे...

तुंबाड मुळे पहायचा राहिला. गेल्या आठवड्यात मार्केट सिटीमधूनही गेला. आणि आज अचानक नेटफ्लिक्स वर पहायला मिळाला. सस्पेन्स ऐवजी अब्बास मस्तान स्टाईल वेगवान थ्रिलर आहे असे म्हणावे लागेल. माफक अपेक्षा ठेवल्या तर सिनेमा आवडतो. सर्वात जबरदस्त तब्बू आहे आणि तीच लक्षात राहते. तिच्या जागी दुसरी कुणी असती तर ही भूमिका कशी केली असती सांगता येत नाही.

सिनेमा निवेदनातून सुरू होतो पण ताबडतोब ट्रॅकवर येतो. मात्र काही गोष्टी जाणूनबुजून दिशाभूल करण्यासाठी आहेत त्या टाळल्या गेल्या पाहीजेत. उदा. आयुष्यमान अंध नसतानाही अंध असण्याचे फायदे सांगतो. प्रेक्षकाची दिशाभूल अशा प्रकारे निवेदनातून नको. प्रसंगातून व्हायला हवी.

अशा ब-याच गोष्टी आहेत. ज्या सिनेमा पाहतानाही जाणवतात. संपल्यावर एकत्रित गाठोडे बनते आणि नंतर त्याचा अर्थ लागतो. तोपर्यंत तरी सिनेमा आवडलेला असतो. त्यामुळे कशाही पद्धतीने का होईना सफाईदार थ्रिलर सादर करण्याचे गुण द्यायला हवेत.

तब्बूचे काय होते ? >>> याचे प्रत्येकाचे उत्तर निराळे असेल. हा प्रेक्षकांचा सिनेमा आहे.

यु ट्युबवर पाहीला. चांगला वाटला...

https://www.youtube.com/watch?v=ghS8KekFnk4 येथे अनिल धवन आणि लिना चंदावरकरचे गाणे आहे. हिच लिंक अनिल धवन सिनेमात उघडतो आणि त्यावरची "Awesome song! Brings back old memories. Where is Pramod Sinha?" आणि "With love from Denmark." अशी सर्फिंग घोस्ट या व्यक्तींने लिहीलेली कॉमेंट जशी च्या तशी बघायला मिळेल. एखाद्या क्रु मेंबरने लिहीलेली कॉमेंट असेल....

25 वर्षांपूर्वी म्हणजे 1994-1995. तेंव्हा अनिल धवन 45 वर्षाचा असता, आणि इतकी छोटीसी फालतू भूमिका करून तो सुपरस्टार कसा झाला असता?
तो काळ म्हणजे हम आपके , दिलवाले दुल्हानिया चा काळ, अंदाधुंद ला प्रेक्षक मिळणे आणि त्यामुळे अनिल धवन सुपरस्टार होणे प्रचंड अवघड वाटतंय.

च्रप्स,
ते गाणं बघा युट्यूबवर जाऊन आणि कमेण्ट्स वाचा म्हणजे कळेल..

पिक्चर काल गुगल मुव्हीज वर 100 रु रेंट करून मी,नवरा व 12 वर्षीय पुतणी ने पाहिला.
सर्वांना आवडला.शेवट पर्यंत आता काय होणार म्हणून श्वास रोखायला लावणारा पिक्चर आहे.दोन चार गोष्टी कळत नाहीत.
डॉ शी आकाश ची ओळख असण्याचा काही सीन सुरुवातीला आहे का?की तो फक्त रिक्षावाला आणि लॉटरी वालीच्या ओळखीचा आहे?डॉ केबल काटल्याचे फोनवर सारखं सांगत असतो त्याला कथेत काही महत्व आहे का?की फक्त हॉस्पिटल तोट्यात गेले, ओस पडले, पैसे कोणत्याही मार्गाने मिळवायला हवेत अशी हिंट द्यायला?हा डॉ आयुष्यमान ला पहिल्यांदा बेशुद्ध आणतो तेव्हाच काय किडन्या लिव्हर वगैरे का नाही काढत?इन्स्पेक्टर बंद लिफ्टमध्ये गोळी झाडतो ती आपटून परत त्यालाच लागते असा काही अर्थ काढायचा आहे का?आयुष्यमान दिना च्या घरी जातो तेव्हा त्याने दिना ला कट समजावून 'आमचा काही वेगळा प्लॅन आहे, तब्बू कडून जगलो वाचलोच तर मला पैश्याची लंडन ला जायला आणि सेट व्हायला पूर्ण मदत कर' सांगितले असेल.तब्बू त्याला रेंज हिल ला नेणार हे रिक्षा वाल्याला कसे माहीत होणार?की तो पाठलाग करून मग पुढे आला?तब्बू च्या लोकप्रिय स्टाईल प्रमाणे ती त्याला बाल्कनीतुन टाकून तो आंधळा असल्याने पडला म्हणू शकेल.अनिल धवन चा लहानसा रोल आवडला.
लहान मुलगा हुशार आहे.
बेशुद्ध पडताना आयुष्यमान ने शिवा चा टॅटू मेंशन केला याने रिक्षावाला आणि लॉटरी बाई चे मनःपरिवर्तन व्हायचे काय कारण?
या सगळ्यात मनाने चांगला असलेला रिक्षावाला फुकट मेलाय.
तब्बू भयंकर आहे.एरवी अनिल धवन चुकून मेला, पण ते लपवायला आता ती काहीही करेल.शेवटी पण ज्या आयुष्यमान ने तिला वाचवलं त्याला चिरडायला ती येत असते.(कथा खरी मानल्यास).ती जळून मेली असेल तर मीडियात ओळखीचा किंवा बातमीचा संबंधच नाही.आयुष्यमान मला अनोळखी व्यक्तीने किडनॅप केले आणि मला दिसत नाही म्हणू शकतो.कथा खोटी असल्यास डॉ ने तब्बूचे अवयव विकून पैसे आणि सर्व मदत केली.पण मग सश्याची काठी वापरायचं काहीच कारण नाही.किंवा वर म्हणतात तसं काठी योगायोगाने विकत घेतली आणि आपटे भेटल्यावर सर्व सोडायच्या पुड्या आठवत गेल्या.
तब्बू त्याला एकट्याला पलंगावर ठेवून कपडे वगैरे काढते हे अविश्वसनीय. राधिका आपटे येणार तिला माहीत नसतं.म्हणजे हा ऐन वेळचा प्लॅन.तिला थेट त्याला बाथरूम मध्ये पडून देऊन खिडकीतून पळून जाता आलं असतं.

१०० रूपये घालवले ? का ?

हॉटस्टार आणि जिओसिनेमा वर आहे की…. फ्री फ्री फ्री

Pages