अंधाधुन - *** इथे स्पॉयलर्स असतील***

Submitted by maitreyee on 13 October, 2018 - 10:58

'अंधाधुन'पाहिला काल.
मला आवडला. एक प्रेडिक्टेबल नसलेला स्मार्ट थ्रिलर + डार्क कॉमेडी बघितल्याची मजा आली.
आयुष्मान चे सिनेमे बहुतेक आवडतात. तब्बू हे सरप्राइज होतं माझ्यासाठी. ती दिसलीय सुरेख आणि काम पण जबरी केले आहे. तिला रोल पण भारी मिळाला आहे.
लूपहोल्स यातही आहेत काही. काही गोष्टी प्रेक्षकांना इंटरप्रेट करायला सोडलेल्या आहेत. त्यावर गप्पा मारायला हा धागा. कोणी काढला नाही म्हणून मीच काढला Happy शीर्षकातच सावधगिरीचा इशारा दिलेला आहे त्यामुळे इथे स्पॉयलर आले तरी हरकत नसावी.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

चिनूक्स तुझे बरोबर असेलही. पण हे असेच झाले याची कुठेही अगदी पुसट हिंट मिळत नाही.

हा चित्रपट डार्क कॉमेडी आहे, त्या प्रकारच्या चित्रपटांची ट्रीटमेंट वेगळी असावी, जी हिंदी मसालापट पहायची सवय असलेल्या सगळ्या लोकांच्या लक्षात लगेच येईल असे नाही असे माझे मत झालेय एकंदरीत. ज्यांना ट्रीटमेंट कळली त्यांना वेगवेगळे अर्थ काढता आले, ज्यांना कळली नाही त्यांना काहीच पटू शकले नाही. Happy Happy

खूप मस्त आहे मुव्ही! आता पुढे काय होते हे सतत वाटत राहते मुव्हीभर. चांगल्या सस्पेन्स मुव्हीचे लक्षण!
मला काही खटकले नाही. अफलातून गोष्ट आहे आणि तशीच मस्त रंगवली आहे!

पहिला तब्बूच्या घरातला सीन व नंतर आयुषमानच्या घरातला तब्बूच्या त्याची परीक्षा घेण्याचा सीन फार मस्त जमले आहेत! त्या प्रेताला व मास्कला मी वाईट दचकले! Lol

नानबा, फ्रेंड्स पाहतेस का? आकाश उनागी अवस्थेला आहे गं! Happy

जितका विचार केला तितक्या शक्यता निघत गेल्या.
माझं माझ्या ऑप्थल्मॉलॉजिस्ट भावाला 'सशाचा कॉर्निया माणसाला बसवता येईल का' हेही विचारून झालं. त्याने माझ्याकडे फारच विचित्र नजरेने बघितलं. Proud

खुप छान..आवडला..
सी सी टी वी चा मुद्दा कोणाच्याच का लक्षात येत नाही?
तो पोलिस जांभळ्या रंगाची बॉग घेऊन जातो.. प्रेत घेऊन..तेव्हा कॉरिडोर आणि ईमारती च्या आवारात तर सी सी टी वी असेलच ना.!
एवढं एक सोडलं तर..बाकी सिनेमा आवडला..
धक्के बसत राहिले..संपूर्ण सिनेमात..
आकाश पहिल्यांदा तब्बुच्या घरी जातो, पोलिस् स्टेश्नला कंप्लेंट करणार असतो पहिल्यांदा, तब्बु आकाशच्या घरी जाते पहिल्यांदा.. हे सीन एक्दम भारी जमले आहेत..!
मला वाट्तं डॉक्टरला आकाश विरोध करतो ..पण नंतर गाडी निघून जाते तिथ पर्यंत् खरंआहे...त्याने डॉक्टरच्या म्हणण्याप्रमाणेच केलं..त्याला द्रुष्टीही मिळाली परत..
नंतर दोन वर्षांनी..असं दाखवलयं..तेव्हा तो राधिकाला त्त्याने रचलेली कथा सांगतो.. डॉक्टर तब्बुला ईंजेक्श्न द्यायला उतरतो..तिथपासून खोटं आहे..
सशाची काटी त्याच्याकडे अगोदरच असेल..आणि त्यवरूनच त्याने कथा रचली..

त्याने प्लान केलेला असतो ना तिला किडनॅप करण्याचा.
ती अपेक्षेप्रमाणे त्याला तुला ड्रॉप करते म्हणून त्याला घेऊन जाते >>
That is second time. Talking abt first time when she throws other lady from balcony

Baske >> unagi .. Lol isnt it a fish? Wink

Sadhana, whatever other interpretation - they came to my mind while matching.
Still didnt like it.

आत्ताच पाहून आले. मस्त आहे. एकदम पैसे वसूल !
बाय द वे,पिक्चर पाहिल्यावर अंधाधून हा शब्द अंधाधुंद ह्या शब्दाशी संबंधित आहे का असं उगीच वाटतंय ( आधी अंधा + धून अशी फोड असेल असं वाटत होतं ) कारण अंधाधुंद घटना घडत जातात एकेक Wink

सशाचा कॉर्निया माणसाला बसवता येईल का>>> Lol सेम सेम विचार मी केला! पण मला नंतर वाटले की तो ससा पण आंधळा दाखवलाय. त्याचे डोळे पण पांढरे फटक होते..

ती बारशाचे पेढे वाट्ल्याप्रमाणे अस्थिविसर्जनाचा प्रसाद घेउन येते ़आआअगदिच्ब अचाट आहे.

काल पाहिला मी. आवडलाच.

माझ्यामते शेवटी डॉ आणि आकाश कारमधून सिमीला घेऊन जातात आणि त्यावेळी डॉक्टर त्याला पुढचा प्लॅन सांगतो की सिमीचं लिवर त्या शेखच्या मुलीला द्यायचं आणि सिमीचे डोळे (कॉर्निया) तुला मिळतील. शिवाय एक कोटी रुपये. हाच प्लॅन पुर्णत्वास जातो.

ती कार एका निर्जन रस्त्यावरून पुढे पुढे जाताना दाखवली आहे. समोर एक टेकडी आणि रस्त्यात एक झाड आहे. इथे सत्य घटना संपते.

कारण आकाश सोफीला सांगताना.. पुन्हा एकदा रिवाइंड झाल्यासारखा तो रस्ता पहिल्यापासून येतो. मग सिमी डिकीतून धडका मारते, डॉ. कार थांबवून उतरतो ... ससा, गोळी मारणे, कारचा अ‍ॅक्सिडेंट, सिमीचा कार जळून मृत्यु इ. इ. घटना घडतात. या घटना आकाशला दिसणं शक्यच नाही, गोळी कोणी चालवली, का चालवली, तिथे ससा होता हे त्याला कळणं शक्य नाही. पण तो हे सगळं सोफीला सांगतो कारण त्याला सोफीबरोबरचं नातं पुढे न्यायचं नाहीये. त्याचं जे स्वप्नं होतं ते साकार झालं आहे. युरोपात एक पियानिस्ट म्हणून तो आनंदात जगतोय. ती काठी त्याच्याकडे आधीच आहे. ती आंधळ्यांची काठी नाही. साधीच आहे. त्या सश्याचा तो गोष्टीत उपयोग करून घेतोय. आता तो युरोपातही आंधळा म्हणूनच वावरतोय कारण त्याला त्याचे फायदे मिळतात. सिनेमातच एका ठिकाणी तो सांगतोही की आंधळा अस्ण्याचे तोटे आहेत पण फायदेही आहेत.

लूपहोल्स मात्र आहेतच. सीसीटिव्ही सारख्या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष्य कसं काय होऊ शकतं?

मला वाटते पोलिस इन्व्हेस्टिगेशन दाखवणे वगैरे या सिनेमाचा हेतु नाही म्हणून सीसीटीव्ही किंवा दुसरा काही तपास दाखवला नाहीये. आयुषमानच्या angle ने कथा दाखविणे हाच मोटिव्ह आहे.

रच्याकने शूटीन्ग ज्या बिल्डिन्ग मध्ये झालीय त्या बिल्डिन्ग मध्ये सी सी टी व्ही आहेत. मगर् पट्ट्यात असलेल्या कल्याण ज्वेलर्स च्या मागे असलेल्या सिएना बिल्डिन्ग मध्ये शूटिन्ग झालय.

अच्छा? 'तुम्हाला' ती बिल्डिंग माहिती आहे हे इथे सांगितल्याबद्दल धन्यवाद. इट इज वेल नोटेड दॅट 'यु' नो द बिल्डिंग व्हेअर द शुटींग टुक प्लेस. अतिशय महत्वाची आणि गोपनिय माहिती सांगितल्याबद्दल प्रविणपा यांचे मायबोली तर्फे विशेष सत्कार करण्याचे ठराव इथे मांडतो.

मुळात खुनांची चौकशी तो पोलिस अधिकारी करतोय. कॉल रेकॉर्ड्स तपासायचे, असंही तो म्हणतो. सीसीटीव्ही फुटेज पुरावा बनू नये, याची तो काळजी घेईलच. त्याच्या हाताखालचा अधिकारीही मिसेस डिसाच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करतो.

आकाशला तब्बू पेढा खायला घालून तात्पुरताच आंधळा करू शकते किंवा त्याची दृष्टी गेलीच नाही. हुशार आकाश तो पेढा खाल्याचं नाटक करून तोंडात धरून ठेवून आत जावून टाकून देत असेल. तो एवढा बावळट नक्कीच नाही. तिथपासून त्याचे पुन्हा अंध व्हायचे नाटक तो बेमालूमपणे continue करतो. त्याला तसं वावरण्याची सवय / सराव असल्याने कठीण जात नाही. Throughout तो सगळं बघू शकतोय. मात्र दुर्दैवाने सिम्मी, मनोहर, डॉ स्वामी, लॉटरीवाली बाई व रिक्षावाल्यासारखे मृताच्या ताळूवरचे लोणी खाणारे किंबहुना लोण्यासाठी कुणालाही मृत बनवणारे लोक भेटल्याने तो स्वत:वर control ठेवतो. पण जे जे लोक तसे वागत गेले त्यांचाही तसाच मृत्यू होत गेला. छाया कदम वाचली पण सगळं हरवून बसली. Organs चोरून विकण्याच्या प्रयत्नात तिच्या नवऱ्याचेच organs donate करायचा सल्ला ऐकायची वेळ येते. बाकीचे चौघे आपसातच संघर्ष होवून मरतात.

आकाशची ह्या हादश्यांची मालिका सुरू व्हायच्या आधीच लंडनला जायची तयारी almost झालेली आहे. सिम्मी मेल्यावर त्याचा मार्ग मोकळा होतो. सिम्मीच्या मरणाला तो ससा अप्रत्यक्षपणे कारणीभूत ठरलेला त्याने पाहिलेला असतो. त्याची कृतज्ञता म्हणून सश्याच्या मुठीची काठी तो नव्याने सुरू केलेल्या आयुष्यात वापरतो. दोन वर्षांनी लंडनमध्ये त्या पियानो बारच्या बाहेर सोफी क्षणभर कुणा फॉरेनर मुलाबरोबर दाखवली आहे. आतमध्ये अनपेक्षितपणे ती भेटल्यावर आकाश तिला त्याची बाजू सांगतो पण आता त्याच्या मनात तिच्याबद्दल कसल्याही भावना किंवा पुन्हा relation ठेवायची इच्छा राहिलेली नसते. कटुतेमुळे नसेलही ... निव्वळ तो लाईफमध्ये move on झाल्याने असेल. त्याच्या अंध असण्यासारखे वागण्याचे मुळातले कारण त्याची कला असते त्यामुळे मधल्या घटनांचा व त्याचे अंधाचे नाटक बंद करण्याचा संबंध नाही. घटना घडत असताना त्याच्या खोट्या अंधपणामुळेच तो वाचतो (त्याच्या हातून स्वसंरक्षणार्थदेखील कुठलाही गुन्हा न घडता) हा तेवढ्यापुरता संबंध त्या घटना संपताच संपतो पण मूळ उद्देश वेगळा असल्याने तो ते लाईफ सुरू ठेवतो.

आकाशला अंधत्व पेढा खाऊन येत नाही. तो फक्त बेशुद्ध होतो.

>>>> करेक्ट. त्याला सिमी अंध बनवते. ती बोलतेही नेट्पे बहुत तरीके मिलेंगे.

आकाशला अंधत्व पेढा खाऊन येत नाही. तो फक्त बेशुद्ध होतो.>>> ह्म्म. म्हणूनच मी 'किंवा' असं शक्यतादर्शक लिहिलं. सिमीने त्याला अंध बनवायचा प्रयत्न जरूर केला पण यशस्वी झाली नाही. तो बेडमधून उठून बाथरूममध्ये जातो तेव्हा पाण्यात चेहरा बुडवल्यासारखा काहितरी शॉट आहे. त्या पाण्याने त्याच्या डोळ्यात तिने जे काही केलं असेल त्याचा effect तो अंध व्हायच्या आधीच गेला असेल.

Organs चोरून विकण्याच्या प्रयत्नात तिच्या नवऱ्याचेच

>>>>> तो तिचा नवरा असतो का?
मला वाटलं होत कि रिक्षावाल्याबद्दल विचारताहेत डॉक्टर तिला

ओह! भाऊ. कुणी खूप जवळचा आहे की ज्याच्यापुढे इतके पैसेही तिला कस्पटासमान आहेत हे कळलं. त्या दोघांनीही काम झकास केलंय.

एवढं कळतं हो मला Proud . कागद आहेत ते आपल्याला दिसतं स्क्रीनवर. पण तिला ती बॅग उघडायच्या आधी ते पैसेच वाटतात ना? भावाला वाचवायला ती तेच देवू पाहाते. मनोहरने फसवून त्यात कोरे कागद भरलेले असतात.

रिक्षावाला तिचा बॉयफ्रेंड दाखवला आहे.
आणि सिमीला आकाशला मिठाई खाऊ घालून अंधच करायचे असते, बहुधा नेम चुकतो/किंवा बसतो, किंवा तो खरंच अंध होतो पण तात्पुरता.
कारण सिमी सांगून मिठाई देत नाही (की याने तु आंधळा होशिल) दुसरी गोष्ट आकाश मिठाई खाल्ल्यावर सांगतो मला काही दिसत नाही तु मिठाईत काय घातलेस, तिसरी गोष्ट इन्स्पेक्टर बॉयफ्रेंड जेव्हा सिमिला विचारतो की तु त्याला नेमकं आंधळं कसं केलंस तेव्हा सांगते की नेट पर हजारो तरिके मिल जायेंगे.

दुसरी गोष्ट आकाश मिठाई खाल्ल्यावर सांगतो मला काही दिसत नाही तु मिठाईत काय घातलेस>>> मला दिसत नाही हे तेव्हा म्हणत नाही बहुतेक... मिठाई खाल्ल्यावर त्याला चक्कर येऊन तो कोसळतो. त्यानंतर शुद्धीवर आल्यावर त्याला दिसत नसल्याचे तो बोलतो आणि बाथरुम मधे धडपडत जाऊन डोळ्यावर पाणी मारतो.

अशी ओपन टू इंटरप्रिटेशन गोष्ट असणे हा मार्केटिंग चा एक भाग आहे. त्यामुळे लोक डिसकस करतात. त्याने पब्लिसिटी जास्त होते. फियर ऑफ मिसिंग होऊन ज्यांनी पहिला नाही ते लोक जाऊन पाहतात. बाकी बॉलीवूड च्या मानाने मूवी फारच चांगला आहे. आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता असा मूवी आवडणारे लोक पण वाढत आहेत असा दिसतंय.

एकदम मस्त आणि खिळवून ठेवणारा चित्रपट. आजकाल तंत्रज्ञानाचा चमत्कार, स्पेशल इफेक्ट्स, ठसठशीत व्हिज्युअल्स, अभिनेत्यांचे वलय, चकाचक सिनेमॅटोग्राफी इत्यादी गोष्टींवर चित्रपट चालतात. बाकी सिनेमाचा मूळ उद्देश्य "व्हिज्युअल माध्यमाचा प्रभावी वापर करून एक चांगली गोष्ट सांगणे" हा अभावानेच आढळतो. कारण मुळात विविध नाट्यमय वळणे घेणारी कथाच आजकाल अभावाने आढळते. त्यामुळे आपसूकच तंत्रज्ञान आणि बाकीच्या गोष्टीनाच महत्व येत आहे. अन्नापेक्षा मसालाच खायला लोक येतात.

म्हणून किमान माझ्या दृष्टीने तरी "कथा, स्क्रिप्ट आणि अभिनय" हाच ज्याचा पाया आहे असेच चित्रपट पाहायला छान वाटतात. त्या दृष्टीने पिंक, पिकू यासारख्या चित्रपटांनंतर खूप कालावधीनंतर एक चांगला चित्रपट पाहायला मिळाला.

Pages