अंधाधुन - *** इथे स्पॉयलर्स असतील***

Submitted by maitreyee on 13 October, 2018 - 10:58

'अंधाधुन'पाहिला काल.
मला आवडला. एक प्रेडिक्टेबल नसलेला स्मार्ट थ्रिलर + डार्क कॉमेडी बघितल्याची मजा आली.
आयुष्मान चे सिनेमे बहुतेक आवडतात. तब्बू हे सरप्राइज होतं माझ्यासाठी. ती दिसलीय सुरेख आणि काम पण जबरी केले आहे. तिला रोल पण भारी मिळाला आहे.
लूपहोल्स यातही आहेत काही. काही गोष्टी प्रेक्षकांना इंटरप्रेट करायला सोडलेल्या आहेत. त्यावर गप्पा मारायला हा धागा. कोणी काढला नाही म्हणून मीच काढला Happy शीर्षकातच सावधगिरीचा इशारा दिलेला आहे त्यामुळे इथे स्पॉयलर आले तरी हरकत नसावी.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

दक्षिणा, मिठाई खाउन तो फक्त चक्कर येऊन पडतो. नंतर सिमी काहीतरी करते. मला तर असे वाटते तो सीन कट केलाय किंवा मुद्दाम अर्धवट ठेवलाय. ऑब्व्हियसली, लोकांचे डोळे कसे घालवावे ह्याचे प्रात्यक्षिक ते सिनेमात दाखवू शकत नाहीत. दाखवले नाही हे बरे. त्या माहितीचा उपयोग कोणा कसा करेल काय माहीत.

अत्यंत सुंदर बनवलेला चित्रपट.
आधी कुठेही काहीही वाचलं न्हवतं, आत्ता बघुन झाल्यावर मायबोली आणि रेडिट वरचे अ‍ॅनॅलिसिस वाचतोय.
चित्रपट बघून झाल्यावर काय वाटलं: शेवटी आकाश कोक कॅनला डोळस उडवतो. सो तो आत्ता आंधळा नक्की नाही. म्हणजे मग तो मध्यंतरी आंधळा झालेला का न्हवता झाला? नक्कीच झाला असावा. कारण त्याला मारायच्या अनेक प्रयत्नातून तो बॉर्डरलाईन वाचतो, दणकट पोलीस गळफास लावायचा प्रयत्न करतो, स्वामी मावशी ऑपरेशन टेबलवर उताणा करुन इंजेक्शन देतात आणि हा गोंदलेल्या शंकरा बद्दल बोलतो आणि त्यांना उपरती होते, तब्बू आणि हा बांधलेले असताना तब्बू जवळजवळ मारते... यातील कुठल्याही प्रसंगात तो नक्कीच मेला असता. त्याला दिसत असतं तर तो यातून थोडा स्मार्टली सुटला असता.
(इंटरनेटवर जे तो आंधळा झालाच न्हवता किंवा एकाच डोळ्याने झालेला असे तर्क लावतायत आणि सपोर्ट करायला एक डोळ्याचा ससा, डोळे मारणारी ऐश्वर्या ह्या हिंट म्हणतायत त्यात तथ्य वाटत नाही )

सो तो आंधळा झालेला हे नक्की मानलं तर याला नक्की डोळे आले कधी? आणि हा युरोपात कसा आला? मित्राने काही केलं इ. हे नक्कीच झूट आहे कारण याला कोणी मित्र नाहीत सगेसोयरे नाहीत. तब्बूने ट्रंक मध्ये हालचाल केल्यावर स्वामी इंजेक्शन घेउन बाहेर जातो तेव्हा स्वामीलाच तब्बू मारते हे त्यावेळीच फार्फेच्ड वाटलेलं. जखमी, बारक्या स्पेस मध्ये कन्स्त्रेन्ड व्यक्ती धडधाकट त्यातही मेडिकेशन तयार असेल्या डॉक्टरला खतम करू शकते ही तेव्हा सिनेमॅटिक लिबर्टीची परिसीमा वाटलेली. पण दाखवताना तर तब्बू ड्राईव्ह करुन याला वाटेत सोडते.. .पण.. मिडीआ मध्ये तब्बू मेलेली आहे, जगासाठी तब्बू मेलेली आहे, राधिका आपटे साठीही मेलेली आहे. जी पाण्यात पडून मेली ती परत जळून कशी मरेल? आणि जर आधी मेली न्हवती आणि आत्ता मेली तर त्याची स्टोरी होईल ना? ती स्टोरी जगाला माहित असेल ना? त्यामुळे ह्या पार्ट मध्ये काही तरी गोंधळ नक्कीच आहे.

ससा आला ते याला आंधळा असून कसं कळलं हा प्रश्न मला पडला नाही कारण जर मिडिआ स्टोरी झाली असेल तर याला समजेलच. पण मिडिआ स्टोरी झाली नाही कारण राधिका आपटेला माहित नाही. म्हणजे हा प्रसंग घडलाच नाही. स्वामी आणि आकाश पुणे मुंबई लांब सडक रस्त्यावर जात आणि जात आणि जात आहेत हे का परत परत दाखवताहेत हे बघताना वाटलेलं पण आत्ता रेडिटवर कोणी लिहिलंय ते झाड आणि एकदा तिकडे गाडी थांबते आणि एकदा थांबत नाही हे तेव्हा नोटिस झालं न्हवतं. ती थेअरी एक्दम चपखल बसते. सगळा मूव्ही खरा आहे एक्सेप्ट झाडाशी कार थांबते, स्वामी मरतो, सिमी गाडी चालवते, हा उतरतो आणि सिमी सशाच्या गन शॉट च्या गोंधळात मरते आणि हा युरोपात येतो.
प्रत्यक्षात स्वामी आणि हा लिव्हर विकतात, लिव्हर गेली की लाईफ संपते (अ‍ॅज पर कोट) याला मेलेल्या व्यक्तीचे करोना मिळतात, आणि गडगंज पैसे, हा युरोपात येतो.

शेवटी आंधळेपणाचं नाटक का करतोय ? हे तर नक्कीच क्लीअर आहे. तो आंधळेपणाचे काय काय फायदे असतात तेच तर मूव्ही भर आपल्याला सांगतोय. एका प्रभात रोडच्या सीनमध्ये आपटे बाईना सांगत असतो जसे ५०० रुपयात घर.. आणि तो संवाद अधुरा आहे आणखी फायदे आहेत हे आपल्याला जाणवतं पण ते स्पष्टपणे पुढे येत नाहीत. युरोपात सगळ्या मुली याच्या मागेपुढे करत असतात, हा बेड मध्ये कसा आहे हे मुलींना सांगत असतो सो हाच सगळ्यात मोठा फायदा आहे हेच अधोरेखित होतं. नाटक का करतोय हे नक्की उघड आहे.

राधिका आपटे पुण्यात ठीक दिसते पण शेवटी भयाण दिसली आहे. अशक्य मेकप आणि दिसणे.
तब्बू बेस्ट दिसली आहे आणि काम पण मस्त.
आयुश्यमान खुराणा पण आवडला. मावशी, काळसेकर रोल एक्दम लक्षात राहिले. मस्त काम आणि लिहिलेले आणि डिलिवर केलेले संवाद.
चित्रपतभर संवाद एक्दम नर्मविनोदी आहेत. संवाद परत ऐकायला ऑनलाईन आला की नक्की बघणारे मी. एक लक्षात राहिलेला संवाद.
तब्बूला आकाश, मावशी आणि तो पंटर डोळे बांधून आणतात आणि स्वामीला जेव्हा इंट्रोड्यूस केलंय तेव्हा तो तिचं रक्त काढतो. तेव्हा ती उर्मट पणे "हा कोण?" असं खेकसते. मावशी म्हणते "हे डॉ स्वामी" तेव्हा तब्बू लगेच "ओह्ह स्वामी 'जी'" म्हणते.
असे गमतीशीर अनेक अनेक पंचेस आहेत. जाम हसायला येत होतं संवादांवर.
वेळाची कसरत करुन बघायला मिळालेला मूव्ही आणि टोटल पैसे वसूल. मजा आली.

@ अमितव ..छान पोस्ट..मला असं नेमक्या शब्दात मांडता आलं नाही..
तब्बूच्या म्रुत्युची बातमी मिडीयात आली असती..हे अगदी बरोबर आहे..जर ती अगोदरच मेली आहे तर परत कशी मरेल?

तब्बूच्या म्रुत्युची बातमी मिडीयात आली असती..हे अगदी बरोबर आहे..जर ती अगोदरच मेली आहे तर परत कशी मरेल? >>>>

तब्बू पहिल्यांदा मेल्याची बातमी मिडियामधे आहे, तेव्हा तिची बॉडी शोधायचा प्रयत्न करतात, पण ती प्रत्यक्षात कुठे मेलेली असते. तिला मावशी, इस्माईल आणि आकाश डॉ. कडे घेउन जातात. आणि जायच्या आधी तिच्या गाडीची विल्हेवाट लावयाला म्हणून ती त्या पुलावरुन खाली टाकून देतात.

माझा गेस म्हणजे आकाशला सिमीची मुलगी म्हणजे दिना मदत करत असेल तिकडे जायला.

आकाशला सिमीची मुलगी म्हणजे दिना मदत करत असेल >>> ह्म्म असे बर्‍याच लोकांनी लिहिलेय. पण ते खूपच हवेतले इंटरप्रिटेशन वाटते Happy कारण त्या गेस ला काही आधारच नाही. म्हणजे लीव्हर विकणे या गोष्टीची हिंट तरी आहे. पण त्या दिनाबद्दल तसे काहीच दाखवलेले नाही. ( अर्थात मग तिच्या कॅरेक्टर ला अर्थ काय असाही एक प्रश्न आहेच. )

फिक्शन आहे ना? का क्राईम्पेट्रोल चा एपिसोड आहे? कहि लोकांचे म्हणजे ना अगदि काहीही सुरु असते.

नवीन Submitted by मेघपाल on 18 October, 2018 - 04:22 >>>>>>>>>>>> हो .... बा ल कि खाल

पण त्या दिनाबद्दल तसे काहीच दाखवलेले नाही. ( अर्थात मग तिच्या कॅरेक्टर ला अर्थ काय असाही एक प्रश्न आहेच. )>> पण मग आकाश तिच्या घरी कशाला जातो, जर सिमी त्याच्या मागावर आहे हे त्याला महिती असते तरी.. दिनाला कुठेच पुढे आणले नाहीये, त्यामुळे ते कॅरॅक्टर अगदीच विस्कळीत वाटते... आणि तो सीन पण बसत नाही मग स्टोरीच्या लाईन मध्ये

Udyach ticket kadhlela ahe ..tyamule ata manavr taaba theun kontyahi pratikriya kiva ya chitrapatachi kahani atach ulagadel..ase kahihi vachne talat ahe..
udya yach dhagyavr mazi pratikiriya asel chitrapat pahun zalya nantr chi...:)

चित्रपट आणि त्याचे तर्क ह्यावर सगळे बोलत आहेत, पण ह्या मूवीतील गाणे एकसेएक आहेत. नैनो का क्या कसूर तर जबरीच. (आयुष्यमान चे unplugged version बघा काय मस्त थिम घेऊन गाणं केलं आहे https://www.youtube.com/watch?v=NX19taLxY4E)

अमित त्रिवेदी ने जबरदस्त मुसिक केलाय आणि अरिजित चा आवाज तर मस्तच. आयुष्यमान स्वतः एक सिंगर असल्यामुळे जबरी गणित जुळून आलाय.

नैना दा क्या कसूर अमित त्रिवेदी ने स्वतः म्हंटलं आहे. जबरदस्त कॅची ट्युन आहे त्याची Happy

हो हो. म्युझिकवर लिहायचं राहिलं. सॉरी. अप्रतिम पियानो पीसेस आणि आवाजाचा फ्लो. वेगवेगळ्या दृष्टांत घटना घडत जातात, आणि संगीत / मेलडी त्याच वेगाने बदलत फ्लो होत रहाते हे बघणं आणि ऐकणं हे निव्वळ लाजवाब आहे.
की बोर्ड वाजवणारा हाताच्या हालाचाली आणि वाजणारे स्वर याचा आयुष्यमानने सुंदर मिलाफ घडवला आहे. कुठेही acting वाटत नाही.

पण पियानो वाजवताना अखंड शॉट्स खूपच कमी आहेत. त्यामुळे पियानो वरचे सफाईदार हात दुसर्‍याचे असावेत असं वाटलं.
पियानो मात्र लाजवाब!

संगीत / मेलडी त्याच वेगाने बदलत फ्लो होत रहाते हे बघणं आणि ऐकणं हे निव्वळ लाजवाब आहे.
की बोर्ड वाजवणारा हाताच्या हालाचाली आणि वाजणारे स्वर याचा आयुष्यमानने सुंदर मिलाफ घडवला आहे. कुठेही acting वाटत नाही.>>+१
या रोल साठी शिकला असेल तर मस्तच.. नवखा वाटला नाही.

कालच पाहिला. मध्यंतरापर्यंत महाप्रचंड आवडला. मध्यंतरानंतर तो आंधळा होईतोवर मस्त होता पण किडनीच्या प्रसंगापासुन पकड कमी झाली त्याचे वाईट वाटले. राधिका आपटे आपटे खुपखुप आवडतेच. आयुश्मान पण आवडतो पण तब्बुही आवडली यात. इतर कलाकार पण आवडले. खुप दिवसानी मस्त काहीतरी मोठ्या पडद्यावर पाहुन फार बरं वाटलं.

मला तर सगळच खोट वाटल .. राधिका आपटे आयुश्यमानच्या घरी येते. तिथे तिला तब्बु दिसते नको त्या कपड्यात.. नंतर तर ती त्याच्या आयुष्यातून निघूनच जाते. मला तर सगळीच नंतरची आयुश्यमानची मनघडन कथा वाटली. कारण तो राधिकालाच स्टोरी सांगत असतो ती. तो कधीच आंधळा होत नाही आणि कायम डोळसच असतो.

मी पण विकेंडला पाहिला. भन्नाट आहे. आवडलाच. आत्ता हा सगळा धागा वाचला.
काय उगाच कीस पाडतात लोकं अशा रिअ‍ॅक्शनने सुरुवात होउन, अमितवने लिहिलेली थियरी लाइकली वाततेय हां, इथवर आले आहे Wink

म्युझिक भारी आहे एकदम. किती दिवसांनी सिनेमा बघून अशी मजा आली.

मध्यंतरापुर्वी प्रचंड पोटेन्शीयल असलेला सिनेमा नंतर तितकाच प्रचंड गंडला असं वाटलं. ह्या वर लिहिलेल्या सगळ्या थियर्‍या जर-तर स्वरुपाच्या आहेत. दिग्दर्शक काहीच सांगत नाही convincingly. एक निरर्थक सिनेमा वाटला किंवा मला अजिबात कळला नाही.

स्वपनांची राणी. तुम्हाला कळला नाही असे नव्हे. तुम्ही तो पारंपरिक पद्धतीने पाहिला म्हणून गोंधळल्या सारखे वाटले. एरवी रहस्य चित्रपट ' संत्रे सोलून ' देतात. म्हनजे स्वतःच रहस्याचा फॅक्चुअल उलगडा करून देतात. यात काय झाले असावे हे प्रेक्षकावर सोडले आहे. त्याने ते इम्प्रोवाइज करावे. वेगवेगळ्या शक्यता गृहीत धरून. त्यातली कोणती बरोबर हेही तो सुचवत नाही. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परिने घटनाक्रमाचा अर्थ लावतो. हा एका अर्थाने खेळ आहे. तो ही चित्रपट पाहून संपल्यावर. अन्यथा रहस्योद्घाटन झाल्यावर आपण आपले थिएतर मधून सुटकेचा निश्वास टाकतो. आणि आपापल्या कामाला लागतो. हा चित्रपट तुमचा मानसिक पाठलाग करतो हा एक एन्जॉएबल खेळ आहे.

ज्यांना दुसऱ्यांदा पहायचा आहे किंवा इथल्या चर्चा वाचल्यावर काही प्रसंग पुन्हा पहायचे आहेत, अशांसाठी ही माहिती - सिनेमा नेटफ्लिक्सवर आला आहे.

काल बघायचा प्रयत्न केला नेटफ्लिक्सवर, पण समहाऊ दुसर्‍यांदा बघताना बोअर झाला मला.

>>अंधाधुन नेफ्लिवर आलाय अशी मेल कालच आल्येय.>> मला वाटलं अंधाधुनवाल्यांनी मेल केली अमितला Wink
मी दुसर्‍यांदा बघणार नाही. दोनदा बघण्याइतका मला तो कॅची वाटला नाही. वन टाईम वॉच फॉर मी.

दुसर्‍यांदा बघताना बोअर झाला मला >>>> तुम्ही आधीच मनाची तयारी केली होती दुसर्‍यांदा आवडणार नाही म्हणून असं झालं Wink

Pages