डोक्यात भरपूर सॅलड रेसीपीजचे कडबोळे करून शेवटी शेतातून ताज्या आलेल्या शेंगा दिसल्यावर त्याच उचलल्या. स्पर्धेसाठी फारच लिंबूटिंबू (नाही नाही 'त्यांची' नाही, माझीच!) एन्ट्री आहे. तरी म्हटलं आपल्या देशी, घरगुती वस्तू वापरून काय तयार होतं पाहू. (तसेही सध्या स्वदेशी बाबा 'इन थिंग' आहेत!) नावात जरा घरगुती वगैरे शब्द टाकले की जरा दवणीय कामपण साधून जातं
तर हे साहित्य:
तीन कोवळया करकरीत लहान काकड्या
दोन लाल पिकलेले टोमॅटो
एक लहान कांदा
एक हिरवी ढब्बू मिरची
मूठभर सोललेले ओले शेंगदाणे (शेंगा खायच्या तर सालं उचललीच पाहिजे!)
मूठभर चणाडाळ (दोन- तीन तास भिजवलेली)
काही डहाळ्या कोथिंबीर आणि पुदिना
ड्रेसिंगसाठी: (फोटो काढायचा राहिला)
एक मोठी वाटी दही
चिमूटभर जिरेपूड
चिमूटभर सैंधव किंवा मीठ
चिमूटभर लाल तिखट
आणि कृती:
१. शेंगा सोलून दाणे काढले. चणाडाळ भिजवून ठेवली.
२. दही स्टीलच्या गाळण्यात ठेवले, म्हणजे जास्तीचे पाणी निघून जाऊन क्रिमी दही शिल्लक राहील.
३. आता चिराचिरी सुरू! काकडीच्या चकत्या केल्या, ढब्बू मिरचीचे जुलियन्स केले. कांद्याच्या चकत्या करून रिंग्स सोडवून घेतल्या. टोमॅटोचे चौकोनी तुकडे केले. दाणेही अर्धे चिरून घेतले. कोथिंबीर बारीक चिरली आणि पुदिन्याची पाने हाताने फाडली.
४. वाटीत ड्रेसिंगचे साहित्य घेऊन काट्याने नीट ढवळून एकत्र केले.
ड्रेसिंग घालण्यापूर्वी.
५. एका वाडग्यात सगळे चिरलेले साहित्य हळुवार एकत्र ढवळून, सॅलड सर्व्ह करायच्या बोलमध्ये काढले. वर ड्रेसिंग ओतून पसरले.
तयार!
सॅलड घरगुती आहे, चुलीवरचे नाही
आमच्याकडे नटी आणि मिंटी नावाचे कोणीही नमुने नाहीत.
चिमूटभर साखर टाळली आहे!
ड्रेसिंग आयत्या वेळी घाला. आधीच मिसळून ठेवले तर घरगुती सॅलड घरगुती पनीरसारखे दिसेल
टिपा: १. सॅलड दोन व्यक्तींना पुरेसे आहे.
२. बरोबर एखादा व्हाईट वाईनचा ग्लास असेल तर लै भारी!
मस्त सॅलड मेग.
मस्त सॅलड मेग.
दही घातलेली सॅलड मला आवडतात.
मला कोशिंबीर वाटतेय. आम्ही
मला कोशिंबीर वाटतेय. आम्ही करतो अशीच मटण केले असेल तर. चणाडाळ आणि शेंगदाणे नाही घालत फक्त. कांदा टाकतो पातळ लांब चिरून.
वाह मस्त आहे. लिहिलंयही छान
वाह मस्त आहे. लिहिलंयही छान.
लिहिलय छान. सलाडही झकास!
लिहिलय छान. सलाडही झकास!
आमच्या आवाक्यातलं ... दाणे
आमच्या आवाक्यातलं ... दाणे चिरण्याचे कष्ट नाही घेणार आणि अजून पौष्टिक करीन चण्याडाळी ऐवजी स्प्राउट्स घालून...
नक्की खरेखुरे सॅलड करून
नक्की खरेखुरे सॅलड करून त्याचे फोटो काढले आहेत ना? का नेहमीप्रमाणे अप्रतीम कलाकारी केली आहे?
ओले शेंगदाणे घालून सॅलडची कल्पना आवडलेली आहे. करून खाण्यात येइल.
मस्त.मी यातले कच्चे कांदे
मस्त.मी यातले कच्चे कांदे वगळून हे सर्व करून पाहेन.
बाय द वे नाव खूप आवडलंय.
छान आहे सॅलड.
छान आहे सॅलड.
मी अशी कोशिंबीर करते. चणा डाळ आणि शेंगदाणे वगळुन
झंपीने म्हणल्याप्रमाणे मट्ण असेल तेव्हा करतेच.
चणा डाळ कच्ची खायचीय?
सगळ्यांना धन्यवाद.
सगळ्यांना धन्यवाद.
माधव, खरंखुरंच केलंय सॅलड
सस्मित, हो कच्ची डाळच आहे. भिजवल्यामुळे मऊ असते, आपण वाटली डाळ वगैरेमध्ये खातो ना कच्ची डाळ. प्रोटीन आणि फायबरसाठी घेतली आहे यात.
मस्त!
मस्त!
मस्त दिसतय मॅगी! रंगीबेरंगी!!
मस्त दिसतय मॅगी! रंगीबेरंगी!! आवडलं.
सुपर दिसतंय सॅलड! मस्त
सुपर दिसतंय सॅलड! मस्त रेसिपी.
मस्त सॅलड.
मस्त सॅलड.
छान दिसतेय सॅलेड. ओल्या शेंगा
छान दिसतेय सॅलेड. ओल्या शेंगा मिळणं अवघड आहे. दाण्याशिवायच करून बघावे लागेल.
अल्पना, मग कच्चे शेंगदाणे (न
अल्पना, मग कच्चे शेंगदाणे (न भाजलेले) भिजवून घेतले तरी चालतील. शक्यतो स्कीप करु नको.
कलर का पैसा माल फुकट.
कलर का पैसा माल फुकट.
४ रंग हवेत ना?
ओके. तसं करून बघते.
ओके. तसं करून बघते.
आरारा, मी हे सॅलड करत होते
आरारा, मी हे सॅलड करत होते तोपर्यंत मला नियमांच्या धाग्याची लिंक सापडली नव्हती. शेवटी आज धागा दिसला तर बरोबर बसत आहेत घटक. कमीत कमी तीन रंग म्हटलेत तेवढे आहेत. लाल, हिरवा आणि पांढरा.
ओह. माझ्या डोक्यात ४ होते.
ओह. माझ्या डोक्यात ४ होते. क्षमस्व!
पिवळा पण आहे की, छान लागेल हे
पिवळा पण आहे की, छान लागेल हे.
मस्तं
मस्तं
wow....
wow....
slurrrrrrrrrrr.........rp
धन्यवाद आरारा, राया, जाई आणि
धन्यवाद रावी, मामो, मामी, स्वाती, अल्पना, आरारा, राया, जाई आणि शशांकदा.
ओल्या शेंगदाण्याची आयडिया
ओल्या शेंगदाण्याची आयडिया आवडली.
करून पाहण्यात येईल
नाव , लेखन आणि एण्ड प्रॉडक्ट,
नाव , लेखन आणि एण्ड प्रॉडक्ट, तिन्ही मस्त.
छान सलाद, लिहीलंय छान.
छान सलाद, लिहीलंय छान.
आमच्याकडे नटी आणि मिंटी नावाचे कोणीही नमुने नाहीत.>> मग मिंटी नावाची आवडती नटी आहे का कोणी?
मस्तच रेसिपी.
मस्तच रेसिपी.
(No subject)
धन्यवाद संयोजक!
धन्यवाद संयोजक!