माह्या भैताड नवर्‍याची दुसरी (कि तिसरी ) बायको- ३

Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13

दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च

तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सौमित्र आणि सरिता यांच्यात ओव्हरअ‍ॅक्टिंगची स्पर्धा सुरू आहे. >>>>> आ, हा सौमित्र आहेच का अजून सिरियलमध्ये? मला वाटल, जस्ट पाहुणा कलाकार असेल . तो कधीपासून ओव्हरअ‍ॅक्टिंग करायला लागला? Uhoh

हि सरीता कोण? नवीन पात्र आहे का?

सौमित्र आणि राधिकाचं जुळवायला हवं असं मालिकेतल्या पात्रांना वाटू लागलंय. >>>>> चला बर झाल, राधिकाच्या सासूबैन्ना वाटत का अस ?

सौमित्र आल्यापासून (म्हणजे मी पाहतोय तेव्हापासून तरी) ओव्हर अ‍ॅक्टिंगच करतोय
सरिता म्हणजे राधिकाची सासू.
सौ रा जोडी जमवावी असं महाजनी आणि राधिकाच्या सासर्‍यांना वाटतंय. आनंदलाही वाटतंय.

चला बर झाल, राधिकाच्या सासूबैन्ना वाटत का अस ? >>>> हे वाक्य एकदम राधाक्काच्या साबांच्या style ने वाचलं मी. शेवटी 'असं?' अधांतरी ठेवतं

चला . डायव्होर्स केसची तारीख पडली. सासूबाईंच्या डोक्यावर आभाळ कोसळलं आणि पायाखालची जमीनही सरकली.
अर्थात मालिका लांबवायचीच असेल तर गुरू यातूनही पतली गलीसे निकल जाएगा.

सरिता म्हणजे राधिकाची सासू. >>>>>> ओहो, सासूबैच नाव सरिता आहे तर. धन्स भरत Happy

सौ रा जोडी जमवावी असं महाजनी आणि राधिकाच्या सासर्‍यांना वाटतंय. आनंदलाही वाटतंय. >>>>> वाटलच मला. सासूबैन्ना 'माहया गुरु माहया गुरुच आता काय होणार' करतील आता.

हे वाक्य एकदम राधाक्काच्या साबांच्या style ने वाचलं मी. शेवटी 'असं?' अधांतरी ठेवतं >>>>>> Lol

Happy पडली का डायव्होर्स ची तारीख?
आता पुन्हा ते चोख पाठांतर केलेले वकील लोक पाहणं आलं...!!!
अरे राम!
स्लीव्ह लेस मधली, केस भुरुभुरू उडणारी राधिका, रेवती, निगरगट्ट गुरव, आणि कोर्ट सीन्स...!!!

बहुतेक आवरायला सुरुवात केलीय किंवा नवा track आणतील.. मावशी लंडनला चालली.
शनायाची हकालपट्टी होणार. डायव्होर्स व्हायचा नाही. ज्योतिषाने सांगितलं.
आपलं आणि शनायाचं गूळपीठ गुरूला कळल्यावर तो काहीतरी डाव टाकेल हे कळण्याची अक्कल राधिकाला नाही. वर ती स्वतःच शनायाला , सावध रहा असा दम देतेय.

गुरु शनायाला जेव्हा जेव्हा ' आता आपल ब्रेकअप' अस खडसावून सान्गतो तेव्हा प्रत्येकवेळी (जुनी शनाया आणि नवीन शनाया दोघीन्नाही) शनायाला हर्ट होताना दाखवलय. जस काय तिच खरच प्रेम होत गुरुवावर. खर तर तिच्यासारख्या मुलीने 'तु नही तो कोई ओर सही. अरे हट! तुझ्यासारखे छपन्न गुरु माझ्या मागे लागलेयत.' असा अ‍ॅटीटयुड दाखवायला हवा होता त्याला.

अहो रस्त्यात 10 दिवस एक दगड दिसत असेल आणि 11 व्या दिवशी दिसला नाही तरी आपल्याला वाटत राहते की अरे दगड कुठे गेला.
शनया मुलगी आहे, इतके दिवस टाइम स्पेन्ड केलाय, तिचे मनही गुंतले असेलच की.

अगदीच टुकार अभिनय, संहिता, संवाद...सगळंच!
ही नवी शनाया तर एकदमच नाटकी वागते बोलते.....
अतिच कृत्रिम! काय ते कपडे, काय ते डोळे गरागरा फिरविणं, अस्ताव्यस्त बटा.....
गुरु पण कावलेला दाखविलाय!

Happy

हो "इश्काची नौका" त्याचं (थोडं की एका गाण्याचं) शूटींग आमच्या रत्नागिरीत झालंय. Happy

भरत. तुम्ही पण ही सिरियल बघता अजूनही??

मी त्या डिवोर्सच्या महाएपिसोडपासून बघायला सुरुवात केलेली. पण नंतर त्याचं काहीच दाखवलं नाही. मग वैतागून आठवड्याभरातच बघणं सोडलं.

मन गुंतल्यापेक्षा स्वतःला डंप केलं जाण्याचं दु:ख जास्त असेल. >>>>>>. खरतर दु:ख होण्याऐवजी राग यायला हवा होता तिला. हि तर बदला घेण्याऐवजी येडपटपणा करते दिवसेदिवस. Biggrin

अहो रस्त्यात 10 दिवस एक दगड दिसत असेल आणि 11 व्या दिवशी दिसला नाही तरी आपल्याला वाटत राहते की अरे दगड कुठे गेला. शनया मुलगी आहे, इतके दिवस टाइम स्पेन्ड केलाय, तिचे मनही गुंतले असेलच की. >>>>>>>>> गुरुला दगड म्हणणे म्हणजे दगडाचा अपमान असेल. गुरु तर दगडापेक्षाही गया गुजरा आहे.

बादवे, गॅट- मॅट नावाचा नवा मराठी पिक्चर आलाय. त्यात रसिकाबरोबर तुपारे ची सॉनया सुद्दा आहे. Happy

दोन नवीन पात्रं आलीत.
शनायाची ममा ( एफजीपी) आणि गुरूचा नवा वकील.
किशोरी अंबिये आणि अशोक समेळ..

किशोरी अंबिये....-----------हॉरिबल! महा बोअर आहे बया!
आणि त्यातून ती शनायाची मम्मा......!! तिला काही चार गोष्टी सांगायच्या सोडून तिलाच प्रोत्साहन देत्येय.

<<शनायाची ममा ( एफजीपी) आणि गुरूचा नवा वकील.
किशोरी अंबिये आणि अशोक समेळ.<<<
अरारा... म्हण्जे आता खुप 'भवति न भवति' होणार आणि एकदाचे फायनली गुरोर्धिका सेपरेट होणार.

होप फुली! Happy

गुरु माय तर अजूनही ऑप्टीमिस्टीक आहे की माह्या मुलाचं अन सुनेचं पॅच अप होईल नं बापा....!!
कैच्याकैच!
दर वेळीस तिला हाय बी पी चा झटका येतो व यांचे डिव्होर्स प्रकर्ण लांबणीवर पडते. राधिका पुन्हा एकदा नरमते व प्रेक्षकांची पुन्हा फरपट होते!
Angry

किशोरी अंबिये....-----------हॉरिबल! महा बोअर आहे बया!
आणि त्यातून ती शनायाची मम्मा......!! तिला काही चार गोष्टी सांगायच्या सोडून तिलाच प्रोत्साहन देत्येय. >>>>>> मला किशोरी अंबिये... हे नाव वाचल्यावर असच वाटलेल. सध्या सिरियल बघत नाही तेच बर आहे.

अशोक समेळ राधिकाचे वकील असायला हवे होते.

ते शनु बेबी म्म्म्म्म्म्माआ म्वा म्वा इतके इरिटेटिंग आहे. त्यात ती मम्मा पुण्याची आहे म्हणून मला जास्त वैताग येतो रॅदर सात्विक संताप.

येस..... त्यांचं ते शनु बेबी --- म्वाs म्वाss पाहून मी एका फटक्यात चॅनेल बंद केलं...!! महा बोरींग...कुठच्या कुठे चाललेली सिरीयल!

अत्यंत घाण आणि समाज मानसिकतेला घातकपणे तेलपाणी घालणारी सिरियल आहे ही. बघायची बंद केली होती पण परवा चुकून डोळ्यासमोर एक एपिसोड आला आणि झी ची किव पण करावी वाटली नाही. दर्जाहिन अगदी.

Pages