माह्या भैताड नवर्‍याची दुसरी (कि तिसरी ) बायको- ३

Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13

दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च

तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सौमित्रची मैत्रीण आलीये माया नावाची. सध्या तरी मैत्रीणच आहे. तिला राधिका फोटोवरुन काकूबाई वाटते.

नवीन Submitted by सूलू_८२ on 25 January, 2020 - 07:25>>>>

म्हणजे आता माझ्या दुसऱ्या नवऱ्याची बायको. राधिकाच्या लाईफमधून सवंतीचा त्रास काही जात नाही बा.

आता माया व गुरवाची जोडी लावणार आहेत!
Biggrin
केड्याचं डोकं कसं चालेल नेम नाही!
केड्या स्वतः चड्डी बनियन विकतो आहे आता!
प्रत्यक्षातही बहुतेक तीच वेळ येणार असं दिसतंय इतकं भंगार लेखन केल्यावर!

प्रत्यक्षातही बहुतेक तीच वेळ येणार असं दिसतंय इतकं भंगार लेखन केल्यावर! >>> कसलं काय, भंगार लेखन करुन झीने टॉपवर ठेवलंय त्याला, मालिका संपता संपेना. केड्याची सर्व बोटं तुपात आहेत.

राधिकाची कंपनी त्याच्याशी टाय अप करायला फ्लोरिडा हून प्रतेक्ष माणूस येतो. जे काम इमेल वर होउ शकले असते. बर तो नैतिकली ठीक नाही म्हणून ही डील नाकारते. हे म्हणजे एलॉन मस्क वीड स्मोक करतो म्हणून मी टेस्ला न घेण्यासारखे आहे. काय संबंध!!! जे एक्स्पोर्ट डील पाकिस्तान मिडल इस्ट, व्हीएट नाम मधल्या ५६ कंपन्यातरी अमेरि केशी करून स्वतः भेटून येतील व पक्के करतील ते ही बाई स्वतः बसून नाकारते.
रिअली गुड फॉर नथिन्ग आहे. ती माया नावाची बाव्हली पण लगेच इंग्रजीतून भापून व बॉस बरोबर टिकि टिकी बोलून माज राखुन आहे. ती लगेच सीईओ पदा साठे कन्सिडर होते. राधा व माया मध्ये स्पर्धा. आता राधिकाचे नागपुरी पेरेंट परत ती कशी ग्रेट ते यशवंत ला सांगतील. घोरपड गळ्यात बांधलेलीच आहे आता भोगा.

यांना कळत नाही आहे का मालिका कुठे संपवायची ते.
झालं ना लग्न मग आता तिच्या नव्या सासरी राधिकाने तारे लावल्याशिवाय संपवणार नाहीत का?? का इथेही माझ्या दुसऱ्या नवऱ्याची बायको आणि मी किती ग बाई हुशार मी किती ग बाई हुशार.
त्या खेड्याला पर्सनली कोणी ओळखत असेल तर सांगा सीजन टू काढ पण आहे ती मालिका एका गुड पॉईंट वर संपवा आता.

अमा.... Biggrin
किती तो संताप!
ती माया पण काय अशी थोर आहे का ! आणि सौमित्र ने आधी कधी सांगितले नाही मायाबद्दल ते?
उगीच चटपट राहायचे व इंग्लीश झापायचे व डोळ्यांची पिट्पिट करुन भुलवायचे!

घोरपड! Lol

पण राधाक्का व मायाची कंपनी तर वेगवेगळी आहे ना? Uhoh मग काय सी ई ओ मधे स्पर्धा?
हिची राधिका मसाले व सौमित्र च्या बाबांची एसबी!
Angry

बर तो नैतिकली ठीक नाही म्हणून ही डील नाकारते. >>>> तो आपल्या आई वडीलांना सोडून जातो म्हणून का ???

राधिकाची कंपनी त्याच्याशी टाय अप करायला फ्लोरिडा हून प्रतेक्ष माणूस येतो. जे काम इमेल वर होउ शकले असते. >>>
हो ना . फक्त "हा जो क्लॉज आहे .." ईतकच ५-१० मिन चं बोलणं होतं आणि आमचा लॉयर , तुमचा लॉयर ....
बाकी घरगुती गप्पा . वैतागणार नाही का तो साईप्रसाद .

यशवंतराव पण राधिकेच्या टॅलेंटने फारच इंप्रेस झाले आहेत. व तिला एक्स्पोजर मिळावे म्हणून एस बीची पण सीएओ तीच. राम ची पण तीच. ग्रूप सीइओ टाइप. ती ज्या पद्धतीने साईप्रसादला वैयक्ति क प्रश्न विचारत होती ते खूपच अनकंफर्टेबल होते. सौमित्र तिच्या प्रेमात पागल असल्याने तिचा फॉलो अप हेच एक काम नियमित पणे इतके दिवस केले आहे. ऑफिसात कुठे काय. अथर्व जसे डबा विसरतो व शालॅट जातो तसाच तो डबा विसरून हपिसात येउन लॅप टोप कडे बघत बसतो. मग आई सॉरी बायको साडे बाराला येते. व डबा हातात ठेवते मग म्हणतो अगं थोंडंसंच काम आहे मग आपण एकत्रच लंच करू. मग ती त्येवढ्यास्या टिफिन मधूनयशवंतराव सौमित्र व अजून एक मॅनेजर ह्याम्ना पोटभरीचे जेवण वाढते. ते लगेच वहिनिंच्या हाताला काय अज ब चव आहे म्हणून तृप्त होतात.

मग सौमित्र बाळ आईबरोबर घरी.

अमा , तुमचा संताप आम्ही समजू शकतो.>> धन्यवाद पण चिल्लर सीरीअल मध्ये काय संताप यायचा. स्टुपिडिटी बघोन वैताग येतो. इन लोगां ऐसेइच मरेंगे. मेरेकु क्या.

महाजनी काका काकूंना अमेरिकेत पाठवले तसेच राधिकाच्या सासू सासऱ्यांना नागपुरी पाठवा. राधिका सौमित्र सुखाने नांदतात असा शेवट करून टाका.
उगाच पाल्हाळ लावलय..

Happy नाही नाही...

आता तो महाजनींचा (दुष्ट) मुलगा त्यांचे अमेरिकेत कसे हाल करेल, मग जगज्जननी कशी त्यातून मार्ग काढून पुन्हा त्यांना परत आणेल, मग नाना नानींचा मुलगा (जो इतके दिवस गायब आहे-)- त्याचा व समिधाचा काही मेलोड्रामा होईल...दरम्यान शनाया व गुरवाचा ब्रेकप होऊन माया गुरवाच्या प्रेमात पडेल.....
आणि इतके दिवस झाले तरी सौमित्र ला हे माहितीच नाहीये की बंद पडत असलेल्या ब्रँच चा नवा मॅनेजर गुरव आहे ते!)
मग ती प्रेमाची खाण, वात्सल्याची विहीर, कारुण्याची नदी असलेली स्नेहमयी राधा या सर्व समस्यांतून तिच्या भक्तांना निवारेल........

सौमित्र चे बॉस का ?>>नाही सौमित्रचे बाबा. > ओके. सौमित्र अमेरिकन कंपनीत कामाला होता ना ? असो . म्हणजे राधाक्कांचे दुसरे बाबा !

अरे , महाजनी काका काकु गेलेही अमेरिकेला Uhoh ???
मुलाचं मतपरिवर्तन झालं की नाईलाज ?

रच्याकने , राधिका मसाले मध्ये , त्या आनंदची पोस्ट काय आहे ?? सहज मनात आलं म्हणून विचारलं Happy
१७ वर्श प्रद्द्नुम्न एसीपी च होते , तस काहीतरी .

आणि तिकडे शन्या आणि तिच्या आईचे काय किळसवाणे प्रकार चालु आहेत ??
घरकाम का करतायेत अचानक?
( घरकाम किळसवाणं नाही आहे , त्यान्चे जे काही चालू आहे ते वैतागवाणं आहे )

प्रेमाची खाण, वात्सल्याची विहीर, कारुण्याची नदी असलेली स्नेहमयी राधा या सर्व समस्यांतून तिच्या भक्तांना निवारेल........>>>>सहमत Proud

त्याचं असं आहे कि अमेरिकेत गूगल फेसबुक ते सोडा साध्या काही कंपन्या नाहीच्चे. एक कंपनी एस बी कंपनी यशवंत् रावाने आपल्या पोराच्या नावाने काढलेली सौमित्र बनहत्ती कंपनी. जी काय काय बनवते कोण जाणे पण त्यात राधिकाचे मसाले जातात. मिसाइल बाँब मध्ये जास्त इफेक्टिव्ह व्हावे म्हणून तिखट पूड पण वापरत असतील राधिका मसालेची. दुसरी पण फूड कंपनी ज्यात साइप्रकाश महाजनी ऑफ फ्लोरिडा काम करतात इथे पण आता इंटरनॅशनल डील झाल्याने राधिकेचे मसाले जातील. मार अ लागो मध्ये सर्व्ह होतील. बरे एस बीचा मालक इथे मुंबईत बसून दा णा दा ण काम करून तिथे प्रॉफिट कमवतो $$ मध्ये. व त्याची राइट हँड माया ही जनरल फक्त होस्टेस लेव्हल दिसते ती एकदम सीइओ पात्रतेची बाई आहे.

ह्या लोकांना कामाचे ताण, त्यामुळे थकवा असे काही ही नाही. मीटिंग घ्यायची, पानवलकर व आनंदने सजेस्ट करायचे. मग जेनी म्हणनर की अहो
जरा डेलिगेट करा मॅम की लगेच ती कायतरी डेलिगेट करून अजून छान पर्फॉरमन्स.
अमेझिंग यार. सौ मित्र बन रे हत्ती केवळ हसत बसतो कधीही काम करताना दिसत नाही.

सौ मित्र बन रे हत्ती केवळ हसत बसतो कधीही काम करताना दिसत नाही.>>>>> काय काम करत नाही? Uhoh काल त्याने त्याच्या ऑफिस मधून नाही का राधाला फोन करुन सांगीतले की एस बी च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स च्या मिटींगला तिला निमंत्रण आहे म्हणून. Proud

शनाया व तिची ममा कमोड च्या सीट वर कपडे ठेवून बेसिन मधे धूत होत्या.....!!
अतिशय किळसवाणा प्रकार!
मुळात म्हणजे यांना हे असलं शूट तरी कसं करवतं?
आणि शनाया अती म्हणजे अतीच शॉर्ट तोकड्या चड्ड्या घालून सदा सर्वदा हिंडत असते....ते काय तरीच चीप दिसतं!
गुरव काल मायाला लालगुलाब, चॉकोलेट्स देत होता तर ती म्हणे...ओल्ड स्कूल! Lol
अमा.... सौ मित्र बन रे हत्ती... Happy

तरी अजून सौमित्र व राधाक्का जवळ आलेले दिसत नाहीत!

मालिका बघण कधीच सोडलय पण इथे वाचायला येते कधी कधी. आज त्याचं चिज झालं. Proud

प्रेमाची खाण, वात्सल्याची विहीर, कारुण्याची नदी असलेली स्नेहमयी राधा या सर्व समस्यांतून तिच्या भक्तांना निवारेल........>>>> Rofl Rofl Rofl
अमा.... सौ मित्र बन रे हत्ती... >>> Rofl Rofl Rofl

Pages