माह्या भैताड नवर्‍याची दुसरी (कि तिसरी ) बायको- ३

Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13

दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च

तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<बबड्यापेक्षा हे लोक सुसह्य आहेत. विनोद बघायला मिळतो>

वाइच कळ काढा. आणखी नवी मालिका आली की बबड्या सुसह्य होईल

8 दिवस सौमित्र पिंकी वेशात होता.......

आता तर मी पूर्णपणे गुरुनाथ च्या बाजूने आहे.

सौमित्र बनहट्टी आणि त्याची नवी बनलेली बनहट्टी या दोघांचा बाजार उठला पाहिजे....

शनाया गोड दिसते अगदी....आणि राधिका ला चक्क शनाया म्हणता येतं...शन्या नाही म्हणत हल्ली बावळटासारखे

लग्न झाल्यावर राधिकाने खरतर गुरुचे झाड सोडायला हवे ना?>>>> राधिकाने नव्हे तर गुरु आणी माहामायने राधिकाचे झाड धरलेय. डाळीत सध्या पाणी वाढवणे, मसाला घालणे चालू आहे.

आँ !! राधिकाने हा निर्णय घेतला? डोक्यावर पडलीय का ती? पानवलकर जेव्हा राधिकाला विरोध करतात पण आपण दोन-तीन क्लॉजेस आपल्या सुरक्षीततेकरता टाकुन घेऊन असे म्हणतात तेव्हाच मला विचीत्र वाटले होते. पण स्वस्ति, तुला कुठे बघायला मिळाले हे?

पाहिले काल. आज क्लिअर होईल. थॅन्क्स स्वस्ति.

राधिकाने काल बराच वेळ खाल्ला. ( नेहेमीच खाऊन मालिका पाणीदार झालीय. ) शनायाच्या नावाने कंपनी, म्हणजे लोभी गुरु, मायाला सोडुन परत शनयाकडे जाईल असे वाटतेय का राधाक्काला? बरं, त्या फोटोंचे काय? आता राधाक्का कंपनी मर्ज करत नाही म्हणल्यावर मायाबै, ते फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करणारेत का? की राधाक्काच या मिडीयासमोर माया व गुरुला उघडे करणार?

मानबा सम्पतेय वाटतय. नविन सिरयलचा प्रोमो बघितला

'येऊ कशी मी नान्दायला' कलर्स मराठीच्या सुन्दरा मनामध्ये भरली ची कॉपी वाटतेय.

https://www.instagram.com/p/CIvmzJUpxu2/?utm_source=ig_embed

बरं झालं संपतेय. झी मराठीचा trp घसरला म्हणून बंद तरी करतायेत नाहीतर अजून कित्ती वर्ष ठेवली असती ही माहिती नाही.

सध्या मी सगळीच channels काढून टाकली आहेत, minimum फ्री तेवढी ठेवली आहेत. बाकी youtube वर समजतं सिरियल्समध्ये काय चालू आहे आणि काय नाही, त्यातले आई, शिवा सिद्धी आणि गौरी जयदीपचं बघते. गौरी जयदीप hotstar vip घेतल्याने बघू शकते पण सध्या बोअर सुरु आहे तिथे.

खरंतर सगळंच दिसते tv वर voot, sony liv, hotstar disney पण बघावं असं वाटत नाही. अमके तमके plans घेतलेत नवऱ्याने त्यामुळे दिसते.

गौरी जयदीप hotstar vip घेतल्याने बघू शकते पण सध्या बोअर सुरु आहे तिथे. >>>>>> रविवारचा महाएपिसोड बघितला नाही का गौरी जयदीपचा? गौरीने धिन्गाणा केला दारु पिऊन.

नाही बघितला, youtube वर समजलं काय दाखवणार ते. हा आठवडा बघायलाच नको. तो अनिल, ज्योतिका बोअर करतात. उसगावकर बाई जाम हलक्या कानाच्या आणि ज्योतिका शालिनीच्या हातातले बाहुले.

या सिरीयलमधे काय चाललं आहे सध्या? वर्षभर बघितली नाहीये!
गुरु-राधिकाचा घटस्फोट झाला का? राधिकाने परत लग्न केलं? शनायाने गुरुला सोडून दुसर्‍याशी लग्न केलं?

वर्षssssssssभर बघीतली नाही???? बोत नाइन्साफी हय यह !

गुरु-राधिकाचा घटस्फोट झाला का?>>>>>> व्हय कंदीच झाला.

राधिकाने परत लग्न केलं>>>> व्हय, सौमित्रशी लग्न केलं. सौमित्रने तिला अथर्वसकट स्वीकारले.

शनायाने गुरुला सोडून दुसर्‍याशी लग्न केलं?>>>> नाय, पण गुरु करतोय माया नावाच्या नवीन पाखराबरोबर. ही शन्यापेक्षा जास्त भैताड आहे.

शनया आता राधिकाची पक्की मैत्रिण आहे. आणी राधिका मसालेची सीईओ पण. बोत लंबी कहानी हय.

आता शनाया ला कोणी मित्र आणणार आहेत वाटतं. की आधीचाच कोणी आहे काय माहिती >>>> एक होताना तिचा मित्र अगोदरचा .
रेवती ला भेटतो तो .
रच्याकने , रेवती आणि नेहा काय म्हणतातयेत ?

मानबा नाही तुजिरं संपतेय... >>> नाही, तुजिर कधीच संपलीये.

आज परत एकदा ओझरती दिसली शिरेल, राधिका चक्क वनपिस मध्ये दिसली, नक्की काय चालुये

Pages