माह्या भैताड नवर्‍याची दुसरी (कि तिसरी ) बायको- ३

Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13

दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च

तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Script died .

माया ही सौमित्र ची जुनी मैत्रिण आणि त्यांच्या कंपनीतली एक वरिष्ठ आहे. >>> धन्यवाद आंबटगोड. हो परवाच्या एका एपिसोड मधे एक मॉडर्न टाइप मुलगी दिसत होती. गुरू एकदम राजीनामा द्यायला निघतो वाला एपिसोड.

माया , शन्या आणि राधा पेक्षा 10 पटीने छान वाटते.
पण कधी कधी कपडे भयानक घालते.
तिचा तो एक schoolgirl skirt फालतू आहे .
आणि त्या वर sleevless crop top !

काल मायाला गुरुला मिठी मारताना प्रिकॅपमध्ये पाहिल. मग अचानक ही गुरुच्या विरोधात कशी काय गेली? Uhoh

एवढ्या मोठ्या ( ३०० वाली ) कंपनीची मालकीण, दुसर्‍या मोठ्या कंपनीची सि ई ओ राधाक्का नेहेमीप्रमाणे भैताड वागलीय. माया आणी गुरु तिला सौमित्र वरुन ब्लॅकमेल करतात, तेव्हा ही धो धो रडते. च्यायला, त्या मायाला सौमित्र समोर उभी करुन चांगली कानफडवली असती तर भडाभडा ओकली असती की हा प्लॅन गुरुचा आहे म्हणून. पण बावळट्टपणा करणार नाही ती राधाक्का कसली ? Angry

एवढी मोठी ceo असून रधक्का ला एवढं साधं ब्लॅकमेल प्रकरण हॅण्डल करता येत नाही? तो १००मित्र म्हणजे काय अप्सरा आहे का हिरोईन की फोटो viral केले तर त्याची इज्जत जाईल... भैतड राधिका कसले भंगार कपडे घालते....त्या काकवा पण बऱ्या कपड्यात होत्या तिच्यापेक्षा.....तिच्या दोन्ही सासवा चांगल्या राहतात तिच्यापेक्षा ..

बाय द वे माझ्या अर्धवट माहितीनुसार सौमित्रबरोबर तिचे लग्न झाले ना? मग कसले ब्लॅकमेल.

नुसते फोटो दाखवुन मायातैने राधाक्काला ब्लॅकमेल केले. राधाक्काला शेवटी जाग आली व ती राखेतुन भरारी मारणार्‍या फिनीक्स पक्षासारखी उसळली. ( मला ह्येच हवे होते) काल शन्याला राधाक्काने ऑफिसमध्ये नेऊन चिमीत्कार घडवला. शन्याकडुन राधाक्काला गुरुबाळाच्या नव्या सावजाचे नाव माया आहे हे समजले. आता दोघी येक होणार आणी गुरुबाळाच्या दाढीत उवा घालणार.Dancing

आता दोघी येक होणार आणी गुरुबाळाच्या दाढीत उवा घालणार. > पूर्वी पण एकदा झाल्या होत्या ना? तेव्हा सुद्धा एक नवीन कोणीतरी जॉईन झाली होती ऑफिस मध्ये . ती नन्तर राधाक्काला शरण गेली होती.

अगं फोटो साधेच होते. म्हणजे मी जास्त बघीतले नाही त्यातला एक फोटो ( मोबाईल वर दाखवत होती मायाबै ) सौमित्र डोळे मिटुन मायाच्या शेजारी बसुन तिच्या मागुन खांद्यावर हात ठेवलेल्या अवस्थेत आहे असा होता. आता हा फोटो एवढा अश्लील तर नव्हता की ज्या वरुन माया ब्लॅकमेल करु शकेल. ही राधिका मुर्ख आहे, लग्गेच भोकाड पसरते. तिला म्हणायचे की तू जर धमक्या दिल्याप्रमाणे सोशल मिडीयावर हे फोटो टाकणार आहेस तर टाक. नाहीतर सौमित्रलाच फोन करुन तिथे बोलावुन घ्यायचे. मायाने लगेच माघार घेतली असती. कारण ती गुरुच्या तालावर नाचत असते ना.

नाचत ना गुरुनाथ आता, फोटोंची बरसात आता
राधिका रडली, राधिका घाबरली
ब्लॅकमेलची सुरुवात आता, नाचत ना गुरुनाथ आता !

नुसती लांबण लावलीय. आता शन्या, राधाक्का व माया तिघी मिळुन गुरुला काळे फासणारेत म्हणे. ती माया कशी सामिल होणार? ती तर CEO बनायला उतावळलीय.

उद्या जाऊन ग्रू ची पण माफी मागेल.. तिचं काय सांगता येत नाही काय करेल... माया एवढी हुशार म्हणवते स्वतः ला आणि गुरू सारख्या लबाड कोल्ह्यावर लगेच विश्वास टाकते..तेही आपल्या सख्ख्या मित्राचा विश्वास घात करून.... A ani a ahe sagla...

अशी भैताड मालिका बनवणारे , ती तितक्याच नेटाने पाहणारे, त्यावर धागा काढून चर्चा करणारे आणि जवळपास पाच हजार प्रतिसाद देणारे पण तितकेच किंवा त्यापेक्षा जास्त भैताड म्हणावे का?

रसिकाच्या इंस्टावरती अशी कमेंट आहे जिला भरपुर लाईक्स मिळतायेत -
“एक काम करा ना, सर्वाना करोना झाला असा दाखवा आणि बंद करा हि सिरीयल. आणि नवीन काही तरी बेटर सुरु करा."
Lol

900

Pages