घरगुती मदतनीसांसंबंधी चर्चा

Submitted by भरत. on 13 August, 2018 - 10:25

स्तनपानाचा धागा पेड मॅटर्निटी लीव्हकडे वळला. पेड मॅटर्निटी लीव्हवरील चर्चेचा धागा घरगुती मदतनीसांना देण्यात येणारा मोबदला, त्यांच्या सुट्या यांकडे वळला.
तर हा धागा त्या चर्चेसाठी.
हा धागा अन्य कुठे वळला, तर पुढे पाहू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळात सोसायटीने ( एम्प्लॉयेर्स ची) सोय केली होती ना! मग ती updated ठेवायला नको का सोसायटीने ( एम्प्लॉयेर्स ने). बायका काही न सांगता घरातली बाथरूम वापरणार नाहीत, मग त्यांच्यावर सांगायची वेळच का येऊ द्या? त्यापेक्षा त्या खालच्या बाथरुम मध्ये self dependent आहेत, facilitate that.

सिंगापूर मधे लोकल मेड परवडत नाही म्हणून भारतातून मेड घेऊन जाणा-यांसाठी कायदे बनले आहेत. कायदे गुगळून पाहू शकता. इथे एक चटकन अंदाज येईल अशी तुलना आहे. अंमलबजावणी झालेली आहे. यावरून कामाचे तास किती (४४_, पगार किती द्यायचा (१२०० डॉलर्स ), वेगळी राहण्याची सोय, पब्लिक हॉलिडेज इत्यादींची कल्पना येण्यासाठी...

आपण किती सुखी आहोत ( कायद्याची अंमलबजावणी करता येत नसल्याने ). उद्या या मेडसचं रजिस्ट्रेशन झालं की संपलं.
आता चौथ्यांदा लिहील्यावर पटेल. बरं झालं इथे चर्चा झाली ते.

राजसी म्याडम , कधीतरी एकदा विषयाला धरून प्रतिसाद द्या की हो चंमतग म्हणून. कायदे काय आहेत हे आपण कुठलीही गोष्ट करताना बघतो ना ? मग आपण जे करतो ते कायद्यात बसतं का ? कुणाचे काय हक्क आहेत हे नको का बघायला ? आणि जर कायद्यात बसत नसेल आणि आपल्या फायद्याचे असेल तर शांत राहणे योग्य नाही का ? मुळात जो कायदाच नाही, त्या तरतुदी आपल्या मनाला वाटल्या म्हणून... या सदराखाली वाद घालून कोण निष्कर्षावर येणार ??

उद्या झाली एखाद्यावर केस... मगच कायदे काय आहेत हे वाचायचे का ?

सोसायटी च्या नियमावलीत घरगुती कामासाठी जे हेल्पर नेमलेले असतात त्यांच्यासाठी सोय करायची तजवीज नाही. सोसायटी एम्लॉयर नाही. प्रत्येक जण एप्लॉयर असतो. कुठे एखाद्या सोसायटीत तशी सहमती झाली असेल तर समहतीचा मामला म्हणून ठीक. पण असा कुठलाही नियम नाही. सोसायटीकडून अशी अपेक्षा ठेवता येत नाही. कामाच्या ठिकाणी एम्लॉयरनेच या सोयी करायच्या असतात.

घरात पेशंटची सेवा करायला येणार्‍या बायकांना/पुरुषांना त्या घरातली वॉशरुम्स वापरायची मुभा नाही हे मला जरा अती वाटतंय. सिम्बांच्या सोसायटीत अशी सोय आहे पण जिथे नाही तिथे ह्या मदतनीसांनी काय करायचं?

गृहसहाय्यिकेला बाथरूम वापरू न देण्यावरून 'द हेल्प' चित्रपटाची आठवण झाली. त्यात गोरी मालकीण काळ्या नोकराणीला घराबाहेर संडास बांधून देते. 'त्या लोकांचे रोग आपल्याला होतील' म्हणून. भारतात आपण सर्रास हेच करतो हा विचार तेव्हा मनात शिवला नव्हता.
अ‍ॅमी यांनी स्तनपानाच्या धाग्यावर विचारलेला प्रश्न त्यावेळी बोचरा वाटला होता, तरी त्या निमित्ताने दोन चांगल्या चर्चा घडत आहेत. एम्प्लॉयर आणि एम्प्लॉयीच्या भुमिकेत गेल्यावर आपल्या विचारसरणीत विरोधाभास निर्माण होतो का, याबद्दल या निमित्ताने सर्वांनाच आत्मपरिक्षण करता येईल.

राहिलं!
मी काय लिहिते आहे आणि ते कोणाला काय पोचतय; काही माझ्या हातात नाही.

मी देव/संत/आयडीयल कंडिशन देणारा एम्प्लॉयर नाही.माझ्यापेक्षा चांगल्या कंडीशन देणारे अनेक असतील.
<<
हेच, मी दुकान टाकुन चार लोकांना नोकरी देण्याचा गुन्हा केल्याबद्दल जेव्हा सरकार कायदा करून भरपगारी बाळंतरजा इ. द्यायला भाग पाडत असेल, तर?

अर्थात, हा धागा त्या वरूनच स्फुरला आहे,
प्रेग लिव्ह चा एम्प्लॉयर्स च्या दृहतिकोनातून विचार-------> तुम्ही स्वतः एम्प्लॉयर् असताना काय करता------> डोमेस्टिक हेल्प बद्दल चे अनुभव असा प्रवास आहे
>>>>

सिम्बा, बरोबर.
त्या धाग्यात अँमी यांनी सुद्धा हा मुद्दा मांडला होता. (जरी मांडताना त्यांनी काहींना उद्देशून तो प्रश्न विचारला, जे माझ्यामते योग्य नाही. पण मुद्दा योग्य आहे).

इथे आलेल्या प्रतिसादांतून ( चर्चा म्हणता येणार नाही), बाळंतपणाची (भरपगारी) रजा या विषयावर रिव्हिजिट करायला हवी असे वाटते.

इथे ९०% बायका या मोलकरणींच्या नखर्‍यांनी त्रस्त झालेल्या आहेत.
या रोजच्या ताण तणावांशी डागदार अड्डावाला अशा (बहुधा) पुरुषांचा संबंध फार फार दुरचा असणार. त्यांना मानवतावादी दृष्टीकोनातून फक्त मोलकरणींना दिल्या जाव्या वाटणार्‍या सुविधांची गरज वाटते. आणि या सुविधा जसे की सुट्ट्या ई , मोलकरणींना मिळतच नाहीत असाही त्यांचा समज दिस्तोय. प्रत्यक्षात अशा सर्व सुविधा हक्कानी घेऊन देखिल, बाकी मोलकरणींच्या कामाचा दर्जा , त्यांचा अ‍ॅटीट्युड कसा असतो याची त्यांना कल्पना दिसत नाही. हक्काबरोबर कर्तव्य देखिल बजावायला हवे ना!!
मी शपथेवर सांगते, नीट नेटके काम जर प्रामाणिकपणे आणि नम्रपणे मोलकरीण करत असेल तर इथेली प्रत्येक बाई तिला तुम्ही सांगताय त्याच्या दुप्पट सुविधा आनंदाने देईल. जाऊ द्या , यांना कसे कळणार मोलकरीण काय चीज असते ते!!
बाकी सरकार नी मोलकरणींसाठी काय कायदे करायचे ते करावे की!! इथे कोण अडवतेय ?? परवडले आम्हाला तर ठेवू मोलकरणी नाहीतर काय राहू तसेच!!

बाकी सरकार नी मोलकरणींसाठी काय कायदे करायचे ते करावे की!! इथे कोण अडवतेय ?? परवडले आम्हाला तर ठेवू मोलकरणी नाहीतर काय राहू तसेच!! ----- +1

डेलिया म्याडम, मानवतावादी दृष्टीकोण कसला ? आहे ते कायदे तुम्ही न वाचता उड्या मारत प्रतिसाद देत सुटला आहात. मी लीजिकली पहिल्यांदा दोन सेक्टर्स यासाठीच मांडले होते. एव्हढी मोठी चर्चा करून तुम्ही पुन्हा तिथे आला आहात. पुन्हा वाचा मागे जाऊन... दुस-या धाग्यावर.

कायदे ऑलरेडी आहेत राजसी म्याडम. न वाचता उडी घेतली की पॅराशूटशिवाय तरंगल्याप्रमाणे होतं बघा अधांतरी. उपरी उपस्कर डिपो !

<<< फ्री इकॉनॉमीच्या नियमानेच होणारे >>>
<<< परवडले आम्हाला तर ठेवू मोलकरणी नाहीतर काय राहू तसेच >>>
या अख्ख्या धाग्यात या २ गोष्टीच महत्वाच्या आहेत.
आणी हो, घरात काम करणारी व्यक्ती ही फक्त सेवादाता आहे, तुमची एम्प्लॉई नाही. त्यामुळे तिच्या बाळंतपणाची भरपगारी रजा द्यायची जबाबदारी तुमची नाही. तुम्ही चांगूलपणा दाखवला तर उत्तमच आहे, पण एम्प्लॉई आणि सेवादाता मधील फरक लक्षात घ्या.

आता खरंचच मौज वाटू लागली आहे. म्हणजे एखाद्या भाबड्या जिवाला ट्रॅफिकचे पण कायदे असतात हेच ठाऊक नसेल आणि कुठेच पाळले जात नसेल म्हणून त्याने कायदे सांगणा-याला सुनवायचे...
ज्याला बनवायचेत त्याने बनवावे की रहदारीचे कायदे मानवतेच्या दृष्टीकोणातून, आम्ही आम्हाला वाटेल तसेच चालवणार ! याच सिद्धांतावर तर पुण्ञातली रहदारी चालू आहे. शिक्षितच आहेत की सगळे.

तर,
एम्प्लॉयी रिलेशन्स मधली विशेषतः छोट्या एंप्लॉयर्सच्या साठी, जे आपण आपल्या डोमेस्टिक हेल्पबद्दल बोलत आहोत, काही लक्षात घेण्याचे मुद्दे, जे वरच्या चर्चेत अमूर्तपणे येऊन गेलेत, ते थोडे क्रिस्टलाइज करतो, जेणेकरून सुखी एम्प्लॉयरचा सदरा तुम्हालाही सापडावा.

१. 'घरच्यासारखे' वागवणे.

हा मुद्दा वर अनेकदा येऊन गेलाय.

घरातही सगळ्यांना सारखे वागवले जात नाही. सासू सुनेला, बाप लेकाला, जावई सासर्‍याला, नात्यात लेव्हल्स अन पदर असतात. सो प्रत्येक घराची 'घरच्यासारखी' रीत वेगळी असते.

मुद्दा, म्युचुअल रिस्पेक्ट हा आहे.

प्रत्येक माणसाला सेल्फरिस्पेक्ट, आत्मसन्मान असतो. त्याचा अपमान करणे, 'नोकरासारखे' वागवणे माणसाला सहन होत नाही. जरी तो नोकरी करत असला, तरी त्याने तुमच्याकडे नोकरी करणे ही तुमचीही तितकीच गरज आहे, जितकी कुणा इतराची नोकरी करणे ही त्याची गरज आहे; हे लक्षात घेतले की असंख्य प्रॉब्लेम्स मिटतात.

सो
१. नोकराचा अपमान करू नका. (This is very important, and MUST be observed by ALL family members, including children. हाक मारताना वयानुसार ताइ, काकू, मावशी, दादा इ. हे शिकवले पाहिजेच) सर्वांसमक्ष/तिर्‍हाइतासमोर तर मुळीच नाही. चुकीबद्दल झापायचे असल्यास, जो माणूस्/बाई नोकराच्या हातात पगार ठेवते, त्याने/तिने, शांततेत सांगावे. मोठ्या चुकीसाठी आग्यावेताळ आवतार घ्यावा लागतो, पण तो कसा ते अनुभवानेच येते.

२. योग्य मोबदला.

यार, मी देखिल पैसे कमवण्यासाठी अन माझं घर चालवण्यासाठीच काम करतोय. त्यातून पुरेसे पैसे मला सुटलेच पाहिजेत. ते मिळत नसतील तर केवळ नाईलाज म्हणून पाट्या टाकणे हे होते.

घासाघीस करणे. एक रजा घेतली की ३० रुपये कापणे असले उद्योग करून दोघांना मनःस्ताप होतो. थोड्याफार दांड्या, थोडी सांडलवंड, थोडी उचलेगिरी सोडून द्यायची असते. नोकर म्हणून मला काय 'पर्क्स' मिळाल्यावर मी खुश राहीन असा विचार केलेला बरा असतो.

हे केल्याने चोर्‍याचपाट्या होत नाहीत, स्वतःहून अधिकची कामे करणे आपोआप होते, अन दोघे खुष राहतात.

३. कामाच्या ठिकाणचे वातावरण.

इथे येऊन काम करावेसे वाटेल अशी परिस्थिती निर्माण केली तर चांगले नोकर टिकून राहतात.

हसून बोला. कधीकधी मूड वाईट असतो ते त्यांनाही समजतं. आपण हसून सुरुवात केली तर समोरचा सहसा नीटच बोलतो असा अनुभव आहे.

झाडु नीट मारतो का हे चेक करायला म्हणून सोफ्याखाली बोळे फेकू नका.

रोज उठून केवळ पैसे वसूलायला चादरी अन जड धुणी काढू नका. आमचे एक मित्रवर्य फरशी पुसणार्‍या बाई नीट काम करतात की नाही हे चेक करायला, वापरात नसलेल्या बेडरूमच्या बाल्कनीत ओल्या पायांनी चालून धुळिचे ठसे उमटवत.

तब्येतीची चौकशी करा, आजारपण जाणा. स्वयंपाकीण बाई शिंका मारत भाज्या पोळ्या करताहेत, हे होऊ देऊ नका. दोघांसाठी वाईट आहे ते.

वर आलाय तसा टॉयलेट वापरू देण्याचा मुद्दा. अहो, आमच्याकडे कामवाल्याला आंघोळ करून यायला शिकवणे, अन त्यातही आंघोळीचा साबण कसा वापरायचा हे शिकवणे हा किस्सा आहे. पण म्हणून टॉयलेट खराब करेल, असे समजून त्या व्यक्तीला शरीरधर्मापासून वंचित ठेवणे योग्य नव्हे.

+++

तर हे आहेत ठळक मुद्दे. बाकी अजूनही बारीकसारीक कलाकुसर यात असते, पण ती अनुभव व व्यक्तिसापेक्ष.

वरची सर्व मते माझी वैयक्तिक आहेत. तुम्हाला पटलीच पाहिजेत असा आग्रह नाही.

धन्यवाद!

आ.रा.रा. >> +१००
एकदम मुद्द्याचे बोललात.

बोका कुणाचे कोण आहात हो ? Lol
नाही म्हणजे हेच दळण दळले गेलेय की. त्याला कायद्याचं कोंदण आहे.

@डागदार

तुमच्या ट्रोलिंगला मी दुर्लक्षित करत आलो आहे, हे तुमच्या अजून लक्षात आले नाही का? Uhoh

ग्रेटच की.. म्हणजे अधून मधून खोडसाळ प्रश्न विचारणारे मुद्दा मांडणा-याला ट्रोल ठरवतात. हे महान आहे. उठाले रे बाबा....
पण बरं झालं हा प्रतिसाद दिला. आप को हम पहचान गये

बोकोबा,

तो माझा पर्सनल ट्रॉल आहे, अन माझ्या पर्सनॅलिटीचे पॅरोडी नांव घेऊन वावरतो आहे.
पॅरॉडी अकाउंट निर्माण होणे यात कुणाचे कौतुक ते सांगायला नको.

तेव्हा आमच्या किरणूचे मनावर घेऊ नका. या अवतारात बराच टिकलाय तो.
अजून पुरेसा तोल गेलेला नाहिये त्याचा.
Lol

कोणते कायदे मोडले जातायेत लिह हो इथे . मला काही या धाग्यावर कोणते कायदे दिसले नाहीत . मे वकील नाही पण साक्षर आहे आणि माझे वाचन उत्तम आहे. तरी मला महिन्यातून चार दिवस 'सुट्टी' वगळता इतर कोणताही कायदा वाच्ल्याचे आठवत नाही. कोणते कायदे आम्ही आम्ही पाळले नाहीत , मोलकरणीं संदर्न्भाने सांगा पाहू

गाडीचे लायसन्स मिळवण्यासाठी कायदे शिकून परीक्षा द्यावी लागते तशी अता मोलकरीण ठेवण्यासाठी द्यावी काय ? Uhoh

रच्याकने , मोलकरणीच्या जाचाला कंटाळून अता माझ्याकडे मोलकरीण नाहीच्चे , तेव्हा मी कायदे मोडण्याचा प्रश्नच येत नाही.

कायद्यावर चर्चा हवी असेल तर कायदे धाग्याच्या हेडींग मधे अ‍ॅड करा ना!!

<<तर,
एम्प्लॉयी रिलेशन्स मधली विशेषतः छोट्या एंप्लॉयर्सच्या साठी, जे आपण आपल्या डोमेस्टिक हेल्पबद्दल बोलत आहोत, काही लक्षात घेण्याचे मुद्दे, जे वरच्या चर्चेत अमूर्तपणे येऊन गेलेत, ते थोडे क्रिस्टलाइज करतो, जेणेकरून सुखी एम्प्लॉयरचा सदरा तुम्हालाही सापडावा.>>

हा जो काही प्रतिसाद आहे ना , आसेच किन्वा याच्यापेक्षा खूप चांगलेच वागवले जाते हो आमच्या कोथ्रूडात मोलकरणींना!! तुम्हाला अनुभव दिसत नाही

डेलिया,

तुमचा अनुभव चुकीचा नाही.

अनेक नोकरही अत्यंत त्रासदायक असतातच.

पण त्यातही माझा अनुभव असा आहे, की अशांना पट्कन फायर करणे चांगले.

एक नव्याने ठेवलेला कंपाउंडर टेबलची ड्रॉवर्स उघडून चाफलताना मला दिसला. म्हणे मी आतून साफसफाई करत होतो. त्याला ३ दिवसांचा पगार देऊन तात्काळ हाकलून दिला होता.

भिंतीवर कोळ्याचे जाळे दिसले, तर मावशीला झाडू घेऊन या, असे सांगून स्वहस्ते काढून टाकतो. 'सर तुम काय्कू कर्रे मै कर्ती ना!" असे लाजून म्हटल्यावर 'मावशी तुम्हारा हाथ नही पहुचा रहेंगा, इस्लिये मै निकाल रा हू' असं सांगून एकदा केलं, की पुन्हा अख्या हॉस्पिटलाच्या कोणत्याच कोपर्‍यात जाळं दिसत नाही.

रिपीट ऑफेंडर असेल, तर 'तुम्हारा काम ठीक नही हो रहा. पेशंट लोगा कंप्लेंट करते' सांगून, 'अगर ऐसेच चल्ता रहा तो इस बार बोनस नही मिलेगा' हा दम कामात येतो.

अर्थात हे झाले किस्से. अ‍ॅन्क्डोट इज नॉट डेटा पॉइंट.

पण

४. नोकराला तुझ्यावाचून माझं अडत नाही, हे फीलिंग अधुनमधून देणे हेदेखिल गरजेचे असतेच. Wink

सगळ्या उलटसुलट चर्चेत माझा एक मुद्दा, जो म्हटलं तर गमतीचा आणि म्हटलं तर त्यावर( विषम आर्थिक स्तर, परंपरागत सामाजिक अन्याय, जातीव्यवस्था, अशिक्षित आईवडील, शिक्षणाबद्दल अनास्था) इ इ तुफान चर्चा होऊ शकते. तर ............

एकीने सुट्टी घेतली तर सगळी काम अंगावर पडू नयेत म्हणून मी स्ट्रॅटेजीकेली 4 कामांसाठी 3 मदतनीस ठेवल्या आहेत. दोघी थोड्याफार कमीजास्त फरकाने वर सगळे अनुभव लिहिले आहेत तशाच आहेत, पण एकुणात काम निभावत आहे. एक आहे ती मार्क्स न शिकता अगदी कम्युनिस्ट आहे Lol आधी कदाचित मी नोट केलं नव्हतं, पण सुरुवात झाली माझ्या वाढदिवसाला नवरा आणि सासू सासर्यांनी गिफ्ट्स आणि लाड करण्याने. तेव्हा तिने मला वय विचारलं आणि मग सांगितलं की ती माझ्याएव्हढीच आहे. त्या दिवसापासून सतत एकतर्फी तुलना आणि स्पर्धा. मी कशी थंडीपावसात कारने जाते, तिला चालत यावं लागत, ती काम संपल्यावर भर दुपारी टळटळीत उन्हात चालत घरी जाते तेव्हा मी मस्त 'एशी'त खुर्चीवर बसून काम करते, माझ्याकडे किती नवीन ड्रेस आहेत, बरय कामाला जाऊन नुसतं 9 तास बसून हजारो रुपये पगार घ्यायचा, दीदीकडे किती काकण आणि कानातले आहेत, रोज नेलकलर्स लावायला बरा वेळ मिळतो, साहेब किती मदत करतात घरात इ इ चर्चा माझ्यासमोर दुसऱ्या दोन मेड्स बरोबर करायच्या. आणि हे क्वचित नाही, प्रत्येक प्रसंगाला अगदी दररोज. थोडे दिवस सगळ्यांनी हसून सोडून दिलं, पण अति झाल्यावर मी वैतागले. तिला एक दिवस सांगितलं की 'शोभा आपण दोघी एकाच वयाच्या आहोत माहीत आहे ना तुम्हाला, तर ऐका की मी वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून तेविसाव्या वर्षांपर्यंत आवडो न आवडो अभ्यास करत होते. तुम्ही 12व्या वर्षी कंटाळा आला म्हणून शाळा सोडली तेंव्हापासून शेतात शिवारात मस्त खेळत होतात हे स्वतःच कौतुकाने सांगितलं आहे. तेव्हा मी उरिपोटी जड स्कुलबॅग घेऊन शाळेत जायचे, परीक्षा लिहून लिहून मला बोटाना घट्टे पडले होते. तेव्हा तुम्ही ऐश केली आता मला करू दे. आणि आता सुद्धा तुम्ही 2 वाजता सगळी काम संपवून घरी जाता आणि 1-2 तास झोप काढता, पण मी सकाळी 9 ते रात्री अनिश्चित वेळेपर्यंत काम करते. एकच दिवस सतत 3 तास खुर्चीत बसून बघा बरं एकदा'. तेव्हापासून तुलना प्रमाण कमी झालं आहे.

बाकी त्यांचे पगार, त्यांना मिळणारी ट्रीटमेंट याबाबद्दल कोणी प्रश्न उपस्थित केला तर लिहिनच. पण कोणताही अन्याय होत नाहीए नक्कीच. उलट त्या सतत तुलनेमुळे आम्हीच कधी कधी बांगड्या किंवा नेलकलर्स आपणहून भेट देत असतो.

काहो या घरगुती मदतनीसांनी रस्त्यावर उतरून राडा दंगल, जाळपोळ असे काही केले आहे का?
कुणी यांच्या विरुद्ध रस्त्यावर उतरून राडा दंगल, जाळपोळ असे काही केले आहे का?
नसेल तर करा की. म्हणजे मग लोक विचार करतील. कायदा करा म्हणतील.
कायदा होईल. त्याच्या अंमलबजावणी साठी सरकारात नवीन लोक घ्यावे लागतील. मग त्यांना पण लाच खायला मिळेल.
भारतीय लोकांना पक्के ठाऊक आहे - कायदा वगैरे झूट।. आपण आपल्याला हवे तसे वागायचे! लाच दिली की झाले.

कायदे कसले करता भारतात. एव्हढे भिन्न चालीरिती असलेले समाज - एका समाजात जे चालते ते दुसरीकडे नाही.

अरे मल्हारी, तू दोन फेक आयडी घेणार होतास त्याचे काय झाले रे ?
मला शिवीगाळ करूनही या अवतारात तुझा आयडी शाबूत आहे ... Lol नॅरो एस्केप Lol
आरारा गेल्यावर चुकचूक किंवा ओह शिट...

वर उपाशी बोका काय म्हणतात, सेवादाता वेगळे आणि employee वेगळे. मग काय घरातले बाथरूम वापरू द्यायचा कायदा आहे का नाही! बाथरूमची सोय आहे बिल्डिंग मध्ये, रहिवाशांच xx चाललं नाही की एक ड्रम विकत घ्यावा, मी कुठेच बाथरूम एक्सेस बंद करा म्हणाले का!
आजकाल बहुतेक घरांत बाथरूम extension of बेडरूम असते. Medicine cabinet आणि तत्सम वैयक्तीक गोष्टी बाथरूममध्ये ठेवलेल्या असू शकतात, तर बाथरुम वापरु देणे म्हणजे invasion ऑफ एम्प्लॉयेर'स privacy नाही का? कोणाच्या सोसायटीत मदतनीसांसाठी common बाथरूम नसेल तर मी काय करु ?! त्या लोकांचा problem.
एखाद दिवस मोलकरणीला काम करता घेरी आली म्हणून चटई-चादर अंथरून पडायला दिलं तर म्हणाल स्वतः बेडवर झोपता आणि मोलकरणीला चटई?असं कसं ती तुमच्याकडे कामाला मदतनीस म्हणून येत असली म्हणून काय झालं, एकदा घरांत आली म्हणजे घरातल्या प्रत्येक काडीवर तिचा एकतर माणुसकी म्हणून नाहीतर कायदा म्हणून अधिकार! नक्की काय काय मदतनीसांचे हक्क कायदे ते सांगा म्हणजे उगीच नियमबाह्य वर्तन व्हायला नको.

Pages