घरगुती मदतनीसांसंबंधी चर्चा

Submitted by भरत. on 13 August, 2018 - 10:25

स्तनपानाचा धागा पेड मॅटर्निटी लीव्हकडे वळला. पेड मॅटर्निटी लीव्हवरील चर्चेचा धागा घरगुती मदतनीसांना देण्यात येणारा मोबदला, त्यांच्या सुट्या यांकडे वळला.
तर हा धागा त्या चर्चेसाठी.
हा धागा अन्य कुठे वळला, तर पुढे पाहू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही आमची मदतनीस बंद केली. मला भांडी घासायला आवडतात आणि आई पूर्ण घराचा केर काढते रोज. मग फरशी पुसण्याचं काम मी जमेल तसं एक-दोन दिवसाआड करते. खूप कंटाळलो आम्ही आमच्या बाईंच्या कामाला आणि वागण्याला. तसंही कपडे मशिनमधे धुवून वाळत घालणं, बाकीची स्वच्छता, स्वयंपाक आम्ही घरीच करत होतो. आता भांडी/केर वगैरेपण. मी पूर्ण वेळ, तेही सॉफ्टवेअरमधे एका अतिशय aggressive कंपनीत नोकरी करत असूनही अजून असं वाटत नाहिये की मदतनीसांशिवाय चालणारच नाही. मला गरज पडली तर घरून काम करता येतं कधीही. जोपर्यंत अगदी अशक्य होत नाही तोपर्यंत मदतनीस ठेवणार नाही असं ठरवलंय. आजवर वेगवेगळ्या ठिकाणी मिळालेल्या वेगवेगळ्या मदतनीसांमुळे झालेल्या त्रासांची काही गणतीच नाही. आणि जेव्हा आम्हाला एखादी चांगली मदतनीस मिळते तेव्हा एकतर आम्ही घर बदलतो काही ना काही कारणाने किंवा त्या बाईना काम सोडावं लागतं. Lol

जेव्हा आम्हाला एखादी चांगली मदतनीस मिळते तेव्हा एकतर आम्ही घर बदलतो काही ना काही कारणाने किंवा त्या बाईना काम सोडावं लागतं>> अरे .. अस होत ..
मीही हाच विचार करुन फक्त भान्डी घासण्यासठी मदत्नीस घेतली, अधी सगळी काम दिली होत तिला, पण तुमच्यासार्खे अनुभव आले, बदलुन पाहिली, पन तेच ते, त्यापेक्शा काम वाटुन घेउन स्वतच करतो.

हो ना सिम्बा, नजर ना लगे.

माझं वैयक्तिक मत - बायकांना सांभाळायला एक टॅक्ट लागते. सुदैवाने आमच्या घरी (आई वडिलांच्या काळापासून आम्ही पहात आलोय) आमच्याकडे बायका वर्षानुवर्षे टिकायच्या. मी आणि माझी चुलत भावंड तान्ही असल्यापासून आमच्याकडे एक बाई होत्या (त्या आम्हाला अंघोळी पण घालत) त्या प्रचंड म्हातार्‍या झाल्या तेव्हा त्यांनी आमच्याकडचे काम सोडले, मग होती ती तरूण होती एकदम. तिच्यावर एकदा पोलिस केस झाली... तेव्हा पण आमच्या घरच्यांनी तिला सोडवून आणली. ती पण अनेक वर्ष आमच्याकडे होती, पण ती केस झाल्यावर तिलाच छान वाटले नाही म्हणून ती जागा सोडून गेली. नंतर आली ती पण अनेको वर्षे आमच्याकडे होती, माझे बाबा तिला रोज चहा देत संध्याकाळी (ती दोन वेळा येत असे) ती भांडी घासे तोवर बाबा तिच्या मुलिचा अभ्यास घेत.
मदतनीस ही नोकर नसून घरचीच व्यक्ती आहे असे आम्ही कायम समजत आलो. शिवाय त्यांच्या सोबत आत्मियतेने बोलणे, चार शब्द गोड बोलणे, समजून घेणे, इतकेच हवे असते त्यांना. त्यामुळे हे साध्य झालं असेल. आता अगदी बेकार मदतनीस भेटल्या नाहित असे नाही, पण खूप कमी.
माझ्या आताच्या बाईच्या अगोदर आलेली बाई.. ज्या दिवशी आली त्याच दिवशी सोडून गेली (फणकार्‍याने) त्याची कहाणी परत कधीतरी सांगेन.

मस्त चर्चा. मी पण मदतनीस नाही गटातली. त्यापेक्षा सर्व आटोमेट केले आहे. एक साइट आहे ते डीप क्लीनिन्ग करून देतात. गरज पडली तर त्याम्ना बोलवेन. त्यापेक्षा मला स्वीगीवरून अन्न मागवणे सोपे पडते. मेड म्हणजे नजर ठेवून असतात आपल्या घरावर व पैसे मागत राहतात, फार बडबड करतात. तेमला आजिबात खपत नाही. हे सोडा बेबी , पाळ णा अंघोळ बाफ वर बाळाला तेल लावुन द्यायला तोतो करायला अन दोरी ( पाळ ण्याची ) हलवायला चला बरे. कारण जिचे हाती रॉकरची स्ट्रिंग ..... तिचे बेबी होईल सिनेटर किंवा तत्सम....

आम्हाला ज्या मदतनीस भेटल्यात, त्यांना चहा वगैरे देणं, चार शब्द त्यांच्याशी बोलणं, त्यांना समजून घेणं, सुट्ट्यांना कधीही कटकट न करणं, साड्या/वस्तू देणं, त्यांना सारखी किटकिट न करणं, त्या काम करताना त्यांच्या डोक्यावर बसून बारकाईनं काम न करून घेणं हे आमच्याकडे पहिल्यापासूनच आहे. पण म्हणतात ना, एकेकाचं नशीब असतं. खरंतर आमचा अ‍ॅटिट्यूड असा असतो की एखाद्या माणसाने नुसतं प्रामाणिकपणे काम केलं तरी त्याला दोन पावलं पुढे जाऊन मदत करावी. पण वस्तुस्थिती अशी आहे की कामचुकारपणा करणारीच माणसं जास्त भेटलीयत.

मी ही बाई नको या मोड मध्येच होते अनेक महिने. सर्व काही एकटी करत होते. पहाटे उठून स्वयंपाक, घरकाम करून पावणे आठ ची बस पकडून हापिस, रात्री ८.३० ला घरी, दुसर्‍या दिवशीची तयारी. मग अखेर बाई ठेवण्याचा निर्णय घेतला.
एक बाई आल्या. रुपये २५०० (२०१२ साली) मी म्हट्लं कधी पासून सुरू करायचं? हे बोलणं सुरू असतानाच अजून एक आली, ती लिहिती वाचती, मोबाईल वाली होती. तिचा पण नंबर घेऊन ठेवला.
पहिली अनिता समजा जी उद्या येते म्हणाली ती आली दुसर्‍या दिवशी तो होता रविवार. आल्या आल्या अत्यंत रागिट चेहर्‍याने भांडी घासली, आणि फर्निचर पुसू लागली. तेव्हा मी तिला पुन्हा एकदा आठवण करून दिली की बस ८ ला असल्याने मला पावणे आठ ला घरून निघावे लागते तेव्हा तुला पावणे सात किंवा उशिरात उशिरा ७ ला यावे लागेल. जेव्हा ठरवलं त्या दिवशी हो हो म्हणाली होती. दुसर्‍या दिवशी फर्निचर पुसताना विचारलं की कितिला याल? तर म्हणाली काल ठरलं ना... मी म्हटलं म्हणजे पावणे सात-सात नक्की ना? तर म्हणाली नाही साडेसात. मी म्हटलं नाही चालणार... तर म्हणाली मी १५ मिनिटात सर्व काम करून देइन Uhoh पोळी भाजी, भांडी केर फरशी सगळं? Uhoh मी म्हटलं बाई मला हे परवडणार नाही, रोज मी गॅसवर नाही रहाणार. फर्निचर पुसता पुसता हातातलं फडकं टाकून म्हणाली ती दुसरी बाई आली ना? म्हणून तुम्ही माझ्याशी असं वागायला लागलाय. (कारण ती दुसरी बाई २००० घेईन म्हणाली होती) माझे भांड्याचे पैसे टाका मला जमणार नाही म्हणाली.
मग मी दुसरीला फोन केला ती आली बोलली आणि उद्यापासून सुरूवात करते म्हणाली, तुम्ही मला ६.४५ ला मिस कॉल द्या मी Uhoh बरं म्हटलं. सोमवार होता दुसर्‍या दिवशी. मी ६.४५ ला उठून मिस्ड कॉल केला... काही हालचाल नाही झाली पलिकडून. मग मी फोन केला तर कुणा माणसाने फोन घेतला... ७.०५ पर्यंत हेच नाटक सुरू... अखेर मी माझ माझा डबा करून घेतला आणि बाई हा विषय मनात बंद केला.
पण काही दिवसांनी आमची आत्ताची 'मदतनीस' दरवाज्यात आली. तिला त्या मिस कॉल वाल्या बाईने माझ्याकडे कामाला बाई हवी हे सांगितलं होतं. ती येताना तिचं ओळखपत्र घेऊन आली होती आणि काम कधी सुरू करणार म्हणता आत्तापासून म्हणाली. आधीच्या अनुभवाने मी तिला फक्त १५०० रूपये देईन अशी सुरूवात केली. ती हो म्हणाली. पण मी आता फारच सुखी आहे तिच्यासोबत. पगार तसा कमी देत असूनही मी इन काईंड जमेल तसे करते तिच्यासाठी.

धाग्याचे नाव घरगुती मदतनिसाचे अनुभव असे बदलून ठेवावे म्हणजे यातूनच घरगुती मदतनिसांना येणारे मालकांचे /किणींचे अनुभव असा नवीन धागा विणता येऊ शकेल.
स्पायडरमॅन - ५

माझ्या आईकडच्या आत्ताच्या दोघीजणी (स्वयंपाक करणारी आणि धुणं भांडी करणारी) दोघीही फार छान आहेत, टचवूड.

स्वयंपाक करणारी पडेल ते काम करते, धुणं भांडीवाल्या मावशी स्वच्छ काम करतात आणि कितीही काम पडलं तरी तक्रार नाही.
सुट्ट्या आजिबात घेत नाहीत (आम्ही पैसे कापत नाही) , आजारी असतील तर आईच 'आत्ताच्या आत्ता घरी जा, काम मी करेन' म्हणत शब्दशः हकलून देते तरी जात नाहीत, मग आई हाताला धरुन बाहेर काढते, गाडीवर बसवून दवाखान्यात नेउन आणते आणि घरी सोडते, रात्री घरी डब्बा पोहचवते.

आईची इतकी काळजी घेतात दोघीही की काही विचारायला नको, उगाच पांचट्पणा नाही, इकडंचं तिकडे बोलणं नाही, फालतू सल्ले नाहीत, चोरी चपाटी नाही. ताटातल्या अन्नाकडे आदाश्यासारखं पहाणं नाही, कितीही आग्रह केला तरी आमच्या घरी जेवणं, चहा पिणं, काही खाणं नाही.

आता कधी कधी अति पांचट स्वयंपाक करणं, नविन पदार्थ न बनवणं , कितीही वेळा शिकवलं तरी तोच पदार्थ त्याच प्रकारे बिघडवणं, खंडीभर भांडी स्वयंपाकाला वापरणं, प्रचंड प्रमाणात पाणी वाया घालवणं, कपड्यांना नीळ न घालणं, साबण/ निरमा इत्यादी संपे दिवसापर्यंत न सांगणं, भसाभसा वापरणं इत्यादी गोष्टी आहेत पण त्या सांभाळून घेतो आम्ही.

पगार स्वयंपाक करणारीला ५५०० आणि धुणं (कपडे मशिन मधे टाकणं आणि झाले की वाळत टाकणं), भांडी (तीन लोकांची), फरशी (हे तिन्ही एकाच वेळेला) याचे ३५०० इतके देतो आम्ही

दिवाळीत १ दिवस , मे महिन्यात १५ दिवस सुट्टी आणि प्रत्येक महिन्यात एक दिवस सुट्टी असं आम्ही अ‍ॅग्री केलेलं... त्या प्रत्येक महिन्यात एक्क सुट्टी घेत नाहीत हा त्यांचा चांगुलपणा आणि मे महिन्यात त्या अर्धा महिना असुनही आम्ही पुर्ण पैसे देतो हा आमचा चांगुलपणा.. यावर निभावुन आहोत दोघीही Happy

आता गंमत अशी की त्यांना माझ्यापेक्षा जास्त सुट्ट्या दिल्या गेल्या आहेत (प्रत्येक वर्षी आम्हाला १५ सुट्ट्या असतात, आधीक सुट्ट्यांचे पैसे कापले जातात) आणि पगार म्हणाल तर त्यांना माझ्या पेक्षा जास्त आहे Proud (३० तासाचे ५५०० रुपये)

पण आम्ही त्यांच्यामुळे आणि त्या आमच्यामुळे खुष आहेत. आम्ही जमेल तोपर्यंत एकमेकींना सोडणार नाही आहोत.

या दोघींच्या आधीच्या दोघी भयानक होत्या

हो मग... रविवारी आमच्या आईला सुट्टी तर त्यांना नको का?
पण त्या घेत नाहीत Happy म्हणून मग आम्ही पण फारसं काम टाकत नाही

सई केसकर ह्यांच्या पहिल्या पानावरील अगदी पहिल्या प्रतिसादास + १००० मोदक.
महिन्यातून दोन सुट्ट्या, सासू आजारी सुट्टी, चुलत सासु मेली सुट्टॅ( एरवी हजार शिव्या दोन्ही सासवांना, वर्षातून थोबाड नसेल बग्गितले तरी गावी जाणार सासूचे कारण सांगोइन),
बाहेर लग्नाला जायचेय सुट्टी, आणि इतर आहेच सुट्ट्या.

ह्यात कधीही पगार कापला नाही आणि साधं टोकलं नाही.
ह्या कामवाल्याबाईंनी माझेच शोषण केलेय. चार बाया चार पद्श्तीने अगदी आखून कट करतात असे आहे.

ज्यास्त करून स्वयंपाकाची बाई. भाजी नाही निवडणार, खोबरं नाही किसणार, भाजी धूवून तुम्हीच ठेवा, तोंडली वगैरे भाजी तुम्हीच कापा.. लय येळ लागतो(इति कामवाली), नाश्ता नाही करणार,
माझी नजर चुकवून डाळ बसकन ओतून ज्यास्त आमटी करणार म्हणजे दुसर्‍या दिवशी आम्ही तिच आमटी खावी व तसे तीच सुचवणार. फळं नाही कापणार, कोशिंबीर नाही करणार.. लय टायम खात्यात...(इति कामवाली). मासे/मटण नाही करणार.
३५०० मधे फक्त एकदाच स्वयंपाक.
आई तिला रोज तिच जे काय ते स्वयंपाक आटपला की गरमागरन जेवण वाढायची. मी हि तेच करते कारण तेवढाच धर्म. पण इतकं करूनही ह्या बायांना माया नाही.

बरे, एखादीला काढली पुर्ण पगार देवून तरी खोट्या बोंबा मारून दुसरीला फितवणार.
मला सुद्धा पगारी सुट्टी नाही मिळत इतक्या ऑफीसात अशी विनोदी कथा आहे.

भारतात गेल्यावर भरमसाठ पैसे देऊन ठेवलेल्या ४ बायका आणि त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे अरेंज केलेलं सासुबाईंच वेळापत्रक पाहुन मलाही बायका मॅनेज करणे ही फार मोठी कटकटच वाटते. इथे सुद्धा घर घेऊन ११ वर्ष झाली, तरी अजुन तरी स्वतः सगळी साफसफाई वगैरे करणं मॅनेज होतंय. इथे काही रॉबरीज् क्लिनरशी जोडल्याच्या केसेस पण ऐकल्या. त्यामुळे पण स्वतः करणं सुरक्षीत वाटतं.

मैत्रिणीच्या सासुबाईंची एक गंमत आठवली त्या निमित्तानी. त्या झाडणारी बाई यायच्या आधी कागदाचे बोळे सोफ्याच्या खाली, बेडच्या खाली टाकायच्या. तिनी सगळीकडुन नीट केर काढला की नाही त्याची टेस्ट Lol

आमच्या मावशी आता 10 वर्षं आमच्याकडे आहेत.सुरुवातीला बरीच कटकट झाली.पोळी भाकरी डायरेक्ट ओटा फडक्याने स्वच्छ पुसून त्यावर करणे(या ओट्यावर मी आदल्या रात्री झुरळाचं औषध मारलं असण्याची शक्यता बरीच असायची),पीठ वालं पाणी सिंक कडे ढकलून घाईत निघून जाणे(मी आल्यावर माझ्या डोळ्यासमोर सिंक मागे वाळलेला पाणी पिठाचा लेयर असायचा.तो स्वच्छ करणे हे अजून कटकटीचे काम होऊन बसले.) अश्या सवयी सांगून बदलाव्या लागल्या.अजूनही 'शनिवारी ओटा गॅस धुणे' याला त्या 'मी माणुसकीच्या नात्यातून तुमच्यासाठी करत असलेलं जादा काम' म्हणतात तेव्हा बधिर व्हायला होतं ☺️☺️☺️☺️ पण या गोष्टी या त्यांच्या बेसिक सवयी आहेत.आपल्याच घरातलं एखादं माणूस अश्या सवयी बाळगून असतं तश्या.

पण बाई अत्यंत खंबीर.नवरा 1 मुलगी 1 मुलगा लहान असताना सोडून गेला दुसऱ्या बाईबरोबर राहायला.तेव्हा पासून एकट्या संसार सांभाळतात.अनेक वेळा भांडून, (त्या कधीकधी मोबाईल वर स्वतः फोन करूनही 10 मिनिटं भांडतात.तत्व म्हणजे तत्व.), कधीही स्वतःच्या इन्क्रीमेंट डिमांड पासून मागे न सरून आता त्या त्यातल्या त्यात चांगला मोबदला मिळवतात कामाचा.आमच्या एरियातला स्टॅंडर्ड रेट पण तोच आहे.आता घरी एक दुचाकी, लॅपटॉप आणि मुलाकडे अमेझॉन चा टेम्पो आहे. मुलांची लग्नं, जगण्याचा लढा अजून चालू आहेच.

कामातल्या अनेक गोष्टी अजूनही खटकतात.पण आता एखाद्या फॅमिली मेम्बर च्या वाईट गोष्टी आपण सुधारतो, बदलता आल्याच नाही तर चालवून घेतो तसे करतो आहे.मे बी अजून चांगलं कोणी मिळालं असतं.पण विश्वासातून आलेला चेंज रीलकटन्स.

आमची मोलकरीण काम सोडून मायबोलीवर पडीक असते. १५ ऑगस्टला सुटी घेते. मोदींच्या भाषणावर चिंतन करते.

मी कालपासून वाचतेय हा धागा , पण प्रतिसाद देणे टाळत होते, कारण माझे मत फारच कलुषित झाले आहे ह्या बायकांबद्दल.
नाही म्हणायला काही अपवाद आहेत याला पण अगदीच नगण्य

आमच्या इकडे यांना कामवाल्या म्हणतात अन तेच योग्य आहे असे त्या वागतात. जणूकाही आपणच फक्त गरजू आहोत असा माज करतात.
आमच्याकडे सगळ्यात पहिल्यांदा ज्या मावशी होत्या त्या त्या मानाने बऱ्याच बऱ्या होत्या. एक नाही की दोन नाही, यायचे अन निमूटपणे आपले काम करून निघून जायचे, कामही मस्त होते. हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना हे काम करावे लागत होते, पण आमच्या दुर्दैवाने त्या दुसरीकडे रहायला गेल्या म्हणून काम सोडले.

त्यांनतर दुसरी एक आली, तिची लहान मुलगी कडेवर घेऊन यायची. उगाच खुपसारी बडबड पण तरी तीही चांगली होती, माणुसकी असणारी होती. , मध्ये तर एक महिना मम्मीपप्पा गावी गेले तेव्हा, आम्ही तिला दुसरीकडे बघ सांगितले कारण मी अन भाऊ सकाळी लवकर जात असू अन रात्री उशिरा येत असे. तेव्हा तर मला तिची खूप मदत झाली, अगदी रात्री दहा वाजता येत होती ती मला मदत करायला, भांडी लादी, कपडे तर करायचीच पण जे तिच्या कामात नव्हते तेही करायची, जसे भाज्या निवडणे, चपात्या शेकणे असे. पण नंतर तीही गेली कारण तिच्या नवऱ्याला तिची अशी कामे करणे आवडत नव्हते. ती ह्या कामातुन मिळालेले पैसे तिच्या माहेरी द्यायची मदत म्हणून. त्यामुळे तो अजून भडकायचा. शेवटी तिला सगळी कामे सोडावी लागली.
अन तेव्हापासून, आता पर्यंत एकही चांगली बाई भेटली नाही. काही न काही त्रास होतोच. दुधाचे भांडे तर कधीच स्वच्छ होत नाही, वर काही बोलले की यांची धमकी असतेच 'माझे काम असेच आहे, नसेल पटत तर दुसरी बघा' अन दुसरी कोणी पहिली मुळे तयार नसते, अन भेटलीच एखादी तर पहिली बरी म्हणावी अशी गत.

घरगुती मदतनीसांना हाताळण्याचा जिम्माही स्त्रीवर्गाकडेच आहे, असे दिसतेय.

मी धागा उघडलाय, म्हणून लिहितोय.
आईला घरातल्यांनीच केलेलं काम पसंत पडायचं नाही, त्यामुळे मोलकरणींचं (हा शब्द असंसदीय नाही ना?)काम तर नकोच, असा तिचा स्टँड होता.
मी अन्य शहरात एकटा असताना, तिथल्या घरमालकांच्या सांगण्यावरून मोलकरणी लावल्या (एक गेली की दुसरी) होती. पण त्यांच्याशिवाय अडलं नाही.
उलट शर्टाच्या कॉलरी ब्रशने घासून घासून फाडून मिळाल्या. पुढे वॉशिंग मशीन घेतली.
पैशाची, रजेची घासाघीस करायचा विचार न आल्याने मी आणि मोलकरीण दोघेही सुखी होतो.
एकट्या पुरुषाच्या घरी जाऊन कसं काम करायचं? असा एक प्रश्न होता. घरमालकिणीकडे चावी ठेवणे हा उपाय निघाला.
एक आजीबाई आपल्या शाळेत जायच्या वयाच्या नातीला घेऊन कामावर यायच्या आणि तिला ऑन द जॉब ट्रेनिंग द्यायच्या. या दोघींबद्दल गिल्ट वाटायचा.

आत्ताच बाबांच्या आजारपणात त्यांची काळजी घेण्यासाठी एक माणूस ठेवलेला. तो दिवसभर नुसता बसून असतो, आणि त्याला आपण इतके पैसे देतो, म्हणून बाबांनी प्रचंड कटकट केली. अर्थात ती गरज पर्मनंट नव्हती, हे नशीब. त्या लोकांनाही आजारी माणसांच्या अशा वागण्याची सवय असावी.
शिवाय बाहेरचं एक माणूस आपल्या घरात येणार, हे मला इन्व्हॅजन ऑफ प्रायव्हसी वाटलं. त्यामुळे मोलकरीण ठेवा, असं नातलगांकडून सुचवलं जाऊनही माझा कल तिथे जात नाही. सध्या स्वयंपाक आणि इतर घरकाम मी आणि आई मिळून करतो. जेवलेलं ताटवाटी, कपबशी बाबा स्वतः घासतात.

मोलकरीण - मोलावर काम करणारी ती मोलकरीण.
पैशाचं सोंग आणता येतं नाही तसंच घरातल्या आजारपणात मनुष्यबळाचे सोंग ( नसले तर आणता येत नाही). घरांत आजारी माणसासाठी नर्स ( बाई/बुवा)ठेवणे हे असून अडचण आणि नसून खोळंबा प्रकारात मोडते. इथे तर 12 तासांची शिफ्ट असलेली nurse घेतली तर एकवेळच जेवण आणि चहा देणे अपेक्षित आहे. इथे आपलंच आपल्याला सगळं सांभाळायला होतं नसतं म्हणून मदत hire करा आणि मदतीच्या जेवणाची सोय बघा, दुष्काळात तेरावा महिना! गॅस सुद्धा पेटवता येत नाही असे लोकं पाठवतात कंपन्या!

इकडे नुसत्याच गोड गोड गोष्टी चालू आहेत,
थोडा मसाला घालू दे.

१) किती मदत्निसांकडून आपण फक्त ठरवलेले काम करायची अपेक्षा ठेवतो? कि हातासरशी हे पण करून टाकायचं कि असे म्हणतो ?
यात स्वयंपाक करणाऱ्या बाईनी हातासरशी भांडी धुवून टाकावीत. कोथिंबीर निवडून घ्यावी,, केर-लादी करणाऱ्या बायकांनी हातासरशी जमिनी वरचे समान (bags, amazon चे बॉक्स, मुलांनी पसरलेली खेळणी पासून फर्निचर पर्यंत काहीही गोष्टी येऊ शकतात ) हलवून स्वच्छ केर काढणे , कपडे धुणार्या बाईनी हातासरशी तारेवारचे वाळलेले कपडे काढून घड्या करून ठेवणे , पेशंट साठी ठेवलेल्या आया बाईनी भांडी विसळणे, या सगल्या अपेक्षा येतात.
हे फाईन प्रिंट JD मध्ये डिस्कस झाले असेल तर ठीक, पण नसेल तर त्या व्यक्तीने हे का करावे?

२) पूर्णवेळ घरी असणाऱ्या बाई ला स्वच्छतागृह वापरू देणे, किमान आरामदायक आरामदायक व्यवस्था करणे
पेशंट अटेंदन्त , किंवा मुले सांभाळायला असणारी बाई/ मुलगी या बर्याचदा घरात खूप काळ असतात, यांना आपले स्वच्छतागृह वापरू देतो का?
आमच्या बिल्डींग मध्ये तळमजल्यावर एक कॉमन बाथरूम आहे, सगळ्या बायका ते वापरतात , मध्ये पाणी टंचाईने ते बाथरूम बंद ठेवायला लागले होते, तेव्हा आपआपल्या बायकांना घरचे बाथरूम वापरू द्या असा ठराव मीटिंग मध्ये आणला, तर सगळ्यांनी एकमतानी फेटाळून लावला होता.
८ तासाची शिफ्ट असताना एक पेशंट असीस्तंत बाई back सपोर्ट नसलेल्या स्टुलावर बसून असलेली पहिली आहे. तिथे किमान पाठवाली hand rest वाली प्लास्टिक ची खुर्ची देता आली असती, आपापल्या ऑफिस मध्ये EHS मध्ये आपल्याला मिळणाऱ्या खुर्च्या आठवा.

३) पूर्ण वेळ घरी असणाऱ्या मदतनिसांना खायला देणे,
सकाळी लौकर घर सोडणारी व्यक्ती, डबा घेऊन येते , नाही येत ती बाहेर खात असेल तर कुठे खाते, तिच्या समोर तुम्ही काही गोष्टी खात असाल तर तिला ऑफर करणे, बारा तासांची शिफ्ट करणाऱ्या बाईने घरून २ डबे घेऊन येणे आणि आपला आपण चहा करून घ्यावा (त्यात परत हातासरशी अजून २ कप करायला काय होते हि अपेक्षा असतेच) हे माणुसकीला धरून नाही.

४) त्यांना सुद्धा मूड असू शकतो हे समजून घेणे
कधीकधी आपलेच स्वत: चे मुल किंवा आप्त त्यांच्या तर्हेवाईक वागण्यानी आपल्याला नको होतात, तेव्हा केवळ मोल देऊन आणले आहे म्हणून त्या व्यक्तीने कायम संयमाने वागावे हि अपेक्षा आपण ठेवतो का? ( अगदी elite क्लास air crew सुद्धा रडणाऱ्या पोराला विमाना बाहेर फेकायची धमकी देऊ शकतो Happy ) इकडे आपण अल्पशिक्षित काहीही ट्रेनिंग न मिळालेल्या staff बद्दल बोलत आहोत.

मुलांना सांभाळणे conti..

स्वत: च्या हातात त्यांना चापट मारायची किंवा आवाज चढवून बोलायची हि अथोरीती नसताना , तुमच्या शिस्तीच्या standard ने वय वर्षे १.५ ते ४ -५ ची मुले सांभाळणे हे प्रचंड जिकरीचे काम आहे.
आपल्या डोक्याशी भुणभुण असह्य झाल्यावर त्याला मोबाईल किंवा TV समोर चिकटवून देऊन आपण थोडावेळ तरी मोकळा श्वास घेऊ शकतो, त्यांना ती सवलत नसते.
शिक्षण कमी असल्याने, मुलाला गुंतवून ठेवण्यासाठी तुम्ही आम्ही सहज करू शकणार्या अक्तीव्हीतीज त्यांच्या साठी शक्य नसतात (उदा पुस्तक वाचणे, गोष्ट सांगणे)
स्वच्छतागृह मुद्दा वर कवर केला.

पैश्याच्या दृष्टीने म्हणाल तर डे केअर मध्ये तासाला ६०-७० रुपये घेतात , म्हणजे दिवसाचे ३०० ते ३५० (५ तास प्रती दिवस), महिन्याचे ७५०० ते ८७५० - रविवारी पूर्ण वेळ सुट्टी. हातासरशी होणारी कामे तिकडे सरकवता येत नाही,
या उलट घरगुती काम करणाऱ्या बाई ला ५००० ते ६००० मिळतात, साधारण रविवारी सुट्टी नसते, दुपारी मुल झोपले कि कपड्यांच्या घड्या, पालेभाजी निवडणे, चहा बनवणे अशी कामे तरी सरकवली जातातच जातात.

त्यांचा prformans रेट करण्या अगोदर या इन्हेरेंट लिमिटेशन चा विचार व्हावा असे मला वाटते

१. अजिबात इतर कामांची ' अपेक्षा' मी तरी ठेवत नाही. संबंध चांगले असले की एखाद्या वेळी जास्त काम/ लवकर येणं असं नक्की अॅडजस्ट करतात चांगल्या बायका.
२. धाकटा मुलगा लहान असताना एक मुलगी होती सांभाळायला. मी नोकरी वगैरे करत नव्हते. पण दोन्ही मुलं लहान होती आणि घरात ज्ये. ना. नाहीत त्यामुळे आम्हाला गरज होती. ही मुलगी आमच्या घरीच रहायची. त्यामुळे ओघाने घरातल्या सर्व सोयी ती वापरायची. दुपारी बाळ झोपल्यावर टीव्हीही पहायची तास दीड तास. सोफ्यावर पाय वर घेऊन बसायची. पाण्याचा ग्लास विसळून ठेवायची नाही. सांगण्याचा उद्देश असा, की अगदी ' घरच्यासारखी' घरातल्या सोयी वापरायची. घरकामाला वेगळी बाई होतीच. पण ही मुलगी चुकूनही अधिकच्या एकाही कामाला हात लावायची नाही. अशा वेळी ' घरच्यासारखी' नाही.

हे घरच्यासारखी आर्ग्युमेंट फार भाबडे आहे.
'घरच्यासारखी' असेल तर जास्तीची हातासरशी कामे करेल आणि माझ्या जेवणात जेवेलही.
जास्तीची हातासरशीची कामे करायला लागता कामा नये (अगदीच व्हॅलिड), अमुक सुट्ट्या हव्यातच हे सगळे 'घरच्यासारखे' वगैरे नाहीये.
जास्तीचे हातासरशीची कामे करायला लागता कामा नये अशी अपेक्षा आहे तशीच जास्तीचे काही दिले/शेअर केले जावे अशी अपेक्षा करणेही चूक आहे.

वावे, तुम्हाला एकटीला उद्देशून नाही. एकूणातच घरच्यासारखे वागवावे हा जो आग्रह असतो तो भाबडेपणाचा कळस वाटतो मला.

अरे! काहीही झालं तरी मतं / मुद्दे बदलत नाहीत, चर्चा हवी त्या दिशेने वळत नाही तर 'एक स्त्री, दुसरी स्त्री' argument का Happy

Pages