घरगुती मदतनीसांसंबंधी चर्चा

Submitted by भरत. on 13 August, 2018 - 10:25

स्तनपानाचा धागा पेड मॅटर्निटी लीव्हकडे वळला. पेड मॅटर्निटी लीव्हवरील चर्चेचा धागा घरगुती मदतनीसांना देण्यात येणारा मोबदला, त्यांच्या सुट्या यांकडे वळला.
तर हा धागा त्या चर्चेसाठी.
हा धागा अन्य कुठे वळला, तर पुढे पाहू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण घरगुती मदतनीस पाहिजेच का?
इथे तर अनेक वर्षे बघतो आहे - कित्येक घरी नवरा बायको दोघेहि नोकरी करतात, मुले असतातच. शिवाय भारतातल्यापेक्षा जास्तीचे म्हणजे हिवाळ्यात स्नो काढणे, नि उन्हाळ्यात गवत कापणे नि उन्हाळा ते हिवाळा मधे झाडांची गळलेली पाने उचलणे असली सगळी कामे कुणाहि मदतनिसाशिवाय होतात. नि लोक सुखी असतात. तक्रारी नाहीत!
बहुतेक इथले आयुष्य कामे करण्यामुळे जास्त सुखाचे झाले आहे. आमचे शेजारी तर सतत काहीना काही करत असतात.

घरच्यासारख्या म्हणाव्या अशा दुसर्या एक बाई आम्हाला नंतर मिळाल्या. सकाळी ९ ते संध्याकाळी ६. मुलांना सांभाळणे हे मुख्य काम. पण वेळ असेल तर त्या इतर कामंही करायच्या. ( उलट कधी कधी उलटा व्यापही व्हायचा Lol आता काही काम नाही केलंत तरी चालेल असं सांगावंसं वाटायचं). कामवाली बाई नाही आली तर भांडी घासून केरही काढायच्या. मीही त्याबद्दल कृतज्ञता दाखवायचे. पगार सुरुवातीला १०,००० आणि दरवर्षी १००० वाढवला. एकदा त्यांना दिलेला पूर्ण पगार त्यांच्याकडून हरवला. तेव्हा त्यांना अजून ५००० रू दिले. ३ वर्षांनंतर गरज राहिली नाही, तेव्हा त्यांना ४-५ महिने आधीच कल्पना दिली. त्यांनी नवीन नोकरी शोधली. सगळं गोडीत झालं.

आमच्याकडे मालकीण बाई आणि मदतनीस बाई एकमेकिंना भेटल्याबद्दल देवाचे आभार मानतात. या मदतनीस आमच्याकडे अनेक वर्षे आहेत Happy
तसेच अनेक वर्षांपूर्वी इंडोनेशियाला असताना मिळालेल्या पेम्बांटूचे (शब्दशः अर्थ मदतनीस) अजूनही गोडवे गायले जातात.
वाईला आमच्या घरी काम करणार्यांनी तर अक्षरशः तीन पिढ्यांची सेवा केली असेल.
तुम्हाला कितीही आचरणात आणण्यासाठी अशक्य वाटत असेल तरी मदतनिस व्यक्तीस घरच्या सारखे वागवणे यास पर्याय नाही. तुम्ही निवड करतानाच हा उद्देश ठेवला पाहिजे.
मग नवर्याला जस हव तस सुधरवून घेता तर मदतनीस कीस झाड की पत्ती.
आणि नवर्याला पण जरा कामाला लावा की. Happy

घरच्यासारखी' असेल तर जास्तीची हातासरशी कामे करेल आणि माझ्या जेवणात जेवेलही.>>>>>>>>

हे घरच्या सारखी अर्ग्युमेंट माझे नाही, त्यामुळे त्या बद्दल बोलत नाही, पण "हातासरशी" माझे आहे त्या बद्दल,

वर राजसी म्हणाल्या
>>>>>>इथे तर 12 तासांची शिफ्ट असलेली nurse घेतली तर एकवेळच जेवण आणि चहा देणे अपेक्षित आहे. इथे आपलंच आपल्याला सगळं सांभाळायला होतं नसतं म्हणून मदत hire करा आणि मदतीच्या जेवणाची सोय बघा, दुष्काळात तेरावा महिना! >>>>>

जर त्यांच्या एम्प्लॉमेंट कॉन्ट्रॅक्ट मध्ये एक जेवण आणि एक चहा देणे नमूद असेल तर त्यावर चिडचिड का?
तसेच नर्सिंग अटेंडेंट ला गॅस पेटवता येत नाही यावर चिडचिड का? त्याला गॅस जवळचे कोणते काम करणे अपेक्षित आहे?

जर त्यांच्या एम्प्लॉमेंट कॉन्ट्रॅक्ट मध्ये एक जेवण आणि एक चहा देणे नमूद असेल तर त्यावर चिडचिड का?<<
मी त्यावर चिडचिड केली नाही. मी शेंगा खाल्ल्या नाहीत. मी टरफले उचलणार नाही.
कॉन्ट्रॅक्टमधे असेल तर मी देईन.

कामवालीला घरच्यासारखी वागवायला हवं किंवा आम्ही घरच्यासारखी वागवतो अश्या दोन्ही प्रकारे वाक्ये चर्चेत येत असतात या विषयाच्या. त्यावर ते तसे म्हणणे भाबडेपणाचे वाटते इतकेच सांगितलेय.

तसेच नर्सिंग अटेंडेंट ला गॅस पेटवता येत नाही यावर चिडचिड का? त्याला गॅस जवळचे कोणते काम करणे अपेक्षित आहे?<<
घरातल्या व्यक्ती दिवसभर बाहेर असताना वृद्ध वा आजारी माणसासाठी अटेंडंट ठेवलेला/ली असेल तर त्याचा चहा करायला आपली नोकरी सोडून घरातल्या व्यक्तीने यायचे की आजारी माणसाने उठून त्याच्यासाठी चहा करायचा? की त्यावेळेला येऊन चहा करून देण्याची मदतनीस लावायची?

कॉन्ट्रॅक्टमधे असेल तर मी देईन.>> +१ .
नसेल तरीही देईन, पण मग कुठल्या ना कुठल्या स्वरूपात परतीचीही अपेक्षा ठेवीन.

मी जेव्हा जेव्हा बाईचं गाह्राणं गायला लागते, तेव्हा तेव्हा माझी मैत्रीण मला एक मंत्र सांगते. तिचं म्हणणं असं, की ह्या बायकांना काय हवं असतं ते नीट पाहीलं की समजतं की, वेळेस पटकन मिळणारी उचल, प्रेमाची वागणूक आणि खाणंपिणं मिळालं की त्या खूष असतात आणि ते नक्की देत रहायचं. ते सोपं असतं आणि तितकंसं महागही नसतं. हिशोबीपणा अजिबात करायचा नाही. पण एकदा का तुम्ही बाईचं मन जिंकलंत की तिच्याइतकं प्रेम कुणी करत नाही. माझी मैत्रीण तिला तंबाखूसाठी पैसे देते, मिशरी लावतेस का वगैरे विचारते.. तिच्या पाळीच्या दिवसांत तिला घरकामात स्वतः मदत करते. स्वतःच्या घरात झोपायलाही लावते कधी बरं नसलं की. लागेल तेव्हा लहान सहान उचल देते. तिच्या एका वाढदिवसाला इतर कामांवर जायला ड्रायव्हरसकट गाडी पण दिली होती एकदा. तिला सिनेमा, तुळशीबाग, हाॅटेल, खाऊ, मुलीला कपडे असं सगळं सगळं करत असते. आणि मग ती बाई (न सांगता)ठरलेल्या कामाव्यतिरिक्त डब्यापासून औषधांपर्यंत सगळ्या वस्तु हातात आणून देते. दवाखान्यात नंबर लावण्यापासून ते नळावरच्या भांडणापर्यंत वेळेला हजर असते. सुट्टीचं नावसुद्धा काढत नाही. आजारपणात सेवा करते. वेळेला स्वतःच्या घरून खायलाही करून आणते. ती आपणहून न सांगता जे जे करते ते मोलानं करून घ्यायचं ठरवलं तर किंमतही होऊ शकणार नाही एवढी परतफेड ती करते.

घरच्या सारखं वागवा यावर मतभेद नाही. पण मला आलेला एका मावशींचा अनुभव सांगावा वाटला.
१. खाली लाकूड आणि वर पिलर सपोर्ट नंतर काच असलेला २ महिने जुना टीपॉय उचलताना काच ताणली जाऊन फुटला.आम्ही दुसर्‍या खोलीत होतो पण मदतीला बोलावले नाही.(इथे नवरा नामक प्राण्याला आधीच इशारा देण्यात आला होता की कार्पेट वर काचेचा टीपॉय आणि ते उचलण्याचं काम बाईंकडे नको. प्रत्येक वेळी उचलायला मदत करायला आपण त्या जागी हजर असणार नाही.त्यांना उचलता येणार नाही.यावर नवरा: 'म्हणजे काय, इतकं करतील त्या.शी इज एफिशियंट.' Happy )
आम्ही पैसे वगैरे वसूल केले नाहीत.
त्या टिपॉय ची काच १० वर्षं झाली बसवलीच नाही. आम्ही त्यावर टेबल क्लॉथ टाकून नुसता लाकडी वापरतो.रोज सकाळी बैठकीवर उचलून ठेवतो.कार्पेट उचलून घडी करुन वर ठेवतो, झाडू पोच्छा ला लागणारे पसारा फ्री ग्राउंड झिरो तयार करुनच बाहेर जातो.
२. घरात पहिल्या सीझनचा आणलेला अर्धा डझन हापूस आंबा बघून 'माझ्या मुलांना खावे वाटतात, चवीला द्या' सांगितले.घरच्यांच्या तोंडाला लागण्यापूर्वी त्यातले २ उचलून दिले.
३. दर ३ महिन्यांनी १० दिवस कामाचा पगार घेऊन उरलेले दिवस गावाला. (यात पैश्याचा तोटा आमचा नाही.लीव्ह चे पैसे त्यांनी मागितले नव्हते.पण नोकरी करणार्‍या माणसाला सर्व्हिस प्रोव्हायडर्स च्या एकावेळी इतक्या लीव्ह्ज, बदली कामगार शोधायला त्यांच्या येण्याजाण्याच्या वेळा हेरणे/गेट वर सांगणे वेळ वाईज जमत नाही.)
४. अशीच एकदा २० दिवस सुट्टी असताना भांड्याना बदली बाई ठेवली आणि ट्रायल म्हणून भांड्यांना तिला चालू ठेवले. २० दिवसवाल्या मावशींचे ७०% काम चालू ठेवले.पण भांडी दुसर्‍या व्यक्तीला दिल्याबद्दल 'एकतर तिला ठेवा किंवा मला ठेवा.मला ठेवायचं तर पूर्ण सगळी कामं मला द्यावी लागतील' म्हणून भांडण केलं.

घरच्या सारखं वागवणं, चहा करुन देणं, खाणं देणं वगैरे सर्व मान्य. पण सोयीस्करपणे 'घेताना घरच्यासारखं' आणि एरवी कामं करताना डोळ्याला स्पष्ट दिसणारा कचरा केवळ टिव्ही टेबल खाली आहे म्हणून झाडूचा स्ट्रोक ३ इंच एक्स्टेंडही न करणे यात काहीतरी चुकतं. (तुम्ही म्हणता जॉब टर्म्स मध्ये डिफाइण्ड आहे का? जॉब टर्म्स मध्ये 'घरातल्या अमुक एरियातली खराब दिसणारी जमिन स्वच्छ करणे आणि त्यासाठी एक्स्क्ल्युजिव्ह सूचना द्यायला न लागणे' हे असते. हे 'डेफिनेशन ऑफ डन' या हल्लीच्या स्पेक्स मध्ये येते.) घरातल्या बाईने ऑफिस ला जाताना स्वयंपाक करुन स्वच्छ चकचकीत केलेला ओटा संध्याकाळी काम करुन झाल्यावर पीठाचे फराटे घाईत फडक्याने पुसून अजून खराब करणे, ते फडके वाळतही न टाकणे हे सर्व कॉन्ट्रॅक्ट लेबर, पी एफ नाही वगैरे म्हणून मान्य होते का?

इथे काही लोकांचं ठरलंय का की कामाला येणार्‍या बायका हा जगातला सर्वात प्रामाणिक, निरागस, निष्पाप, सालस आणि सोज्वळ घटक आहे जो निस्वार्थपणे कामे करत असतो.

आमच्या नाही हो, शेजारच्यांच्या शेजारच्यांचे शेजारी आहेत ना, त्यांच्या आत्याच्या नणंदेच्या भाचीच्या सासूबाईंकडे ज्या मदतनीस बाई येतात ना घरकामासाठी त्या आठ तास काम करतात. मधल्या काळातला चहा त्या एम्प्लॉयरच्या कँटीनमधे पैसे देऊन पितात. जेवणाची सुटी १५ मिनिटे असते. सुटी झाली कि अगदी घड्याळाच्या ठोक्यावर ब्ल्यू डायमंड हॉटेलचा मनुष्य दारात उभा असतो जेवण घेऊन. त्या ही चटकन पैसे देऊन जेवायला बसतात. जेवणासाठी मालकीणबाईंनी एक कोपरा उदारहस्ते दिलेला आहे. या उपकाराला स्मरून त्या मदनीस बाईही दहाच मिनिटात जेवण आवरतात.
जायला यायला वेगळे पैसे द्यावे लागत नाहीत. त्यांच्या मर्सिडीजचे डिझेल त्या स्वखर्चाने भरतात. कधीही मालकीणीची स्कूटी मागून गैरफायदा घेतलेला नाही. ब्ल्यू डायमंड बंद असते त्या दिवशी त्या असिस्टंटला घेऊन येतात. यांची वेळ होईपर्यंत असिस्टंट कोप-यात तीन दगडी मांडून त्यात कोळसे घालतात आणि जाळ पेटवतात. मस्तंपैकी स्वयंपाक करतात. कधी कधी घरातल्यांनाही ऑफर करतात.
खूप चांगल्या बाई आहेत.

पेशंटला sponging करायला गॅस पेटवता यायला नको? पेशंटला जेवायला वाढायचे, जेवण गरम करायला गॅस पेटवता यायला नको?चहा-साखर-दूध ओट्यावर ठेवले नर्सला स्वतः चहा प्यायचा असेल गॅस पेटवता यायला नको? काही गोष्टी वेळच्या वेळेस sterilise करून ठेवायच्या असतील तर गॅस पेटवता यायला नको? व्यक्तिगत चहा-स्वयंपाकासाठी नाही. घरात फक्त पेशंट आणि nurse आहे. दुर्दैवाने, घरातल्या कर्त्या मंडळींना already बऱ्याच सुट्ट्या झाल्या म्हणून सुट्टी घेणे आणि पेशंटजवळ घरांत बसणे शक्य नाही म्हणून मुळात nurse hire केली आहे.

आणि nurse ला जेवण पुरवण्याबद्दलची चिडचिड का? आत्ता लिहायचा मूड नाही.

मी स्वतः नोकरी करायचे, सकाळी 6.10ची लोकल असायची. 5.45 ला घर सोडावं लागायचं तरीही पोळी-भाजीचा डबा घेऊन जायचे, तेव्हा नो स्वयंपाकिन काकू! मला कोणाची कौतुक ऐकत बसायचा मूड नाहीये- बिचारिनी किती वाजता घर सोडले असेल? कसा डबा करेल? Been there, done that ( lakhs ऑफ people still doing it)

या विषयाशी संबंधित पहिल्याच रिप्लाय मध्ये मी म्हंटले होते,
या विषयावर चर्चा होऊ शकत नाही,
प्रत्येक जण आमच्याकडे कशा आईडीअल वर्किंग कंडिशन आहेत हे सांगेल, आणि तेच होत आहे.
कामवाल्या कसे त्रास देतात यावर जोक, लेख, चर्चा सगळे असते पण त्यांच्याशी लोक कसे वागतात याबद्दल कोणी बोलत नाही.
आणि थोडा जरी तो अँगल एक्सप्लोर केला तर तमाम मालक वर्गाला खटकते, काही लोक बायका निष्पाप, सोज्वळ आहेत हे ठरवूनच बोलतात वगैरे ऐकावे लागते.

पहिली गोष्ट,
कामवाल्या बाया/ मदतनीस सगळ्या साध्याभोळ्या नसतात तसेच सगळ्या मुद्दाम त्रास द्यायला बसलेल्या पैश्यासाठी हापापलेल्या नसतात .

दुसरी तिसरी गोष्ट थोड्या वेळात लिहितो,

आमच्या बिल्डींग मध्ये तळमजल्यावर एक कॉमन बाथरूम आहे, सगळ्या बायका ते वापरतात , मध्ये पाणी टंचाईने ते बाथरूम बंद ठेवायला लागले होते, तेव्हा आपआपल्या बायकांना घरचे बाथरूम वापरू द्या असा ठराव मीटिंग मध्ये आणला, ----- ह्यात helpers चे बाथरूम पाणी बंद करणे inhuman आहे. ते एकमेव बाथरूमच पाणी कोणत्याही परिस्थितीत बंद करायला नको. वर 2/3 bhk घरांत तितकेच बाथरूम आणि प्रत्येक बाथरूमला तीन ते सहा पाण्याचे outlet, kitchen टॅप, utility tap एवढ्या ठिकाणी पाणी द्यायव्हे आणि helpers च्या बाथरूमचे पाणी बंद! प्रत्येक घरात एकच बाथरूमला पाणी आणि फक्त kitchen मध्ये पाणी इतकं केलं असतं तरी हेलपर्स बाथरूम पाणी चालू राहिले असते आणि त्यांना वरच्या फ्लॅट्स मध्ये तोंड वेंगडायची वेळ आली नसती. मुळात च प्रॉब्लेम solving ability, empathy आणि डोकी नसतील तर अश्या लोकांकडे काम करायला लागले तर helpers ना त्रास होणारच!

अबाऊट नर्स- गॅस,
घरी कोणी मोठे नसेल, पेशनट आणि नर्स दोघेच असतील म्हणून नर्स ला गॅस पेटवता आला पाहिजे अशी अपेक्षा तुम्ही स्पष्ट सांगितली होती का?
नसेल तर त्या बद्दल चिडचिड करून काय फायदा?

ह्यात helpers चे बाथरूम पाणी बंद करणे inhuman आहे. ते एकमेव >>>>
मी 2015 च्या टंचाई बद्दल बोलतोय ज्यात पूर्ण बिल्डिंगलाच पाणी 2 तास यायचे, लोक घरी पाणी साठवून वापरायचे , कॉमन टॉयलेट ला पाणी साठवायचा मार्ग नव्हता म्हणून ती वेळ आली होती.

मूळ प्रश्नाला बगल दिलीत पण तुम्ही,

हेल्पर्स ना घरची वॉशरूम (3 पैकी 1क तरी)वापरू देत का?
तुम्ही देतही असाल पण किती जण वापरू देतात हा प्रश्न आहे,

व्हॉट एम्प्लॉयर्स थिंक अबाउट देअर (पर्मनंट अँड / ऑर टेम्पररी) एम्प्लॉईज.. या सदरात पण इथले मांडणे मोडू शकते का?

मी देव/संत/आयडीयल कंडिशन देणारा एम्प्लॉयर नाही.माझ्यापेक्षा चांगल्या कंडीशन देणारे अनेक असतील.

मुद्दा हा की घेताना ठरवलेली किमान कामं नीट झाली नाही म्हणून तक्रारीचा सूर काढला तर यांच्यावर अन्याय कसा होतो?
इथे मुद्दा बायका त्रास द्यायला बसलेल्या वगैरे नसून एका दिवसातले १० तास बाहेर असणार्‍या बाईला अमुक एक रक्कम देऊन अमुक एक ठरवलेल्या कामात ज प्रोफेशनॅलिझम अपेक्षित असतो, जो बरेचदा मिळत नाही, मनासारखे किंवा त्यातल्या त्यात चांगले काम करुन घेणे ही रोजची मानसिक एनर्जी खर्च करणारी लढाई बनते तिथे काय?
मी सगळे नियम पाळेन. बाईंना पी एफ देईन.मेडिकल देईन.मिनीमम वेजेस अ‍ॅक्ट ने पगार देईन.पण त्याच्या बदल्यात त्यांच्याकडून जो प्रोफेशनलिझम अपेक्षित आहे त्याबद्दल कोणी बोलेल का? की त्यावेळी 'बिचार्‍या आधीच गांजलेल्या, त्यांना नियम कसले घालायचे' म्हणून कर्तव्यांचा पार्ट गुंडाळला जाईल?

बायांवर अन्याय होतो. मलाही असे वाटते. बरेच एम्प्लॉयर त्यांचे शोषण करतात.त्यांच्यावर वाईट नजरा टाकतात.
पण इथे ज्यांना असे वाटते अश्या किती पार्टी शहरात या बायांबरोबर डे टू डे डायरेक्ट डील करतात? आपल्याला स्वतःला सगळीकडे वेळ कमी पडत असताना बाईंना एकच काम रोज प्रेमाने समजवून सांगण्यात कसा थकवा येतो हे त्यांनी एक फर्स्ट डीग्री स्टेकहोल्डर म्हणून अनुभवलंय का? नाही पटली की बदल बाई, असं करता येत नसतं प्रत्येक वेळी.

जमलं तर कोणत्याही medical assistant प्रॉव्हिडिर app वर जाऊन जेव्हा 24 hrs. 2 nurses इन 2 shifts अश्याच JD वाचा. फक्त पेशंट शेजारी बसून बघायचं नसतं की पेशंट कसा दिसतोय! संध्याकाळी घरचे ऑफिस हून परत आले तर घरांत मिट्ट काळोख. घरातले घाबरले काय झालं emergency phone का नाही आला? पटकन फोन करायला लाईट लावला तर attendant आणि पेशंट दोघे अंधारात बसलेले, nurse ला लाईटचे बटन शोधता आले नाही!

मी काम करतो तेव्हा माझ्या एम्प्लॉयरने माझ्यासाठी सगळं बेस्टच केलं पाहिजे. शक्य तितकं उत्तम काम मी करेन, पण तू सांगितलं की लगेच पटवून घेईन असं अजिबात नाही. जर तुला ते हवं असेल तर सांगकाम्यागिरी ही जमेल पण मग मी माझं डोकं बाजुला ठेवणार, जे तुला चालणार असेल तर बघ.
मला सुविधा मात्र जास्तित जास्त हव्याच. माझी कामाची पद्धत आवडत नसेल तर खुशाल काढुन टाक, पण जोपर्यंत माझ्या इतकीच त्याला पण गरज आहे तोपर्यंत त्याला आणि मला मिडल ग्राउंड काढतच प्रवास करायचा आहे. मागणी पुरवठा गणित त्याच्या बाजुला गेलं आणि मी गरजू बनलो की मी त्याच्या तालावर अर्थात नाचेन. कारण गरज मला आहे. अगेन, बेसिक मार्केट नियम पाळून पिळवणूक होणार नाही याची कायदा काळजी घेईलच.
मोलकरणी (यात प्रेग्नंसी कुठे येत नाही) या लो-स्किल, चीप लेबर आहेत. त्यांना माणुसकी नक्की दाखवू, वर्क प्लेस एथिक्स नक्की पाळू. पण म्हणून घरातल्या माणसाप्रमाणे त्या अजिबात नाहीत. परत एक गेली तर दुसरी तुलनेने सहज मिळणार आहे, सो मला गरज असली तरी पर्क्स मध्ये कोणी स्वतःचा फायदा बघितला तर ते फ्री इकॉनॉमीच्या नियमानेच होणारे. अर्थात बाथरुम वापरु न देणे हे क्रुर आहे.

 ना घरची वॉशरूम (3 पैकी 1क तरी)वापरू देत का?
तुम्ही देतही असाल पण किती जण वापरू देतात हा प्रश्न आहे, ---मी काय करते तो मुद्दा नाही. एक मोठा ड्रम विकत घ्यायला असा किती खर्च येतो? सोसायटीला परवडणार नाही का? हेलपर्स ना सांगायचं आपापला पाळी लावून रोज ड्रम भरायचा. नाहीतर security / gardner कोणाला तरी compulsory करता येतं.

तीन ते चार केसेस आहेत यात. बाकीचे चार्जेस जाऊ द्या. पण स्लेव्हरी आणि इल ट्रीटमेंट... हे कायदे कडक आहेत.

https://www.firstpost.com/world/devyani-khobragade-row-third-case-of-mai...

घरगुती मदतनीस म्हणता येणार नाही, पण आमच्या घरचा कचरा दर आठवड्याला घेऊन जाणारा माणूस कचर्‍याचा डबा नि झाकण रस्त्यावर फेकून देतो, त्यातून अनेक कटकटी होतात. पुनः नवीन डबे पण काही स्वस्त नाहीत!
त्या कटकटी इतक्या भारी असतात की कधी कधी स्वप्ने पडतात - डबे रस्त्यावर टाकले, झाकणे सापडत नाहीत, मी सैरावरी फिरतो आहे, झाकणे शोधत!
कधी कधी झोपेतून उठल्यावर पहावे तर खरेच डबे फेकून दिलेले असतात. "अमानवीय" या धाग्यावर लिहावे का हे?

मोलकरणींना लोकांनी कामावर ठेवलंय सोसायटीने नाही. त्यांच्या प्रसाधनगृहाची सोय एम्प्लॉयर करत नसेल तर ते इन-ह्युमेन आहे.
नंद्या Biggrin अगदी अगदी. कॅनडात असताना वार्‍याने डबेच्या डबे उडून जातायत आणि मी सैरावैरा पळतोय हे फॉल मध्ये एकदा तरी घडायचंच.

एम्प्लॉयर्स थिंक अबाउट देअर (पर्मनंट अँड / ऑर टेम्पररी) एम्प्लॉईज.. या सदरात पण इथले मांडणे मोडू शकते का?
Submitted by मानव पृथ्वीकर on 16 August, 2018 - 22:02
>>>>>>>
अर्थात, हा धागा त्या वरूनच स्फुरला आहे,
प्रेग लिव्ह चा एम्प्लॉयर्स च्या दृहतिकोनातून विचार-------> तुम्ही स्वतः एम्प्लॉयर् असताना काय करता------> डोमेस्टिक हेल्प बद्दल चे अनुभव असा प्रवास आहे

Pages