पहिले मी जेव्हा तुला ( भाग ६ )

Submitted by अनाहुत on 31 July, 2018 - 10:41

" I m sorry "
तिला त्याच्या डोळ्यात दिसणारं सॉरी त्याच्या ओठातूनही बाहेर पडलं होत ."असू दे रे किती मनाला लावून घेतोस . "
" नाही मी तुला असं अडवायला नको होत . " त्याच्या बोलण्यात तो दुखावल्याचे जाणवत होत .
" Its ok "
" नाही पण ... "
" पुरे यार किती तेच ते दुसरं काही तरी बोल ना मला कंटाळा आलाय तुझ्या sorry चा "
" माझा नाही ना आला कंटाळा ? "
" काहीही काय "
" हो तस असेल तर सांग "
" मी जाऊ का , म्हणजे तुला असच बोलायचं असेल तर जाते मी " ती वळून निघाली .
" कायमची निघालीस ? मला सोडून ? "
त्याच्या डोळ्यात पाणी होत आणि तो याच्यामुळे खूप हर्ट झाला होता .
" नाही रे असं काही नाही . आणि तू माझ्याशी भांडायचं सोडून हे असं मुळूमुळू का झाला आहेस मला नाही आवडत असं. "
" मी तुला आता आवडतही नाही ना "
" असं काय बोलतोय . मी काय बोलतेय आणि तू विषय कुठे घेऊन चालला आहेस ? "
' ठीक आहे ' असं म्हणत तो निघाला . त्याला आता त्याच्या भावना अनावर झाल्या होत्या आणि तो कोसळण्याच्या मार्गावर होता .
तिने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण त्याने हातानेच तिला थांबण्याचा इशारा केला आणि तो निघून गेला . ती त्याला जाताना पाहण्यापलीकडे काहीही करू शकली नाही .
पुढे दोन दिवस तो आलाच नाही . त्याचा फोनही लागत नव्हता . तिला अस्वस्थ वाटत होत . तिने त्याच्याबद्दल चौकशी केली पण कुणालाच काहीच माहित नव्हतं . तिला काय करावं हे सुचत नव्हतं .

दोन दिवसानंतर तो आला . त्याला पाहून तिला आभाळ ठेंगणं झालं होत . तिला त्याच्याशी बोलायचं होत पण तो मात्र अबोल अबोलच होता . शेवटी न राहवून तिने त्याला विचारलं " काय करतो आहेस ? आणि असा का वागतो आहेस ? मला त्रास होतोय याचा . "
" मलाही खूप त्रास झाला . पण नंतर खूप जास्त त्रास करून घेण्यापेक्षा काय तो त्रास आताच करून घेतलेला काय वाईट . तुला आता मी पूर्वीसारखा आवडत नाही ना . हे वाढत जाईल आणि एक दिवस तू जाशील माझ्यापासून दूर . नंतर हा त्रास नको म्हणून आताच जातोय . "
' ऐक तर ' म्हणेपर्यंत तो गेला
तिलाही राग आला होता . ' जा जातोय तर जा . '
पुढे काही दिवस त्रास होऊन सुद्धा ती त्याच्याशी नाही बोलली .
****

" हे हाय आय एम सॅम आय ऍम न्यू हिअर "
" ओह हाय "
" पण तू इतका लेट ऍडमिशन कस मिळालं तुला "
" थोडा जुगाड चलाया "
" जुगाड ? "
" अग थोड्या ट्रिक ओळखी पाळखी "
" ओह . बट नाईस वर्ड जुगाड "
" तुला आवडला मग आता तुझा . "
तिने एक्सप्रेशननेच ' म्हणजे काय ' असं विचारलं
" म्हणजे हा वर्ड तुझ्या मालकीचा "
" हे म्हणजे ब्रिटिशर्सनी मुंबई आंदण दिल्यासारखं आहे ना . जी गोष्ट स्वतःची नाही ती दुसऱ्याला दिल्यासारखं "
" या जगात असं खूप होत . पण दुसऱ्याच असं इथे कुठं काय असत . जो जिता वही सिकंदर . "
" तू काय बोलतोस मला कळत नाही कधीकधी "
" नाही कळलं कि सोडून देत जा जास्त टेन्शन नाही घ्यायचं "
" भारी आहेस रे तू "
" अपना तो एक हि फंडा है टेंशन नही लेनेका बस लाईफ एन्जॉय करनेका "
" भारी फंडा आहे "
****

" हे बघ ती माझ्या सोबत आहे "
" कधी दिसली तर नाही " - सागर
" आता आमचं थोडं बिनसलंय म्हणून "
" मग मला काहीच प्रॉब्लेम नाही जा जाऊन बोल तिच्याशी "
" मी बोलेनच , पण तू बोलायचं नाहीस तिच्याशी "
" का "
" मी सांगतो म्हणून "
" ती तुझ्या सोबत आहे ना "
" हो मग "
" मग विश्वास नाही का स्वतःवर , तुझी आहे तर तुझीच राहील .. खरंच तुझी असेल तर "
तो धावून आला
" थंड घे . हिम्मत असेल ना तर तिला अडवून स्वतःच्या हिमतीवर दाखव मला अडवून नाही "
" तू बघशील "
" बर "
****

" यार ह्याच्यामुळं तर टेन्शनच आलय "
" कुठन उपटल काय माहित "
" आणि तुला काय आताच सुचलं होत तिच्यापासून दूर जायचं "
" त्याला काय स्वप्न पडलं होत असं काही होईल म्हणून " त्याचा सगळा ग्रुप त्याच्या प्रोब्लेमवर विचार करत होता .
" ए बस करा आधी तर काही सुचत नाही आणि तुमचं आणि त्यात हे " तो चिडला त्यांच्यावर .
" त्याला ढोस देऊया का चांगला ? "
खरंतर त्याच्याही मनात होत हे पण त्यानं त्याला आव्हान देऊन बांधून ठेवलं होत . त्यामुळे त्याची तडफड होत होती . एकतर तो स्वतःहून तिच्यापासून दूर गेला होता आणि आता स्वतःहुन तिच्याशी बोलायचं त्याला अवघड वाटत होत . आणि तिच्याशी न बोलता तिला त्याच्यापासून दूर करण्याचा दुसरा कोणताही मार्ग त्याला दिसत नव्हता आणि त्याच्याबरोबर बोलणं झाल्यापासून सागर तिच्या आणखीनच जवळ जात होता आता तर तो खूप जास्त वेळ तिच्या सोबत राहू लागला होता .
शेवटी त्याला राहवलं नाही आणि त्याने तिच्याशी बोलायचं ठरवलं .
****

" ऐक ना "
तिने त्याच्याकडे लक्षच दिल नाही .
" ऐक ना काय बोलतोय मी "
" काय आहे आता काय बोलायचं आहे ? " ती रागातच होती .
त्यालाही राग आला आता . " समोरचा आपल्याशी काय बोलतोय ते ऐकून घ्यावं ना मग काय ते बोलायचं ना "
" मला काही ऐकायचं नाही तुझं . "
आता मात्र त्याच्यासमोर काहीच पर्याय शिल्लक राहिला नव्हता . पण त्याला तिने विचारही करू दिला नाही आणि ती निघून गेली तिथून . तो तसाच तडफडत राहिला .

.... क्रमशः

भाग १ : https://www.maayboli.com/node/63972
भाग २ : https://www.maayboli.com/node/64112
भाग ३ : https://www.maayboli.com/node/64527
भाग ४ : https://www.maayboli.com/node/66363
भाग ५ : https://www.maayboli.com/node/66936

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users