पाहिले मी जेव्हा तुला ( भाग ३ )

Submitted by अनाहुत on 15 November, 2017 - 22:37

" अग म्हणजे अशी प्रत्येक गोष्टच नाही कळत पण तरीही आपण समजतोच ना एकमेकांना . "

" म्हणजे selective गोष्टी समजतात आणि बाकीच्या नाही . पण कोणत्या समजतात आणि कोणत्या नाही ? "

" अग काय हे ? असं असत तुझं , मी काय बोलतोय आणि तुझं काहीतरी वेगळच . understanding आहे ना आपल्यात . "

" कसलं understanding जे कळायला हवं ते तर नाही कळत आणि बाकीचं समजून काय फायदा "... ती अस्पष्टसं ओठातल्या ओठात काहीस बोलली .

" काय ते ? मी ऐकलं नाही . "

" तू राहू दे तुला न बोलता सगळं कळत आणि बोललेलं ऐकूही येत नाही . "

" अगं असं का सांग ना काय ते ? "

" ते राहू दे, ते मी असाच बोलत होते . तू सांग तुझं लक्ष असत ना आजकाल कॉलेजमध्ये लेक्चर करत नाहीस . "

" आता मी लेक्चर द्यायला लागल्यावर कोण थांबणार आहे ? "

" PJ बंद कर रे . "

" मग तूच तर म्हटलीस . "

" मी तू लेक्चर अटेंड नाही करत त्याबद्दल बोलतेय , परत attendance चा प्रॉब्लेम होईल बर का . "

" असू दे, तुला काय त्याच ? माझं काय चाललय तुला काय माहित ? "

" का काय झालं ? "

" हम्म काय सांगू ? "

" ए सांगणारेस का ? "

" आता काय आणि कस सांगू ? "

" ए बास राहूदे तुझं . "

" अग तस नाही , सांगतोय मी "

" अरे बर आठवलं मला जरा काम आहे आलेच मी . "

" अग ऐक तरी ...."

" ए परत आता जाते मी . "
....................................................................................................................................................................
" अग काय कसलं एव्हढं काम आहे तुझं ? त्याला बोलायचं होत ना तुझ्याशी ? ऐकून नंतर जाता आलं असत ना ?

" अग उगाच भाव खात होता म्हणून निघाले आणि त्याच काही महत्वाचं नसत उगाच काहीतरी TP सुरु असतो .असं खूप serious असल्यासारखं बोलायचं आणि खरं तर महत्वाचं काहीच नसत . म्हणून निघाले ."

" पण खरंच काही असेल तर उगाच नको ... "

खरंच काही असेल का ? उगाच निघाले का मी ? थांबले असते तर ? छे उगाच आले मी काय बोलायचं होत त्याला ?
.......... क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users