पाहिले मी जेव्हा तुला ( भाग ४ )

Submitted by अनाहुत on 9 June, 2018 - 01:39

तिच्या डोक्यातली चक्र काही थांबत नव्हती . आणि त्याला आपल्याशी काय बोलायचं आहे याचाच विचार ती करत होती . तो समोर आला तरी त्याच्याशी काय आणि कसं बोलावं हे तिला कळत नव्हतं . पण मनातली घालमेल तिला स्वस्थ बसू देत नव्हती . शेवटी न राहवून तिने त्याला विचारलं
" तू काहीतरी बोलत होतास ना माझ्याशी ? काय बोलायचं होत तुला ? "
एकवेळ त्याने काहीतरी बोलण्यासाठी पवित्रा घेतला पण तो थांबला आणि थोड्या वेळ घेऊन म्हणाला
" मी काहीही बोलू शकतो नेहमीसारखा, पण मला खरंच त्रास होतोय आणि म्हणून आढेवेढे न घेता बोलतोय . खर सांगू तर कधी आणि कशी सवय झाली तुझी माहित नाही मला पण आता मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय आणि प्रेम आहे माझं तुझ्यावर . "
" काय बोलतोय तू ? " तिला तो अचानक असं बोलल्यावर काय प्रतिक्रिया द्यावी ते समजत नव्हतं त्यामुळं ती पटकन बोलून गेली .
" आणि मला माहित आहे तुझही माझ्यावर प्रेम आहे . विनाकारण नाही म्हणू नकोस . " तो आत्मविश्वासानं बोलला .आता तिला दुसरं काही बोलायला त्याने मार्गच ठेवला नव्हता .
त्यामुळे शेवटी ती बोलली
" मलाही हेच जाणवत होत .... " का कुणास ठाऊक पण ती लाजत होती आणि लाजून तिची मान सारखी खाली जात होती, तिला नीटस बोलताही येत नव्हतं . शेवटी ती अचानक गप्प झाली आणि खाली पाहू लागली . एव्हढ्यात " ए ते बघ काय पडलय ? " कुठं काय हे विचारण्यासाठी तिने त्याच्याकडे पाहिलं . त्याने नजरेनच खूण करून तिला तिकडे असं सांगितलं . ती तिकडे बघत होती पण तिला काही दिसलं नाही . म्हणून तिने परत त्याच्याकडे पाहिलं , ' काय ? ' असं विचारणार तेव्हढ्यात त्याने हाताचा इशारा करून एकीकडे दाखवलं आणि म्हणाला , " तो बघ तुझा कान पडलाय . " ती त्याच्या हाताच्या इशाऱ्याने आणि बोलण्यात अशी गुंतून गेली होती कि तिने तिकडे पहिले आणि तिचा हातही अभावीतपणे कानाकडे गेला , स्वतःची चूक समजून ती हसू लागली " कसा आहेस रे तू ? सारखं असं का करतो ? " तिच्या चेह-यावरची स्माईल तशीच होती .
" त्याशिवाय तू कशी बोलली असतीस . प्रेम आहे म्हणून माझी मैत्रीण हरवत होती ती सापडली परत . " ती त्याच्याकडं पाहत होती . ' हे त्याला चांगलं जमत एखादा विषय एकदम कसा बदलायचा याच्यात त्याची मास्टरी होती . ' त्याच्या बोलण्यामुळे ती बरीचशी नॉर्मल झाली आणि म्हणाली
" मलाही हेच जाणवत होत पण एकीकडे हेही वाटत होत कि हे बरोबर नाही . मला माझ्या आयुष्यात खूप काही करायचं आहे आणि या अशा सगळ्यात पडून मला कस चालेल . एकतर आपल्यात कोणत्याच बाबतीत साम्य नाही . आपली आर्थिक परिस्थिती किती वेगळी आहे आणि ...."
" तुझं प्रेम आहे ना माझ्यावर .... " त्याने तिला पुढे बोलू न देता विचारलं .
" हो " हे मात्र ती ठामपणे म्हणाली .
" मग झालं तर बाकीच्या गोष्टी नंतर आधी हेच महत्वाचं आहे " तो तिला विश्वास देत म्हणाला .
" तू आणि मी जोपर्यंत वेगळे होतो तोपर्यंत हे तुझे आणि माझे प्रॉब्लेम होते पण जेव्हा आपण एकत्र आहोत तेव्हा हा आपला प्रॉब्लेम आहे . आणि तो तितक्याच सहजपणे सुटू शकतो " तिचा हात त्याच्या हातात होता . त्याच्या स्पर्शाने तिला धीर दिला होता .
आता शब्दांची काही गरज नव्हती फक्त स्पर्शातून व्यक्त होत गेल्या त्यांच्या भावना . एकमेकांच्या डोळ्यात पाहून दोघेही त्याचा ठाव शोधण्याचा प्रयत्न करत होते .
***

" ए काय ग तू आजकाल माझ्याशी भांडत नाहीस ? " - तो
" आता नाही वाटत भांडाव वाटत तुझ्याशी ? " ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली
" का गं ? " त्यांनही तिच्या डोळ्यात पाहत विचारलं .
" नाही माहित पण नाही भांडावस वाटत . " तिच्यासोबत तिच्या डोळ्यातलं प्रेमही बोलत होत .
" अग अशी का दिसतेय आज ? " त्यांनही ते वाचत विचारलं .
" का ठीक नाही दिसत का ? " ती एकदम बावरून गेली आणि स्वतःला चेक करत म्हणाली .
" अगं वेगळी दिसतेय. " तो तिच्याकडेच पहात होता .
" चांगली नाही का दिसत ? " तिने परत विचारलं .
" छान दिसतेयस . "
असं म्हणत त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवले आणि तिच्या डोळ्यात पाहू लागला तीही त्याच्याकडे पाहू लागली . त्याला ती आज नेहमीपेक्षा जास्तच सुंदर दिसत होती . आणि तिला पाहून तो तिच्याकडे ओढला जाऊ लागला . दोघांमधलं अंतर हळूहळू कमी होऊ लागलं . तो तिच्या खूप जवळ आला होता . तिच्या डोळ्यात चलबिचल होऊ लागली .
" ए नको ना प्लिज . " तिने दूर व्हायचा प्रयत्न केला .
" का ग काय झालं ? " त्याला तिच्यापासून दूर व्हायचं नव्हतं पण तिची चलबिचल त्याला जाणवत होती .
" मला ऑड वाटतंय . " तिनं त्याला स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न केला .
" इट्स ओके " म्हणत तो तिच्यापासून दूर झाला .
" मला असं ठीक वाटत नाही " ती अजूनही अनकंफर्टेबलच होती .
****

" त्याला हिम्मत लागते . दुसऱ्या कुणाला थोडीच स्वतःच्या गर्लफ्रेंडला किस करायचं आहे ना . " शरद त्याला आव्हान देत म्हणाला . सगळ्या ग्रुपसमोर असं आव्हान दिल्याने त्याला विचित्र वाटत होत .
****

तो तिच्या जवळ येत होता . ती मानेने नकार देण्याचा प्रयत्न करत होती पण तो आज ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता तिनं बोलण्यासाठी तोंड उघडण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत त्याने त्याचे ओठ तिच्या ओठावर टेकवले क्षणभरच आणि तो दूर झाला . त्याने तिच्याकडे प्रेमाने पाहिले पण तिच्या डोळ्यात पाणी होत
" अग काय झालं ? "
तिने काहीही उत्तर दिल नाही . तिच्या डोळ्यात पाणी मात्र तसच होत .
"ओह आय एम सॉरी " त्याला हे ठीक वाटलं नाही .
" असं सगळ्यां समोर ... " ती आणखीनच रडवेली झाली .
" आय एम सॉरी माझ्या लक्षातच नाही आलं . पण आता कान पकडतो तू म्हणालीस तर लग्नानंतरही तुला हातही लावणार नाही . " त्याने कान पकडत तिला विनवणी केली .
" तस नाही रे असं सगळ्यांसमोर कशाला प्रदर्शन ? "
" ओके मी परत असं करणार नाही प्रॉमिस "
ती अजूनही comfortable वाटत नव्हती पण त्याच्या समाधानासाठी वरवरचं हसली .
****

ती त्याला तो फोटो दाखवत होती . त्या दोघांचा फोटो whatsapp वरून तिला कुणीतरी सेंड केला होता .
" हे बघ यासाठी म्हणत होते मी . " त्याला आता राग आला होता . " तुला कोणी पाठवला ? "
" त्यानी काय फरक पडतो ? आपलं parsonal life असं सार्वजनिक होत ते मला नको आहे . "
" I am sorry . पण सांग तो मेसेज कुणी केला होता . हे काम कुणाचं आहे ते शोधुदे मला "
" राहू दे रे . "
ती त्याला सांगत नव्हती पण त्याने बोलता बोलता तिचा मोबाईल चेक केला होता आणि आता त्याला ते नाव समजलं होत ... विशाखा

.... क्रमशः

भाग १ : https://www.maayboli.com/node/63972
भाग २ : https://www.maayboli.com/node/64112
भाग ३ : https://www.maayboli.com/node/64527

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तीन तासांच्या सिनेमाची कथा १० मिनिटात सांगितल्यासारखे वाटतंय. ..कृपया कथा अजून खुलवता आली तर चांगली वाटेल वाचताना.. आत्ता धावत पळत वाचल्यासारखे वाटतंय .. वाचून संपल्यावर जास्त काही लक्षात राहत नाही