करणी प्रकार खरेच असतो का????

Submitted by VB on 30 June, 2018 - 02:39

आज सकाळी माझ्यासोबत थोडा विचित्र प्रकार घडला. झाले असे की आज शनिवार असल्यामुळे थोडी ऊशिरा निघाली ऑफिसला. रोजची ट्रेन नसल्यामुळे एकटीच होते. बोलायला कोणी नव्हते सोबत त्यामुळे आपोआप तंद्री लागली , स्वत:च्याच विचारात गुंतली होती. मधे अचानक एका बाईचा आवाज कानावर पडला. म्हणे " बेबी, राग येणार नसेल तर काही बोलु का?" , अचानक तंद्री तुटल्यामुळे आधी काही कळलेच नाही, मग भानावर आल्यावर म्हटल , "बोला काय बोलायचे आहे". त्यावर खुप विचीत्र प्रकारे माझे निरीक्षण करत त्या बोल्ल्या की " मला त्यातले कळते, आणी तुला पाहुन हे जाणवितेय की तुझ्यावर कुणीतरी करणी केलीये. " मला एक क्षण कळलेच नाही की ती काय बोलतीये. नुसती बघत बसली मी तीला, ते पाहुन माझ्या बाजुला बसलेल्या एक काकु त्यांना ओरडल्या, की काहिही का बरळताय, का घाबरवताय या मुलीला. त्यावर त्या बाईने स्पष्टीकरण दिले की " हिला खुप धोका आहे असे दिसले, अगदीच रहावले नाही म्हणुन बोलली आणी मी नक्की सांगु शकते की ही खुप त्रासात आहे वगैरे" ईतक्यात अजुन दोघी-तीघी त्यांना ओरडल्या म्हणुन त्या तिथुन निघुन गेल्या. ईतक्यात माझे स्टेशन आले म्हणुन मी उतरली.
तरी खुप सारे प्रश्न मनात आलेच, म्हणजे जरी माझा देव , करणी , भुते यासर्वावर विश्वास नसला तरी खरेच माझ्या मनात काही प्रश्न आले, जसे
ईतक्या जणी मधुन ती मलाच असे का बोलली?
खरेच करणी वगैरे असते का?
तिचे मी त्रासात वगैरे असणे अगदीच काही चुकीचे नव्हते, पण कदाचित ते माझ्या चेहर्यावरुन किंवा माझी जि तंद्री लागली ते पाहुन ती असे बोलली असेल?
अन हे असे मला सांगुन तिला नक्की काय मिळाले? म्हणजे यापुर्वी मी तिला कधी पाहिल्याचे आठवत नाही, किंवा आताही तीने काही पैसे वगैरे मागीतले नाही.

या प्रकाराबद्द्ल ईथे कुणाला काही शेअर करायचे असेल नक्कीच लिहा.

**** वेमा, जर हा धागा नियमात बसत नसेल तर ऊडवा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चमत्कारांचे विज्ञान
प्रा. अद्वयानंद गळतगे
http://www.ajabgroup.com/shop/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4...

एक प्रकरण वाचून पहा. साठ रूपये किंमत आहे फक्त. वाचून पहायला काय हरकत आहे ? नंतर मत मांडता येईल ना ?
http://www.ajabgroup.com/wp-content/uploads/2016/08/493.pdf

कोकणात एकफम आडगावात माझ्या आजोबांकजी जमीन,घर होते.आजोबा मुंबैत नोकरी करायचे.तेव्हा हा माणूस गावी येणार नाही हया विश्वासात ठेठ करणी/मूठ मारणे प्रकार सुरु zaale.दर पौर्णिमा/अमावस्येला गुलाल टाकलेला भात आणि काहीवेळा कोंबडे मारून असायचे.ज्याला भागेली म्हणून नेमले होते तो मस्त पैकी भातावर्चा गुलाल वगैरे काढून बाकी भय खायचा.कोंबडे असेल त्यावेळी रस्सा करूँ खायचा.

काळी विद्या असते. हे खरे आहे. पण ती करणारी मानसे फार दुर्मीळ आहेत. त्यांचे साध्यही वेगळे असते. तिचा प्रयोग असा काही रुपयांसाठी एकाचं एकून दुसऱ्यावर करण्याईतका तो प्रकार सहज नाही. हे म्हणजे आयुष्यभराची कमाई देउन त्याबदल्यात भोपळा घेतल्यासारखे झाले. ज्याला वाटते आपल्यावर करणी झाली त्याने एक विचार करावा "आपल्याकडे असं काय आहे की कोणी आपल्यावर करनी करावी?" उत्तर मिळेल. Happy
(मी देव मानतो आणि तो "जैसा दीपु ठेविला परिवरी। कवणाते नियमी ना निवारी॥ असा आहे. माझा देव ही माझी फार वैयक्तीक बाब आहे. )

VB ताई , त्या बाई तुम्हालाच असे का म्हणाल्या हे समाजाने कठीण आहे
काद्दचीत त्या या विषयातील जाणकार असाव्यात किंवा फसवणूक ही असू शकते

तंत्र प्रयोग करणी व काळी जादू याबद्दल अधिक माहिती माझ्या या ध्याग्यावर पहा

https://www.misalpav.com/node/23985

पण कदाचित ते माझ्या चेहर्यावरुन किंवा माझी जि तंद्री लागली ते पाहुन ती असे बोलली असेल?>>> हो अगदी तसेच.
व्हीबी आपण तणावात आहात हे तिने ओळखले. अशा वेळी मन द्विधा झालेले असते. कौन्सिलर व सायकोथेरपीस्ट ची मदत घ्या

पहिली 10च पानं आहेत मिटी स्टफ मिस होतोय. असं नका हो करू.>>>>>>>>>
ट्रेलर आहे ते सर, तिकीट काढण्याची उत्सुकता वाटेल इतकेच एक्सपोज करते Lol

करणी जे मानतात त्यांच्यासाठी आहे. लोकांना अनुभव येतात पण स्पष्टीकरण लगेच सापडत नाही. ते अनुभव करणीच्या नावाखाली जातात. दुबळ्या मनाचे लोक बळी पडतात.

तुम्हाला भेटलेल्या बाईला तिचे म्हणणे पूर्ण करता आले नाही, नाहीतर तिने पुढे जाऊन तुम्हाला उपाय सुचवला असता व त्याचे पर्यवसान पैशांचा फटका बसण्यात झाले असते हे 100 टक्के.

मी असे म्हणू शकते कारण मी अनुभव घेतलाय. काही वर्षांपूर्वी काही कठीण विवंचनेतून जात असताना मी मानसिकरित्या खूप डिस्टरब होते. त्यामुळे घरी दारी कायम तंद्रीत असायचे. एकदा दुपारी दारावर दोन बाया आल्या. गुरू व शिष्य अशा रुपात. माझ्याकडे येण्याआधी आमच्या कॉमन गॅलरीत उभे राहून त्यांचे आजूबाजूचे सगळे निरीक्षण करून झाले असणार. या लोकांना निरीक्षणातून निष्कर्ष काढणे व फेसरीडिंग चांगले जमते. मला कोणता व किती त्रास आहे, माझ्या शेजारचे कसे जळतात, त्यामुळे माझा त्रास कसा वाढतोय वगैरे बोलून झाले. बोललेले सगळे माझ्या परिस्थितीशी जुळणारे होते. माझ्याशी बोलताना घरात कोण आहे, नाही हेही दिसत होतेच. त्याला अनुसरून बोलणे करून, माझ्यावर कुणी वाईट करणी केलीय, ती निवारायला खर्च आहे, पण आमची गुरू 300 रुपयात करेल हे सांगून माझ्याकडून पैसे घेतले गेले. माझ्या डोक्यावरती तेव्हा धोंडा पडलेला. कारण हेच की मलाच का बोलली, माझा त्रास नेमका कसा कळला वगैरे विचार करून मी विश्वास ठेवला. खरेतर ती बाई खूप मोघम बोलत होती पण तिच्या बोलण्याचा अर्थ मी मला हवा तोच तसाच। काढत होते, तिचे मोघम बोलणे मी माझ्या त्रासाशी जोडत होते. हे सगळे मी करत होते, ती फक्त सुचवत होती. 300 रु गेले ते गेलेच वर त्यामुळे अमुक तमुक होईल असे जे आश्वासन दिले गेले होते ते कधी घडलेच नाही, घडणार नव्हतेच. त्यानंतरही मी एकदा फसले. भांड्यात तांदूळ भरून त्यावर अगरबत्ती पुरून वर पाणी टाकुन ती अगरबत्ती जशी फिरली त्यावरून मोघम बोलून फसवलं व 100 रु उकळले. मी तेव्हा इतकी त्रासात होते की कुठल्याही मार्गाने त्रास कमी झाला तर मला हवा होता. त्यामुळे सारासार बुद्धी गहाण पडली.

सर्वप्रथम, एक व्याख्या आपल्या सर्वांसमोर आपण मांडून ठेऊ. म्हणजे वैचारिक गोंधळ न होता त्याधारे पुढे बोलता येईल.

विवेकवाद किंवा बुद्धीप्रामाण्यवाद म्हणजे गणित.
Science ultimately boils down to Mathematics. If it doesn't it is not science. Science is nothing but applied Mathematics.

दोन अधिक तीन म्हणजे पाच. यात कोणताही वाद असण्याचे कारण नाही. यापेक्षा वेगळे उत्तर म्हणजे मनोरंजन.

म्हणून:
१. माझी अत्यंत श्रद्धा आहे त्यामुळे दोन अधिक तीन चे उत्तर सात आले
२. नामस्मरण केल्याने उत्तर साडेपाच आले
३. सामान्यत: उत्तर पाचच येते पण त्यादिवशी कुणीतरी करणी केल्याने चार आले
४. शाळेची जागा बाधलेली होती. कोंबडे कापले नव्हते. त्यामुळे कुणीही हे गणित केले कि उत्तर साडेचारच येत असे

ह्या व अशा विधानांना मनोरंजन यापलीकडे अर्थ नाही.

या पार्श्वभूमीवर पुढील चर्चा करू. या पार्श्वभूमीवर मधुर आंबेकर शेजवलकर यांनी दिलेले पुस्तक मी वाचतो, तुम्हीही वाचा.

मी प्रतिसाद वाचले आहेत. वडाची साल वांग्याला लावलेले प्रतिसाद इग्नोर केले आहेत. उदा. शशिकांत ओक यांचे प्रतिसाद विशिष्ट घटनांबाबत आहेत. तसेच ते स्वतःचे म्हणणे मांडत आहेत. त्यात मला गळतगे यांचे म्हणणे काय हे समजले नाही. त्यांना ट्रोल केलेले दिसले. रमेश भिडे यांनाही मिसळपास या ठिकाणी ट्रोल करण्यात आले असे दिसतेय.

पण माझे म्हणणे या दोघांप्रमाणे नाही. मी आग्रह देखील करत नाही.
माझे म्हणणे इतकेच की विज्ञान शक्यतांचा विचार करते. पृथ्वी चपटी आहे हे एके काळी विज्ञान होते. ती गोल आहे असे म्हणणे हास्यास्पदच होते. त्या वेळी अशी शक्यता मांडली तेव्हां दोन गोष्टी घडू शकत होत्या

१. पृथ्वी गोल आहे हे सिद्ध करता न येणे
२. पृथ्वी गोल आहे हे सिद्ध करता येणे

पैकी दुसरी शक्यता सत्यात आली आहे. पण पहिल्या प्रयत्नात पृथ्वी गोल आहे हे सिद्ध करता येणे शक्यच नव्हते. कारण साधनांची कमतरता. त्यामुळे सैद्धांतिक पातळीवर ते मान्य केले जाऊ शकत होते.

मी गळतगे यांचे पुस्तक वाचलेले नाही. मी त्याचा प्रचार करत नाही. माझे म्हणणे इतकेच आहे की ते म्हणतात त्याप्रमाणे काही गोष्टींचा वेध आजच्या विज्ञानाला घेता आलेला नाही याचे वरील पार्श्वभूमीवर स्वागत केले पाहीजे आणि खुल्या मनाने त्यांना ते सिद्ध करू दिले पाहीजे. त्यासाठी ते किमान ऐकून घेतले पाहीजे, वाचले पाहीजे. न वाचताच ते हास्यास्पद आहे हा वैज्ञानिक दृष्टीकोण कसा काय असू शकतो ?

ड्युआयडीद्वारे वैयक्तिक हल्ले करायचे असतील तर मला या काहीच फरक पडत नाही. तसेच माझे म्हणणे न पटले, पटले तरी नाही. मला काही गोल्ड मेडल मिळणार नाही.

"पृथ्वी चपटी आहे हे एके काळी विज्ञान होते"

==> हे चुकीचे विधान आहे. पृथ्वी सपाट/चपटी आहे असे विज्ञान नव्हे तर धर्माने सांगितले होते

"काही गोष्टींचा वेध आजच्या विज्ञानाला घेता आलेला नाही याचे वरील पार्श्वभूमीवर स्वागत केले पाहीजे"

==> विज्ञानाला अनेक गोष्टी अद्याप अवगत नाहीत. विज्ञान कधीही "हेच सर्वज्ञान" असा दावा करत नाही. अशा बाबतीत आधी थियरी मांडली जाते आणि ती विवेकवादाच्या आधारे सिद्ध करावी लागते. आधी सिद्ध केली असेल तरीही त्यावर विवेकवादी शंका वा प्रश्न विचारणे हा विज्ञानाचा मार्ग. कोणी म्हणतंय किंवा कुणालातरी जाणवतेय/वाटतंय म्हणून ग्राह्य धरले जात नाही.

पूर्वी (कधीपर्यंत हे ठाऊक नाही) विज्ञान आणि अध्यात्म हे पूर्वी एकच होते. विज्ञान अध्यात्माचा भाग आहे, तत्त्वज्ञानाचा भाग आहे असे मानले जात असे. स्वतंत्र वैज्ञानिक दृष्टीकोण विकसित व्हायला वेळ लागला. त्यामुळे विज्ञान चर्चच्या अखत्यारीत येत होते.

साधना आपण आपली फसवणूक कबूल केलीत हे कौतुकास्पद आहे.
300 रुपये फार नाहीत. आमच्या घरच्यांनी पाच हजार उडवलेले. मी कॉलेजात होतो. घरच्यांशी भांडून वाद घालून त्यांचा तो अक्कल गहाण पडायचा क्षण टाळायचा बराच प्रयत्न केला. त्या बुवा लोकांना तोंडावर उडवून लावले. तसे आमच्या घरचे त्यांना बोलले की पोरगा नास्तिक आहे, लक्ष देऊ नका..

असेच दोन भामटे होते जे बहुधा बिल्डींगमधील लोकांची बरीच माहिती काढून आलेले. आधी कॉमन पॅसेजमध्ये बडबड केली आणि मग एकेकाच्या घरी जाऊन लुबाडायला सुरुवात केली.
आमचे बिल्डींगमधील एका बाईशी तेव्हा पटायचे नाही. तर नेमके तिचे वर्णन करत म्हणाले अश्या एका बाईची नजर लागली आहे. झाले आमच्या घरचे गंडले.

संध्याकाळी जेव्हा बिल्डींगमधील सारे लोक एकत्र येत आपल्या अनुभवांवर चर्चा करू लागले की कोणाला कसे गंडवले आणि कोण कसा वाचला तेव्हा घरच्यांना माझे पटले.

अर्थात तरीही या प्रकारांवरचा त्यांचा विश्वास कायम आहेच.

माझ्या लग्नामध्ये अडचण होती. मृत्युयोग होता. म्हणून 25 हजारांचा खर्च करत काही उपद्व्याप केलेच. तेव्हा मात्र मी विरोध करू शकलो नाही कारण हात दगडाखाली होते. मोठ्या नशीबाने आंतरजातीय विवाहाला तयार झाले होते, त्यात अजून मतभेद ताणतणाव मला नको होते.

एकदा तुम्ही विश्वास ठेवला या जगात देव आहे की मग त्याला कुठल्यातरी रुपात शोधायला जातात. आणि म्हणूनच मी थेट देव या संकल्पनेलाच विरोध करतो.

V B, तुम्हालाच का याचं स्पष्टीकरण मला तरी वाटतं की बाकीच्यांपेक्षा तुम्ही जास्त तणावाखाली दिसत असणार आणि मिळाले शे दोनशे तर का सोडा . असं म्हणलंय कारण हे काम कुणी फुकट करत नाही.
मी सुद्धा या बुवाबाजी प्रकाराला फसलीय. काही वर्षांपूर्वी मी प्रचंड त्रासदायक परिस्थितीतून जात होते. तेव्हा माझ्या ओळखीच्या एक काकू मला म्हणल्या की त्यांचा एक गुरू आहे . ते सगळ्यातून मार्ग काढतात. त्या काकू जेव्हा त्यांच्या आर्थिक विवनचनेतून वैतागून जीव द्यायची भाषा करत होत्या तेव्हा त्यांना ते गुरू भेटले होते आणि त्या गुरूंनी काकूंना सांगितलेले की येत्या 10 दिवसात तुम्हाला पैशाचा मार्ग सापडेल आणि खरोखरच 10 दिवसाच्या आत त्यांच्याकडे शिवण शिकायला 10 मुलींचा ग्रुप आला . काकांना नवीन नोकरी लागली. फार नाही पण बुडत्याला काडीचा आधार झाला . निदान त्यांच्या डोक्यातून ते आत्महत्येचे विचार गेले . वगैरे ऐकून मी ही त्यांना भेटले . 250 रु पहिल्या visit चे घेतले. मंतरलेले काळे उडीद 4 चमचे दिलेले ते घरभर पसरायचे होते. मी चक्क ते केले सुद्धा .
काहीही उपयोग झाला नाही. पैसे अक्कलखाती गेले. खरं तर 6 महिन्यांपूर्वी जर मला कोणी सांगितलं असतं की तू 6 महिन्यांनी असा प्रकार करणार आहेस तर मी संगणार्याला वेड्यात काढलं असतं अशी मी होते. पण परिस्थितीपुढे आपण कमकुवत होतो आणि मग विचार करतो की सारासार विचार करून काहीही निष्पन्न होत नाहीये तर असं करून बघण्यात काय वाईट आहे?

हया प्रकाराला काय म्हणतात ते माहित नाही.चेम्बूर मधल्या एका प्रसिद्ध दुकानात खरेदीनंतर पैसे देत होते.त्यावेळी माzee नजर सहज त्याचयासमोरच्या थाळीत गेली .दोंन लिंबे कापून गुलाल की कुंकू आणि अबीर लावलेली होती.थाळीत अजून ही काहीतरी होते तांदूळ की फुले आठवत नाही.एकदम लालभडक कुंकू,अबीर pivalee लिम्बे,ती सारी रंगसंगती मस्त दिसत होती.सुटे पैसे मिळेपर्यन्त ते पाहिले. केशियरचया अगदी जवळ होते .१० मिनिटानंतर डोके असह्य दुखू लागले.ऑफिसमधून आल्यामुळे किंवा भूक लागल्यामुले असेल म्हणून लक्ष दिले नाही.
दोन ते तीन तास दोके ठणकत होते.परत काही दिवसाने त्या दुकानात गेल्यावर लिम्बाकडे अगदी सहज नजर गेली.परत तोच किस्सा रिपिट zaala.ती तीव्र डोकेदुखी परत व्हायला नको म्हणून आजतागायत परत कधीही त्या थालिकडे पाहिले नाही.
कदाचित योगायोग असेलही पं डोक्याची शकले होतील अशी डोकेदुखी नको म्हणून जाणीवपूर्वक पहात नाही.

सर्वांचे आभार

मी हा किस्सा इथे लिहिला कारण, असेच काही इतर कुणाचे अनुभव असतील तर ते त्यांनी इथे सांगावे अन मनात जे प्रश्न आले ते मांडावेसे वाटले.
माझा देवावर विश्वास नाही, अन ह्या असल्या प्रकारांवर सुद्धा नाही. त्या दिवशी मी त्रासात होते म्हणजे गेले दोन दिवस मला ताप अन लो बिपी होता (पावसात भिजयची मस्ती जिरली अजून काय) त्यात ऑफिसमध्ये कामाचा जोर वाढलेला त्यामुळे गरज असूनही सुट्टी घेता येत नव्हती. त्यामुळे नाही म्हणायला चेहर्यावर थोडे आजारपण अन थकवा आलेच होते. म्हणून कदाचित त्या बाईला तसे वाटले असावे.
इथे आलेले काही प्रतिसाद जे मला पटले अन मी स्वतः याबद्दल जो विचार केला त्यावरून तरी माझा आधीचेच मत योग्य आहे असे वाटते "न देव आहे न भूत" तसेच करणी वगैरे सुद्धा नसावेच.
तरी एक शंका आहे, मी लहान असल्या पासून म्हणजे खरेतर जन्मापासून पौर्णिमा ते चतुर्थी मला खूप त्रास होतो. त्रास म्हणजे खूप चिडचिड होते, बिनकारणी रडू येते, उदास वाटते. या काळात माझ्याजवळची माझी अशी बरीच मानसेदेखील माझ्यापासून दुरावलेली आहेत. माझी मम्मी ही सांगते की मी खूप रडायचे या दिवसात, खूप काही केले पण फरक पडला नाही.
या शनिवारी देखील द्वितीया होती, तर त्याचा अन ह्या घटनेचा काही संबंध असू शकेल का असा एक विचार येतोय मनात. कारण नेहमी प्रमाणे आताही मला पौर्णिमा आल्याचे वगैरे माहीत/लक्षात नव्हते. आता हे नेहमीचेच झालेय की मला असा काही त्रास झाला की समजा पौर्णिमा नुकताच झाली

मागच्या महिन्यात सहकुटूंब अष्टविनायक यात्रा केली. (मी स्वतः नास्तिक असुनही दुसर्‍यांच्या श्रद्धेला डिवचत नाही.) मोरेश्वरच्या देवळाबाहेर एक माणूस माझ्याजवळ आला आणि सांगू लागला की त्याला फेसरिडींग येतं. त्याने दोन-तीन वाक्य बरोबर सांगितली. ही माहिती थोडसं निरिक्षण केल्यावर मिळतेच प्रत्येकाला असं नाही, पण जे काही होतं त्याच्याकडे त्याला कला निश्चित म्हणू शकू. माझा स्वभाव माहित असल्यामुळे माझं सगळं कुटूंब आता पुढं काय होणार म्हणून गंमत बघत उभं होतं. मी त्याला म्हणलं, हे बघ बाबा, माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही. पण तुला हे येत असेल तर मला माहित असलेल्या गोष्टी सांगून मला काय उपयोग? त्यापेक्षा तुझी ही शक्ती/कला वापरून तू मला असं काहितरी सांग ज्याच्यात आपला दोघांचा फायदा होईल. लॉटरीचा नंबर वगैरे सांग. बक्षीस मिळालं की मी तुला त्यातला त्यातले अर्धे पैसे देइन. पण त्याआधी एक छदाम देणार नाही. असं म्हणल्यावर तो रागावून निघून गेला.

<<< व्हीबी आपण तणावात आहात हे तिने ओळखले. अशा वेळी मन द्विधा झालेले असते. कौन्सिलर व सायकोथेरपीस्ट ची मदत घ्या >>>
+१

अॅमी , अहो मी काही तणावात वगैरे नाहीये सध्या, तेव्हा फक्त आजारी असल्यामुळे , त्रासात आहे असे वाटले असेल . असे मला बोलायचे होते. Happy

काळी विद्या असते. हे खरे आहे. पण ती करणारी मानसे फार दुर्मीळ आहेत. त्यांचे साध्यही वेगळे असते. तिचा प्रयोग असा काही रुपयांसाठी एकाचं एकून दुसऱ्यावर करण्याईतका तो प्रकार सहज नाही. हे म्हणजे आयुष्यभराची कमाई देउन त्याबदल्यात भोपळा घेतल्यासारखे झाले. ज्याला वाटते आपल्यावर करणी झाली त्याने एक विचार करावा "आपल्याकडे असं काय आहे की कोणी आपल्यावर करनी करावी?" उत्तर मिळेल. Happy
(मी देव मानतो आणि तो "जैसा दीपु ठेविला परिवरी। कवणाते नियमी ना निवारी॥ असा आहे. माझा देव ही माझी फार वैयक्तीक बाब आहे. )
अगदी खरे आहे शाली.

इतर बायका लगेच तुमच्या मदतीला आल्या हे वाचून चांगले वाटले.

तिचे मी त्रासात वगैरे असणे अगदीच काही चुकीचे नव्हते, पण कदाचित ते माझ्या चेहर्यावरुन किंवा माझी जि तंद्री लागली ते पाहुन ती असे बोलली असेल?>>>
अर्थात. असेच हेरुन खडा टाकून बघतात हे लोक, पैसे उकळायला कोणी सावज मिळते का हे बघायला.

प्रवासात पाहिलेत असे लोक. बरेचदा यांचाच एखादा माणूस असतो, जो हो हो, तूम्ही कसं ओळखलं, हे पण बरोबर ते पण बरोबर करत त्या व्यक्तीच्या "जाणकारपणाची" छाप इतरांवर पाडतो, आणि मग इतरांना त्यात ओढतात.

पैसे कमवायचे धंदे असतात हे
हातोहात फसवत असतात लोकांना. माझ्या साबा ला बर्‍याच जनांनी गंडवलयं. तरीही त्या अशा लोकांवर विश्वास ठेवतात. अतिशयोक्ती वाटेल पण काही हजारांचा चुना लागला आहे.

करणी भानामती व्हूडू तंत्रप्रयोग हे १००% खरे वास्तव आहे . वामाचारी तंत्रमार्गात षट्कर्म म्हणून प्रकार आहे .यात स्तंभन मारण मोहन उच्चाटन वशीकरण विद्वेषण इत्यादी प्रकार असतात . दशमहाविद्या तसेच बंगाली काळी जादू करणारे लोक यात पारंगत असतात . आसाम कामाख्या देवी मंदिरानजिक असल्या तांत्रिकांचा सुळसुळाट असतो

Pages