कडेगावची भानामती आणि अंनिसची बुवाबाजी विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मुलन प्रकरण 1. ---

Submitted by शशिकांत ओक on 9 February, 2012 - 06:40

मित्र हो,
नुकताच ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे यांचा ब्लॉग तयार झाला. त्यातील काही मजकूर मिपाकरांनी वाचावा.विचार करावा.
खालील अभिप्राय बोलका आहे.
...श्रद्धेचे अस्तित्व मानवी जीवनात अपरिहार्य आहे. हे प्रमेय विज्ञानाच्या आधारेच सिद्ध करण्यासाठी अद्वयानंद यांनी पाश्चात्य शास्त्रज्ञ संशोधकांचा आधार घेऊन केलेला युक्तिवाद खरोखरच स्तिमित करणारा आहे. बुद्धिवादाचा तसेच विज्ञाननिष्ठेचा मक्ता आपल्याकडेच आहे असे मानणाऱ्यांनी या पुस्तकातील युक्तिवाद आपल्या भूमिकेकडे नव्यादृष्टीने पहाण्याची निकड जाणवून देईल. या पुस्तकाचा सखोल अभ्यास प्रत्येक विचारवंत तरुणाने करायला हवा....

....... . दैनिक लोकमत -शंकर सारडा

विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 1. --- कडेगावची भानामती आणि अंनिसची बुवाबाजी
विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन
प्रकरण 1. कडेगावची भानामती आणि आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बुवाबाजी
कराडच्या पुर्वेस 20 किमीवर असलेल्या कडेगाव या गावी भानामतीचा विलक्षण प्रकार सुरू झाल्याची बातमी 15 मार्च 1988 च्या दै. पुढारीत प्रसिद्ध झाली.गावातील मराठी शाळेतील इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या मुलींच्या डोळ्यातून खडे आपोआप निघत असल्याचे व नेत्रतज्ज्ञ व इतर अधिकारी व्यक्तिंनी हा प्रकार प्रत्यक्ष जाऊन पाहून खरा असल्याची खात्री करुन घेतल्याचे व त्यांना हा प्रकार मती गुंग करणारा वाटला असल्याचे पुढे बातमीत म्हटले होते. यासंबंधी खरी परिस्थिती समजाऊन घेण्यासाठी मी ( अद्वयानंद गळतगे) 18 एप्रिलला गेलो. संबंधितांच्या मुलाखतीवर आधारित पुढील माहिती मला आढळून आली....

या प्रकरणातील काही शीर्षके

सुरवात कोठे झाली?
मुलींवर दमबाजी

गावकऱ्यांचा आलेला खुलासा - वस्तुस्थिती नेमकी काय?
<दाभोळकरांनी दिलेले खोटे आश्वासनli>

गावकऱ्यांचा मुख्य प्रश्न
विज्ञान प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांचे अवैज्ञानिक संशोधन

समितीची पोकळ कारणे
अंधश्रद्ध कोण? गावकरी की समितीचे लोक?

कडेगावचा प्रकार भानामतीचाच
गावकरी समितीच्या लोकांवर का रागावले?

संपुर्ण प्रकरण इथे वाचा.

गुलमोहर: 

सुरवातीला काहीच लिंक लागली नाही. शिर्षकावरून काल परवाची बातमी असावी असे वाटले, अजुनही अशा घटना होतात तर.. असा विचार करून वाचायला लागलो..मग कळाले की ही त्या ब्लॉगची 'रिक्षा' आहे. Happy
असो, दै. पूढारीतील बातम्या किती गांभिर्याने वाचायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न! पण भानामती अन अनिस यांच्या बाबत पण मी थोडा उदासीनच आहे. १९९७ च्या आसपास नाशकात अनिसचा मोठा कार्यक्रम/कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. त्यायोगे कार्यकर्त्यांची जमवाजमव झालीच. समाजाच्या उत्कर्षाच्या उदात्त हेतूने प्रेरीत होउन मी व माझ्या मित्राने प्रत्येकी रू.१०० (सभासद फी.) भरले. सदस्यत्वांच पत्र, इतर माहीतीची पूस्तीका इ.इ. तुम्हाला पोष्टाने पाठवण्यात येईल असे सांगण्यात आले. त्याची अजुन आम्ही वाट पाहातोय.. Sad

त्या मुलींचे पूढे काय झाले? त्या प्रश्नांची ऊकल कशी झाली? त्यात प्रा. गलतगेंचा रोल काय याबाबत समजले तर बरे होईल..

रिक्षा फिरवली ते फिरवली पण कमीत कमी "मिपाकरांचे" "माबोकर" तरी करायचे ना????? Proud

का हे लिखाण फक्त माबोवरल्या "मिपाकरांसाठी" आहे?????? Wink Proud

अरे देवा.. ओकसाहेब इथेही !!

असू द्या, असू द्या.
आता आलाच आहात तर जरा सावकाश स्थानापन्न व्हा. हळूहळू आपले नाडी-पुराणही सुरू करा. अंनिसला ठोका. बुद्धिप्रामाण्याची खिल्ली उडवा. लाल-हिरव्या रंगीबेरंगी पोस्टी टाका. (इकडे टाकता येत नाहीत, बहुतेक.)
मिपा आणि उपक्रमापेक्षा तुम्हाला इथे नक्कीच जास्त अनुयायी आणि सहानुभूतीदार मिळतील, याची खात्री बाळगा. फायनली, तुम्ही योग्य फोरमवर आला आहात. Wink

वेलकम !

मिपा आणि उपक्रमापेक्षा तुम्हाला इथे नक्कीच जास्त अनुयायी आणि सहानुभूतीदार मिळतील, याची खात्री बाळगा. फायनली, तुम्ही योग्य फोरमवर आला आहात..

एका वाक्यात आरपार... Wink

अहो हे काय! अंनिसवर टीका करताय!! तुमचा आयक्यू नक्कीच बिलो अ‍ॅव्हरेज दिसतोय. आता असं करा. इथल्या काही अबोव्ह अ‍ॅव्हरेज आयक्यू असलेल्या डॉक्टरांकडून तुमचा आयक्यू मोजून घ्या आणि तो अबोव्ह अ‍ॅव्हरेज झाल्यानंतरच इथे लिहा.

विज्ञानाला आव्हान देण्याची ताकद कुणामध्ये नाही.विज्ञानाचा विजय असो.अंनिसचा कायदा झालाच पाहिजे.

अनिस वाले विज्ञानाची भाषा करतात मग एखादा माणुस त्याला शास्त्र शुध्द रित्या आव्हान देतो त्याला अनिस वाले घाबरतात का ? येउद्याकी सत्य काय आहे ते ?

गोडाबाबाच्या बाबतीत सुध्दा हेच झाल. पुण्याचे पाच डॉक्टर्स आणि पाच प्रोफेसर्स यांच्या समोर घेतलेली सॅम्पल्स चेक करुन आल्यावर पाच डॉक्टर्स आणि पाच प्रोफेसर्स यांना निष्कर्श न दाखवता अनिस ने गोडाबाबा हात चलाखी करतो असे वर्तमान पत्रात छापुन आणले.

अनिसने अनेक भोंदु बाबांविरुध्द जी कृती केली त्याबद्दल त्यांना सलाम. पण ज्या गोष्टी सध्याच्या विज्ञानाच्या कक्षे बाहेरील आहेत त्या अंधश्रध्दाच आहेत हे ठसविण्याचा आग्रह कशाकरता ?

ब्लॉगची रिक्षा मिपावर.. त्या रिक्षाची रिक्षा मायबोलीवर.. Happy

असो... ते पुस्तक मी पाहिले आहे.. त्यात अनेक चमत्कृतींबाबत माहिती आहे.

>>>ते पुस्तक मी पाहिले आहे..
तरीच, जामोप्या, तू बरच काय काय बघत अस्तोस! Happy चान्गल हे!

ब्लॉगची रिक्षा मिपावर.. त्या रिक्षाची रिक्षा मायबोलीवर..

खेकडा भजी आणि ओनीयन रिंग सुध्दा मिसळपाव वर आहे.

मित्रहो,
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
सादर केलेले विचार ज्ञान तपस्वी प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांचे आहेत. माझे नाहीत. मला भावले हे निश्चित.
काही काळापासून मी इथला सदस्य असूनही काहीच लेखन कार्य इथे सादर केले गेले नसल्याने येथे ही त्यांचे लिखाण सादर करावे असे वाटून ते प्रकाशित केले.
पोस्ट मधील लिखाणात अनवधानाने राहून गेलेले काही शब्द जाड ठशात सादर केले आहेत.
....इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या मुलींच्या डोळ्यातून आपोआप खडे निघत असल्याचे...
विविध घटनांतून अंनिसच्या कार्यातील दिसणारी अंगे दर्शवून देण्यामागे त्यांचा अवमान वा पाणउतारा करायचा हेतू नाही. मात्र जे त्यांच्यातर्फे प्रसिद्धिमाध्यमातून वाचायला मिळते. त्यापेक्षा काही निराळे घडलेले सत्य सांगितले गेले तर त्यात दुसरी बाजू समजून घेतल्याचे समाधान मिळेल. आपल्याला प्रा. गळतगे म्हणतायत ते लगेच मान्य व्हावे अशी मुळीच अपेक्षा नाही. पण हळू हळू त्यांच्या लेखनातून बुद्धिवाद्यांची विचार करायची पद्धत आणि त्यातील उणीवा समजून घ्यायला काय हरकत आहे असे वाटून ते विचार इथल्या सदस्यांसाठी सादर केले.
आता या रिंगणातील काही भिडू कधी कधी अन्यठिकाणी भेटलेले असले तर त्यांना पुनः प्रत्ययाचा आनंद होईल अशी आशा आहे.
...त्या मुलींचे पुढे काय झाले? - त्यांची लग्ने होऊन त्या संसारी झाल्याचे कळते.
...अंनिसचे लोक येऊन गेल्यावरही मुलींच्या डोळ्यातून खडे येत होते. असा खुलासा तेथील संबंधित गावकऱ्यांनी दै. पुढारीत पत्र पाठवून केला होता. तो आपण वाचलेला असेल....
बुद्धिवादी लोक त्यांना रुचेनासे झाले की बुद्य़ांकाच्या गप्पा करतात हे नवीन नाही. असो.

अंधश्रद्धा- श्रद्धा वगैरे मला नक्की माहीत नाही.
पण विज्ञानाचा अभ्यासक या नात्याने पाहिल्यास ही जी घटना आहे म्हणतायत तसं काहीतरी मी प्रत्यक्षात पाहिलेलं नसलं तरी; जर असं काही प्रत्यक्षात असेलच तर त्यातही विज्ञान लपलेलं असेल यात शंका नाही !!
अंनिसवाल्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की विज्ञान सगळीकडे आहे . अंधश्रद्धा वैद्न्यानिक अंगाने सिद्ध करता येत नसतील तर डिंग्या मारू नयेत .अंधश्रद्धांचा पडदा फराश करणे हेही एक शास्त्रच असले पाहिजे ते अंनिसवाल्यांना साध्य झाले नाही असे मला वाटते
ओक साहेब- मिपाकर:- हा विषय छेडल्याबद्दल अभिनंदन; पण अशाप्रकारे दुसऱ्या ब्लॉग्सच्या जाहिराती माबोवर करू नयेत ....... माबोवर आमचे एकनिष्ठ प्रेम आहे ...............आमची ब्लॉग-शाखा कुठेही नाही.

अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्वाचे काम अंनिस करत आहे. आज पुढारलेल्या महाराष्ट्रातूनही पुत्रप्राप्तीसाठी नरबळी देणे, शनि मंगळ युती आहे म्हणून सहकुटुंब आत्महत्या करणे अशा घटना घडत असताना तर त्यांचे काम अधिकच कौतुकास्पद आहे. त्यांच्याकडे शिस्तबद्ध संघटन नसेल, थोडासा ढिसाळपणा होत असेल, पण Thier heart is in the right place. गणेशोत्सवात निर्माल्य कंपोस्ट करावे, मूर्ती ( ज्या आजकाल प्लॅस्टरच्या असतात) नदीत टाकू नयेत वगैरे त्यांचे अनेक उपक्रम आज सुरू आहेत. या सर्व उपक्रमात 'हिंदु धर्म खतरें में' अशा घोषणा देऊन टीका करण्यासारखे काय आहे ?

अमेरिकेतील जेम्स रँडी ने दहा लाखाचे बक्षीस ठेवले आहे. त्या गोडा बाबा की आंबट बाबा यांनी हे आव्हान स्वीकारून सर्वांची तोंडे बंद करावीत.

वैभव आणि विजय व अन्य मित्र हो,
ऱँडी व गोडबाबा आपापले पाहून घेतील.
प्रा. गळतगे यांचे विचारधन मी आपल्यापुढे मांडले आहे.
धन्यवाद

अहो श्री श्री ओकबाबा महाराज बुवा, हे १९८८ मधील प्रकरण आहे त्याचा आत्ता काय संबध आहे ?

असो मला वेगळाच प्रश्न आहे.
..त्या मुलींचे पुढे काय झाले? - त्यांची लग्ने होऊन त्या संसारी झाल्याचे कळते.
...अंनिसचे लोक येऊन गेल्यावरही मुलींच्या डोळ्यातून खडे येत होते
>>>>
लग्न झाल्यावरही त्यांच्या डोळ्यातून खडे येत होते का ? मग तांदुळ निवडताना त्यांनी काय बरे precaution घेतली ? कारण खडे येत असतील तर तांदुळ कधीच निवडुन होणार नाहित. का त्यांचे कुटंबीय खडे असलेला भातच आता खातात ? याचा खुलासा केला तर बरे पडेल.

शिवाय यावर अनिस च्या लोकांनाच बोलावुन संशोधन करायला सांगायचे. खड्यांएवजी हिरे, माणके पडतील असे काहि शोधता येइल का ?

>>> मूर्ती ( ज्या आजकाल प्लॅस्टरच्या असतात) नदीत टाकू नयेत वगैरे त्यांचे अनेक उपक्रम आज सुरू आहेत.

२०१२ पासून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे, असे बर्‍याच गणपती मूर्तीविक्रेत्यांकडून सांगण्यात येते. खरे खोटे खुदा जाने!

सध्या सर्व नद्या इतक्या प्रदूषित आहेत की, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींमुळे होणारे प्रदूषण म्हणजे महासागरात एखादी बादलीभर पाणी ओतल्याने त्यात जितकी वाढ होईल तितकेच असते.

पण प्लॅस्टर ऑफ पॅरीस विघटीत होत नाही.. दरवर्षी थोडे थोडे जरी गणपती घडत राहिले तर एक दिवस पी ओ पी चा हिमनग तयार होईल... Happy

मित्रांनो,
आपण गळतगे यांच्या लेखातील कथनावर आपले मत व्यक्त करावे.
अंनिसच्या कार्याची स्वतंत्र ओळख होताना त्यांच्या विचारांशी बांधिलकी असणाऱ्या समर्थकांना थोड्या वेदना होणे स्वाभाविक आहे. यानंतरच्या लेखातील त्यांचे विचार त्यांना अंतरमुख करायला लावेल.
अवांतर प्रतिसादातून गळतगे यांच्या लेखातील कथनावर कोणी फारसे मत व्यक्त करताना दिसत नाहीत. असो.

प्रा गळतगे यांच्या वयाचा आणी व्यासंगाचा आदर ठेवूनही तो कांगावाखोर लेख अजिबात पटण्यासारखा नाही असे नम्रपणे नमूद करावेसे वाटते.

सिव्हील सर्जन किंवा अन्य कुणीही प्रत्यक्ष खडे डोळ्यातून येताना पाहिले आहे काय ? अशा सर्व प्रकरणात आजूबाजूला कोणी नसताना खडे बाहेर येत असतात.

लहान मुलांमध्ये इतरांचे अनुकरण करायची प्रवृत्ती असते. याला काही उत्क्रांती संबंधी कारणेही असतील.
शिवाय लहान मुले susceptible to suggesstion असतात. लहान मुले सोडा काही वर्षापूर्वी मोठी माणसेही गणपतीने दूध पिले या hoax ला बळी पडली होती.

जाता जाता गळतगे सरांनी अब्राहम कोवूर यांच्यावर विनाकारण टीका केली आहे.

या प्रकरणात अंनिस ने नीट पाठपुरावा केला नसेल, पण केवळ तेवढ्यावरून हा सर्व भानमतीचा प्रकार आहे हे सिद्ध होत नाही.

>>भानामतीच्या अनेक प्रकरणांची माहिती विज्ञान आणी चमत्कार या पुस्तकात दिली आहे वाचकांनी ती पहावी.

no thanks , आमच्याकडे संध्यानंद येतो.

>>> सिव्हील सर्जन किंवा अन्य कुणीही प्रत्यक्ष खडे डोळ्यातून येताना पाहिले आहे काय ? अशा सर्व प्रकरणात आजूबाजूला कोणी नसताना खडे बाहेर येत असतात.

डोळ्यातून खडे बाहेर येणे हा १०१ टक्के हातचलाखीचाच प्रकार असणार. यात भानामती, जादूटोणा, देवीचा कोप इ. चा काहीही संबंध नाही.

मित्रांनो,
प्रा गळतगे म्हणतात, "आमचे भांडण बुद्धिवाद्यांशीं नाही. बुद्धिवादाशी आहे."
प्रकरण ७ मधील एक उतारा - विचारार्थ सादर.

बुद्धिवाद्यांनी कसे वागावे, काय करावे, काय करून नये हे सांगण्याचा आम्हाला अधिकार नाही. त्यांनी आपल्याला समजलेला बुद्धिवाद खुशाल जगावा. पण आपला बुद्धिवाद ज्या विज्ञानावर आधारल्याचा दावा ते करतात, त्या विज्ञानाचा त्याला कितपत आधार मिळतो किंवा तो मिळतो काय हे तपासण्याचा अधिकार सर्व विज्ञानवाद्यांना आहे. कारण विज्ञानवाद हा काही बुद्धिवाद्यांचा मक्ता नाही. या वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांचा दावा हा फोल असल्याचे आपण यापुर्वी 'विज्ञान आणि बुद्धिवाद' या ग्रंथातील अनेक प्रकरणातून सप्रमाण दाखवून दिले आहे. ( विज्ञानाचा जन्मच बुद्धिवादाविरुद्ध बंड करून झाला असल्याची इतिहासाची साक्ष असल्याने विज्ञान आणि बुद्धिवाद यात विस्तव जात नसल्याचे त्या लेखातून दाखविले आहे.)
आता विज्ञानानेच माणूस डोळस बनतो हे सर्व मान्य आहे. पण विज्ञानावर बुद्धिवाद आधारलेला नसल्याने बुद्धिवाद किंवा त्याची बुद्धिवादाला कसलीच पुष्टी मिळत नसल्याने बुद्धिवाद कसा डोळस ठरतो हे बुद्धिवाद्यांनी सिद्धकरून दाखवले पाहिजे. तरच बुद्धिवाद डोळस आहे हे मान्य करता येईल. पण त्यांनी तसे कोठे सिद्ध केल्याचे आढळून येत नाही. केवळ बुद्धिवादाचा विज्ञानाच्या आधारे ते पुरस्कार करताना आढळतात. पण तो विज्ञानाचा पुरस्कार ठरतो. बुद्धिवादाचा पुरस्कार ठरत नाही. पण बुद्धिवाद्यांनी आम्ही विज्ञानाचे पुरस्कर्ते आहोत, हे तुणतुणे वाजवत राहिल्याने ते विज्ञानाच्या नावाखाली सत्यान्वेष ही जी खरी वैज्ञानिक दृष्टी आहे, तिची हानी करण्याची 'सेवा' मात्र त्यांच्या हातून बुद्धिपुरस्सर घडत असल्याचे जाणत्या लोकांना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागते.
श्री. मकरंदजी,
आपण आपले विचार भाषेचा तोल सांभाळून व्यक्त करावेत ही नम्र विनंती...

मित्र हो,
एके ठिकाणी एक मित्र म्हणतात,

डोळ्यातून खडे बाहेर येणे हा १०१ टक्के हातचलाखीचाच प्रकार असणार. यात भानामती, जादूटोणा, देवीचा कोप इ. चा काहीही संबंध नाही.

मित्रा, आपले मत की "हा प्रकार हातचलाखीचाच असणार" तर्काने निर्माण केलेले आहे. गावकऱयांनी दै. पुढारीला लिहिलेल्या आपल्या पत्रात म्हटले आहे की जर त्या शाळकरी मुली(एक नव्हे दहा) असे हातचलाखीचे प्रकार लीलया करत होत्या तर अशा या प्रकरणातील भांडाफोडमधे पारंगत असलेल्या अंनिसवाल्या लोकांनी त्याच्याप्रमाणे तशीच हातचलाखी करून डोळ्यात खडे घालून व नंतर ते काढून दाखवावेत. त्यांनी तसे प्रयोग करून दाखवले नाहीत. ही गावकऱ्यांची प्रमुख तक्रार होती.
या विधानावर विचार करावा.

"अमूक एक प्रकार तुम्ही करून दाखवा किंवा तो भानामती आहे हे मान्य करा" हा बालहट्ट कशासाठी ? गावोगावच्या जत्रेत फिरून जादू करणारेही जादूचे असे प्रकार करतात की आपण आश्चर्याने तोंडात ( जादुगाराच्या नव्हे आपल्याच) बोटे घालू. पण त्या जादूगाराने असली जादू करून दाखवा किंवा भानामती आहे हे मान्य करा असे म्हणले तर?

मुळात डोळ्यातून खडे येणे, अंगावरचे कपडे फाटणे, घरावर दगड पडणे, घरातील वस्तूंना आग लागणे बिब्याच्या फुल्या, हे तथाकथित भानामती चे प्रकार आजूबाजूला कुणी नसतानाच होतात.

गावकर्‍यांनीही हा प्रश्न प्रतिष्ठेचा का केला ? गावात भानामती होणे हे गौरवास्पद आहे का?

एकविसाव्या शतकात ही प्रा गळतगे सारखी ऋषीतुल्य व्यक्तीमत्वे भानामती आहेच असे ठासून सांगतात हे पाहून वाईट वाटते.

एका ज्ञानतपस्वीने लिहीलेला हा लेख माझ्यासारख्या नाठाळ, मंदबुद्धी ( पक्षी निबुद्ध ) वाचकाला देखील प्रभावित करू शकला नाही. बुद्धीवादी खूपच लांब राहीले Proud

लेख काहीतरी सत्यशोधनाचा आव आणत असला तरी त्यावर पु ना ओक ( योगायोग !) स्कूलचीच छाप आहे. दाभोळकरांनी दमदाटी केली वगैरे तर कांगावाच वाटतो आहे. दाभोळकरांचं बरोबरच आहे.. या मुली हॉस्पिटलमधे २४ तास अंडर ऑब्जर्वेशन राहील्या तर त्यांच्या डोळ्यांतून खडे निघतील का ? किंवा दाभोळकर तिथे असताना ( बर्वे येऊन जाऊन करीत असताना ) नेमके त्याच वेळी खडे का बरं नाही निघाले ?

एक गंमतीदार प्रश्न विचारला गेला आहे तो असा कि तिसरीतल्या एकाच वर्गातल्या मुलींच्या डोळ्यातून खडे का निघाले ? खरं तर यातच उत्तर दडलेले आहे. हा प्रश्न त्या लेखकाने स्वतःलाच विचारला असता तर पुस्तक लिहीण्यात गेलेला बहुमूल्य वेळ, तपस्वी या शब्दामुळे झालेले हसे हे सर्व टाळता आले असते.

अवांतर : ओकसर आपका इष्टाईल आवड्या. अंगावर आलं कि लेख मी नाही लिहीला म्हणून टुणकन उडी मारायची , आणि प्रतिसाद नाही आवडला तर आपल्याच घरातल्या हंटरने फोडून काढायचे. लैच भारी. पेटंट घेतले नसतील तर इष्टाईल कॉपी मारीन म्हणतो Wink

Pages