भौत विज्ञानाकडून अतींद्रिय विज्ञानाकडे - विज्ञान आणि बुद्धिवाद - प्रकरण 1

Submitted by शशिकांत ओक on 16 June, 2012 - 07:16

भौत विज्ञानाकडून अतींद्रिय विज्ञानाकडे -
विज्ञान आणि बुद्धिवाद - प्रकरण 1
या प्रकरणात प्रा. अद्वयानंद गळतगे म्हणतात.....
जे पाच इंद्रियांना जाणवते , त्याचाच फक्त वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणे शक्य आहे, असे समजण्याचे काऱण नाही. मनोविज्ञान हे मनाचा वैज्ञानिक व पद्धतीने अभ्यास करते. पण मन हे इंद्रियविषय होऊ शकत नाही. पण म्हणून मनच अस्तितावात नाही असे म्हणता येणार नाही. जीव विज्ञान (Biology) जीवाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करते. पण जीव इंद्रियविषय नाही. पण म्हणून जीवच अस्तित्वात नाही असे म्हणता येणार नाही. जीव व मन हे स्वतंत्रपणे अस्तित्वात नसून ते भौतिक विश्वाचेच भाग आहेत, असे मात्र भौत वैज्ञानिक म्हणू शकतात. पण ते भौतिक विश्वाचे कसे भाग होऊ शकतात, हे वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करणे भाग आहे. तसे सिद्ध झालेले नाही. मनाचा किंवा जीवाचा 'फॉर्म्युला' तयार करता आलेला नाही. पण म्हणून त्यांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यासच करता येत नाही , असे समजता येईल काय?....
... आपण काल भूत कालाकडून भविष्यकालाकडे जात आहे असे मानतो. पण फेनमनच्या शोधानुसार काल भविष्याकडून भूतकालाकडे जात आहे (या शोधाबद्दल 1965 साली फेनमनला नोबेल पारितोषक मिळाले आहे.) ज्याला 'फेनमनची आकृती' (Feynman's Diagram)म्हणतात. त्या आकृतीत जो कण भूतकालातून भविष्यकालाकडे जात आहे तो कण आकृती फिरवली की भविष्याकडून भूतकालाकडे जात असल्याचे दिसतो. काळाच्या या कल्पनेनुसार मी जसा भूतकालाचे 'अपत्य' ठरतो तसे भविष्यकालाचे 'भूत' ही ठरतो. म्हणजे माझे अस्तित्व भूतकालाप्रमाणेच भविष्यकालावरही अवलंबून आहं. दुसऱ्या शब्दात मी भूतकालाप्रमाणेच भविष्यकालाशीही जखडला गेलो आहे. कशाने? हे भौतिक शास्त्र सांगू शकत नाही. अध्यात्मशास्त्र मात्र 'कर्मा ने' हे उत्तर देते. आणि या जखडण्यालाच 'पुनर्जन्म' हे नाव देते. यातून सुटका करून घेणे म्हणजे स्थलकालातीत होणे होय...
इथे आपण आणखी काय वाचाल?

मन स्थळ काळाची मर्यादा ओलांडू शकते...
मन भौतिक विश्वाची मर्यादा ओलांडू शकते...
क्वांटम भौत वाद...
गूढवादी भौतिक शास्त्र
एकात्म विश्व ...
या पुढील संशोधन....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पण फेनमनच्या शोधानुसार काल भविष्याकडून भूतकालाकडे जात आहे (या शोधाबद्दल 1965 साली फेनमनला नोबेल पारितोषक मिळाले आहे.) ज्याला 'फेनमनची आकृती' (Feynman's Diagram)म्हणतात.

आयला, असं काय वाट्टेल ते लिवल्यावर नोबेल देतात तर रोलिंग बाईना का नोबेल देत नाहीत?

ते नोबेल पारीतोषीक तिघांना मिळाले होते - पाथ ईंटेग्रल्स करता. फाईनमन डायग्राम्स हा त्याचा एक छोटा भाग होता (इतक्यातच एक वैज्ञानिका त्याडायग्राम्स बद्दल होती: http://www.maayboli.com/node/34935)
त्याने फक्त लोकली ते शक्य आहे हे दिसते. थर्मोडायनॅमिक्स वगैरे सर्व एकत्र केल्यास नेमके काय होते याबद्दल वैज्ञानिक ज्युरी अजुनही विचार करताहेत.

अतिंद्रीय ज्ञान म्हणा की - विज्ञान कशाला?

मांजरा - तुलाही नोबैल पारितोषिक मिळु शकेल. स्वतःला श्रॉडिंगरचा पिट्टु घोषीत केल्यास कोणी गळ्यात बेल बांधायचा प्रयत्न करणार नाही व आपसुकच स्वतः नोबेल बनशील व ज्यांना कोणाला प्राप्त होशील त्यांच्याकरता प्राईझ्ड पझेशन बनशील.

aschig,
आपला अभिप्राय आवडला. आपली दिलेली लिंक वाचली मी सायन्सचा अभ्यासक नाही. तरीही
आपण आपल्या पाथ इंटेग्रल संबंधी लिंकमधे 'कण भविष्य काळाकडून भूतकाळाकडे जात आहे' असे एकेठिकाणी म्हटले आहेत.
त्या संकल्पनेतील कथन गळतगे यांच्या कथनाच्या बाजूने आहे किंवा नाही याचा खुलासा आपण करावा. कारण इथे काहींना फाईनमन व पर्यायाने गळतगे आपल्या मनचेच बोलताय असे वाटल्याचे भासते.

...असं काय वाट्टेल ते लिवल्यावर नोबेल देतात...
------
गळतगे यांच्या लिखाणात त्यांनी काल हा भूत, वर्तमान व भविष्य असा तोडून न पहाता एकत्र आहे यावर भर दिला आहे.
...काळाच्या या कल्पनेनुसार मी जसा भूतकालाचे 'अपत्य' ठरतो तसे भविष्यकालाचे 'भूत' ही ठरतो. म्हणजे माझे अस्तित्व भूतकालाप्रमाणेच भविष्यकालावरही अवलंबून आहं. दुसऱ्या शब्दात मी भूतकालाप्रमाणेच भविष्यकालाशीही जखडला गेलो आहे. कशाने? हे भौतिक शास्त्र सांगू शकत नाही.....
त्यावर आपले मत द्यावे ही विनंती.
गळतगे अतींद्रियाला ते 'विज्ञान' का म्हणतात याचा खुलासा त्यांच्या पुढील लेखांत ते करतील. पण तोवर आपण म्हणता तसे ज्ञान म्हणा विज्ञान म्हणून नका...