करणी प्रकार खरेच असतो का????

Submitted by VB on 30 June, 2018 - 02:39

आज सकाळी माझ्यासोबत थोडा विचित्र प्रकार घडला. झाले असे की आज शनिवार असल्यामुळे थोडी ऊशिरा निघाली ऑफिसला. रोजची ट्रेन नसल्यामुळे एकटीच होते. बोलायला कोणी नव्हते सोबत त्यामुळे आपोआप तंद्री लागली , स्वत:च्याच विचारात गुंतली होती. मधे अचानक एका बाईचा आवाज कानावर पडला. म्हणे " बेबी, राग येणार नसेल तर काही बोलु का?" , अचानक तंद्री तुटल्यामुळे आधी काही कळलेच नाही, मग भानावर आल्यावर म्हटल , "बोला काय बोलायचे आहे". त्यावर खुप विचीत्र प्रकारे माझे निरीक्षण करत त्या बोल्ल्या की " मला त्यातले कळते, आणी तुला पाहुन हे जाणवितेय की तुझ्यावर कुणीतरी करणी केलीये. " मला एक क्षण कळलेच नाही की ती काय बोलतीये. नुसती बघत बसली मी तीला, ते पाहुन माझ्या बाजुला बसलेल्या एक काकु त्यांना ओरडल्या, की काहिही का बरळताय, का घाबरवताय या मुलीला. त्यावर त्या बाईने स्पष्टीकरण दिले की " हिला खुप धोका आहे असे दिसले, अगदीच रहावले नाही म्हणुन बोलली आणी मी नक्की सांगु शकते की ही खुप त्रासात आहे वगैरे" ईतक्यात अजुन दोघी-तीघी त्यांना ओरडल्या म्हणुन त्या तिथुन निघुन गेल्या. ईतक्यात माझे स्टेशन आले म्हणुन मी उतरली.
तरी खुप सारे प्रश्न मनात आलेच, म्हणजे जरी माझा देव , करणी , भुते यासर्वावर विश्वास नसला तरी खरेच माझ्या मनात काही प्रश्न आले, जसे
ईतक्या जणी मधुन ती मलाच असे का बोलली?
खरेच करणी वगैरे असते का?
तिचे मी त्रासात वगैरे असणे अगदीच काही चुकीचे नव्हते, पण कदाचित ते माझ्या चेहर्यावरुन किंवा माझी जि तंद्री लागली ते पाहुन ती असे बोलली असेल?
अन हे असे मला सांगुन तिला नक्की काय मिळाले? म्हणजे यापुर्वी मी तिला कधी पाहिल्याचे आठवत नाही, किंवा आताही तीने काही पैसे वगैरे मागीतले नाही.

या प्रकाराबद्द्ल ईथे कुणाला काही शेअर करायचे असेल नक्कीच लिहा.

**** वेमा, जर हा धागा नियमात बसत नसेल तर ऊडवा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे ते स्पर्श वैगरे काय नसतं. ट्रेनमध्ये वाऱ्याचा एक रेझोनन्स तयार होतो, तो आपल्या डोक्यावरून गेला की आपल्या डोक्याला कोणीतरी स्पर्श करतोय असा भास होतो. खास करून जे दरवाजात उभे राहतात त्यांना जास्त अनुभव येतो. वैज्ञानिक कारण आहे यामागे.

हां रेकी असू शकते कारण अगदी त्या हाताचा स्पर्श मी पकडायला गेले की नाहीसा व्हायचा. बाय द वे, माझ्या साबांनी त्याआधी काही दिवसापूर्वी एका मंत्रतंत्र जाणणार्‍या त्यांच्या ओळखीतील व्यक्तीला घरी बोलावले होते आणि त्या व्यक्तीने मला गळ्यातली चेन काढून ती डोळ्यांनी लंबकासारखी हलविता येते का याची चाचणी केलेली होती. मला वाटलेलं होतं की ते सहज बोलता बोलता गंमत म्हणुन केले असेल. पण अशी गंमत कोणी का करेल?
अजुन एक त्यांना चंडीचा नवार्ण मंत्र माहीत होता जो मलाही माहीत होता त्यामुळे त्याबद्दल थोड्या गप्पा झाल्या पण एक आहे ती व्यक्ती देवीचे खूप करणारी होती.

अरे ते स्पर्श वैगरे काय नसतं. ट्रेनमध्ये वाऱ्याचा एक रेझोनन्स तयार होतो, तो आपल्या डोक्यावरून गेला की आपल्या डोक्याला कोणीतरी स्पर्श करतोय असा भास होतो. खास करून जे दरवाजात उभे राहतात त्यांना जास्त अनुभव येतो. वैज्ञानिक कारण आहे यामागे.

नवीन Submitted by बोकलत on 10 October, 2019 - 21:25>>>+११११ मलाही असेच वाटले होते, रोजची सवय आहे ट्रेनच्या दरवाज्यात उभे राहून प्रवास करायची. जेव्हा गप्पा मारत असतो तेव्हा जाणवत नाही पण कधी एकटे अन शांत उभी असेन तर असे वाटते

ओह मग तसेच असेल. तुम्हालाही असे वाटलेले आहे म्हणजे मग तसे असू शकते. कारण मीही दारतच उभी होते. बोकलत व व्हीबी दोघांचेही धन्यवाद.
सर्व वाचकांचे आभार!!!

Black magic.. सिरीयसली.. Uhoh
भास असुच शकतात.आपण देव मानतो पण ते फक्त आपल्याला positive energy मिळते यासाठी.पण black magic/करणी सारखे प्रकार जे 'माझ्यामते' अस्तित्वातच नसतात.त्यांचा विचार करुन वेळ आणि energy कशाला वाया घालवायची? Happy हेमावैम

अरे ते स्पर्श वैगरे काय नसतं. ट्रेनमध्ये वाऱ्याचा एक रेझोनन्स तयार होतो, तो आपल्या डोक्यावरून गेला की आपल्या डोक्याला कोणीतरी स्पर्श करतोय असा भास होतो. खास करून जे दरवाजात उभे राहतात त्यांना जास्त अनुभव येतो. वैज्ञानिक कारण आहे यामागे. >>> हेच लिहिणार होते पण मध्येच प्रतिसादात दिसलंच. रेझोनन्स असेल किंवा static असू शकेल.

धन्यवाद अश्विनी!!
अवांतर - तुझा स्तोत्रे धागा अफाट आवडतो मला.पूर्वीपासूनची वाचक व कॉन्ट्रिब्युटर आहे मी त्यावरती.

अहो हे con-artist भारी हुशार असतात असेच हेरुन मधेच कोनाला पकडतात. कधीकधी अगदी नाव घेवुन हाक मारतात.

माझा विश्वास नाही अशा गोष्टी वर पण माझ्या पाहण्यात एक घटना आली होती .
अतिशय उच्च शिक्षित घरात झालेल्या घडामोडी मी prataksh बघितल्या आहेत .
त्या मुळे अविश्वास दाखवू शकत नाही

Pages