करणी प्रकार खरेच असतो का????

Submitted by VB on 30 June, 2018 - 02:39

आज सकाळी माझ्यासोबत थोडा विचित्र प्रकार घडला. झाले असे की आज शनिवार असल्यामुळे थोडी ऊशिरा निघाली ऑफिसला. रोजची ट्रेन नसल्यामुळे एकटीच होते. बोलायला कोणी नव्हते सोबत त्यामुळे आपोआप तंद्री लागली , स्वत:च्याच विचारात गुंतली होती. मधे अचानक एका बाईचा आवाज कानावर पडला. म्हणे " बेबी, राग येणार नसेल तर काही बोलु का?" , अचानक तंद्री तुटल्यामुळे आधी काही कळलेच नाही, मग भानावर आल्यावर म्हटल , "बोला काय बोलायचे आहे". त्यावर खुप विचीत्र प्रकारे माझे निरीक्षण करत त्या बोल्ल्या की " मला त्यातले कळते, आणी तुला पाहुन हे जाणवितेय की तुझ्यावर कुणीतरी करणी केलीये. " मला एक क्षण कळलेच नाही की ती काय बोलतीये. नुसती बघत बसली मी तीला, ते पाहुन माझ्या बाजुला बसलेल्या एक काकु त्यांना ओरडल्या, की काहिही का बरळताय, का घाबरवताय या मुलीला. त्यावर त्या बाईने स्पष्टीकरण दिले की " हिला खुप धोका आहे असे दिसले, अगदीच रहावले नाही म्हणुन बोलली आणी मी नक्की सांगु शकते की ही खुप त्रासात आहे वगैरे" ईतक्यात अजुन दोघी-तीघी त्यांना ओरडल्या म्हणुन त्या तिथुन निघुन गेल्या. ईतक्यात माझे स्टेशन आले म्हणुन मी उतरली.
तरी खुप सारे प्रश्न मनात आलेच, म्हणजे जरी माझा देव , करणी , भुते यासर्वावर विश्वास नसला तरी खरेच माझ्या मनात काही प्रश्न आले, जसे
ईतक्या जणी मधुन ती मलाच असे का बोलली?
खरेच करणी वगैरे असते का?
तिचे मी त्रासात वगैरे असणे अगदीच काही चुकीचे नव्हते, पण कदाचित ते माझ्या चेहर्यावरुन किंवा माझी जि तंद्री लागली ते पाहुन ती असे बोलली असेल?
अन हे असे मला सांगुन तिला नक्की काय मिळाले? म्हणजे यापुर्वी मी तिला कधी पाहिल्याचे आठवत नाही, किंवा आताही तीने काही पैसे वगैरे मागीतले नाही.

या प्रकाराबद्द्ल ईथे कुणाला काही शेअर करायचे असेल नक्कीच लिहा.

**** वेमा, जर हा धागा नियमात बसत नसेल तर ऊडवा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला अजूनही काही पटत नाही पण दर पौर्णिमेच्या वेळेस मला त्रास होतो हे नक्की

करणी जाऊ दे, पण हे पौर्णिमेचे कोडे सुटले तरी बास

देवाची करणी आणि नारळात पाणी" हा मंत्र पुटपुटल्याने त्रास होणार नाही.

नवीन Submitted by उपाशी बोका on 22 October, 2018 - 22:58>>>>> खूप खूप धन्यवाद

फक्त एक सांगा, हा उपाय तुम्ही स्वतः टेस्ट केलाय न, म्हणजे कसे खात्री पटेल माझी☺️

अन हो, तुम्ही कितीवेळ पुटपुटायचा तेही सांगा, उगाच वेळ कमी जास्त झाला म्हणून आराम पडला नाही असे नको व्हायला न ☺️

मलातरी कुठे करणीचा त्रास होतो, माझा त्रासच वेगळा आहे, सो पुढल्या वेळी न वाचता सल्ले देऊ नका☺️

मला न हे असे प्रतिसाद द्यायला आवडत नाही, पण किमान एखाद्या गंभीर मुद्द्यावर म्हणजे तुमच्यासाठी जरी नसला, तरी इतरांसाठी असू शकतो की, सो तिथे तरी असले प्रतिसाद देणे टाळता येते का बघा

अर्थात, ते तुम्हालाच ठरवायचे आहे

विबी , अनेक गोष्टी मानसिक असतात गं, आपल्या मेंदुला माहीत असतं आता पौर्णीमा किंवा आमावस्या येणार आहे की लगेच आपल्याला त्रास सुरु होतो.

चंद्राला मनाचा कारक मानलं गेलय. त्यामुळे अमावास्या व पोर्णिमा या तिथींना काही लोकांना त्रास होऊ शकतो.

रीया, हो काही गोष्टी मानसिक असतात, पण माझ्या बाबतीत असे नसावे कारण मला बरेचदा अमावश्या - पौर्णीमा कधी असतात ते माहितच नसते . मुळात मी नास्तिक असल्याने कधी कॅलेंडर बघतच नाही, जर कुणी सांगितले की काय तिथी आहे तरच.
पण मला असा अचानक त्रास व्हायला लागला कि आता मला कळाते की पौर्णीमा आली.

कारण मला बरेचदा अमावश्या - पौर्णीमा कधी असतात ते माहितच नसते .
>>
आपल्याला नसले माहीत तरी आपल्या 'सुप्त' मनाला आणि शरिराला माहीत असतेच. जेट लॅग मधे कसं बरोबर नेहमीच्या वेळेला आपल्याला झोप आणि जाग येते, तसंच काहीसं..

मला स्वतःला अमावस्येला भुताची आणि पौर्णिमेला आमच्या गुरुंची स्वप्न पडतात (अनेकदा, जनरली) पण मला माहीत आहे त्याचा अमावस्या किंवा पौर्णिमेशी काही संबंध नाही

माझ्या मित्राच्या आईला मानसिक त्रास होता, त्या पण अमावस्या, पौर्णिमेला विचित्र वागायच्या... अनेक वर्ष मित्राच्या कुटुंबाअने अनेक देव, धागे, अंगारे, धुपारे, कुठले कुठले बाबा आणि काय काय केलं , कशाचाही फरक पडला नाही.
आता योग्य त्या मानसोपचार तज्ञाकडे जायला लागल्या पासुन त्या बर्‍या होतायेत पण आयुष्याची अनेक वर्ष त्यांनी 'करणी' केलीये या भ्रमात वाया घालवली याचं फार वाईट वाटतंय आणि आता त्यांना नॉर्मल होईला अनेक वर्ष लागतील हे ही खरं

आहो हे जर का खरे असते तर मग आपल्याला सैन्यासाठी किंवा आयुधांसाठी खर्चच नको करायला ... सरळ करणी करून आपण शत्रूला नामोहरम करून शकतो ...
कशाला हवे राफेल आणि बोफोर्स ...

सरळ करणी करून आपण शत्रूला नामोहरम करून शकतो ...
>>>>
करणी शत्रूवर करू शकत नाही. फक्त आप्तेष्टांवर होते. जेवढे जवळचे नाते तेवढी करणी स्ट्रॉनग !
कोकणात राहतो, देवाची करणी आणि नारळात पाणी ही म्हण आम्हीच बनवली आहे.

मी असं ऐकले आहे कि पुरुषांना बाधा पटकन होऊ शकते... तशी होऊ नये यासाठी काही नियम सांगितले गेले आहेत...
मी असं सुद्धा ऐकले आहे कि स्त्रियांसाठी सुद्धा काही नियम सांगितले आहेत..
ही अंधश्रद्धा का मनाचा खेळ का अजून या गोष्टींमागचे कारण न समजलेले शास्त्र या गोष्टी तञ् व्यक्ती ठरवतील..

जुन्या वळणाचे लोक असे सांगतात कि काही अतृप्त आत्मे असतात ज्यांच्या कधीही न संपणाऱ्या वासना असतात. मांत्रिक वगैरे लोक त्या अतृप्त आत्म्यांना 'भोग' देतात.. अशा अतृप्त आत्म्याचे भोग पुरवले कि ते आपल्याला वश होतात आणि मग आपल्याला हवी ती (चांगली आणि बहुसन्ख्य वेळेला वाईट) कामे करायला तयार होतात त्यामुळे अशा गोष्टी घडतात ... पुर्वी अशा प्रकारे भोग पुरवून सत्य-असत्य, नीती-अनिती, न्याय-अन्याय याचा विचार न करता काम करवून घेणार्याना वाईट चालीचे मानले जात असे. असे काम करणार्याना 'पिशाच्च योनीतील' मानले जात असे. आमची एक आजी काही गोष्टी नक्की तपासून बघाव्यात असं सांगत असे -

१) आपण वेडे वाकडे विचार ज्याने मन दुर्बल होऊ शकेल असे विचार, अनावश्यक दिवा स्वप्न बघत नाही ना किंवा नाही त्या कल्पना करत नाही ना.
२) आपल्या आणि जवळच्या लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्यावी.
३) आपली संगत सय्यमी, विवेकी आणि आत्यंतिक इच्छा किंवा महत्वाकांक्षा नसणारी आहे ना ते बघावं.
४) अनीतीने वागणार्र्या व्यक्तींची संगत मग ते आपले कितीही लाड करत असतील तरीही कधीही धरू नये
५) आपल्या कडून कुणाच्या सद्भावनांचा वैयक्तिक स्वार्थासाठी गैरवापर झाला आहे का ते पाहावं.
६) कोणाला फसवू नये..
७) आळस अजिबात करू नये
८) दारू, व्यभिचार,आंबट शौकीनपणा, कामुकता वाढेल अशा गोष्टी या पासून दूर राहावे..
९) तद्न्य व्यक्ती कडून योगासने शिकावी आणि शक्यतो नियमित करावीत.

आणि या सगळ्या गोष्टी पाळूनही उगीच काहीतरी विचार मनात येत असतील तर हा सगळा मनाचा खेळ समजावा. आवश्यक वाटल्यास मानसोपचार तज्ञांची मदत घ्यावी.

अतृप्त आत्मे असतात ज्यांच्या कधीही न संपणाऱ्या इच्छा असतात>>>>
या जगात संपणाऱ्या इच्छा कुणाच्या असतात? ज्या व्यक्तीचे आयुष्यात सर्व काही व्यवस्थित झाले, सून, जावई चांगले निघाले, नातवंडांनी लळा लावला, ती व्यक्ती शेवटी नातसून बघायची राहिली हो म्हणून चुतपुटत जाते.

मानव माझा प्रतिसाद नन्तर परत वाचून पाहिला तेव्हा काही अपुर्णता दिसली.. त्यानुसार बदल केले आहेत. नविन प्रतिसाद जास्त योग्य वाटेल अशी आशा करतो.

अननस तुमच्या आजींनी सांगितलेल्या ९ गोष्टी खरच छान आहेत.

बाकी करणी, भूत, अतृप्त आत्मा वगैरे भ्रामक कल्पना आहेत.

दारू, व्यभिचार,आंबट शौकीनपणा, कामुकता वाढेल अशा गोष्टी या पासून दूर राहावे..
>>
ह्या: , याला काय अर्थ आहे.? हे नाही चालणार बुवा आपल्याला. मग करणी करा नाहीतर आणखी काहीतरी करा...

करणी हा प्रकार खरोखर असतो बरं का. लांब कशाला जाताय माझंच उदाहरण घ्या, मी आदल्या दिवशी ठरवतो उद्या कंपनीत जायचं नाही तरी सकाळी उठल्यावर आपोआप माझी पावलं कंपनीकडे वळतात, असं वाटतं कोणीतरी मला पाठीमागून ढकलतयं, संध्याकाळी सुटल्यावर असं वाटतं कोणीतरी मला पुढून खेचतंय. आमचा बॉस तासंतास केबिन मध्ये बसून काय करत असतो देव जाणे, एकदा मी हळूच दरवाजाच्या फटीतून बघितला तर डोळे मिटून निवांत पडला होता, कुठलातरी जप करत असावा बहुतेक,एकदा तर आमच्या डिपार्टमेंटला रविवारी कामावर बोलवत होता, चक्क रविवारी कामाला म्हणजे कहरच झाला, सहज कॅलेंडरवर नजर गेली तर अमावसेचा दिवस होता, काळजात असं काही धस्स झालं विचारू नका बहुतेक बॉसला यज्ञ करून आमच्या सगळ्यांची आहुती द्यायची होती( मी त्याचा हा बेत कसा हाणून पाडला याची डिटेल स्टोरी त्या दोन धाग्यांवर लवकरच लिहिणार आहे) मला खात्री आहे त्यानेच करणी केले आमच्या सगळ्यांवर.

मानव, आजी ने सांगितलेल्या गोष्टींपैकी एक सांगायचे राहून गेले - प्राप्त कर्तव्य अगदी नीट करावे'

तुम्ही म्हणता तसं कदाचित खरं असेल. फक्त ते सत्य पेलण्यासाठी मनाचा आणि बुद्धीचा आवश्यक तो विकास होणे आवश्यक असते. नाही तर मांत्रिक वगैरे लोक तुम्हाला 'मूठ मारून' पैसे मिळतील , प्रमोशन मिळेल, गर्ल फ्रेंड मिळेल , घर होईल, गाडी घेता येईल, प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवता येईल, अशी भुरळ घालतात आणि अनेक लोक अशा गोष्टींना फसतात.. यामध्ये मांत्रिक लोक स्वतःचा फायदा करून घेतात. लाखात एखाद्याला त्याने पूर्वी केलेले काम चांगले असेल तर योगायोगाने अशा गोष्टी मिळतील पण तरीही याला शास्त्रीय आधार काही नाही....

अशा मांत्रिकांचे ऐकल्याने कधी तात्पुरते मनाचे समाधान होऊ शकते पण नंतर परत अशा कोणत्यातरी मांत्रिकाची गरज वाटू लागते.. अर्थात तो मांत्रिक काही कायदे बाह्य किंवा अनैतिक करायला सांगत नसेल आणि एखाद्याची वेळ, पैसे, शारीरिक आणि मानसिक शक्ती देण्याची तयारी असेल तर शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न होतो.

कर्मवाद ---->
कष्ट = फळ

दैववाद ----->
श्रद्धा / अंधश्रद्धा
१) देवयानपंथ .....
नवस यज्ञ याग व्रत वैकल्ये
>>>> सुदृढ़ मन

२) कुपंथ ....
करणी बाधा मुठ मारणे वगैरे वगैरे
>>>> कमकुवत मन
★कमी कष्टात जास्त फळाची अपेक्षा

It's placebo and nocebo effect affecting the mind & the body. Depending on how susceptible one's mind is to the power of suggestion.

बहुसंख्य वेळा भावनिक प्रवृत्तीची लोकं, मांत्रिक, तांत्रिक, चेटके अशा नादाला लागताना दिसतात. या पैकी अनेकांचा देवावर काही प्रमाणात विश्वास असतो. आम्ही देवासाठी अनेक गोष्टी करतो, देवावर प्रेम करतो तरीही देव आम्हाला सुख का देत नाही? असा ते विचार करतात आणि कधी अयोग्य संगतीला लागून, मांत्रिक, तांत्रिक, चेटके अशा नादाला लागतात, कदाचित पूर्वीच्या चांगल्या कामांमुळे मांत्रिकाच्या सांगण्यावरून त्यांच्या आयुष्यात काही सुखाचे क्षण आले तरीही त्याने देव दुखावतो आणि दुरावतो... असं माझे एक आजोबा सांगत

देव आपल्याकडून योग्य कार्य करून घेतो आणि मग आपल्याला सुख देतो.. देवावर त्याच्या न्यायावर आणि प्रेमावर विश्वास ठेवावा, देवच एक आपल्या बरोबर कायम असणार आहे .. आपण देवाला सोडून मांत्रिकाच्या, चेटक्यांच्या नादाला लागल्याचे देवाला कळणार नाही असे वाटते... पण देवाला या गोष्टी चटकन समजतात आणि मग देव आपली परीक्षा पाहत असतो.. कधी देवाने आपल्या कडून उंदड कार्य करून घेतले आणि क्वचित सुख दिले तरीही ते हिताचे आहे यावर विश्वास ठेवावा. असं माझ्या ओळखीचे एक मोठे उपासक सांगत असत.

VB, माझा असाच एक अनुभव सांगू इच्छिते. हा अनुभव मी दोनदा जालावरती मांडलेला आहे , कोणालाही अमकं असेल तमकं असेल च्या पलीकडे उत्तर देता आलेले नाही.
- मी मुंबईच्या लोकल ट्रेनने मुलुंडला चालले होते. वेळ ऑफीस सुटल्यानंतरची असल्याने अतोनात गर्दी होती. अर्थातच मी लेडीज डब्यात होते. पण यावेळेस गर्दीचा रेटा भीषण होता इतका की मला वाटले कोणाचा तरी चेंगरून, गुदमरून मृत्यू होईल या गर्दीत . मुलुंड जवळ येऊ लगले तशी मी दाराकडे सरकून जवळजवळ दारातच उभी राहीले की उतरता यावे. एका हाताने पर्स धरलेली तर दुसरा हात बारवर अगदी रोवलेला. बाहेरची हवा खात जीव मुठीत धरुन उभी होते आणि कोणीतरी डोक्यावरुन हात फिरवायला सुरुवात केली. मी पर्सवरचा हात काढून डोक्यावर हात नेला की तो हात एकदम जायचा. असे १० मिनीटे चालले. मी मागे वळून तुसड्यासारखी म्हणाले "हात मत लगाओ" , ती बाई म्हणाली "मै नही लगा रही हूं" परत तिला म्हटले "एक बार बोला ना हाथ मत लगाओ" ती बाई परत म्हणाली "अरे बहन मै नही लगा रही हुं". मी पर्सवरचा हात चटकन डोक्यावर नेऊन तो हात पकडायचा प्रयत्न अनेकदा केला पण तो हात बरोब्बर "इन निक ऑफ टाईम" निघून जायचा त्यामुळे माझ्या काही तो हात पकडीत आला नाही.
१० मिनिटात मला काही गोष्टी जाणवल्या - (१) स्पर्श हळूवार होता , स्त्रीचा होता(२) हाताची बोटे लहानसर (लांबसडक नाही) पण निमुळती होती . (३) टाळूवरुन हात क्लॉकवाईज फिरत होता.
बरं मागील कोणाही स्त्रियांना काही दिसत असल्याचे जाणवत नव्हते. त्या गप्पांमध्ये मग्न होत्या.
मी ना पर्सवरचा हात सोडायला तयार होते ना बारवरचा. कारण बारवरचा हात सोडला असता तर १००% बाहेर फेकले गेले असत,/ कोणितरी ढकललही असतं ..... मुद्दम अथवा चुकून.
तब्बल १० मिनिटांनी हात फिरणे थांबले व मी त्या दिवशी गर्दीमुळे मुलुंडऐवजी ठाण्याला उतरून परत मुलुंडला आले. मुलुंडला माझा फ्रेन्च भाषेचा वर्ग होता (शिकत होते) तो करून घरी आले ती पहील्यांदा आंघोळ केली व देवळात गेले.
आजपर्यंत हे कळले नाही की तो हात का डोक्यावरुन फिरत होता. कोणी चोरट्या बायकांना माझी पर्स लांबवायची होती? चोरट्या बायकांची टोळी असावी ज्यांची "मोडस ऑपरंडी" असावी - लक्ष विचलीत करून पर्स पळविणे.
पण डोक्यावर हात फिरवला तर अन्य बायकांच्या लक्षात येईलसे वाटते त्यामुळे या विचारास तितकीशी पुष्टी मिळत नाही.

एखादी कडेवर घेतलेली लहान मुलगी किंवा मुलगा गंमत करत नाही याची खात्री आहे का ? नाहीतर स्त्री असेल तर चोरी किंवा वेगळा काही हेतूही असू शकतो .. समलैंगिक - अतृप्त इच्छेची अशा गर्दीत पूर्तता वगैरे ..

नाही राधानिशा, माझ्या आसपास, लहान मुलगी नव्हती त्या ट्रेनमध्ये. जर सम लैंगिक स्त्री असेल तर फक्त टाळूवरुन हात का फिरवेल? किती वेळ तो प्रकार .घाटकोपर ते मुलुंड.

शक्य आहे पण असे कधी झाले नव्हते.झालेनंतरही तसा अनुभव आला नाही.
इतका वेळ हल्युसिनेशन होइल असे वाटत नाही.

टाळू = ब्रह्म रंध्र = सहस्त्रार

काहीतरी वशीकरण टाइप वाईट उद्देशाने केलेली कृती असावी. प्रत्यक्ष स्पर्श होतोय असे वाटले तरी त्या व्यक्तीचा हात तितका जवळ नसावा ( जसे रेकी मध्ये काही अंतर राखून उपचार करतात त्याप्रकारे काहीसे ) म्हणून तो स्पर्श झटकायला कितीही चपाळाई केली तरी काही उपयोग झाला नसावा.

Pages