मराठीचा अट्टाहास कशासाठी?

Submitted by कटप्पा on 21 June, 2018 - 23:32

आजच एक धागा पहिला, एका इंग्रजी शब्दाला मराठी शब्द हवा म्हणून.
किल्ली यांच्या धाग्यावरही काही प्रतिसाद वाचले, महाराष्ट्रात लोकांनी मराठी बोलणे कसे महत्वाचे आहे आणि बाकीच्या अमराठी लोकांना मराठी कसे बोलायला भाग पाडले पाहिजे वगैरे वगैरे.
इतका मराठीचा अट्टाहास कशासाठी? मराठी मिश्रित हिंदी किंवा इंग्रजी मिश्रित मराठी बोलणे हे खूप कॉमन आहे आणि आपण याला सपोर्ट केला पाहिजे. निदान यातून आपण मराठी लोक काही इंग्रजी शब्द शिकू तरी.

आपल्याला काय वाटते???????

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

- ऋन्मेष -

<<<<<<<
हे अर्धवट हिंदाळलेले मराठी इंग्रजी बोलणारे लोक हिंदी किंवा इंग्रजी देखील नीट बोलत नाहीत. त्याचा सात्विक संताप येतो. त्या त्या भा षेचे बेअरिंग पक्के घ्यावे ना.
>>>>>>>>

अमा, आपल्याकडे कित्येक लोकं बोलताना ईंग्रजी शब्दांचा वापर सर्रास करतात. उदाहरणार्थ टाईम काय झाला, फॅन चालू कर, आज तुझी तब्येत डाऊन दिसतेय, संध्याकाळी आम्ही मूव्हीचा प्लान करतोय.. वगैरे वगैरे..

गंमत अशी आहे की मराठी बोलताना एखादा हिंदी शब्द खड्यासारखा टोचतो. पण तेच ईंग्रजी या परकीय भाषेतील शब्द आपल्याला गोड वाटतात.

वर याला गंमत म्हटलेय खरे...
पण हे खरे तर आपल्या भाषेचे दुर्दैव्य आहे. जे रोजच्या व्यवहारातील वाक्ये बोलायलाही आपल्याला ईंग्रजी शब्दांच्या कुबड्या वापराव्या लागतात :!

>>Submitted by टवणे सर on 3 July, 2018 - 13:27
Submitted by असामी on 3 July, 2018 - 14:09<<

उप्स; कोलॅटरल डॅमेज... Lol

<मुद्दा आहे तो व्याकरणदृष्ट्या कर्रेक्ट च लिहिण्याबोलण्याच्या अट्टहासाचा !>
तुम्हांला समजून घ्यायचंच नाहीए, पण शेवटचं सांगतो. व्याकरणाचे नियम न पाळणे हे वाहतुकीचे नियम न पाळण्यासारखेच आहे.

तुम्हांला प्रमाण भाषा, तिचे नियम , शाळेत शिकलेले व्यवहारात आचरणे या गोष्टी जुलूम वाटतात; तर पुढील गोष्टी सुरू करा
१. कुठेही प्रमाण भाषा वापरू नका, व्याकरणाचे नियम पाळू नका. स्वतःच्या मनाला वाटेल, तसं बोला आणि लिहा (खरं तर हे भाषेपुरतंच का? जगण्याच्या प्रत्येक अंगाबाबत करा.
२. वरची गोष्ट कामाच्या ठिकाणी इंग्रजीचा वापर करतानासुद्धा लक्षात ठेवा. नाहीतर मराठीच्या नियमांना पायदळी तुडवाल आणि इंग्रजीचे नियम डोक्यावर घेऊन चालाल.
३. भाषेला व्याकरणाची अजिबात गरज नसते, आपण बोलू तीच बरोबर भाषा; भाषेचे नियम इतिहास भूगोलात पाळायची गरज नसते; इत्यादि फंडे आपल्या मुलांना शिकवा. त्यांच्याकडून काही चुका (म्हणजे तुमच्या मते इतरांपेक्षा वेगळं काही) होत असतील, तर त्या सुधारू नका नका. त्यांची भाषा त्यांना घडवू द्या.
असं करताना हा समाज तुम्हांला जाच करण्याची शक्यता , कमी असली तरी आहे. विद्रोह करा.
शुभाऽस्ते पंथानः |

कित्ती कित्ती जण त्यांच्या प्रतिसादांशी सहमती दर्शवत होते.

कहां गये वो लोग! Lol

दुतोंडी गांडुळे भरलीयत इथे Proud

व्याकरणाचे नियम न पाळणे हे वाहतुकीचे नियम न पाळण्यासारखेच आहे.>>>>. आख्ख्या धागात आणि इतक्या प्रतिसादात हेच एक रत्न फार्फार विनोदी वाटलं. Rofl Lol

अहो भरत तुम्ही पुन्हा त्या वाहतूक नियमांचे उदाहरण देत गल्लत करत आहात.

पुन्हा सांगतो, जर मला एखाद्या रस्त्याने जायचेच नसेल तर मी त्या रस्त्यावरचे वाहतूक नियम का पाळू?

आता तुम्हाला त्याच रस्त्याला प्रमाण रस्ता ठरवायचा असेल तर माझी काही हरकत नाही. पण मला तिथूनच जायला पाहिजे असा अट्टहास तरी करू नका Happy

तुम्ही जाताय तो हमरस्ताच आहे.
तुम्ही लिहियात ती मराठी प्रमाण भाषा आहे. तुम्ही मान्य करा अथाअ करू नका. त्यात तुमच्याकडून ज्या चुका होतात त्यांना आपलं अज्ञान किंवा चूक न समजून बाणेदारपणाचा आव आणताय. आपलं मराठी व्याकरण आणि शुद्धलेखन कच्चं आहे, असं तुम्ही तुमच्या आधीच्या अवतारात लिहिल्याचं आठवतंय. चुका सुधारायची आणि शिकायची तयारी आहे, असंही तुम्ही लिहिलं होतं. ते शोधून पुरावा देण्याइतका वेळ तुमच्यावर घालवायची हौस नाही.
तसंच तुम्हाला कोलांट्या उड्या मारायची सवय आहे हे अनेकदा दिसलंय. किंबहुना कोलांट्या उड्या मारणं हेच तुमचं मायबोलीजीवितकार्य असावं असं वाटतंय.
चालू द्या.

हिंदी नावाची कुठलीही मूळ भाषा नाही. ती पाच सहा भाषांचे मिश्रण आहे. ती, भोजपुरी, मैथिली , हरियाणवी , उर्दू, मगधी (अर्धमागधी), शैरसेनी -महाराष्ट्री (पाली) इ. मधून विकसित झालेली आहे. यातील काही भाषा आजही अस्तित्वात आहेत. त्यांना आज हिंदीच्या बोली म्हणतात. पण त्या जशाच्या तशा हिंदीमधे स्विकारल्या जातात. त्यांना हिंदीच म्हटले जाते. उदा. अवधी, ब्रजभाषा, कन्नौजी, बुंदेली, बघेली, भोजपुरी, हरयाणवी, राजस्थानी, छत्तीसगढ़ी, मालवी, झारखंडी, कुमाउँनी, मगही (मगधी) इ. आज ती जगातील तिस-या क्रमांकाची भाषा आहे. अलिकडेच हिंदीत प्रमाण (शुद्ध संस्कृतोद्भव) भाषेचं खूळ आलेलं आहे. पण हिंदी राजभाषा नावाच्या चळवळीने बोलचाल की भाषा हेच प्रमाण धरून तिचा प्रसार सुरू ठेवलेला आहे. आजतागायत हिंदीला काहीही अडचण आलेली नाही.

म्हणजे मुंबईतील हिंदी " उंच जीनेपर से धप्पकन पड्या" " तू ऐसा कायकू करता है" ही बोलचाल की भाषा म्हणून मान्य आहे का?

"मला आरती करा" या प्रतिसादातच भास्करने प्रमाणवाद्यांचा त्रिफळा उडवला आहे. त्याला उत्तर नसल्याने उगीचच लंबंचवडं छातीबडवू र्‍हेटॉरिक चालू आहे. मुळात ज्या फारसी-ऊर्दूतून "मदद" शब्द मराठीत आला तिथेच तो "मेरी मदद करो" असा म्हटला जात असेल तर "माझी मदत करा" मध्ये काय चूक आहे? एक तर तो शब्द मराठीत आणताना आपण त्याचं स्पेलिंग चुकवलंच, वर विभक्तीचीही काशी केली. आता इतक्या शतकांनी ती चूक सुधारली जातेय तर वाईट काय आहे?
"भाषा प्रवाही असावी याबद्दल दुमत नाही.पण, "आज"ची अधिकृत प्रमाण मराठी, ही बोलता, लिहिता यायलाच हवी." यातला विरोधाभास खरंच कोणालाही जाणवत नाहीये? "आजची मराठी" "उद्याची मराठी" "२०१९ च्या फिस्कल पिरियड मधली मराठी" अशी शासनपुरस्कृत गॅझेट निघत असतात काय? कि रोज सकाळी सहाच्या बातम्यांमध्ये "आजचा ताजा मेनु" सारखे "आज मराठीत नव्याने समाविष्ट झालेले शब्द" असं बुलेटिन निघतं? की "लॉलीपॉप, मार्शमेलो, नुगाट" अशा मराठीच्या अपडेट निघतात? अरे भाषा प्रवाही आहे म्हणताय तर तिला धरण का बांधताय? दूरदर्शनवर प्रमाणित भाषा वापरू नये, असं इथे कोण म्हणाला दाखवून द्या पाहू? पण "मायबोलीवर यायचं तर अमकीच मराठी लिहिली पाहिजे" हा अट्टाहास कशासाठी? जसंकाही ॲड्मिनने यांनाच शुद्धलेखन-कोतवाल नेमलंय.
"प्रमाण आणि शुद्ध" वेगळ्या गोष्टी आहेत" असा साळसूद बचाव केला जातो. प्रत्यक्षात विशिष्ट शब्द वापरणार्‍यांची चेष्टा केली जाते. परवा मायबोलीवर एका कोल्हापूर साईडच्या लेखिकेने "मी आलो" लिहिलं तर एका शहाजोग वाचकाने तिला अशुद्ध भाषा सुधारायचा सल्ला दिला. बाकी "आनि-पानीवाले" वगैरे उल्लेख नेहमीचेच.

"पाणी पिलं" ऐकून माझा एक मित्र अगदी हमसून हसला होता. त्याच्या मते 'पाणी प्यायलो" म्हणायचं. आता काही लोक म्हणत असतील "पाणी पिलं" ते चूक मग "मी भात खायलो" असं का म्हणायचं नाही? "पाणी मागितलं" असं म्हणायचं तर "दहाला बाराने भागितलं" असं का नाही म्हणायचं? थोडक्यात व्याकरणाचे "नियम" म्हणजे नुसत्या "चालत आलेल्या रीती" असतात. प्रमाण भाषा म्हणाजे फक्त त्या काळात बोलल्या जाणार्‍या भाषेचं दस्तावेजीकरण असतं. जशी भाषा बदलत जाईल तसं दस्तावेजीकरण अपडेट व्हायला पाहिजे. प्रमाण भाषेप्रमाणे"च" बोललं पाहिजे असा हेका म्हणजे घोड्यापुढे गाडी जोडण्याचा प्रकार आहे.

अमेरिकेत दहा-बारा बोली बोलल्या जातात ही माहिती माझ्यासाठी नवीन आहे. नुसते "all of y'all" किंवा aint वगैरे म्हणजे बोली नाही. पण तरीही न्यू यॉर्क मध्ये बसलेला यॅंकी टेक्सासवाल्याच्या "य'ऑल"ची खिल्ली उडवत नाही. अमेरिकन लोक भाषेचा एवढा आग्रह घेऊन बसले असते तर आजही color चे स्पेलिंग colour लिहीत बसले असते. आणि पोटुस (किंवा ती बया निवडून आली असती तर पोटुशी) Four score and seven years ago अशा भाषेत भाषणं देत असती.

पुलंनी बोलीभाषेची खिल्ली उडवली आहे, तशीच "प्राज्ञ मराठीची" सुद्धा उडवली आहे. बाकी त्या लेखात पुलं एका गावकर्‍याचं वाक्य लिहून "मला त्यातला फक्त "बैल" हा शब्द समजला असं म्हणतात (आणि त्यांचे डोंबिवली-सदाशिव-गिरगाव साईडचे वाचक त्यावर पोट धरून हसतात) आता महाराष्ट्राच्या अंतर्भागातल्या मराठीत म्हटलेल्या वाक्यात पुलंसारख्या मराठीच्या प्राध्यापकाला फक्त बैल हा शब्द समजला, तर ती बोलणार्‍याची कमजोरी की प्राध्यापकाची?

"व्याकरणाचे नियम न पाळणे हे वाहतुकीचे नियम न पाळण्यासारखेच आहे", हे वाचून मात्र खरंच धास्तावलो. म्हणजे उद्या एखादी मुलगी रस्त्याने जाताजाता मी "आली-गेली" म्हणाली आणि एखाद्या हवालदाराने ते ऐकलं म्हणजे पाच हजाराची पावतीबिवती फाडणार की काय, असं वाटून गेलं. या मोदलाईत काहीही शक्य आहे म्हणा...

<मुळात ज्या फारसी-ऊर्दूतून "मदद" शब्द मराठीत आला तिथेच तो "मेरी मदद करो" असा म्हटला जात असेल तर "माझी मदत करा" मध्ये काय चूक आहे? एक तर तो शब्द मराठीत आणताना आपण त्याचं स्पेलिंग चुकवलंच, वर विभक्तीचीही काशी केली. आता इतक्या शतकांनी ती चूक सुधारली जातेय तर वाईट काय आहे?>
म्हणजे तुमच्या मते तुम्ही प्रमाण भाषेतली चूक सुधारताय. याचाच अर्थ तुम्हांला प्रमाण भाषा आणि तिचे नियम मान्य आहेत.
तुम्ही ज्यांच्या मागे उभे राहताय त्या भास्करना हे दोन्ही मान्य नाहीत.

आता वरच्या मदत बद्दल. एका भाषेत परभाषेतले शब्द घेताना त्यात बदल होऊन येणं हे होतच आलंय. मग ते संस्कृतमधले शब्द असोत (पर्ण-> , कर्ण -कान, उर्दू फारसीतले - बेचिराग -> बेचिराख. ही काही उदाहरणं.
त्यातला अर्थ समजून न घेण्याचा आव आणत भास्कर यांच्या पंक्तीला बसण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहेच.
परभाषेतून आलेले शब्द त्या भाषेच्या नियमांप्रमाणेच वापरले तर एकाच भाषेत किती बरे नियम होतील?

< जशी भाषा बदलत जाईल तसं दस्तावेजीकरण अपडेट व्हायला पाहिजे. >
हे होतंच असतं. मराठीतले शुद्धलेखनाचे नियमही बदललेत. पूर्वी तत्सम शब्द जसेच्या तसेच लिहायचे असा नियम होता. आता त्यातले अंत्य इकार आणि उकार (अपावद वगळून)दीर्घ लिहावे असा नियम आला. उदा: कवि .

भाषा प्रवाही असते, वापराप्रमाणे बदलते हेही मान्य. पण सध्या तरी माझी मदत करा, हे चूक आहे.

<व्याकरणाचे नियम न पाळणे हे वाहतुकीचे नियम न पाळण्यासारखेच आहे>
रूपक /प्रतीक कुठून सुरू झालं पाहू. मी कसंही बोलेन, समोरच्याला माझं म्हणणं पोचल्याशी कारण, असा भास्कर यांचा सुरुवातीचा युक्तिवाद होता. त्याला समांतर असं वाहतुकीचं उदाहरण दिलं.

त्यांचं म्हणणं आहे की मी प्रमाण भाषेच्या मार्गाने जातच नाहीए. मग कोणत्या मार्गाने जाताय? ती दिसतेय तर प्रमाण भाषा. ती एखादी बोली आहे का? शेवटी भाषा ही एका (लहान किंवा मोठ्या) समूहाची असते, व्यक्तिपरत्वे तिचे रूप बदलते का?

अमेरिकन भाषेचं उदाहरण देताय, तर बोललेली भाषा आणि लिखित भाषा यांतला फरक लक्षात घ्या. आता ट्विटर, एसेमेस ही नवी माध्यमं आलीत, त्यांतली भाषा वेगळी असणारच. पण अमेरिकेतली बातमीपत्र किंवा निवेदनं कोणत्या भाषेत बोलली जातील? पोटसने आपल्या ट्विटमध्ये चुकीचा शब्द वापरला किंवा स्पेलिंग चुकवलं, तरी त्याची बातमी होते.

भारतातलीच एक बातमी होती - महाविद्यालयांतले विद्यार्थी एसेमेसच्या भाषेत उत्तरे लिहीत असल्याची. असं करू नये अशा सूचना त्यांना कराव्या लागल्या.
त्यामुळे कुठल्या प्रकारची भाषा कुठे वापरावी, याचं तारतम्य प्रत्येकाला हवं.

<प्रमाण भाषेप्रमाणे"च" बोललं पाहिजे असा हेका म्हणजे घोड्यापुढे गाडी जोडण्याचा प्रकार आहे>
तुम्ही एकंदरित प्रमाण भाषेत लिहीत असाल, तर त्या भाषेचे प्रचलित नियम पाळून लिहिण्यात वावगं काय आहे?
तुम्ही बोली भाषेत बोलत असाल, तर त्यात वापरल्या जाणार्‍या शब्दाऐवजी किंवा प्रयोगाऐवजी प्रमाण भाषेतला शब्द वापरला अथवा प्रयोग केला, तरीही तो कानाला खटकेलच.

<"मला आरती करा" या प्रतिसादातच भास्करने प्रमाणवाद्यांचा त्रिफळा उडवला आहे. >
यावरही लिहिलंय.
सुखकर्ता सारखी आरती असेल, तर माझी आरती करा, असं होईल.
पंचारती असेल, तर मला आरती ओवाळा असं होईल.

विषय थोडा बदलतेय. हल्ली ब्लॉग्जवर किंवा मराठी साईट्सवर वगैरे ‘सोबत हे घेतलें, ते घेतलं‘ असं म्हणजे सोबत हा शब्द खूप वाचायला मिळतो. मला समहाऊ तो खटकतो वाचताना. मला सोबतपेक्षा ‘बरोबर’ हा शब्द जास्त तोंडात बसल्याने असू शकेल. पण सोबतचा हा वापर हल्ली हल्लीचाच आहे की पूर्वीपासूनच?

तुम्ही एकंदरित प्रमाण भाषेत लिहीत असाल, तर त्या भाषेचे प्रचलित नियम पाळून लिहिण्यात वावगं काय आहे?
Submitted by भरत. on 5 July, 2018 - 08:57>>>> +११११११११११

अगदी सहमत.
प्रमाण मराठी वापरायची असेल तर तिचे नियम पाळा, इतकी साधी गोष्ट आहे.

पण वरकरणी प्रमाण मराठी वापरणार परंतु तिचे नियम नाही पाळणार म्हणजे मी पेट्रोलची गाडी डीझेल, केरोसीन काय मिळेल ते भरून वापरणार असे म्हणण्यासारखे झाले!!!

दुसर्‍या बाजूच्या हेतूंवर (साळसूदपणा वगैरे), माहितीवर (एक्स्पोजर) शंका येउ लागल्या किंवा अनावश्यक भांडकुदळ शंब्दांची (छाती बडवेपणा) खैरात होउ लागली की समजावे मुद्दे पटवून देता आलेले नाहीत व त्यामुळे हे करावे लागत आहे. कसली कंड असते ही उगाच वाकड्यात शिरायची, विशेषत: समोरची व्यक्ती व्यवस्थितपणे लिहीत असताना?

प्रमाण भाषा - बातम्या, वर्तमानपत्रे, सरकारी नोटिसा वगैरे मधे वापरली जाणारी भाषा. ही देशभरात सहसा एकच असते. कॅनडा वगैरे अपवाद असतील. अमेरिकेतही एकच आहे. डबल निगेटिव्ह वगैरे यात कोठेही वापरत नाहीत.

शुद्ध भाषा - असे काही मुळातच नसते. असलेच तर एखाद्या ठिकाणची स्थानिक भाषाही नीट न बोलता येणे याला अशुद्ध भाषा म्हणता येइल. सहसा अमराठी लोकांची. आपण च्या ऐवजी आम्ही वापरायचा माझा एक अमराठी मित्र. दुसरा एक "इथे डोंगर होता. तो बुजवला आहे" वगैरे म्हणायचा. त्याला अशुद्ध म्हणता येइल.

प्रमाण आणि शुद्ध - यातला फरक पटला.

आता काही जणांचे आक्षेप हे 'बोलताना' अमुक तमुक शब्द ऐकला की दाताखाली खडा आल्यासारखे वाटते - अश्या प्रकारचे आहेत. मुळात बोलायची भाषा ही प्रमाण असण्याची गरज नाही, त्यामुळे त्याला आक्षेप का हे कळलं नाही. फक्त जिथे प्रमाण भाषा लिहिणे गरजेचे आहे, तिथे वेगळी भाषा वापरल्यास आक्षेप घेता येऊ शकेल, बोलताना नाही. अश्या वेळी प्रमाण भाषेत न बोलणार्‍या व्यक्तिंना अधिक प्रयास पडतील, कारण ती वापरण्याची सवय नसल्याने लिहिताना चुका होऊ न देणे याकडे लक्ष द्यावे लागेल.

काहींचा मुळात एखादी भाषा प्रमाण असण्यालाच आक्षेप आहे. पण जगात सर्वत्र कामकाजासाठी प्रमाण भाषा वापरतात. त्याने कमीत कमी असंदिग्धता निर्माण होते. आता अमेरिकेत मूळ भाषेपेक्षा वेगळी इंग्रजी वापरत असले, तरी अमेरिकन प्रमाण भाषा ही एकच आहे. बोलताना अनेक स्लँग्ज वापरत असू द्या की! आता अमुक एकच ढंगाची भाषा प्रमाण का - याची चर्चा होऊ शकते, पण या धाग्याचा तो विषय नाही. उद्या नागपुरी लोक म्हटले की आमची भाषा प्रमाण म्हणून सर्वांनी वापरा, आणि ती सर्वांना मान्य असेल, तर ती तरी सर्वांनी नीट वापरावी. त्यात 'करून र्‍हायलो' ऐवजी 'केले' लिहिले तर ते देखिल चूक ठरेल. नियम एक तर एकच असावा.

मूळ धागा मराठी भाषेच्या अट्टहासाविषयी आहे आणि चर्चा प्रमाण मराठीच्या अट्टहासाविषयी चालली आहे. म्हणून मी आता मूळ मुद्द्यांकडे परत येतो.
- बोलताना मिश्र भाषा वापरली तर काय फरक पडतो?
- काहीजण म्हणाले की मातृभाषेत प्राथमिक शिक्षण घेणे चांगले. पण मातृभाषाच मिश्र असेल तर? (आजकाल असते)
- वरच्या चर्चेत प्रमाणभाषा-पाठिराख्यांनी मराठीच्या अट्टहासाची देखिल पाठराखण केली आहे. म्हणजे इतर बोलीभाषा बोलणार्‍यांची मराठीच्या मिश्रभाषा होत जाण्याला काही हरकत नाही? बोलीभाषा देखिल मिश्र होत गेली तर चालेल?
- आताच्या बोलीभाषा (आणि प्रमाणभाषा सुद्धा) एक प्रकारे मिश्रण होत जाऊनच तयार झाल्या आहेत - त्याचे काय?
- असे ऐकले आहे की शिवपूर्वकाळात मराठीत फारसी शब्द खूपच प्रमाणात मिसळून एक अतिमिश्रभाषा असे मराठीचे स्वरूप झाले होते. शिवाजी महाराजांनी राज्यभाषाकोष तयार करवून ते मिश्रण कमी करवले आणि जुन्या मराठीला प्रमाण म्हणून दर्जा दिला. भाषेच्या जडणघडणीसाठी हे पाऊल योग्य होते की चुकीचे? ते करण्याने काय फरक पडला? (ही माहिती सत्य आहे का - हा देखिल एक मुद्दा आहे)

मूळ धागा मराठी भाषेच्या अट्टहासाविषयी आहे आणि चर्चा प्रमाण मराठीच्या अट्टहासाविषयी चालली आहे. >>>> + १. त्यामुळेच ते स्किप केले आहे.
अट्टहास म्हणजे नेमके काय अपेक्षित आहे हे लेखकाने एकदा पुन्हा स्पष्ट करावे. इंग्रजी मधे तर कित्येक भाषेतल्या शब्दांची भेळ आहे. याच पद्धतीने ती भाषा टिकूनही आहे आणि जगावर राज्य देखील करतेय. कर्मठपणा वाढला की -हास निश्चित.

शंतनू, तुमच्या.म्हणण्याशी सहमत आहे.
माझेच मुद्दे वेगळ्या शब्दांत मांडलेत, असं वाटलं.

बोलीभाषा या प्रमाणभाषांपेक्षा अधिक प्रवाही असतात.
दोन समूहांच्या देवाणघेवाणीतून तिसरीच बोलीभाषाही तयार होऊ शकते.
मराठीच्या अट्टहासाबद्दल मी अजूनपर्यंत लिहिलेलं नाही. पण माझा तसा आग्रह नसतो.
आमच्याकडचे गुजराती, राजस्थानी दुकानदार कामापुरतं मराठी बोलतात.
पण परप्रांतीय रिक्षावाल्यांशी, cab वाल्याशी मी हिंदीतच बोलतो.
परप्रांतीय डॉक्टरशी मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषांत.
बँकेत इंग्रजी आणि हिंदीत.

माझ्या अभ्यासविषयासंबंधी मराठी माणसाशी बोलायचं असेल ,तरी इंग्रजीत बोलणं सोयीचं ठरतं.

प्रमाण भाषा - बातम्या, वर्तमानपत्रे, सरकारी नोटिसा वगैरे मधे वापरली जाणारी भाषा. ही देशभरात सहसा एकच असते. कॅनडा वगैरे अपवाद असतील. अमेरिकेतही एकच आहे. डबल निगेटिव्ह वगैरे यात कोठेही वापरत नाहीत.

शुद्ध भाषा - असे काही मुळातच नसते. असलेच तर एखाद्या ठिकाणची स्थानिक भाषाही नीट न बोलता येणे याला अशुद्ध भाषा म्हणता येइल. सहसा अमराठी लोकांची. आपण च्या ऐवजी आम्ही वापरायचा माझा एक अमराठी मित्र. दुसरा एक "इथे डोंगर होता. तो बुजवला आहे" वगैरे म्हणायचा. त्याला अशुद्ध म्हणता येइल.

^^^ पूर्णपणे सहमत. भांडणार्‍या लोकांना हेच समजून घ्यायचं नसतं.

काहीजण म्हणाले की मातृभाषेत प्राथमिक शिक्षण घेणे चांगले. पण मातृभाषाच मिश्र असेल तर?

--- प्राथमिक शिक्षणाची भाषा स्थानिक, म्हणजे मुलांच्या सवयीच्या, नेहमीच्या, राहण्याच्या परिसरातली असावी असा आग्रह आहे. मातृभाषा म्हणजे मातेची भाषा असा अर्थ आहे पण तो अर्थ इथे अभिप्रेत नाही. स्थानिक भाषा म्हणजे रोजच्या रोज कानावर पडणारी भाषा, त्या भाषेतून शिक्षण दिले तर मुलांना लगेच समजते. शिक्षण शि़क्षण म्हणजे फार रॉकेट सायन्स नाही. दूध तापवून त्याचं तूप होण्याच्या अवस्थेपर्यंतची कृती कुणा आईला आपल्या पाच सहा वर्षाच्या मुलीला शिकवायची असेल तर स्थानिक भाषेतून समजवणे सहज सोपे व विनासायास होते.

परंतु बिहार मधून महाराष्ट्रात आलेल्या स्वतःच्या मूळ स्थानिक बोली शिवाय इतर भाषा न येणार्‍या बायकांची मुले जेव्हा सक्तीने संपूर्ण इंग्रजी भाषेचे वातावरण असलेल्या शाळेत जातत तेव्हा जी कुचंबणा सगळ्यांचीच होते ती टाळण्याचा काय मार्ग आहे हे वेगळ्या चर्चेचा विषय आहे.

मला मिश्र भाषा बोलण्याचा/ ऐकण्याचा काही त्रास होत नाही. ’मी संडेला तुझ्याकडे येणार होतो, पण टायमच नाय भेटला’ असं मला कोणी म्हटलं, तरी चालेल. कारण मला कळलं समोरच्याला काय म्हणायचं आहे ते. पण माझा आग्रह अशावेळी एकच असेल, की या वाक्यात ३ वेगवेगळ्या भाषांचं कडबोळं झालेलं आहे, त्या तिनही भाषेत हे वाक्य सरमिसळ न करता बोलता यायला हवं! Happy थोडक्यात, जी भाषा मी ’माझी’ म्हणून बोलते, त्यात मला व्यवस्थित बोलता यायला हवं. माझा आळशी मेंदू उगाचच इतर भाषेतले शब्द त्यात घुसवतो आणि मी बोलते काहीतरी वेगळंच, पण मेंदूला कामाला लावलं तर योग्य शब्द आठवले पाहिजेत. कशाकरता? कारण प्रत्येक भाषेत एक सौंदर्य आहे, ती समृद्ध आहे, सर्व मूळ भावना तिच्यात प्रक्षेपित करण्याची ताकद आहे- ती आपल्याला माहित असायला हवी. ती तुम्ही वापरा किंवा वापरू नका. पण संवादाचं माध्यम म्हणून माहिती तरी हवीच. उदा. मी कधीच विहिरीवरून पाणी भरलेलं नाही, त्यामुळे माझा आणि पाणी ’शेंदणं’ याचा कधीही संबंध आलेला नाही. शहरी आणि आता अनेक ग्रामीण भागातही (पंप लावलेले असल्यामुळे) हे क्रीयापदच आता हद्दपार होईल. हे आपल्याच भाषेकरता चांगलं नाही ना? असे वापरात नसलेले शब्द नष्टच होत गेले तर भाषेतली खुमारीच निघून जाईल आणि मग उरतील फक्त कामापुरते आणि कसे का होईना, पण भावना पोचवणारे अनेक भाषांचे मिळून केलेले बोलीशब्द. त्याने संभाषण साधलं जाईल कदाचित, पण काहीतरी अर्धवट वाटत राहिल, सलत राहिल- मला तरी Happy

पूनम पाणी शेंदणे की रहाट शेंदणे? मला शंका आहे.

माझा साधा सरळ नियम आहे स्वत:साठी.
बोलताना बोलिभाषा वापरायला ठिक आहे आणि मी ती वापरते नक्कीच तशीच्या तशी. उदा. चहा पिलास का? मी अगदी चहा प्यायलिस का? असं विचारत नाही.
पण हेच वाक्य जर मला लिहायचं असेल तर मी ते प्रमाण भाषेतच लिहिणार की 'चहा प्यायलीस का?'

कोल्हपुरला वगैरे सिंह म्हणत नाहीत तर सिंव्ह म्हणतात. (बर्‍याच भागात म्हणत असतील अर्थात) मी ही शाळेत सिंव्हच म्हणत होते, पण खूप लहान असताना एकदा सिंव्ह लिहिलं तर सरांनी बोली आणि लिखित भाषेतला फरक समजावून सांगताना सांगितले की बोलताना आणि लिहिताना काही शब्द वेगळेच असतात.

उदा. ब्राम्हण (बोलताना म पहिला येतो) लिहिताना ह पहिला ब्राह्मण
जान्हवी म्हणताना न पहिला येतो पण लिहिताना जाह्नवी असे लिहितात.

चहा प्यायलीस का ऑर चहा प्यायली आहेस का?

ह्यापैकी कोणती प्रमाणभाषा व का?

ब्राह्मण बोलतांना सुद्धा ह आधी येतो मग म.

ब्राम्हण (बोलताना म पहिला येतो) लिहिताना ह पहिला ब्राह्मण
>>>
नाही आधी ह आणि मग म.

संस्कृत/मराठीत बहुतेक लिहिण्याच्या पद्धतीत अपवाद नाही आहेत. जोडाक्षर वाचताना डावीकडून उजवीकडे व वरून खाली असा क्रम लावायचा असतो असे आजोबांनी सांगितल्याचे आठवते. जाणकार योग्य नियम सांगू शकतील.
\-- वरून खाली म्हणजे: तर्क - आधी र आणि मग क येतो, तर कृष्ण मध्ये आधी क मग ऋ येतो.
र आणि ऋ चा पण गोंधळ होतो माझा तरी. वार्‍यावर, पर्यावरण, कृष्ण, तृष्णा यात र ची जोडाक्षरे कुठली व ऋ ची कुठली?

ती सुद्धा आजकाल मिश्र झाली आहे, हा मुद्दा आहे.

भाषा मिश्र झाली आहे की कसे हे माहित नाही. परंतु स्थानिक भाषेत इतर भाषेतले शब्द येतात तेव्हा भाषा मिश्र झाली आहे असे म्हणणे योग्य नसावे.

उदा. नमुने
१. मी आज घरुन गाडीने येत होतो, मध्येच महादेवाचं मंदीर लागलं. मग उतरुन नमस्कार केला आणि प्रसाद घेतला. तेव्हाच आरती चालू होती हे माझे किती भाग्य, नाही का? माझी चप्पल मात्र चोरीला गेली राव.

२. मी आज सिटीतून कारने येत होतो, ऑन द वे मला महादेवाचं टेंपल दिसलं. मग एक स्टॉप घेतला तिथे. प्रेयर केली आणि प्रशाद खाल्ला. सेम टाइमला आरती वाज गोईंग ऑन. हाउ लकी आय अ‍ॅम. बट माझी सँडल गायब झाली ब्रो!

३. मी आज स्वतः ड्रायविंग करत कार चालवत होतो. देन मला एक महादेवाचं मंदिर नोटीस झालं. सो मग आय जस्ट ड्रॉप्ट देअर. पिंडीवर डोकं टचडाऊन केलं आणि प्रसाद घेतला. देअर वॉज सम प्रेयर्स चालू होत्या. मला खूप लकी फिलींग व्हायला लागलं. पण बॅडलकच , माझी न्युअली विकत घेतलेली एट हंड्रेड अ‍ॅण्ड फिफ्टी रुपीजची सँडल कोणी चोरून नेली.

Pages