मराठीचा अट्टाहास कशासाठी?

Submitted by कटप्पा on 21 June, 2018 - 23:32

आजच एक धागा पहिला, एका इंग्रजी शब्दाला मराठी शब्द हवा म्हणून.
किल्ली यांच्या धाग्यावरही काही प्रतिसाद वाचले, महाराष्ट्रात लोकांनी मराठी बोलणे कसे महत्वाचे आहे आणि बाकीच्या अमराठी लोकांना मराठी कसे बोलायला भाग पाडले पाहिजे वगैरे वगैरे.
इतका मराठीचा अट्टाहास कशासाठी? मराठी मिश्रित हिंदी किंवा इंग्रजी मिश्रित मराठी बोलणे हे खूप कॉमन आहे आणि आपण याला सपोर्ट केला पाहिजे. निदान यातून आपण मराठी लोक काही इंग्रजी शब्द शिकू तरी.

आपल्याला काय वाटते???????

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम्म...काही अंशी सहमत.

किल्लीताई च्या धाग्यावरची माजी कंमेंट इथं टाकतो -

महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी लोकांना मराठी शिकवण्यापेक्षा आपण हिंदी शिकावी ते फायद्याचे असेल.

अट्टाहास वाईट आणि घेडगुजरी बोलण्याला सपोर्ट केला पाहिजे ही चुकीचेच.
शुद्ध भाषा बोलता आली पाहिजेच पण म्हणून कोणी बोलली नाही तर त्याला हिडीस फिडीस करणे काही बरोबर नाही.

कोणतीही एक भाषा वापरत असताना दुसरे शब्द त्यात घुसवणे बरोबर नाही. ( बऱ्याच वेळा शब्द आठवायचा कंटाळा, किंवा वापरलेला मराठी शब्द खूप पुस्तकी वाटेल असे वाटून मी इंग्लिश शब्द घुसवतो हे मला मान्य आहे)

तसेच पाश्चात्य देशात शोध लागलेल्या वस्तू/विचार यांना बोजड मराठी शब्द शोधणे आणि हट्टाने वापरणे हे देखील चुकीचे आहे.

समोरच्याला नीट समजली की ती भाषा आपली म्हणावी असा काळ आहे हा त्यामुळे दोन्ही पक्षाची सरमिसळ होतच जाणार हे खरे असले तरी वैयक्तिक स्तरावर दोन्ही पक्षाने आपापली भाषा निश्चितच जपावी अन् अधिक समृद्ध करावी.

तसेच च्रप्स ह्यांच्या मुद्द्याशीही सहमत Happy

माझे एक सर म्हणायचे, जोपर्यंत मातृभाषा नीट येत नाही, तोपर्यंत दुसरी भाषा नीटपणे शिकता येणार नाही. आणि हे बरोबर आहे, हे माझ्यावरून मी सांगू शकतो...

पण नीट म्हणजे किती नीट?>>> पुरेसा शब्दसाठा तर हवाच, पण आपल्या गहण भावनाही आपल्याला मातृभाषेत व्यक्त करता यायला हव्यात. Till then you'll not be able to express your emotions in other language absolutely, and at the same time emotional development also becomes little difficult.

आता मातृभाषा म्हणजे नक्की कोणती भाषा हा देखिल प्रश्न उपस्थित होतो? कारण घरात पण मिश्र भाषाच बोलली जात असेल तर तीच मातृभाषा झाली की!

आता मातृभाषा म्हणजे नक्की कोणती भाषा हा देखिल प्रश्न उपस्थित होतो?>>> माझी आई माझ्याशी ज्या भाषेत बोलते (मराठी) तीला मी मातृभाषा मानतो. बाकी माझी आई आणि बाबा अहिराणीत बोलतात नेहमी..

भाषा हे संवादाचे माध्यम आहे. आपले म्हणणे समोरच्याला समजले की संवाद होतो. कुठ्ल्या भाषेत केला गेला हे गौण!

माझी आई माझ्याशी ज्या भाषेत बोलते (मराठी) तीला मी मातृभाषा मानतो >> बरोबर. मग ह्याच न्यायाने एखाद्याची आईच मिश्र भाषा बोलत असेल तर काय? - हा मुद्दा मांडला मी.

कोणतीही एक भाषा वापरत असताना दुसरे शब्द त्यात घुसवणे बरोबर नाही.
तसेच पाश्चात्य देशात शोध लागलेल्या वस्तू/विचार यांना बोजड मराठी शब्द शोधणे आणि हट्टाने वापरणे हे देखील चुकीचे आहे. >>> +१

कुठलीही भाषा बोला.. खिचडी भाषेची भलावण करू नका. >>> +१

त्याचप्रमाणे कोणत्याही भाषेत बोलताना त्या भाषेचे व्याकरणाचे नियम पाळून बोलले पाहिजे. नियम माहित नसतील तर ते माहित करून घेणे आवश्यक आहे.

कोणतीही एक भाषा वापरत असताना दुसरे शब्द त्यात घुसवणे बरोबर नाही.
तसेच पाश्चात्य देशात शोध लागलेल्या वस्तू/विचार यांना बोजड मराठी शब्द शोधणे आणि हट्टाने वापरणे हे देखील चुकीचे आहे. >>> +१
कुठलीही भाषा बोला.. खिचडी भाषेची भलावण करू नका. >>> +१
त्याचप्रमाणे कोणत्याही भाषेत बोलताना त्या भाषेचे व्याकरणाचे नियम पाळून बोलले पाहिजे. नियम माहित नसतील तर ते माहित करून घेणे आवश्यक आहे.+ १०००००००००००००००००००००००११११११११

माझ्या एका मैत्रिणीचे बाबा पंजाबी तर आई बंगाली. तिचा नवरा गुजराती. घरी सगळे हिंदी किंवा इंग्लिश बोलतात. मग आता तिची मुलं मातृभाषा म्हणून हिंदी असच सांगतात

मी जर इंग्रजी बोलत असेल तेंव्हा मराठी प्रचलीत शब्द वापरले तर चालेल का? मग मराठी बोलत असताना किमान शुद्ध मराठी बोलावी ही अपेक्षा का नसावी?
मी खरोखर कन्फ्युज्ड आहे. हे चालते मग I'm really gondhaloy! असे म्हटले तर चालेल का?

माझ्या एका मैत्रिणीचे बाबा पंजाबी तर आई बंगाली. तिचा नवरा गुजराती. घरी सगळे हिंदी किंवा इंग्लिश बोलतात. मग आता तिची मुलं मातृभाषा म्हणून हिंदी असच सांगतात>>> ओह! ईतकाही गोंधळ असतो असं वाटलं नव्हतं.. मग तर...
Surrender

शुद्ध मराठी म्हणजे नेमकी कुठली? संस्कृती प्रवाही असते तशीच भाषाही. आपण आता ज्ञानेश्वरांच्या किंवा शिवरायांच्या किंवा अगदी परवाच्या टिळकांच्या काळातली मराठी बोलत नाही. अगदी सध्याच्या शासकीय प्रमाणभाषेतही बोलत नाही! कितीतरी भाषांतून शब्द आयात केले आहेत मराठीने, आणि काही बदलत्या काळानुसार विसरलेही आहेत. राहणीमान बदलेल तशी भाषाही बदलत जातेच, जावीही. नाहीतर ती मरून जाईल!

<<राहणीमान बदलेल तशी भाषाही बदलत जातेच, जावीही.>>

शिवाय एखाद्यास जसे बोलायचे तसे बोलू द्यावे. म्हणजे शब्दांचे उच्चार, हेल (मराठी अर्थ) काढून बोलणे, हेहि मान्य असावे.
विशेषतः ज्यांना येत नसेल त्यांच्यासमोर काहीहि बोलून सांगावे आमच्या (कोंकणी किंवा नागपुरी किंवा अहिराणी ) भाषेत असेच बोलतात!
उदा. " हे चालते मग I'm really gondhaloy! असे म्हटले तर चालेल का?" - मला चालेल.

म्हणजे मग असले प्रश्नच उद्भवणार नाहीत नि उगीच भांडणे होणार नाहीत.

शक्यतो इंग्रजी मध्ये मराठी घुसवत नाही कारण कार्यालयात चुकून तोंडातून असली वाक्य नको निघायला क्लायंट समोर.

<<तसेच पाश्चात्य देशात शोध लागलेल्या वस्तू/विचार यांना बोजड मराठी शब्द शोधणे आणि हट्टाने वापरणे हे देखील चुकीचे आहे.>>
रोजच्या वापरात येणार्‍या अर्ध्याहून अधिक गोष्टी, क्रिया या आजकाल पाश्चात्य देशात शोध लागलेल्या आहेत. म्हणून जबरदस्ती त्यांचे मराठीकरण करायचे त्यापेक्षा सरळ मूळ पाश्चात्य शब्दच वापरणे सोयीचे.

रहाता राहिल्या भावना , विचार ज्या पाश्चात्य किंवा भारतीय नसतात. या भावना , विचार वैयक्तिक रीत्या कुणाजवळ उघड करायचे असतील तर त्यात भाषेची अडचण येऊ नये. यांची देवाण घेवाण मनोमन होते. मनाला स्वतःची भाषा नसते. तिथे कित्येकदा भाषा न वापरता देखील भावना, विचार पोचतात.
आता जर या भावना, लेख एखाद्या भाषेतील कविता वा लेख म्हणून सार्वजनिक करायच्या असतील तरी त्यातल्या भाषेचे, वापरलेल्या शब्दांचे रसग्रहण करायला मुळात भाषा उत्तम यायला हवी. आजकाल किती लोकांना मराठी भाषेचे एव्हढे ज्ञान आहे की त्यांना असले काही कळेल. त्यांचा भाषेशी संबंध फक्त कळले की झाले असा असतो. मग शब्द कुठल्या का भाषेत असेनात. माझ्या हार्टची क्वीन असे शब्द असलेले मराठी गाणे सुद्धा चालते!

हे चालते मग I'm really gondhaloy! असे म्हटले तर चालेल का >> बोलतात की अश्या पद्धतीचं इंग्रजी! "आय वॉज टेलिंग हिम, की धिस इज ऑल ढापोफाईड" - असं बरेच जण बोलतात. फक्त समोर ते कळणारा श्रोता असावा.

शिवाय इंग्रजांची इंग्रजी तरी कुठे आता शुद्ध राहिलीये! (शुद्ध इंग्रजी म्हणजे नक्की काय ही पण एक शंकाच आहे)

मला एक गम्मत वाटते. धेडगुजरी इंग्लिश कुणी बोललं, तर त्याला हसतात, त्याच्यावर अडाणीपणाचे आरोप वगैरे होतात. पण धेडगुजरी मराठी बोलली, तर त्याला मात्र 'प्रमाणभाषा म्हणजेच योग्य का?, भाषा कळली म्हणजे झालं, शुद्ध भाषेचा आग्रह का' वगैरे आक्षेप घेतले जातात.

माझं मत असं आहे, की जितक्या जास्त भाषा येतात - चांगल्या प्रतीच्या येतात, तितका जास्त आनंद मिळतो आणी आयुष्य समृद्ध होत जातं. साधं मराठी आणी इंग्रजी आलं तर त्यातून ज्या द्वैभाषिक कोट्या करता येतात, साहित्य वाचता / ऐकता येतं, बातम्या कळतात त्यानं सुद्धा कितीतरी फरक पडतो.

>>> मला एक गम्मत वाटते. धेडगुजरी इंग्लिश कुणी बोललं, तर त्याला हसतात, त्याच्यावर अडाणीपणाचे आरोप वगैरे होतात.

There even are places where English completely disappears! In America, they haven't used it for years!! Happy

शुद्ध मराठी म्हणजे नेमकी कुठली? >>> त्यांना प्रमाण मराठी म्हणायचे असावे. अनेक जण प्रमाण ला शुद्ध समजतात.

ते गर्व/अभिमान चा गोंधळ प्रमाण भाषा न वापरल्यानेच होतो. जेवण केले का म्हणजे खाउन झाले का विचारत आहेत की स्वयंपाक झाला का, हे कळावे. पाजी म्हणजे शिवी आहे, की आदरार्थी संबोधन, की ज्ञानामृत पाजि वगैरे म्हणायचे आहे आणि फक्त वेलांटी चुकली आहे हे महाराष्ट्र एक्सप्रेसवरच्या रूट (कोल्हापूर-गोंदिया) वरच्या सर्व गावांतील लोकांना एकाच अर्थाने कळावे म्हणून प्रमाण भाषा आवश्यक आहे Happy

Pages