तमाशा - एक भयकथा (अंतिम)

Submitted by अजय चव्हाण on 20 May, 2018 - 14:26

भाग पहिला - https://www.maayboli.com/node/66008

काही वर्षापूर्वी......

एका भल्यामोठ्या आरशासमोर "ती" तिच रूप न्हाहळत होती... गोल चेहरा, सोनेरी कांती, कोरीव पण नाजुक भुवया, रूंद कपाळ, निळे खोल पाण्यासारखे डोळे, एखाद्याने तिच्या डोळ्यात पाहील की, हरवून जावं असे, सरळ नाक, गुलाब्याच्या पाकळ्यासारखे असरेले रसरसशीत गुलाबी ओठ..काळेभोर रेशमी केस, एखाद्या अप्सेरेला लाजवेल असं अस्सलखित लावण्य...ती आरशात स्वतःच रूप पाहताना हरवली होतीच जणू..स्वतःशीच ती खट्याळ हसली....
इतक्यात पाठीमागून कुणीतरी पुटपुटलं....

" हसतेस तु अशी की, झंकार चांदण्याचे...
मज वेड लागलेले तुजलाच पाहण्याचे...."

"झंकार चांदण्यात कित्येक तारे तुटलेले मनाचे...
वर का अभिशाप हा कित्येक काळ ते सोसलेले..."

असं आरशातूनच " ती " त्याला प्रतीउत्तर देते....

"वा...वा... लाजवाब ....कविताही करता येतात तर तुम्हाला..." बोलता बोलता शर्टाच्या बाह्या सरकवत गणेशराव जवळच असलेल्या गादीवर आरूढ होतात....

जवळच असलेल्या पाण्याचा पेला पुढे करत ..."आज स्वारी आमच्या फडात कशी काय ??"

" त्याच कारण माहीत आहे ना तुला...आज येशिल का रातच्याला?" इतकं बोलून गणेशराव घटाघट पाणी पितात आणि रिकामा पेला जमिनीवर ठेवत तिच्या होकाराची प्रतिक्षा करतात...

ती नुसतेच लाजते...काय ते लाजणं..ह्याच लाजण्यावरती कित्येक ह्लदये घायाळ झालेली...

"आज तमाशा रंगणार आहे ..तुमच्यासाठी स्पेशल...या..तुम्ही बघायला...मग आटोपल्यावर डायरेक्ट येतेच की वाड्यावर.."

स्वतःशीच खुष होत गणेशराव खिशातले काही बंडल काढून तिच्या चोळीत कोंबतात...

..........................................................................................................................................................

अख्या पचक्रोशीत कधी झाला नाही असा तमाशा आज त्या गावात होणार होता....त्यात "त्या " बाईच नाव खुप गाजलेलं...
फक्त तिलाच पाहण्यासाठी कितीतरी लोक येणार होती....

" ढोलकीचा ताल सुरू झाला....सोंगाड्याने उगिच आपल्या इथल्या तिथल्या गप्पा मारत...थोडी प्रस्तावना देत..जमलेल्या प्रक्षेकाच मनोरंजन करायला सुरूवात केली...."

सोंगड्याने आपलं काम चोख बजावलं.....

मग "ती" आली...अख्खं पब्लिक तिला पाहून खुळ झालं...ज्यांनी तिला पहिंल्यादाच पाहील ते सारं काही विसरून तोंड उघडं ठेवून पाहतचं राहीले...बाकीच्यानी शिट्या, टाळ्या वाजवल्या, काहीनी नुसत्या दर्शनाचेच बंडल फेकले होते....

मग ढोलकीच्या तालावर गाणं सुरू झालं...

त्या गाण्याला एक वेगळा अर्थ होता...एक थिम होती....

एका राज्याच्या आयुष्यात एक सुंदर कन्या येते....आणि तो तिच्यावर प्रेम करू लागतो....तिच्यासाठी व्याकूळ होतो..ती ही भेटते त्याला पण काही स्वार्थी कारणासाठी तिचा खुन तो करतो...मग व्याकुळलेली तिची आत्मा गाणं म्हणते..

" तुझ्या नजरेतल्या प्रितीत ...तलवार कधी ही घुसली...
तुझीच होते राजसा मी..मग का ती अशी माझ्या काळजात खुपसलीस..."

थिम गाणं झाल्यानंतर त्यांच नेहमीचच एकट्या बाईची प्रसिद्ध लावणी सुरू होते...

" माझ्या रूपातला ऐवज लाखाची नाणी...
चंद्र तारकाच्या जगात मी ग राणी....
ह्या मदीरेची नशा ग मी.....
हया गोड स्वप्नाची दिशा ग मी...
ह्या सुरात..ह्या संगितात ग माझीच गाणी..."

हे गाणं गणेशरावांनी कित्येक वेळा ऐकलेलं होतं....तमाशा संपल्यानंतर ते वाड्यावर तिच्या येण्याची वाट पाहत असतात...ती येते.. आज खुपच वेगळी वाटत होती ती...आज तिच्यात तो उन्माद नव्हता...ऐरवी असणारा बेफिकरीपणा नव्हता....आज काळजी होती....स्रीसुलभ असणारी भिती होती...

हे गणेशरावांना जाणवलं.....म्हणून ते विचारतात तिला...

"काय झालं??"

"मी पुन्हा आई होणार आहे....आजच कळले. ...आतातरी लग्न करा..."

गणेशराव खो खो हसू लागतात....त्यांच्या हसण्यात एक प्रकारचे असूरी भाव होते...

"करूया की मग...पहिल्या लेकीच काय केलेस..?, तिलाही बोलवूया की...तिच्या आईबापाच्या लग्नाला..."
त्यांच्या बोलण्यात खोचक टोमणा होता...

"चल जाऊ दे...एक सप्राईज आहे तुझ्यासाठी...तळघरात ठेवलय...चल...लवकर दाखवतो.." असं बोलून ते तिला घेऊन जातात...

काय असेल सरप्राईज ह्या उत्सुकतेपोटी..."ती" पुढे जाते...

गणेशराव हलकेच दार लावून घेतात...कोपर्यात ठेवलेल्या सळईला हलकेच हातात घेऊन पाठीमागून एक जोरचा प्रहार ...
तिच्या डोक्यात घालतात...

ती तशीच जमिनीवर रक्त्याच्या थारोळ्यात पडते...

" शब्बास.... लेका...." एक अघोरी साधु पाठीमागच्या दरवाजातून ओरडतो...

"गर्भवतीचा बळी......गर्भवतीचा बळी....." स्वतःशीच आनंदाने किंचाळून तो अघोरी साधु नाचु लागतो..
स्वतःच्या आनंदाला थोड बाजुला ठेऊन तो आपलं काम सुरू करतो...कसलेचे मंत्र पुटपुटले जातात.. बहुतेक शरीरातून निघणार्या त्या शक्तीशाली आत्माल्या अडवण्याच काम ते करत असावे....काही मंत्र उच्चारल्यानंतर तो साधु थांबतो....गणेशरावांना तो उद्देशून सांगतो..

"आता तिची आत्मा बाहेर येईलं...तिचा दुसरा मृत्यू नंतरचा प्रवास सुरू होईल पण त्या अगोदर तुला तिचा केस काढून तिला कधीच सापडणार नाही अशा ठिकाणी ठेवावा लागेल... ती तुला त्रास देऊ शकणार नाही पण रोज तुझ्या स्वप्नात येईल.. स्वप्नात तुला.. विणवनी करेल...धमकी देईल...काहीही आमिश दाखवेल....तु घाबरायचं नाही....तिच्या त्या केसांमुळे...ती बंदीस्त होईल...सर्व शक्ती असूनसुदूधा तिला वापरता येणार नाही..." मी अजुन काही मंत्र म्हणतो...दहा मिनिटाच्या आत...
तिचा केस काढून तुला लपवावा लागेल....एक सेकंद जरी उशीर केलास तर प्राणाला मुकशील....प्राण जरी गेला तुझा तर ती मुक्त होईल...पण तुझा आत्मा युगानुयुगे इथेच अडकून राहील...जोपर्यत तुझ्या नावाने कुणी अशाच गर्भवतीचा बळी त्या काळभैरवाला देत नाही तोपर्यंत...इथेच तुझा आत्मा भरकटत बसेल....लक्षात ठेव...पण एकदा तु नियम पाळलेस तर तुला आयुष्यात जे पाहीजे ते मिळेल..फक्त तो केस जपून ठेवायचा...समजलास?? "

"खरंतरं हे त्याने अगोदरच सांगितलं होतं...म्हणूनच हे सगळा प्लान केला होता मी....तमाशातली " ती" पैशाला भुलुन जाळ्यात ओढली गेली...पहिल्यांदा ती गरोदर झाली तेव्हा मी इथे नव्हतोच.....एक वर्ष परदेशात होतो...नायतर तेव्हाच कारभार आटपला असता...मुलीचा जन्म झाला तेव्हा तिनेच ही बाब सगळ्यापासून बदनामीच्या भितीने लपवून ठेवली...अगदी गुप्तपणे हे सगळं केलं तिने...मुंबईला बहीण असते तिची ...तिच्याकडेच ठेवलयं तिला... अजुनही एकदाही तिला बघायला गेलो नाही ...मरू दे...ह्या छीनालच्या पोरीला कोण बघणार...?? आज संधी साधली आपण...आता आपली स्वप्न आपल्याच मुठीत...तयारी ..सगळी व्यवस्था कालच केली आपण.."

समजलास....?? साधुने दरडावणीच्या सुरात विचारल्यावर गणेशरावांची विचारशृखंला तुटली तशी मानेनेच त्यांनी होकार दिला..

साधु मंत्र म्हणू लागला...धरणीकंप यावा तसा कंप निर्माण होऊ लागल्या ...भिंती हलतायेत असा भास होऊ लागला...
एक कर्कश किंकाळी ऐकू येतेय...आणी त्या आवाजाने कान फाटतील की, काय असं वाटू लागलय....एक हिरवटसा प्रकाश कुठुनतरी येतोय कुजट वास सगळीकडे पसरलाय ..त्यात त्या मंत्राचे चित्रविचित्र उच्चार...आणि अशातच त्याने इशारा केला... .लागलीच जवळच असलेला चाकू काढून गणेशरावांनी आपली लुंगी बाजुला केली... पटकन एक केस उपटून ...एक हलकासा वार त्यांनी आपल्याच मांडीवर केला.. मांडीवरच्याच वाराने झालेल्या भेगेत त्यांनी तो खोल कोंबला ..त्यावर त्याच लुंगीची पट्टी फाडून गच्च बांधून घेतली ..

त्या दिवसानंतर गणेशरावांचा आयुष्यच पालटलं...सगळं काही मिळत गेल पैसा...वैभव.मानपान...त्यांच अभिनेता होण्याच स्वप्नही पुर्ण झालं...कित्येक वर्षे सरली . .एक अभिनेता असूनही..इतकी इज्जत कमावूनही लोकांच्या नजरेत मात्र त्यांच संबोधन "गण्या पाटील" असच एकेरी व्हायचं...कुठल्यातरी सिनेमातल्या रंगवलेल्या त्यांचाच नावाच्या पात्राने लोकाचं मन जिंकल होतं...अर्थात तोंडावर एकेरी संबोधन करण्याची कुणाची छाती नव्हतीच पण माघारी असाच उल्लेख व्हायचा...

आणि आज त्याच "गण्या पाटील" नावाच पात्र एका हाॅरर सिनेमात घेऊन शुटींग सुरू होती..ऐनवेळेस चेटकीनीचा राॅल करणारीला सेक्स रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली अटक झाली...आणि एका दिवसात..नवा चेहरा डायरेक्टर साहेबांना शोधावा लागला...आणि तो चेहरा त्यांना रस्त्याiवर सिगारेट ओढताना दिसला...अगदी त्यांना हवा तसा चेहरा....

"सोनेरी कांती, कोरीव पण नाजुक भुवया, रूंद कपाळ, निळे खोल पाण्यासारखे डोळे, एखाद्याने तिच्या डोळ्यात पाहील की, हरवून जावं असे, सरळ नाक, गुलाब्याच्या पाकळ्यासारखे असरेले रसरसशीत गुलाबी ओठ..काळेभोर रेशमी केस, एखाद्या अप्सेरेला लाजवेल असं अस्सलखित लावण्य.."

मग विचारण झालं तीही राजी झाली ...रोल काय आहे...कसा करायचा सगळं समजावून झाल...स्क्रीप्ट देऊन प्रॅक्टीसही करायला सांगितली ..एका दिवसात सगळं झालं...फक्त फोनवर गणेशरावांना कल्पना दिली होती..ते डायरेक्ट शुटीगला येणार असं कळलं....त्यांच काम चोख होत.. .फक्त त्या मुलीला नीट तयारी करायला सांगितली त्यांनी...आणि आज शुटींग सुरू असताना असं घडलं...

.........................................................................................................................................................

अचानक भयाण काळोखातल्या त्या प्रकाशमान खिडक्या धाड्कान बंद झाल्या ....आयुष्याचा सारा सारीपाट...त्या गलिच्छ अंधारातून प्रवास करताना त्याला दिसला....
मागच सारं काही दिसून गेलं...आपण कुठे होतो..हे कळलं...
फक्त कुठे आहोत..आणि कुठे चाललोय ..ह्याच उत्तर त्याला अजून मिळाल नव्हतं.... " चरचर" त्याच्या पायाला नव्हे त्याच्या त्या चेतनाला खाली काहीतरी लोखंडी वस्तुसारख काहीतरी जाणवलं..त्याने खाली पाहीलं...तीच ती रक्ताने बरबटलेली सळई ..जिने त्याने खुन केला होता...हीच ती सुरूवात ..त्याने चमकून सभोवती पाहील...तो आपल्याच वाड्याच्या अंधार्या तळघरात होता...
दुर कुठुनतरी गाणं ऐकू आलं ..

" तुझ्या नजरेतल्या प्रितीत ...तलवार कधी ही घुसली...
तुझीच होते राजसा मी..मग का ती अशी माझ्या काळजात खुपसलीस..." आणी गाण्याबरोबर तिचीच आकृती त्याला दिसली...

आता युगानेयुगे सुटका नाही .....हे त्याला कळून चुकलं...

...............................................
........................................................................

काही दिवसानंतर.....

" गण्या पाटील .." ह्या नावाच पात्र कोण साकारणार...??
असा प्रश्न दिगदिर्शकाला पडलाच नाही...त्यांनीच तो रोल करायचा ठरवलं...मनात एक सुप्त ईच्छा ही होतीच...

यथावकाश शुटीग पुर्ण झालं..सिनेमा तुफान चालला तमाशा आणि भयानक हे काॅम्बिनेशन लोकांना खुप आवडलं...

आपल्या आईचच हुबेहुब रूप घेऊन जन्माला आलेली अभिनेत्री
माधुरी चंद्रलेखा गणेशराव पाटील..( हो गणेशराव ह्यांचीच मुलगी) हिला बेस्ट अभिनेत्री चा अवार्ड देण्याच जाहीर झालं आणि हो " तमाशा" ह्या चित्रपटाने चांगली कमाई तर केलीच पण ह्यावर्षीच्या बेस्ट फिल्म चा अवार्डदेखिल मिळणार हे जाहीर करण्यात आलं आहे..

समाप्त...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast