Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162
या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे
"शर्मिष्ठा राऊत"
'नन्दकिशोर चौघुले'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे नाही, अस्ताद बरोबर बोलला
अरे नाही, अस्ताद बरोबर बोलला .
म.मां “फार छान गोष्ट’ मुद्दाम खोचकच म्हंटले होते, केवळ जुई विषयी हीने काय बिचिंग केले सांगायला
ते झालंच पण त्या आधी काहीतरी
ते झालंच पण त्या आधी काहीतरी काॅम्पलिमेंटही दिली त्यांनी.
नं की ला ऋतुजा येईपर्यंत तरी
नं की ला ऋतुजा येईपर्यंत तरी ठेवा
ऋतुजाने एकदाका त्याच थोबाड फोडलं की बिंदास हाकला. मला वाटत त्याला हे सगळ करण्याचे नक्कीच जास्तीचे पैशे मिळाले असतील.
मला वाटत त्याला हे सगळ
मला वाटत त्याला हे सगळ करण्याचे नक्कीच जास्तीचे पैशे मिळाले असतील.>>+१
कालची भाषणं बोअरिंग झाली,
कालची भाषणं बोअरिंग झाली, आस्ताद रेशम तर पूर्णपणे कुत्र्याची शेपूट आहेत, मला नाही द्यावेसे वाटतेय कुकी पॉईंट्स .

केवळ खात्या अस्तादला रेडा म्हंटला आणि रा.रे गॉसिप विषयी बोलला ऐकून त्यांनी सईला सपोर्ट केलय , शिवाय सईची स्तुति करून मेघाला जे टर्गेट केलं गेल , त्यांचा हेतु पूर्णपणे दिसला, पण मठ्ठ लोकांना अजुन समजत नाहीये, मोअर यु टार्गेट हर, मोअर फॅन्स सपोर्ट मेघा गेट्स !
इतर सगळे लोक मधे बोलत होते, मेघाचं बोलणं का दाबून टाकतात ? म.मां बघु बोलतात का या विषयी.
आउंचं बाकी भलतच लॉजिक, बेडवर तुम्ही दोघी कुचकुच करता, एकत्रं झोपु नका
बाकी सईला हरभर्याच्या झाडावर चढवले सगळ्यांनी, सई खुष होणे सहजैक आहे पण त्या नं .कि ना कशाला विचारयला गेली , घरात काय सुधारणा हवी
अजुनही वाटतय काही तरी पोकळ फुगा फोडणार म.मा कि कोण कसा स्टॅड घेतं बुलिंग विरुद्ध हे बघण्यासाठी न.कि ने मुद्दाम अॅक्टींग केलं किंवा असच काहीतरी !
कम्माले..आजच्या भागावरच्या
कम्माले..आजच्या भागावरच्या प्रतिक्रिया कशा नाही आल्या अजुन ते..
मी एक छोटूशी क्लिप पाहिली थोपूवर.. पुष्करची टिम स्क्रिप्ट सादर करत होती ते..
भूषण = आऊ
पुष्कर = स्मिता
आणि बाकिचे कळले नाही..
नं चौ = सुशांत कि आस्ताद बहुधा..
शर्मिष्ठा = सई वगैरे..
आज सुरवातीलाच सर्व
आज सुरवातीलाच सर्व सदस्यांनी पावसाचा मनमुराद आनंद घेतला. एकतर आधी ६० दिवस पूर्ण झाल्याबद्दल सगळ्यांनी गार्डनमध्ये एकत्र येऊन रिंगणार उभं राहून, हातात मँगो मिल्कशेकचे ग्लासेस घेऊन चियर्स केलं आणि मँमिचा आस्वाद घेतला. नंतर पाऊस सुरू झाल्यावर बाहेरच गृपबरोबर गप्पा मारत बसलेल्या सईला रहावेनाच. ती माईक काढून सरळ पावसात जाऊन उभी राहिली. तिचा उत्साह संसर्गजन्य होता. सईमागोमाग मेघा उठली आणि सरळ स्विमिंग पूलमध्येच उतरली. मग पुष्की, शरा, स्मिता, अस्ताद, भूषण सगळेच आले. स्मिता किलर दिसत होती शॉर्टसमधे. त्या गंदकिशोरची नजर तिच्यावरून हटत नव्हती. बाकीच्यांनीही तिच्या हॉट दिसण्यावर माफक कमेंट केल्या. सगळ्यांनी धमाल केली. कधी नव्हे ते सगळे आनंदानं एकत्र येऊन हसत होते ते बघून बरं वाटलं. कॅप्टन सईदेखिल खुष होती यामुळे. तिनं तसं कॅमेरासमोर येऊन सांगितलं देखिल.
आज आधी पुष्कीलाही सई, मेघा आणि शरा हॉट दिसतोयस म्हणून पीडत होत्या.
सुशांत गेल्यावर ज्या अनेक वावड्या उठल्या, तर्क वितर्क लावले गेले, थिअरीज मांडल्या गेल्या त्यांना विराम देण्यासाठी आज सुशांतला पाचारण करण्यात आलं आणि पुन्हा एकवार त्याच्या तब्येतीचं न पटणारं कारण देऊन आता तो खेळात परत मात्र येणार नाही हे ममांनी स्पष्ट केलं.
मग ममांनी सदस्यांना दिलेलं स्कीटचं कार्य सदस्यांनी सादर केलं. (हे सुरू होत असताना नेमकं पावसामु़ळे माझ्याकडचं रिसेप्शन बंद पडलं होतं. अधला मधला भाग आता पुन्हा बघेन) मस्त नकला केल्या प्रत्येकानं. आउनं केलेली किशोरची नक्कल, सईनं साकारलेला पुष्की आणि किशोरनं केलेला अस्ताद मला खूप आवडले. ममांनी नंबर काढले बेस्ट अॅक्टर - भूषण (यानं कोणाची केली?), बेस्ट नट्या - रेशम ( मेघा) आणि आउ (किशोर). उत्तेजनार्थ पुष्की (सई) आणि किशोर (अस्ताद) असे काहीसे नंबर काढले.
यात बाकी सगळे ठीक पण रेशमनं मेघाची एक्झॅगरेटेड अँक्टिंग केली असं मला वाटतं. बाकीच्यांनी जिथे इतरांची नॉर्मल अॅक्टिंग केली तिथे रेशमनं (ती स्वतः मेघावर खार खाऊन असल्यानं ) मेघाचं कॅरिकेचर काढल्यासारखी अॅक्टिंग केली.
त्याखानं एक रॅप गायलं.
असे सगळे आनंदी क्षण अनुभवल्यवर मग ममा किशोरवर बरसले. चढलेच ते त्याच्या अंगावर अक्षरशः. पण व्हेरी फ्रँकली त्यामुळे त्याच्यावर फारसा काही परिणाम झालेला दिसला नाही. गेंड्याची कातडी आहे तो इसम. सॉरी म्हणतानाही त्याला खरंच सॉरी वाटतंय असं दिसलं नाही.
ममांनी मग मेघा, सई, शरा आणि पुष्कीचं कौतुक केलं. इतरांनाही ओरडले की तुम्ही का काही स्टँड घेतला नाही? अस्ताद, भूषण, स्मिता, त्याखा यांना इंडिव्हिज्युअली जाब विचारला आणि स्पष्टीकरण द्यायला लावलं. इथेही भूषण आणि त्याहीपेक्षा अस्ताद यांच्या चेहर्यावरची माशीही हलली नाही. अस्तादतर अतिशय उर्मटपणे (म्हणजे त्याच्याकरता नॉर्मल) नजरेनं ममांकडे एकटक बघत बसलेला. आपल्या वागण्याची खंत वाटल्याचं अजिबात दिसत नव्हतं त्याच्या चेहर्यावर.
पण ... आणि हा पण बराच मोठा आहे कारण हा पण वेळोवेळी किंबहुना प्रत्येक वेळी समोर येतो की रेशमला एका शब्दानं काही का बोलले नाहीत ममा? रेशमही तिथे आली होती आणि आपण त्या गावचेच नाही असा चेहरा करून वावरत होती कारण ओरडणारा तिच्या गृपमधला होता. हीच जर उलटी परिस्थिती असती तर रेशम लगेच दादागिरी करायला आली असती.
ममा, थिस इज जस्ट नॉट फेअर. रेशमचे आणि ममांचे काय लागेबांधे आहेत माहित नाही पण तिला नेहमी फेवर केलं जातंय ममांकडून. पब्लिकच्या लक्षात येतंय ते. ते रेशमला चक्क घाबरतात बहुतेक. नाहीतर तिच्या हातात त्यांच्या नाड्या आहेत काहीतरी.
शिवाय आज घरातल्या पुरुषांवर किशोरविरुद्ध काही स्टँड न घेण्याबद्दल जेव्हा ममा ओरड होते तेव्हा ते म्हणाले की ' नाहीतर तुम्ही बांगड्या भरा" हॅल्लो! इट इज नॉट पॉलिटिकली करेक्ट ममा. पुरुषांना बांगड्या भरायला सांगणे म्हणजे त्यांचा अपमान करणे ही कन्सेप्ट सोडा. बांगड्या बायका घालतात म्हणून ते कमीपणाचं हे डोक्यातून काढा. तो वाकप्रचार असला तरी तो आता चुकीचा आहे आणि तो वाक्प्रचारच आता मोडीत काढा.
ममांनी मेघाला स्मिताला मोलकरीण म्हटल्याबद्दल दटावलं. कारण मोलकरीण हा शब्द तिनं असा derogatory meaning नं वापरायला नको होता असं त्यांचं मत होतं. जे बरोबरच आहे. पण मग तुम्ही देखिल जरा सजग रहा हो ममा. रच्याकने, ममा किती चुकीची मराठी बोलतात.
एनिवे, तर आजचा एपिसोड हा असा इथेच संपलाय. उद्या उश्यांच्या टास्कचा हिशोब मांड्ला जाणार आहे.
रात्री कॅप्टन रुममध्ये सईला
रात्री कॅप्टन रुममध्ये सईला गरम व्हायला लागलं म्हणून ती सरळ पुन्हा नेहमीच्या जागेवर येऊन झोपली.
ममा, थिस इज जस्ट नॉट फेअर.
ममा, थिस इज जस्ट नॉट फेअर. रेशमचे आणि ममांचे काय लागेबांधे आहेत माहित नाही पण तिला नेहमी फेवर केलं जातंय ममांकडून. पब्लिकच्या लक्षात येतंय ते. ते रेशमला चक्क घाबरतात बहुतेक. नाहीतर तिच्या हातात त्यांच्या नाड्या आहेत काहीतरी.
<<
Haven't seen today's episode but I feel the same !
Resham is the only one who addresses him as 'Mahesh' !
Everyone else including Aau follow the protocol of addressing him as Mahesh sir /Maheshji.
भूषण पुन्हा चापटरपणे निसटला .
भूषण पुन्हा चापटरपणे निसटला .
पुष्करने महिला वर्गाचे वोट कमावले.
रेशमची आणि महेश ची काय स्कीम आहे ??
म मां मस्त बोलले चौगुलेला आणि
म मां मस्त बोलले चौगुलेला आणि पुष्कर सोडून सर्व पुरुषांना बांगड्या भरायला सांगितल्या, लय भारी. एकटा पुष्कर भिडला चौगुलेला आणि तो बायकांना रिस्पेकट देणारा खरा जेंटलमन ठरला याचा मला खूप आनंद झाला.
म मां स्मिताला पण योग्य बोलले. फक्त रेशमला एका शब्दाने विचारलं नाही की बायगो तुला रेशमताई म्हणतात ह्या मुली तर त्या जेव्हा चुकीच्या गोष्टींवर योग्य बोलत होत्या तेव्हा तू काहीच कसं बोलली नाहीस. रेशमला तर जास्त बोलायला पाहिजे होतं आधी बोलत होता तेव्हा चौगुले रेशमचा कामगार पण होता.
सई मोलकरीण म्हणते स्मिताला ते
सई मोलकरीण म्हणते स्मिताला ते मला आवडत नाही त्यामुळे म मां त्याबद्दल सई आणि मेघाला बोलले ते बरोबर होतं.
पुष्कर टीमने स्किट छान सादर केलं.
आता सईने कॅप्टनशिप छान करून दाखवावी. नुसतं पुष्की पुष्की करत बसू नये.
सुशांतला एकदम फिट बघून बरं
सुशांतला एकदम फिट बघून बरं वाटलं, घरात परत येणार नाही बघून आनंद झाला. पण याच न्यायाने ऋतुजाला पण आणणार नाहीत का कारण ती पण घरी गेलीय आणि तिने सर्व वाचलं असेल.
रात्री कॅप्टन रुममध्ये सईला
रात्री कॅप्टन रुममध्ये सईला गरम व्हायला लागलं म्हणून ती सरळ पुन्हा नेहमीच्या जागेवर येऊन झोपली. Lol

<<<
झालं , आउंनी पाहिलं तर गजब होणार किंवा मग तिला परत आलेली पाहून आउ रातोरात मेघाला बेडवरून हलवून त्या स्वतः तिथे झोपणार , सकाळी सईने डोळे उघडताच आउचे डोळे वटारलेले डोळे दिसणार असे काय काय सीन्स डोळ्यापुढे येतायेत
Btw , कोणी ऐकलं का परवा आउ काहीतरी बोलल्या कि सुशान्त माझ्यावर ओरडला म्ह्स्णून अजारी पडला टाइप काहीतरी
मागे पण स्मिता भांडली तेंव्हा माझ्यावर खुन्नस देणार्यांना देव माफ करत नाही टाइप काहीतरी बोलून नवर्याची स्टोरी सांगितली होती.
हो डीजे. अतिशय चुकीच्या
हो डीजे. अतिशय चुकीच्या बोलल्या आऊ त्यांच्यामते त्यांना त्रास देतात ते आपोआप काही कारणाने बाहेर पडतात. परत स्मिता त्यांना काहीतरी बोलणार आता, वाजणार त्यांचं. आता कदाचित ती बाहेर पडण्याचे चान्सेस मग म्हणतील बघ कशी मला बोलत होती, पडली बाहेर. मागे सगळेच आऊना बोलतात. आऊ पण सगळ्यांना बोलतात.
चौगुले जास्त दिवस आला असेल तर पुढच्यावेळी तो जायला हवा बाहेर.
स्मिता पण काय त्यांना बोलते
स्मिता पण काय त्यांना बोलते काय माहिती, ट्युबलाईट कोण घरात असे विचारणार बहुतेक, ती आऊ म्हणणार. खरं तिचीच ट्युबलाईट उशिरा पेटते, एनिवे उद्या कळेल. आऊना पण स्मिता काही बोलली तर जास्तच लागतं.
अरे ते मांजरेकर काय विचारत
अरे ते मांजरेकर काय विचारत होते ...लोकं काय स्पष्टीकरण देत होते..मांजरेकरांना तरी कळत होते का? म्हणजे काहीही बोला पण बोला, बोलणं महत्वाचं, तसेही ते प्रतिप्रश्न करत नाहीत. सगळ्यांना विचारताना रेशमाला न विचारणं लग्गेच लक्षात आलं.
यात बाकी सगळे ठीक पण रेशमनं मेघाची एक्झॅगरेटेड अँक्टिंग केली असं मला वाटतं. >> हो मलाही वाटलं. मेघ खूप अलर्ट असते, खूप चाणाक्ष वाटते मला. सो 'बिग बॉस बोलताना ती लक्ष देत नाहीये ते जरा जास्त वाटलं.
कोणी ते ऐकलं का, म मा पुष्करला म्हणाले नॉर्मल बोलला असतास तरी सईसारखा बोलला असतास , ते मला जरा विचित्र वाटलं.
यावेळेस त्या खा चा नंबर.... काही कंटेन्ट देत नाहीये...द्यायला गेलं तरी पोलखोल होते, मला त्या खा खूप गरीब बिचारा वाटायला लागलाय, म्हणजे कितीपण चाप्टरपणा केला ना तरी मूळ स्वभावच भिडस्त , असे लोकं 'बिग बॉस ला चालत नाहीत.
चला, ऋतुजा येणार नाही हे
चला, ऋतुजा येणार नाही हे कन्फर्म झालं म्हणजे..
वाईट वाटतंय तिच्यासाठी. तिला खूप चांगला चान्स होता, इंडस्ट्रीत नाव मिळवायचा. ॲक्शन रोल वगैरे मिळाले असते तिला फिल्म्समध्ये जास्त दिवस टिकली असती तर.
स्मिताबद्दल माझं मत थोडं
स्मिताबद्दल माझं मत थोडं निगेटिव्ह होत आहे. ती मनाने खूप चांगली आहे पण मला वाटतंय ती गंडलीये ह्या शोमध्ये. तिला स्टॅंड घेणं हे अडचणीत येण्यासारखं वाटतंय. पण जसा जसा शो पुढे जाईल तसतसं ब्राऊनी पॉईंट्स कमवूनच इथं राहता येईल. नुसतं कामं करून उपयोग नाही.
आऊ ही टिपिकल गावाकडे तुझी ताटी उचलली, तुझं तळपट होईल वगैरे शिव्या घालणाऱ्या बायकांसारखी वाटायली आहे. गुड फॉर नथिंग. ह्या वेळेला नको पण पुढच्या वेळी ती जावीच.
आज कोण जाईल असं वाटतंय?
आज कोण जाईल असं वाटतंय?
नॉमिनेटेड आहेत : मेघा, आउ, अस्ताद, भूषण, रेशम, त्यागराज
मला वाटतंय त्यागराज जाईल.
काल ममां म्हणाले ना की बिग
काल ममां म्हणाले ना की बिग बॉसच्या ठरलेल्या हॉस्पिटलमध्येच त्याने उपचार घेतले असते तर त्याचे परत यायचे चान्सेस होते असं. ऋतुजा कुठे उपचार घेतेय हे कुठे स्पष्ट झालंय अजून?
जसं सुशांतला कन्फेशन रुममधूनच बाहेर पाठवलं तसंच ऋतुजाही गेली होती. तिचंही सामान पाठवून दिलं होतं नंतर. पण अजून तिच्या नावाची पाटी आहे तिथेच. याचा अर्थ......
पण याच न्यायाने ऋतुजाला पण
पण याच न्यायाने ऋतुजाला पण आणणार नाहीत का कारण ती पण घरी गेलीय आणि तिने सर्व वाचलं असेल. >> ममा असे पण म्हणाले की याच घरात राहुन उपचार घेतले किन्वा लोणावळ्यामधे जे यांचे हॉस्पिटल आहे तिथे उपचार घेतले तर परत शो मधे येता येते. कारण त्या हॉस्पिटल मधे पण बिग बॉस टीम यांना प्रसार माध्यमे व फोन बघू देत नाहीत त्यामुळे बाहेर काय चालले आहे ते तिथे कळत नाही. कदाचित रुतुजा त्या हॉस्पिटल मधे च उपचार घेत असावी. मधे तिचा विडीओ दाखवला तेव्हा पण ती हॉस्पिटल रूम मधेच असावी असे दिसत होते. सो ती तिथे असेल आणि तिला बरे वाटले तर ती परत शो जॉइन करू शकते.
आडो, डेलिया + १
आडो, डेलिया + १
तिने ट्विटरवर लाईव्ह केलेले २
तिने ट्विटरवर लाईव्ह केलेले २ आठवड्यांपुर्वी.
सुशान्त आज खूप वेगळा , वेल
सुशान्त आज खूप वेगळाच , वेल ग्रुम्ड आणि एकदम टोन्ड डाउन दिसत होता !
अजारी असणे इश्यु नसेलच असं पुन्हा एकदा वाटून गेलं उगीच.
त्याला टाटा केलय तर मग आज एलिमिनेशन कॅन्सल करणार का ?
नाही कॅन्सल केलं तर आज खात्या जाणार बहुदा पण भुषण गेला तर बरं होईल.
म.मां ची शाळा बाकी सगळ्यांनी लिहिलय तसं रेशम सोडून सगळ्यांवर बरस्स्ले.
आज स्टार झाला पुष्की , गेल्या आठवड्यात बोलणी खऊन यावेळींमात्रं ऑलमोस्ट सत्कार, अगदी म.मां कडून स्पेशल टाळ्या !
वेल डन पुष्कर !
इतर सगळ्यांनी बोलणी खाल्ली आउंसाठी सिच्युएशनवर स्टँड न घेतल्याने पण रेशमही तिथे काहीही न करता चिप्स खात बसली होती तरी तिला काहीच म्हंट्ले नाहीत, उद्या तरी करतील का याचा उल्लेख ?
नाही केला तर जे प्रेक्षक समजतायेत तसच चालु आहे असा अर्थ काढावा लागणार !
या शिवाय नॉमिनेशन टास्क ला म.मां नी जे विचारले ते मुळीच नाही पटले , लास्ट वीकेंडला नॉमिनेशन सिरियसली घेत नाही म्हणून ओरडले आणि आज म्हणे आउ आईसारखी आहे तर तिला का वाचवल नाही खुर्चीवरून उठून
ती स्किट्स अगदीच अॅव्हरेज शालेय गॅदरींग व्हरायटी होती, पुष्की गृपचं त्यातल्या त्यात बरं.
रेशमला मेघाची अॅक्टींग अजिबात नाही जमली, अॅक्टर्स पैकी आउ आणि किशोर फक्त चांगले वाटले.
सगळ्यात बेकार त्यागराजचे रॅप, अगदीच पकाऊ.
मला वाटतं सुशांतला त्याच्या
मला वाटतं सुशांतला त्याच्या फॅमिलीने आणि पक्षाने हलवलं असणार, परत नको यायला म्हणून, एकेक बघून इमेज पार खाली गेली होती.
आता एकेक वाचून जंटलमन होऊन यायचं होतं पण bb आता येऊ नाही देणार.
ममां रेशमला फेवर करतात हे आज
ममां रेशमला फेवर करतात हे आज प्रकर्षानी जाणवले. आउसाठी स्टँड न घेण्याबाद्दल तिला काहीच म्हणाले नाहीत. तसंच तिचं इतकं भंकस ओव्हरअॅक्टींग होऊनही तिचा पहिला नंबर! ये बात कुछ हजम नही हुई!
स्कीट पुष्करकंपनीचं चांगलं झालं.
भूषणचा फार राग येतो. दरवेळी करुनसवरुन नामानिराळा होऊ पहातो आणि आश्चर्य म्हणजे ममां चक्कहोऊ देतात.
आज तो जायलाच पाहिजे.
रेशमने केलेली मेघा (?) बघून
रेशमने केलेली मेघा (?) बघून ऊलट ममांने तिला ओरडायला हवं होतं कारण मेघा अशी कार्टूनसारखी चालतबोलत नाही. तर ऊलट रेशमला अभिनयाचे बक्षिस, किती पार्शियल आहेत ममां. त्या स्मिताला बिचारीला वसावसा ओरडत असतात, आस्ताद आणि रेशमसमोर बोलती बंद. आऊतर स्पेशल गेस्ट आहेत बिबाॅच्या. काही काम करायचं नाही, खायचं, प्यायचं आणि लोळायचं, बिचींग करायचं. कोणि नाॅमिनेट केलं तर जन्माचं वैर असल्यासारखा डूख धरायचा. ती स्मितातरी कशाला त्यांना बोलून चिखलात हात घालते. ममां किती बाजू घेतात आऊची पहिल्या दिवसापासून आणि आऊ किती सविस्तर सगळं सांगत बसते, तिला नाही म्हणत कधी वेळ कमीए, काल त्याखाला म्हणाले रॅप आवरा पटापट. पुष्करला ममां ईनडिरेक्टली काल बायल्या म्हणाले, म्हणजे मुलींसारखा बोलतो, असं नाही म्हणायला पाहिजे होतं त्यांनी.
होहो.... ते पुष्करला तसे
होहो.... ते पुष्करला तसे म्हणालेले बिल्कुलच आवडले नाही.... भूषणला मात्र मस्त झाडले त्यांनी... "चायसे ज्यादा किटली गरम म्हणाले त्याला"
स्मिताला अज्जिबात झेपत नव्हते उत्तर द्यायला.... मी मधूनच ऑफ होते काय!.... लोकांचे विनोद वाया जातात काय! .... काहीच्या काही!
बाकी पूल पार्टी मस्त झाली..... सगळ्यांचाच मूड मस्त होता
बाकी ते नो एलिमिनेशन वीक असेल
बाकी ते नो एलिमिनेशन वीक असेल तर "वोटींग लाईन्स बंद" असा मेसेज दाखवतात ना आपल्याला.... त्यामुळे एलिमिनेशन होईल आज!
Pages