बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>रेशमने केलेली मेघा (?) बघून ऊलट ममांने तिला ओरडायला हवं होतं<<

का बरं? स्किटची थिम होती "नक्कल" करा म्हणुनच ना? मग नक्कल लाउड केल्याशिवाय त्या कॅरेक्टरची छबी रंगवता येत नाहि. बाहेर जे कमेडियन्स बच्चन साहेबांची नक्कल करतात ती लाउड अस्ल्यानेच हशा-टाळ्या मिळवते ना?

मांजरेकरांनी सुशांतला परत आत घेता येणार नाहि याला कारण बिग्बॉसचं फॉर्मॅट आहे, हे सांगणं म्हणजे बिग बिएस होतं. यापुर्विच्या सिझन्स मध्ये इमर्जंसी कारणांमुळे बाहेर पडलेले सदस्य परत आत आलेले आहेत. काहि तर एलिमिनेट झाल्यावर बाहेर २-३ आठवडे राहुन, मस्तपैकि अभ्यास्/रिसर्च करुन आत आले होते आणि त्यांनी बाहेरची सगळी अंडि-पिल्ली घरातल्या लोकांशी शेअर केली होती... Lol

झालं , आउंनी पाहिलं तर गजब होणार किंवा मग तिला परत आलेली पाहून आउ रातोरात मेघाला बेडवरून हलवून त्या स्वतः तिथे झोपणार , सकाळी सईने डोळे उघडताच आउचे डोळे वटारलेले डोळे दिसणार असे काय काय सीन्स डोळ्यापुढे येतायेत

>>> अगं नाही डिजे. नेमक्या त्यावेळी आऊ कॅप्टन रूम मधे वाॅशरूमला जायला आली होती. तर तिला सई सांगत होती की फार गरम होतंय इथे. मग आऊच तिला म्हणाली की त्या खोलीत ये झोपायला.

रच्याकने, मराठी बिबाॅ मधे कॅप्टन म्हणून काही प्रिव्हिलेजेस नाही देत का? हिंदीत कॅप्टनची रूम एकदम सॅक्रेड असे. इतर कोणाला त्यात प्रवेश नसे. कॅप्टनची सेवा करायला लागत असे. त्याला काही विशेष अधिकार असत. असं काहीतरी अजून इथे दिसलं नाही.

इथे कॅप्टन फक्त कामाची वाटणी करतो आणि स्वतःही कामे करतो. कॅप्टन्सीचा टास्क झाला तो दिवस सोडून इतर दिवशी कॅप्टन कोण ते लक्षातही राहत नाही.

सुशांत एक्दम वेगळाच वाटला काल. काहीही हेल्थ प्रॉब्लेम दिसला नाही त्याला. 'अपरिहार्य ' कारणाने सोडलेला दिसतो शो. आस्ताद " तो आता २०१९ ची तयारी करतोय" असं म्हणाला ओझरता. पण तसे असले तरी त्यामुळे शो काय तडकाफडकी सोडायचा असे मला वाटले. दादागिरी, गुन्हेगार, वाईट पब्लिक इमेज असलेल्या लोकांना निवडणुकीचे तिकिट मिळणे कधी पासून बंद झाले आपल्याकडे? Proud
स्किट मधे मला तरी किशोर चा 'आस्ताद' सगळ्यात आवडला. नंतर पुष्कीची सई. मस्त केले त्याने. शर्मिष्ठामधे पण पोटेन्शियल आहे Happy तिला जास्त काम नव्हते पण मला हसू आले तिच्या त्या २ च लाइन्स चे. उना समहाऊ मला उनाच वाटली. रेशम तरी जराथोडेफार मेघाचे बेअरिंग घेऊ शकली पण मेघाला शून्य मार्क. बिग बॉस संपले की तिचे अ‍ॅक्टिंग करियर संपुष्टात येणार Happy भूषण ला कसले बक्षिस दिले ममाने ? मला नाही आवडले त्याचे.

बाकी ममांनी काही विशेष खरडपट्टी काढली असे वाटले नाही. एकदा च ओरडले फक्त तेही फारच जनरिक. सगळेच मेंबर "हे आपल्याला लागून होत नाही" असा चेहरा करून मख्ख पहात होते. स्लायमी भूषण अ‍ॅज युज्वल काहीतरी टॅन्जन्ट बोलून वळवळत बाहेर पडला सिचुएशन मधून. ममां उनाला पुन्हा पुन्हा सुचवत आहेत की तलवार बाहेर काढ पण तिला ते समजत नाही आहे. बाहेर जाण्याची वेळ आली आहे थोडक्यात. किशोर ला किंवा इतरांना पण जे काही ओरडले ते पण त्यांच्या एक्सप्लेनेशन वर फॉलो अप क्वेश्चन्स काही नाहीत त्यामुळे ते इफेकिटिव नाही झाले. फुसका बार!

कि नंतर आत जाऊन आस्तादला बोलला कि आउ तयारच होती, काल २-३ हात मारून झाले होते आज फायनल मारला, मला भांडायचेच होते ते ममांनी बघितले नाही वाटते. त्याने मी गम्मत करायला गेलो आणि हे झाले असे बोलल्यावर ममां शांत झाले Uhoh

बिग बॉस संपले की तिचे अ‍ॅक्टिंग करियर संपुष्टात येणार >>. मेघा खरंतर अजिबातच नटी मटेरियल नाहीये. तीनं प्रोड्युसर व्हावं. पैसा आहेच तिच्याकडे.

खात्या बाहेर.

पण त्या कुशन टास्कचं काय झालं ? त्याबद्दल अवाक्षरही नाही. आजचा पूर्ण एपिसोड फुल्ल टु गंडलेला होता! नुसताच टाईमपास.

आज पुन्हा डोक्यावर विविध विशेषणांना मुकुट घालायचा पकाऊ खेळ खेळला.

नंतर खुर्चीवर नाॅमिनेटेड सदस्यांना बसवून बाकीच्यांना त्या. सदस्याबद्दल प्रश्न विचारून हो - नाही उत्तरं द्यायला लावणे हा महापकाऊ खेळ होता. जर जास्त उत्तरं हो असतील तर एक
पुठ्ठ्याचा मोठ्ठा हात खुर्चीवर बसलेल्याला थोबाडीत बसत होती. पण हे इतकं बिनडोक होतं की 'तुम्हाला काय वाटतं की हा सदस्य सेफ असेल का?ʼ यालाही हो उत्तर आल्यावर थोबाडीत बसत होती.

मेघा मध्येच एकदा रेशमला ' तु पैसे चोरलेस असं म्हणताना दिसली. याचा अर्थ कुशन टास्कबद्दल पण चर्चा झाली पण ती आपल्याला दाखवलीच नाही.

मुकुटाच्या टास्कमध्ये आउ एकदोनदा कोणी नाव घेतल्यानं चिडली म्हणून तो खेळ दाखवला बहुतेक. पण एक आख्खा कॅप्टन्सीचा टास्क झाला आणि त्याबद्दल काहीच चर्चा नाही? किती वेडेपणा आहे हा.

ममांनी आता स्मिताला टोमणे मारणे सोडून दिले तर बरं. त्यातून त्यांचा काहीही पुरुषार्थ दिसत नाही. ती पण दरवेळी अत्यंत यडपटपणा करते खरंतर पण जस्ट लीव इट. तेच तेच बघून कंटाळा आला.

आज आउनं मेघा टीमबरोबर सॉलिड मैत्री दाखवली. व्हिलन मंडळींचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते.

अस्ताद हल्ली मेघानं तोंड उघडलं की डोळे अस्मानात पोहचवतो. बाबारे, तुला जसं बोलण्याचा हक्क आहे तसाच तिला आहे. तिनं तुला वाटतं, झेपतं, हवं आहे तितकंच आणि सईनं तुला हवंय त्याच व्हॉल्युममध्ये बोलावं ही तुझी अपेक्षा अत्यंत बिनबुडाची आणि मूर्खपणाची आहे. ग्रो अप!

त्या रेशमला कोणीतरी नवे कानातले आणून द्या रे. दर शनिवारी तिचे तेच ते कानातले पाहून कंटाळा आलाय.

व्हिलन मंडळींची डबल ढोलकी बघा. अस्ताद आधी काही स्ट्रॅटेजी ठरवतो आणि त्यामुळे स्वतःला किंगमेकर समजतो. पण हेच जर मेघानं केलं तर ती चालबाज. का? तर ती सबंधवेळ तेच करत असते असं त्यांना वाटतं. म्हणजे यांनी पाच मिनिटं घालवली स्ट्रॅटेजी ठरवायला तर मेघानं पण तितकीच मिनिटं घालवली पाहिजेत. तिनं अर्धातास याबद्दल तिच्या टीमबरोबर चर्चा केली तर तो फाउल!

MCP आहेत व्हिलन मंडळी. आणि रेशम न बोलून शहाणी!

कॅप्टनशिप टास्क तर कॉमेडिच होता, सई जस काय ५ वर्शासाठीच उमेदवार आहे इतकी वचन घेण चालल होत तसही कॅप्ट्नशीप तितकी पॉवरफुल नाहिचे आहे इथे हिन्दीत स्वतः नॉमिनेट न होण दुसर्याला नॉ मिनेट करण असे बरेच अधिकार होते कॅप्ट्नला.. मेघाला बोलु का देत नव्हते पण सगळेच बोलत असताना तिला बोलु न देण अतिच होत होत...
कालच्या अभिन्यात भुषण बरा होता.

इथे कॅप्टन फक्त कामाची वाटणी करतो आणि स्वतःही कामे करतो. कॅप्टन्सीचा टास्क झाला तो दिवस सोडून इतर दिवशी कॅप्टन कोण ते लक्षातही राहत नाही. >>> लय भारी Lol

त्या रेशमला कोणीतरी नवे कानातले आणून द्या रे. दर शनिवारी तिचे तेच ते कानातले पाहून कंटाळा आलाय. >>> लकी असतील, हे कानातले घातल्यावर वाचत असते ती असं तिला वाटत असावं.

कु टा बद्दल बोलले नाहीत म मां, रेशमने stand घेतला नाही त्याबद्दल बोलले नाहीत. आमची स्मिताच दिसते. तीपण ना सगळे तिला ट्यूबलाईट म्हणतायेत आणि आहे पण ती तर मीच म्हणावं ना. ती बिचारी soft target म मां ची. काही नाही नीट समजत तर बोलूच नये तिने. तिच्या उशा शिवण्याच्या डोकेबाजी बद्दल एक शब्द नाही बोलले.

आऊची नाटकं आता बास झाली. पुढच्या वेळी ती आली नॉमिनेशनमध्ये तर तिलाच हाकला. जरासुद्धा खिलाडू वृत्ती नाहीये त्या बाईमध्ये. चिडकी, रडकीए नुसती.

स्मिताला अध्यात्माचं फार आहे (:P). त्यामुळे ती मुळात शांत असते. कित्येकदा, काय करायचंय ते करा म्हणून ती तिथून निघून जाते..

अहो दक्षिणाताई 2000 पूर्ण तर होऊ द्या. कंटीन्यूटी नाही राहत मधूनच धागा काढला की. टेन्शन नका घेऊ नवीन धागा काढण्याचा मान तुम्हालाच देऊ आम्ही नाही काढणार कोणी.

टेन्शन नका घेऊ नवीन धागा काढण्याचा मान तुम्हालाच देऊ आम्ही नाही काढणार कोणी.
>>> लोल...मागे कोणीतरी म्हटले होते ना पुढचा धागा काढायचा मान मामी ना दिला पाहिजे... त्याच टेन्शन आले का?

कालच्या भागात सगळेच म्हणत होते की किशोर मुद्दाम आउ ला टार्गेट करत आहे ते सर्वांच्या लक्षात आले होते. बहुधा त्यामुळेच कुणी इन्टरफिअर केले नसावे. ही बिग बॉस ची चाल आहे असे समजून. तोही आऊ ची तेवढी एक कुरापत आणि तो पुष्कर सोबत एक सीन क्रिएट करून थांबला. आता शांत बसलाय. ते अ‍ॅक्टिंग होतं असंच वाटतंय एकूण. तो चांगला अ‍ॅक्टर आहे ते सिद्ध केलेच आहे त्याने.
ममां काल उगीच शरा वर डाफरले. म्हणे गुलाम टायटल काही हसण्यासारखे नाही. सिरियसली घे.
आऊ चे चिडणे सगळेच एंजॉय करत होते. तेच हवं होतं ममांना.
खात्या गेला. नो सरप्राइज देअर. त्याचं "नशीबाने गंडवलं" गाणं अ‍ॅप्ट झालं तिथे. कशाला त्याला पाठवलं कुणास ठाऊक. वाइल्ड कार्ड मटिरियल अजिव्बातच नव्हता तो. काहीही व्हॅल्यू अ‍ॅडिशन झाली नाही त्याच्या येण्या- जाण्याने. आता नेक्स्ट कुणाचा नंबर? मला भूषण गेलेला आवडेल पण वाइल्ड कार्डवाले जास्त डेन्जर मधे असतील असे वाटते. इन्क्लुडिंग शरा.

Pages