नाकारडे

Submitted by प्रमोद् ताम्बे on 26 April, 2018 - 20:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य : दोन काकड्या,हिंग, चवीनुसार सैंधव मीठ,हिरवी मिरची,लवंगा, दालचिनीचा तुकडा,काळे मिरे,जिरे,सुंठ पावडर , मोहरी,५-६ पाकळ्या लसूण,अर्धी वाटी मलईचे घट्ट दही ,बारीक चिरलेली कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

कृती : काकड्यांची साले काढून, काकड्या किसून घ्या.आता हा कीस राजापुरी पंचावर टाकून, पंचा गुंडाळून चक्क कपडा पिळल्या सारखा घट्ट पिळून घ्या.जमेल तेव्हढे पाणी काढून टाका.
वरील सर्व मसाले, मोहरी, सुंठपावडर , लवंग दालचिनी , जिरे मिरे, यांची मिक्सरवर छान पावडर करून घ्या.
एकदा बारीक झाले की मग त्यातच लसूण व मिरची घालून परत एकदा मिक्सर वर वाटून घ्या. हळद,हिंग, सैंधवमीठ मिसळा.
आता हे सर्व काकडीच्या किसात मिसळून छान एकत्र करा. त्यात घट्ट दही आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करा. झाले तुमचे चविष्ट असे तोंडीलावण तय्यार !
मोहरीच्या उग्रपणामुळे हे 'नाकारडे' खाताना नाकातून अक्षरश: सुं सुं पाणी सुरु होत. सर्दी पडश्यावर एकदम नामी उपाय !! झटकन जाम झालेलं डोकं एकदम हलक होत.
घरात फ्रीज नसलेल्या काळातही हे 'नाकारडे’ सहज महिनाभर मडक्यात राहायचं अन् टिकायच सुद्धा.
आतातर मी चक्क बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवून दोन-तीन महिने मनसोक्त चाखत राहातो.
टीप : या नाकरड्याला वह्राडात कुरमुडे असे म्हणतात.

वाढणी/प्रमाण: 
१०-१२
अधिक टिपा: 

टीप : या नाकरड्याला वह्राडात कुरमुडे असे म्हणतात.

माहितीचा स्रोत: 
कोकणातील आजी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे एकदम भारी लागेल. काकडी बरोबर दालचीनी कधीच ट्राय केली नव्हती. नाव खरचं काही तरी मस्त पाहिजे होत.
मस्त असतात रेसीपी तुमच्या .