Submitted by pltambe@yahoo.co.in on 18 April, 2018 - 08:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
साहित्य :एक गड्डा कोवळा नवलकोल,साजूक तूप एक डाव,साखर एक वाटी, दूध एक कप,खवा १०० ग्रॅम,बेदाणे ,काजू पाकळ्या,केशराच्या चार काड्या.
क्रमवार पाककृती:
कृती : नवलकोलची साले काढून किसून व मायक्रोवेवहमध्ये वाफवून घ्या. गॅसवर एका कढईत तूप तापवून घेऊन त्यात वाफावलेला नवलकोलचा कीस घालून सोनेरी रंगावर परतून घ्या व दूध घालून शिजवा. कीस शिजला की खवा घालून परता. आता साखर घालून परता. खवा व साखर एकजीव झाले व कीस घट्ट होत आला की त्यात केशर,काजू पाकळ्या व बेदाणे घालून उलथण्याने हालून एक वाफ काढून गॅस बंद करा.
वाढणी/प्रमाण:
३ते ४ जंणांसाठी
अधिक टिपा:
जेवणानंतर स्वीट डिश म्हणून सर्व्ह करा.
माहितीचा स्रोत:
मित्राची पत्नी
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवलकोल ला उग्र वास असतो, या
नवलकोल ला उग्र वास असतो, या हलव्यात तो वास जाणवत नाही का?
नवलकोल माझी आवडती भाजी.
नवलकोल माझी आवडती भाजी.
किसणे, वाफवणे, परतणे या प्रकारात वास जात असावा.
आमच्याकडे नवलकोल अजिबात आणला
आमच्याकडे नवलकोल अजिबात आणला/केला जात नाही पण टेक्श्चर मुळ्यासारखं असतं असं बघितल्यासरखं वाटतंय. वासही तसाच उग्र असतो का?
वासही तसाच उग्र असतो का? >>
वासही तसाच उग्र असतो का? >> हो बराच मुळ्यासारखा उग्र वास असतो. भिजवलेली मुगडाळ, गोडा मसाला इ घालुन केलेली त्याची भाजी कशीबशी खाल्ली जाते कारण तिखट भाजीला तो वास चालुन जातो. गोड चवीबरोबर तो वास जरा वेगळंच वाटेल. ( शक्यता आहे कि कोवळ्या नवलकोलला तो वास कमी असेल).