नवलकोलचा हलवा

Submitted by प्रमोद् ताम्बे on 18 April, 2018 - 08:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य :एक गड्डा कोवळा नवलकोल,साजूक तूप एक डाव,साखर एक वाटी, दूध एक कप,खवा १०० ग्रॅम,बेदाणे ,काजू पाकळ्या,केशराच्या चार काड्या.

क्रमवार पाककृती: 

कृती : नवलकोलची साले काढून किसून व मायक्रोवेवहमध्ये वाफवून घ्या. गॅसवर एका कढईत तूप तापवून घेऊन त्यात वाफावलेला नवलकोलचा कीस घालून सोनेरी रंगावर परतून घ्या व दूध घालून शिजवा. कीस शिजला की खवा घालून परता. आता साखर घालून परता. खवा व साखर एकजीव झाले व कीस घट्ट होत आला की त्यात केशर,काजू पाकळ्या व बेदाणे घालून उलथण्याने हालून एक वाफ काढून गॅस बंद करा.

वाढणी/प्रमाण: 
३ते ४ जंणांसाठी
अधिक टिपा: 

जेवणानंतर स्वीट डिश म्हणून सर्व्ह करा.

माहितीचा स्रोत: 
मित्राची पत्नी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे नवलकोल अजिबात आणला/केला जात नाही पण टेक्श्चर मुळ्यासारखं असतं असं बघितल्यासरखं वाटतंय. वासही तसाच उग्र असतो का?

वासही तसाच उग्र असतो का? >> हो बराच मुळ्यासारखा उग्र वास असतो. भिजवलेली मुगडाळ, गोडा मसाला इ घालुन केलेली त्याची भाजी कशीबशी खाल्ली जाते कारण तिखट भाजीला तो वास चालुन जातो. गोड चवीबरोबर तो वास जरा वेगळंच वाटेल. ( शक्यता आहे कि कोवळ्या नवलकोलला तो वास कमी असेल).