मित्र नव्हे, परिचित !

Submitted by हेमंतकुमार on 16 April, 2018 - 02:01

माझ्या वैद्यकीय कारकिर्दीच्या सुरवातीच्या टप्प्यातील हा प्रसंग आहे. एम.डी. ही पदवी प्राप्त करून मी एका हॉस्पिटलमध्ये सल्लागार म्हणून रुजू झालो. ते हॉस्पिटल नव्यानेच सुरू झाले होते. त्यामुळे माझ्यासह इतर सहकारीही पायाभूत उभारणीची कामे मन लावून करीत होते. हळूहळू हॉस्पिटलचा विस्तार होत गेला. मग तेथील डॉक्टरांची संख्याही वाढवण्यात आली. अशाच एका नवीन भरतीच्या वेळी माझ्या विभागात डॉ. सतीश हा माझा कनिष्ठ सहकारी म्हणून रुजू झाला. महिनाभरातच मी त्याच्याविषयी एक अंदाज बांधू शकलो. तो जरी फारसा हुशार नसला तरी तो नेमून दिलेली कामे व्यवस्थित करीत असे.

रोज जेवणाच्या सुटीत आम्ही दोघे एकत्र डबा खाऊ लागलो. त्या वेळेस मी विवाहित होतो तर तो अविवाहित. असंख्य विषयांवर आमच्या मनमोकळ्या गप्पा होत. त्यामध्ये क्रिकेट, राजकारण, नाटक-चित्रपट इ. नेहमीचे विषय तर असतंच, पण त्याचबरोबर स्त्री-पुरुष संबंध या तारुण्यसुलभ विषयाचाही समावेश असे. सतीश या विषयातील त्याच्या शंकांचे माझ्याकडून निरसन करून घेई. त्याचे असे कुतूहल पाहून मलाही माझ्या विवाहपूर्व दिवसांची आठवण होई! आमच्या विभागात आम्ही दोघेच डॉक्टर असल्याने आमची मैत्री दृढ होत गेली.

कालांतराने सतीशच्या घरच्यांनी त्याच्यासाठी मुली पाहणे सुरू केले. त्या ‘पाहण्याच्या’ कार्यक्रमांचा सविस्तर वृत्तांत तो मला दुसऱ्या दिवशी सांगत असे आणि बायको कशी असावी यावर माझा सल्लाही विचारत असे. यथावकाश त्याचे लग्न झाले. हळूहळू तो संसारात रमला. दोन वर्षात नोकरीतही रुळला.

एव्हाना आमचे हॉस्पिटल सुरू झाल्याला चार वर्षे झाली होती. आता हॉस्पिटलचा विस्तार करण्याचे व्यवस्थापनाने ठरवले होते. त्यामुळे आम्हा सर्वांची जबाबदारी अधिकच वाढत गेली. सतीश व मी दिलजमाईने रोजची कामे जास्त वेळ थांबून पूर्ण करीत होतो. त्यामुळे आमची मैत्री घट्ट होत गेली. आम्हा दोघांना एकमेकांच्या आयुष्यातील काही माहिती नाही असे काहीच उरले नाही.

दरम्यान मी नोकरीची चार वर्षे समर्थपणे पूर्ण केल्याने आणि वाढत्या जबाबदाऱ्या स्वीकारत असल्याने मी माझ्या बढतीचा प्रस्ताव वरिष्ठांपुढे मांडला. मग माझे मूल्यमापन करण्यात येऊन त्यांनी तो व्यवस्थापनापुढे ठेवला. थोड्याच कालावधीत मला ‘वरिष्ठ सल्लागार’ या पदावर बढती देण्यात आली. नवीन पदभार स्वीकारण्याचा दिवस होता १ जानेवारी. पगारामध्ये अर्थातच आकर्षक वाढ दिलेली होती.

नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला हे समजू शकेल की तिथल्या पहिल्या बढतीचा आनंद हा अवर्णनीय असतो. तरुणपणी योग्य वयात बढती मिळणे हा त्या व्यक्तीच्या दृष्टीने महत्वाचा टप्पा असतो. मात्र जर का तुम्ही पहिल्याच पदावर बरीच वर्षे कुजलात, तर मात्र तुमची प्रगती नक्कीच खुरटते. माझ्याबाबतीत ही बढती योग्य वयातच झाली होती. त्यामुळे एक प्रकारचे चैतन्य माझ्यात संचारले होते.
बढतीचा आदेश स्वीकारतानाच कार्यालयातील अनेकांनी “डॉक्टर, पेढे पाहिजेत, खरे तर पार्टीच हवी’, असा गलका केला. त्याने मी खूप भारावून गेलो. आमचे संपूर्ण हॉस्पिटल म्हणजे एखाद्या मोठ्या कुटुंबांसारखेच होते. त्यामुळे मी दुसऱ्याच दिवशी त्या सर्वांना पेढे वाटण्याचे ठरवले. तारुण्यात आपण तसे शौकीन असतो. त्यानुसार माझ्या शहरातील सर्वात प्रसिद्ध मिठाईवाल्याकडून त्याच्याकडील सर्वात मोठ्या आकाराचे केशरी पेढे मी खरेदी केले.

हॉस्पिटलच्या उभारणीपासून आम्ही सगळे एकत्र राबलेले असल्यामुळे आमच्यात जिव्हाळा निर्माण झाला होता. त्यामुळे आमच्यातील कोणाच्याही आनंद वा दुखःद प्रसंगात सगळेच सामील होत. ठरवल्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलभर फिरून पेढेवाटप सुरु केले. मला पहिला पेढा खरे तर सतीशला द्यायचा होता पण त्या दिवशी तो नेमका कामावर उशीरा येणार होता. म्हणून मी इतरांचे वाटप सुरु केले. त्या सगळ्यांनी माझे मनापासून अभिनंदन केले.
आता मी सतीशची आतुरतेने वाट पाहत होतो. साहजिकच होते ते, कारण आम्ही रोज जास्तीत जास्त काळ एकत्र असायचो आणि जेवणही बरोबर करायचो. थोड्या वेळाने सतीश आमच्या विभागात आला. आमची नजरानजर झाली. आमच्या मैत्रीच्या नात्याने तो आल्याआल्याच माझ्या बढतीबद्दल काही बोलेल अशी माझी अटकळ होती. परंतु, इथेच मला पहिला धक्का बसला. त्याने निर्विकारपणे त्याच्या कामास सुरवात केली.
मी त्याच्याजवळ जाऊन त्याला पेढा दिला. त्यावर त्याने “काय विशेष?” असा अनपेक्षित प्रश्न विचारला. हा मला बसलेला दुसरा धक्का होता. एव्हाना माझ्या बढतीची बातमी हॉस्पिटलभर आणि कर्णोपकर्णी अनुपस्थित लोकांपर्यंतही पोहोचली होती. त्यामुळे ती सतीशला माहिती नसणे जवळपास अशक्य होते. त्याच्या “काय विशेष” ला मी ,”माझ्या बढतीबद्दल”, असे उत्तर दिले. तिसरा धक्का मला आता बसायचा होता. “हं” एवढाच हुंकार काढून त्याने पेढा तोंडात टाकला. मग तो “पेढा मस्त आहे”, म्हणाला अन त्याच्या कामात गढून गेला.

दोन मिनिटे मी अगदी सुन्न झालो. माझ्या या आनंदाच्या प्रसंगी हॉस्पिटलमधील माझ्या सर्वात जवळच्या ‘मित्रा’कडून ‘अभिनंदन’ हा पंचाक्षरी शब्दही ऐकायला मी पारखा झालो होतो. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात एवढा नकारात्मक प्रतिसाद मी प्रथमच अनुभवत होतो. थोड्या वेळाने माझा पेढेवाटप कार्यक्रम संपला. नंतर रोजची जेवणाची वेळ झाली. सतीश व मी एकत्र जेवायला बसलो. त्या दिवशी मी चांगल्यापैकी कपडे केले होते. बुटांनाही चकाचक पॉलिश केले होते. जेवताजेवता सतीशने माझ्या पायांकडे पाहिले आणि “बूट छान आहेत” असे म्हणाला. जेवण संपेपर्यंत तो तसा अबोलच होता. माझ्या बढतीचा विषय तर त्याने कटाक्षाने टाळला.

माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात पेढे वाटण्याचे अनेक प्रसंग आले होते. किंबहुना सर्वांच्याच आयुष्यात ते कधीना कधी येतात. परंतु अशा प्रसंगी, “ अरे वा, छान झालं” असे न म्हणणारी व्यक्ती मला अद्याप भेटली नव्हती. द्वेष, मत्सर, असूया इत्यादी गुण हे मानवी स्वभावाचेच भाग आहेत. प्रत्येकाच्या ठायी ते वास्तव्य करतातच. पण एखाद्याच्या आनंदाच्या प्रसंगी वरकरणी तरी त्याचे अभिनंदन वा कौतुक करणे, ही व्यावहारिक सभ्यता असते. बहुसंख्य लोक ती पाळताना दिसतात. एखाद्याजवळ आपण आपला आनंद व्यक्त केल्यावर त्याने ‘अरे वा’ वगैरे काहीही नाही म्हटले तरी चालेल, हा विचार म्हणून ठीक आहे. पण, तेवढी स्थितप्रज्ञता आपल्यात असायला आपण साधुसंतच असायला हवे. ते नसल्यामुळे आपला अपेक्षाभंग होतो. किंवा ‘फलाची अपेक्षा न धरता कर्म करीत राहा’ हे पचवणे भल्याभल्यांना संपूर्ण आयुष्य खर्ची पडले तरी जमत नाही. मी तर तेव्हा जेमतेम तिशीत होतो.

प्रस्तुत प्रसंगात सतीश हा कुठल्याच प्रकारे माझा स्पर्धक नव्हता. त्याचे वय आणि अनुभव हे माझ्याहून कमी होते. मी एम डी होतो तर तो एम बी बी एस नंतरचा डिप्लोमा धारक.
तसेच नजरेत भरावे असे काही वेगळे कामही त्याने केलेले नव्हते. तेव्हा याप्रसंगी त्याचे माझ्यावर जळणे हे माझ्या आकलनशक्तीबाहेरचे होते. आमच्या संपूर्ण स्टाफपैकी माझे अभिनंदन न करणारी सतीश ही एकमेव व्यक्ती होती आणि या गृहस्थाला मी माझा सर्वात जवळचा मित्र धरून चाललो होतो !

या एका कडवट प्रसंगाने माझ्या आनंदावर अगदी विरजण पडले. अनेक दिवस हे सतीशचे वागणे माझ्या डोक्यातून जात नव्हते. किंबहुना वरिष्ठ पदावर काम करण्याचा उत्साहच कुणीतरी काढून घेतल्यासारखे वाटत होते. त्यावेळेस मला माझ्या पूर्वायुष्यातील दोन व्यक्तींच्या उद्गारांची प्रकर्षाने आठवण झाली.

मी शाळेत नववीत असताना माझ्या वर्गात सुदेश नावाचा विद्यार्थी होता. त्या वयातही त्याचे विचार परिपक्व होते. वर्गातील सर्वजण त्याला ‘अकाली प्रौढ’ म्हणत. तो एकदा आम्हाला गप्पांच्या ओघात म्हणाला होता, “आपण वर्गातील सर्वजण हे एकमेकांचे ‘परिचित’ आहोत. एकमेकांना ‘मित्र’ म्हणण्याची चूक कोणी करू नका कारण, मित्र हे खूप वरच्या पातळीवरचे नाते आहे.

तर दुसरे उद्गार मी एका दैनिकाच्या संपादकांच्या लेखात वाचले होते. त्यांनी लिहीले होते, “संकटकाळी जो उपयोगी पडतो तो खरा मित्र, ही मित्राची व्याख्या आता फार जुनी झाली आहे. सध्याच्या काळातील व्याख्या म्हणजे, आपल्या आनंदात मनापासून सहभागी होतो तो खरा मित्र !”
या दोन्ही उद्गारांची प्रचिती मला वरील प्रसंगातून पुरेपूर आली हे सांगायलाच नको.
…..
आज वरील घटनेनंतर २५ वर्षांनी मी त्याकडे तटस्थपणे बघू शकतो, हे नक्की. परंतु तेव्हा काय वाटले होते त्या ऊर्मितून हे लेखन झाले इतकेच.

********************************
( पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर काहींनी विचारले आहे की लेखातील प्रसंगानंतर आमचे पुढे कसे काय चालले होते.

ठीक आहे, तुमचे कुतुहल शमवितो. त्यानंतर आम्ही दोघे वर्षभरच एकत्र होतो. त्याकाळात जेवढयास तेवढे असे संबंध राहिले. पुढे मी काही वर्षे परदेशात होतो. मायदेशी परतल्यावर नंतर बऱ्याच वर्षांनी आम्ही रेल्वे स्टेशनवर अचानक भेटलो.

आता खरी गंमत पुढेच आहे.....

माझा हा लेख ‘अंतर्नादमध्ये प्रसिद्ध झालेला होता. गप्पांमध्ये त्याने मला तोही त्या मासिकाचा वर्गणीदार असल्याचे स्वतः होऊन सांगितले. त्या लेखानंतरच्या महिन्यात माझा परदेशातील अनुभवाचा अन्य लेख प्रसिद्ध झाला होता तो चक्क त्याने वाचला होता ! अर्थात “मी वाचला” एवढेच तो म्हणाला. मी धन्यवाद म्हटले.

...आता ही दाट शक्यता आहे की प्रस्तुत लेखही त्याने मासिकात वाचला असेल. याबाबत आम्ही दोघेही मूग गिळून गप्प ! तो स्वतः विषय काढणे अवघड होते आणि मी तरी कशाला उकरून काढेन ?

आम्ही कौटुंबिक गप्पा छान मारल्या. ट्रेन १ तास उशीरा ने होती. त्यामुळे रेल्वे यंत्रणा, आपला देश वगैरे ‘सुरक्षित’ विषयांवरही गप्पा झाल्या.

अखेर ट्रेन आली. आमचा डबा वेगळा होता . आम्ही एकमेकांना अच्छा केले.
बास, त्यानंतर भेट नाही. पुढे कधी झालीच तर हवापाणी, कुटुंब व क्रिकेट वर गप्पा मारायला माझी काहीच हरकत नाही.
…………. लेखनसीमा……..…

तर मग डॉक्टर, तुम्हीही तो तुमचा मित्र होता हे डोक्यातुन काढुन टाका.
एक सहकारी होता. बास.
ऑफिसातल्या मुलींशी मी ही बरंच काही बोलते, गप्पा मारते, घरचे प्रॉब्लेमही शेअर करते.
पण ती माझी मैत्रीण नाही हे मला ठाउक आहे. Happy हा जॉब सोडला तर मी तेवढी कॉन्टॅक्ट मधी नाही रहाणार तिच्या.
खरंतर हे माझ्याच स्वभावात नाही. Happy
पण तिची माझ्यापेक्षा जास्त इंक्रीमेंट झाली तर तिचं अभिनंदन केलं पाहिजे हे मला कळतं. केलंच मी.
शिवाय घरच्या काही गोष्टी शेअर केल्यामुळे तिचं स्वतःचं घर नाही ह्याची तिला खंत आहे हे कळलं.
पण जेव्हा माझ्या स्वतःच्या घराची न्युज तिला सांगितली तेव्हा तिने माझं इतक्या सुंदर रीतीने अभिनंदन केलं की विचारु नका.
तिच्या डोळ्यात मला खुप आनंद दिसला मला तेव्हा.
तर हे माणसा माणसा वर आहे.
काही जळक्या प्रवृत्तीचे असतात. काही अगदी मनमोकळे.

आज वरील घटनेनंतर २५ वर्षांनी मी त्याकडे तटस्थपणे बघू शकतो, हे नक्की. परंतु तेव्हा काय वाटले होते त्या ऊर्मितून हे लेखन झाले इतकेच.>>>>हे सांगूनही लोकं विसरुन जा, माफ करा का सांगत आहेत ते कळेना.
माझे चांगले झाल्याने जो मला आपला वाटला त्याला/तिला आनंद झाला नाही, हे विसरण्यासारखे असते का? हे लक्षात राहते. पण याचा अर्थ असा होत नाही कि मी त्याबद्द्ल मनात राग ठेऊन आहे.
अश्या प्रसंगानंतर त्या व्यक्तिशी बोलूच वाटत नाही असे होत असेल तर खरेच तिथे माफ करायची/विसरायची वा दुसरी बाजू समजून घ्यायची गरज असते.

छान लेख लिहिला आहे. आवडला.

>> अखेर ट्रेन आली. आमचा डबा वेगळा होता . आम्ही एकमेकांना अच्छा केले.

अपरिचित, परिचित, मित्र, खास मित्र. डबे वेगवेगळे Wink सो, साठा उत्तराची कहाणी संपली Happy

लेख वाचला, लेखकाच्या ठीकाणी कुणीही असता तरी त्याचे मन दुखावले गेलेच असते.
इतर लोकान्च्या प्रतिक्रीया म्हणजे लोल आहेत, धागा उडवा काय, दुसरी बाजू काय नी काय...अर्रे त्या क्षणी मनस्थिती खराब असेल, आणि नन्तर अभिनन्दन केले असेल तर तसा उल्लेख आला असता ना, आणि इतका सल मनात राहिला नसता लेखकान्च्या सुद्धा. कमाल आहे, लोक दुसर्यान्चे प्रोब्लेम म्हणुन किती इझीली जज करू शकतात Happy

पण यातूनच साहित्य निर्माण होत असते हे नाकारुन चालणार नाही. >> आपण कसे सद्गुणाचा पुतळा आणि बाकीचे कसे जळकुटे, दुष्ट, पॉलिटिक्स खेळणारे अशा व्हिक्टिम प्लेयिंगऐवजी थोडा बदल म्हणून confession मोडमधे गेले लोक तर बरं होईल. त्यातुनपन साहित्य निर्मिती होऊ शकते. मला वाटत स्वप्न_राज चा एक पन्ना आहे असा. आपल्या फ्लॅट पार्टनराच्या चिठ्ठीमुळे केलेल स्वतःच्या वागण्याचं अनलिसिस.

===
बादवे मला कुमार१ यांचे माहितीपूर्ण धागे आवडतात. मी त्यांची चाहतीदेखील आहे.

इथे मी माझ्या नावडत्या लेखन प्रकाराबद्दलच किरकिरतेय; कोणाएका व्यक्तीबद्दल नाही.

आम्ही एकमेकांना अच्छा केले.
बास, त्यानंतर भेट नाही. पुढे कधी झालीच तर हवापाणी, कुटुंब व क्रिकेट वर गप्पा मारायला माझी काहीच हरकत नाही.>>>>>

डॉक्टर साहेब, बाकी हा शेवट लै बेश झाला बगा.
तो सल राहणारच या सोनाली व आशु यांच्या मताशी सहमत.
पर दुःख नेहमीच शीतल असते.

बढतीसाठी अभिनंदन केले नाही , दिलेला पेढा फुकट गेला, हे दु:ख आणि प्रॉब्लेम्स? बापरे! दोन्ही गोष्टी फारच स्वस्त झालेल्या दिसताहेत.

>>बढतीसाठी अभिनंदन केले नाही , दिलेला पेढा फुकट गेला, हे दु:ख आणि प्रॉब्लेम्स? बापरे! दोन्ही गोष्टी फारच स्वस्त झालेल्या दिसताहेत.>>

च्च! आपण अपेक्षा केली त्यापेक्षा खूप विपरीत अनुभव आला की दुखावते मन! गृहित धरलेले नाते संपते किंवा ते खरे नव्हतेच असे लक्षात येते, त्यात प्रसंग तरुण वयातला लक्षात राहणारा असा माईलस्टोन असे असेल तर नाही म्हटले तरी कुठेतरी सल रहातो. दुसर्‍या व्यक्तीचा कुठला सल स्वस्त, कुठला मोलाचा हे आपण कसे ठरवणार?

नाही म्हटले तरी कुठेतरी सल रहातो.>>>> मुळात तो रहायला कशाला पाहिजे? आपण त्याच्या जागी आहोत अशी कल्पना करायची म्हणजे आपला सल हा सलच रहात नाही. उलट आपणच त्याच्यावर कसा अन्याय केला हे कळतं. :रागः

दुसर्‍या व्यक्तीचा कुठला सल स्वस्त, कुठला मोलाचा हे आपण कसे ठरवणार?
>>>>

+786

पण बरेचदा असे ठरवले जाते. म्हणून आपण आपल्या भावना पब्लिक केल्या की यासाठी तयार राहावे Happy

बस ना आता,
कुमार स्वतःच म्हणत आहेत त्यांना (आता) सल नाही,
मग आपण बाकीचे का बोलतोय त्या बद्दल?
अशाने ते परत त्या प्रसंगातून जात आहेत, काळाच्या ओघात विसरलेले डिटेल्स (तो दुसर्याशी कसा वागला?, त्याचे हास्य छद्मी होते की नव्हते?) परत आठवत आहेत, आणि (कदाचित) नव्याने कडवट चव अनुभवत आहेत.जे त्यांच्या भावनिक स्वास्थ्यासाठी चांगले नाही.

दुसरी गोष्ट , हे ललित मध्ये पोस्ट केले आहे, लेखन प्रथमपुरुषी एकवचनी असले तरी हे 100% खरेच आहे असे समजायचे कारण नाही, आणि ही समज मायबोलीकरांकडे नक्कीच आहे , करण तशी ती नसती तर स्वतःच्या बदफैलीपणाचे प्रथम पुरुषी एकवचनि प्रांजळ कथन करणारी सिरीज लोकांनी निषेध करून बंद पाडली असती.

प्रथम पुरुषी ललित/कथा बेस ठेऊन , त्यातल्या पात्रांचे वागणे बरोबर का चूक हे डिस्कस करणे म्हणजे बाजीराव चित्रपट पाहून , शनिवारवाड्यात जाऊन"इकडे काशीबाई आणि मस्तानी कुठेश्या नाचल्या हो?" म्हणून विचारण्या सारखे आहे.

कदाचित "तो" मायबोलीवर पण असेल, आणि कुमार याना त्याला परत ऐकवायचे असेल. त्यांच्या बंदुकीचा आपण खांदा का व्हा? (कुमार सर, हे तुम्हाला उद्देशून नाही आणि यात तुमचा अपमान करायचा हेतू तर बिलकुल नाही, पण सोशल मीडिया वर लिहिताना कोणाचा काय हेतू आहे हे सांगणे खरचं शक्य नसते)

विचार करू तितके ऑप्शन आणि फाटे फुटत जातील.

सोडून द्या सगळे, छान ललित म्हणा आणि move on, Happy

सिम्बा, प्रतिसाद आवडला.

बर्‍याच वर्षांपूर्वी लोकसत्तेच्या चतुरंग पुरवणीतील लेखाची आठवण झाली."मी तुझ्या जागी असते/असतो तर...अरे पण तू माझ्याजागी असतास/असतीस तरी तू तुझ्याचसारखा विचार केला असतास.माझे काय' अशा टाईपचा लेख होता.

सिम्बा प्रतीसाद पटला फक्त खालील वाक्ये सोडुन
<<< कुमार स्वतःच म्हणत आहेत त्यांना (आता) सल नाही,
मग आपण बाकीचे का बोलतोय त्या बद्दल?
अशाने ते परत त्या प्रसंगातून जात आहेत, काळाच्या ओघात विसरलेले डिटेल्स (तो दुसर्याशी कसा वागला?, त्याचे हास्य छद्मी होते की नव्हते?) परत आठवत आहेत, आणि (कदाचित) नव्याने कडवट चव अनुभवत आहेत.>>>> जर अलमोस्ट २५ वर्षानी एखाद्याला हा लेख परत प्रकाशित करावा वाटतो म्हणजे ते ती घटना विसरले नाहीयेत किंवा जरी ते स्वत:ला समजवतायेत / त्यांना वाटतेय तरी कुठेतरी ती सल अजुन थोडीफार का असेना शिल्लक आहे ,
अर्थात हेमावैम

विचार करू तितके ऑप्शन आणि फाटे फुटत जातील.

सोडून द्या सगळे, छान ललित म्हणा आणि move on, Happy >>>> +१११११

दुसर्या व्यक्तीचा कुठला सल स्वस्त, कुठला मोलाचा हे आपण कसे ठरवणार? >> बरोबर आहे.
+ त्याने किती काळ, किती जणांसमोर ते दुःख उगळावे हा पण त्याचाच प्रश्न झाला.

पण
'असली' दुःखं उगळायला 'मी' कितीजणांना, कितीवेळा खांदा देऊ??
माझं काय???
माझा कोण विचार करणार?????
भ्याआआआ

इतका का पेटलाय बघून लेख वाचला. काही दशके मागे घडलेली गोष्ट आज आठवली तर माणूस हसून मूव्ह ऑन होईल असं वाटलेलं. अर्थात व्यक्ती तितक्या प्रकृति.

सिम्बा, मला एकही मुद्दा पटला नाही.
1. त्यांनीच लेख लिहिलाय सो त्या अनुभवातून जायची त्यांचीच इच्छा आहे मायबोलीकराची नाही.
2. ललित मध्ये असतानाही ते त्यांच्या बाजूने सहानुभूती दर्शविणाऱ्या प्रतिसादांना पुन:प्रतिसाद देत आहेत. आपणहून आणखी आणखी डिटेल देत आहेत. यातला काही भाग फिक्शनल असेल तर त्यांना ते लेखात किंवा नंतर स्पष्ट करणे सहज शक्य होते. प्रश्न विचारले की उत्तरे देऊन आता आपल्यावर उलटतय असं वाटलं की फिक्शनल आधार घेणे पळपुटेपणा आहे.

अमितव, तुम्हाला सिंबाचं मराठी कळत नाहीए.

आता तुम्ही विषय काढलाच आहे,तर आणखी एक निरीक्षण नोंदवतो. वैद्यकविषयावरचे त्यांचे लेख असतात, त्यातही लेख आवडला असं म्हणणार्‍या प्रतिसादकांना ते अगदी नाव घेऊन धन्यवाद देतात. पण एखाद्याने लेख आवडला, उपयुक्त वाटला, असलं काही न लिहिता, लेखाच्या विषयासंबंधाने एखादा मुद्दा मांडला असेल, तर त्याचा अनुल्लेख होतो.

हे मी लाल की हिरवं पेन घेऊन सगळ्या लेखांचं ऑडिट करून लिहीत नाहीए. पण मला आणि आणखी एकांना हे जाणवलंय. अर्थात याबद्दल तक्रार नाही.

दुसरी गोष्ट , हे ललित मध्ये पोस्ट केले आहे, लेखन प्रथमपुरुषी एकवचनी असले तरी हे 100% खरेच आहे असे समजायचे कारण नाही,
>>>>

ललितलेख खरे समजायचे नसतात हे नवीनच लॉजिक ऐकतोय.. कारण माझा एखादा लेख वा त्यातील तपशील खोटे वाटल्याने मी बरेच गोंधळ अनुभवलेत. थोडक्यात खरेच लिहावे अशी लोकांची अपेक्षा असते म्हणून गोंधळ झाले आणि कित्येक तपशीलांचे पुरावेही माझ्याकडे मागितले गेलेत. मी अगदी माझ्या फ्रिजचा, माठाचा, माठाचे झाकण फ्रिजवर ठेवून त्याचा फोटोही काढून ते दिलेही आहेत.

बरं ते असो,
पुढे प्रतिसादात ते म्हणताहेत ना हे खरे आहे. पुन्हा तो मित्र भेटला वगैरे डिटेलही दिलेत. मग का खरे समजायचे नाही? कि मी काही मिसले वाचायचे?

प्रस्तुत प्रसंगात सतीश हा कुठल्याच प्रकारे माझा स्पर्धक नव्हता. त्याचे वय आणि अनुभव हे माझ्याहून कमी होते. मी एम डी होतो तर तो एम बी बी एस नंतरचा डिप्लोमा धारक.
तसेच नजरेत भरावे असे काही वेगळे कामही त्याने केलेले नव्हते. तेव्हा याप्रसंगी त्याचे माझ्यावर जळणे हे माझ्या आकलनशक्तीबाहेरचे होते. >>>>
हे तुम्ही ठरवलत ? कदाचीत सतिशला त्याच काम ग्रेट वाटत असेल. कदाचीत तुमच्या मुळ तो झाकोळला गेला आहे अस वाटत असेल. सॉरी. पण लेख अज्जिब्बात आवडला नाही. चर्चा तर मुळीच नाही. गिव्ह सतिश अ ब्रेक,

सतिशने नावापुरत अभिनंदन करायला हव होत हे बरोबर. पण त्यांने ते केल नाही म्हणुन , तुम्ही त्याच्याशी बोलुन काय झालय नेमक हे समजावून न घेता (तुम्ही मित्र होता म्हणुन) असा लेख लिहिण अज्जिब्बातच पटल नाही.

ललित लेखनावर चर्चा करावी का? का करावी?
http://www.maayboli.com/node/22044
प्रतिसाद वाचा
>>>

वाचले नाही फार, पण वरच्या लिंकवर एका कथेवर चर्चा चालू आहे. सत्यकथनावर वा अनुभवावर नाही.

पण ललित लेखनात लेखकाने 'मी देतोय ही माहिती १००% खरी आहे, खोटी सापडल्यास मला नोकरीवरुन/मायबोलीवरुन टर्मिनेट करावे' असे प्रतिज्ञापत्र कुठे दिलेले असते? इव्हन सावधान इंडिया सारख्या सत्यकथांवर आधारीत मालिकांमध्ये पण 'मूळ प्रसंगाचे ड्रामेटायझेशन' असे कॅप्शन स्क्रिनवर असते.
आपण नेहमीच कोणतेही लिखाण '१००% सत्यकथन' असे लिहीलेले नसताना फिक्शनल म्हणून घ्यावे असे मला वाटते.
मुक्तपीठ मध्ये सासूला लाथा घालणार्‍या सुनेच्या वागण्याबद्दल लेख असतात तसे.(या सुना नेहमी 'माझ्या एका परिचितांची सून' असतात Happy जसं भूत नेहमी 'मित्राच्या मित्राने' पाहिलेलं असतं तसं.म्हणजे कोणी 'ओ मला ते घर माहिती आहे, तुम्ही लिहीलं तसं तिथे होत नाही' असं म्हटलं तर सेफली 'हे दुसरे परिचित' असं म्हणता येतं.)

हल्ली मिडीया मध्ये आलेल्या मुलाखती, कोर्ट स्टेटमेंट कुठेही पूर्ण सत्य नसते, मग ते एका लेखात का असावे? फक्त 'या लेखात पूर्ण प्रसंग देणे बरोबर न वाटल्याने काही फेरफार केले आहेत' असा डिस्क्लेमर दिला की झाले.

"कोणतेही लिखाण '१००% सत्यकथन' असे लिहीलेले नसताना फिक्शनल म्हणून घ्यावे असे मला वाटते."

--> ललित असो किंवा फिक्शन. काही वास्तववादी गृहीतके असतातच. ती पाळायला नकोत का? उद्या कोणी ललित लेखनात लिहिले "मी इंग्लंडला गेलो होतो. तिकडे सूर्य दक्षिणेला उगवतो" आणि एखादा जाऊन आला असेल त्याने सांगितले हे चूक आहे तर लिहिणाऱ्याने आणि प्रकाशित करणाऱ्याने ते दडपून टाकावे का? आता जे इंग्लंडला गेलेले नाहीत त्यांनी वाचून 'ललित आहे जाउदे कुठे का उगवेना' असे म्हणून सोडून द्यावे अशी अपेक्षा असेल तर मग ते दडपले का गेले असाही प्रश्न येतोच.

डॉक्टरांनी "आयुष्यात घडलेले" म्हणून सत्यकथन स्वरुपात लिहिले आहे. तेंव्हा त्यांनी उपस्थित केलेल्या शंकांना इथेच उत्तरे देणे अपेक्षित होते (जसे या आधीच्या पण प्रतिक्रियांना त्यांनी दिली आहेत)

मला वाटते लेखातील पदव्यांमध्ये घोळ झालेला. कदाचित डॉक्टर कुमार यांना त्या मित्राची नेमकी पदवी आता आठवत नसावी, पण ती खालची असावी एवढे आठवत असावे. त्यामुळे डिप्लोमा वगैरे काहीतरी लिहिले असावे. मग आरारांनी तो घोळ उघडकीस आणला. त्यावर आरारांनी धागा उडवायलाही सांगितले. पण मला वाटते त्याचा धाग्यातील मूळ आशयाशी फारसा काही संबंध नाही. तर धागा उडवायची गरज नव्हती. म्हणून शंका उपस्थित करणारे प्रतिसाद धागा भरकटू नये म्हणून ऊडवले गेले.

आता तो नक्की काय घोळ होता हे सांगायचे की नाही हे लेखकावर आहे. पण त्याची कोण जबरदस्ती करू शकत नाही. मला पर्सनली ते फार महत्वाचे वाटत नाही. उत्सुकता आहे, पण नाही समजले तर त्यात काही अडण्यासारखे नाही.

मूळात एखादी व्यक्ती मायबोलीवर चांगले माहितीपूर्ण लेख लिहित आहे तर त्याला कुठेतरी एका "क्षुल्लक" पॉईण्टमध्ये पकडून त्याचा माबोवर लिहायचा ईण्टरेस्ट जाईल असे वागणे हे पर्सनली मला पटत नाही.

वरील क्षुल्लक व्यक्तीसापेक्ष असू शकते. बाकी ज्याची त्याची मर्जी..

तसेच आरारांची पोस्ट माहितीपुर्ण होती. ती आरारांना सांगूनच उडवली असावी अशी शक्यता. आरारांचा आक्षेप नसेल तर बाकीच्यांना वाद घालायची गरज नाही असे मला वाटते.

Pages