मित्र नव्हे, परिचित !

Submitted by कुमार१ on 16 April, 2018 - 02:01

माझ्या वैद्यकीय कारकिर्दीच्या सुरवातीच्या टप्प्यातील हा प्रसंग आहे. एम.डी. ही पदवी प्राप्त करून मी एका हॉस्पिटलमध्ये सल्लागार म्हणून रुजू झालो. ते हॉस्पिटल नव्यानेच सुरू झाले होते. त्यामुळे माझ्यासह इतर सहकारीही पायाभूत उभारणीची कामे मन लावून करीत होते. हळूहळू हॉस्पिटलचा विस्तार होत गेला. मग तेथील डॉक्टरांची संख्याही वाढवण्यात आली. अशाच एका नवीन भरतीच्या वेळी माझ्या विभागात डॉ. सतीश हा माझा कनिष्ठ सहकारी म्हणून रुजू झाला. महिनाभरातच मी त्याच्याविषयी एक अंदाज बांधू शकलो. तो जरी फारसा हुशार नसला तरी तो नेमून दिलेली कामे व्यवस्थित करीत असे.

रोज जेवणाच्या सुटीत आम्ही दोघे एकत्र डबा खाऊ लागलो. त्या वेळेस मी विवाहित होतो तर तो अविवाहित. असंख्य विषयांवर आमच्या मनमोकळ्या गप्पा होत. त्यामध्ये क्रिकेट, राजकारण, नाटक-चित्रपट इ. नेहमीचे विषय तर असतंच, पण त्याचबरोबर स्त्री-पुरुष संबंध या तारुण्यसुलभ विषयाचाही समावेश असे. सतीश या विषयातील त्याच्या शंकांचे माझ्याकडून निरसन करून घेई. त्याचे असे कुतूहल पाहून मलाही माझ्या विवाहपूर्व दिवसांची आठवण होई! आमच्या विभागात आम्ही दोघेच डॉक्टर असल्याने आमची मैत्री दृढ होत गेली.

कालांतराने सतीशच्या घरच्यांनी त्याच्यासाठी मुली पाहणे सुरू केले. त्या ‘पाहण्याच्या’ कार्यक्रमांचा सविस्तर वृत्तांत तो मला दुसऱ्या दिवशी सांगत असे आणि बायको कशी असावी यावर माझा सल्लाही विचारत असे. यथावकाश त्याचे लग्न झाले. हळूहळू तो संसारात रमला. दोन वर्षात नोकरीतही रुळला.

एव्हाना आमचे हॉस्पिटल सुरू झाल्याला चार वर्षे झाली होती. आता हॉस्पिटलचा विस्तार करण्याचे व्यवस्थापनाने ठरवले होते. त्यामुळे आम्हा सर्वांची जबाबदारी अधिकच वाढत गेली. सतीश व मी दिलजमाईने रोजची कामे जास्त वेळ थांबून पूर्ण करीत होतो. त्यामुळे आमची मैत्री घट्ट होत गेली. आम्हा दोघांना एकमेकांच्या आयुष्यातील काही माहिती नाही असे काहीच उरले नाही.

दरम्यान मी नोकरीची चार वर्षे समर्थपणे पूर्ण केल्याने आणि वाढत्या जबाबदाऱ्या स्वीकारत असल्याने मी माझ्या बढतीचा प्रस्ताव वरिष्ठांपुढे मांडला. मग माझे मूल्यमापन करण्यात येऊन त्यांनी तो व्यवस्थापनापुढे ठेवला. थोड्याच कालावधीत मला ‘वरिष्ठ सल्लागार’ या पदावर बढती देण्यात आली. नवीन पदभार स्वीकारण्याचा दिवस होता १ जानेवारी. पगारामध्ये अर्थातच आकर्षक वाढ दिलेली होती.

नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला हे समजू शकेल की तिथल्या पहिल्या बढतीचा आनंद हा अवर्णनीय असतो. तरुणपणी योग्य वयात बढती मिळणे हा त्या व्यक्तीच्या दृष्टीने महत्वाचा टप्पा असतो. मात्र जर का तुम्ही पहिल्याच पदावर बरीच वर्षे कुजलात, तर मात्र तुमची प्रगती नक्कीच खुरटते. माझ्याबाबतीत ही बढती योग्य वयातच झाली होती. त्यामुळे एक प्रकारचे चैतन्य माझ्यात संचारले होते.
बढतीचा आदेश स्वीकारतानाच कार्यालयातील अनेकांनी “डॉक्टर, पेढे पाहिजेत, खरे तर पार्टीच हवी’, असा गलका केला. त्याने मी खूप भारावून गेलो. आमचे संपूर्ण हॉस्पिटल म्हणजे एखाद्या मोठ्या कुटुंबांसारखेच होते. त्यामुळे मी दुसऱ्याच दिवशी त्या सर्वांना पेढे वाटण्याचे ठरवले. तारुण्यात आपण तसे शौकीन असतो. त्यानुसार माझ्या शहरातील सर्वात प्रसिद्ध मिठाईवाल्याकडून त्याच्याकडील सर्वात मोठ्या आकाराचे केशरी पेढे मी खरेदी केले.

हॉस्पिटलच्या उभारणीपासून आम्ही सगळे एकत्र राबलेले असल्यामुळे आमच्यात जिव्हाळा निर्माण झाला होता. त्यामुळे आमच्यातील कोणाच्याही आनंद वा दुखःद प्रसंगात सगळेच सामील होत. ठरवल्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलभर फिरून पेढेवाटप सुरु केले. मला पहिला पेढा खरे तर सतीशला द्यायचा होता पण त्या दिवशी तो नेमका कामावर उशीरा येणार होता. म्हणून मी इतरांचे वाटप सुरु केले. त्या सगळ्यांनी माझे मनापासून अभिनंदन केले.
आता मी सतीशची आतुरतेने वाट पाहत होतो. साहजिकच होते ते, कारण आम्ही रोज जास्तीत जास्त काळ एकत्र असायचो आणि जेवणही बरोबर करायचो. थोड्या वेळाने सतीश आमच्या विभागात आला. आमची नजरानजर झाली. आमच्या मैत्रीच्या नात्याने तो आल्याआल्याच माझ्या बढतीबद्दल काही बोलेल अशी माझी अटकळ होती. परंतु, इथेच मला पहिला धक्का बसला. त्याने निर्विकारपणे त्याच्या कामास सुरवात केली.
मी त्याच्याजवळ जाऊन त्याला पेढा दिला. त्यावर त्याने “काय विशेष?” असा अनपेक्षित प्रश्न विचारला. हा मला बसलेला दुसरा धक्का होता. एव्हाना माझ्या बढतीची बातमी हॉस्पिटलभर आणि कर्णोपकर्णी अनुपस्थित लोकांपर्यंतही पोहोचली होती. त्यामुळे ती सतीशला माहिती नसणे जवळपास अशक्य होते. त्याच्या “काय विशेष” ला मी ,”माझ्या बढतीबद्दल”, असे उत्तर दिले. तिसरा धक्का मला आता बसायचा होता. “हं” एवढाच हुंकार काढून त्याने पेढा तोंडात टाकला. मग तो “पेढा मस्त आहे”, म्हणाला अन त्याच्या कामात गढून गेला.

दोन मिनिटे मी अगदी सुन्न झालो. माझ्या या आनंदाच्या प्रसंगी हॉस्पिटलमधील माझ्या सर्वात जवळच्या ‘मित्रा’कडून ‘अभिनंदन’ हा पंचाक्षरी शब्दही ऐकायला मी पारखा झालो होतो. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात एवढा नकारात्मक प्रतिसाद मी प्रथमच अनुभवत होतो. थोड्या वेळाने माझा पेढेवाटप कार्यक्रम संपला. नंतर रोजची जेवणाची वेळ झाली. सतीश व मी एकत्र जेवायला बसलो. त्या दिवशी मी चांगल्यापैकी कपडे केले होते. बुटांनाही चकाचक पॉलिश केले होते. जेवताजेवता सतीशने माझ्या पायांकडे पाहिले आणि “बूट छान आहेत” असे म्हणाला. जेवण संपेपर्यंत तो तसा अबोलच होता. माझ्या बढतीचा विषय तर त्याने कटाक्षाने टाळला.

माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात पेढे वाटण्याचे अनेक प्रसंग आले होते. किंबहुना सर्वांच्याच आयुष्यात ते कधीना कधी येतात. परंतु अशा प्रसंगी, “ अरे वा, छान झालं” असे न म्हणणारी व्यक्ती मला अद्याप भेटली नव्हती. द्वेष, मत्सर, असूया इत्यादी गुण हे मानवी स्वभावाचेच भाग आहेत. प्रत्येकाच्या ठायी ते वास्तव्य करतातच. पण एखाद्याच्या आनंदाच्या प्रसंगी वरकरणी तरी त्याचे अभिनंदन वा कौतुक करणे, ही व्यावहारिक सभ्यता असते. बहुसंख्य लोक ती पाळताना दिसतात. एखाद्याजवळ आपण आपला आनंद व्यक्त केल्यावर त्याने ‘अरे वा’ वगैरे काहीही नाही म्हटले तरी चालेल, हा विचार म्हणून ठीक आहे. पण, तेवढी स्थितप्रज्ञता आपल्यात असायला आपण साधुसंतच असायला हवे. ते नसल्यामुळे आपला अपेक्षाभंग होतो. किंवा ‘फलाची अपेक्षा न धरता कर्म करीत राहा’ हे पचवणे भल्याभल्यांना संपूर्ण आयुष्य खर्ची पडले तरी जमत नाही. मी तर तेव्हा जेमतेम तिशीत होतो.

प्रस्तुत प्रसंगात सतीश हा कुठल्याच प्रकारे माझा स्पर्धक नव्हता. त्याचे वय आणि अनुभव हे माझ्याहून कमी होते. मी एम डी होतो तर तो एम बी बी एस नंतरचा डिप्लोमा धारक.
तसेच नजरेत भरावे असे काही वेगळे कामही त्याने केलेले नव्हते. तेव्हा याप्रसंगी त्याचे माझ्यावर जळणे हे माझ्या आकलनशक्तीबाहेरचे होते. आमच्या संपूर्ण स्टाफपैकी माझे अभिनंदन न करणारी सतीश ही एकमेव व्यक्ती होती आणि या गृहस्थाला मी माझा सर्वात जवळचा मित्र धरून चाललो होतो !

या एका कडवट प्रसंगाने माझ्या आनंदावर अगदी विरजण पडले. अनेक दिवस हे सतीशचे वागणे माझ्या डोक्यातून जात नव्हते. किंबहुना वरिष्ठ पदावर काम करण्याचा उत्साहच कुणीतरी काढून घेतल्यासारखे वाटत होते. त्यावेळेस मला माझ्या पूर्वायुष्यातील दोन व्यक्तींच्या उद्गारांची प्रकर्षाने आठवण झाली.

मी शाळेत नववीत असताना माझ्या वर्गात सुदेश नावाचा विद्यार्थी होता. त्या वयातही त्याचे विचार परिपक्व होते. वर्गातील सर्वजण त्याला ‘अकाली प्रौढ’ म्हणत. तो एकदा आम्हाला गप्पांच्या ओघात म्हणाला होता, “आपण वर्गातील सर्वजण हे एकमेकांचे ‘परिचित’ आहोत. एकमेकांना ‘मित्र’ म्हणण्याची चूक कोणी करू नका कारण, मित्र हे खूप वरच्या पातळीवरचे नाते आहे.

तर दुसरे उद्गार मी एका दैनिकाच्या संपादकांच्या लेखात वाचले होते. त्यांनी लिहीले होते, “संकटकाळी जो उपयोगी पडतो तो खरा मित्र, ही मित्राची व्याख्या आता फार जुनी झाली आहे. सध्याच्या काळातील व्याख्या म्हणजे, आपल्या आनंदात मनापासून सहभागी होतो तो खरा मित्र !”
या दोन्ही उद्गारांची प्रचिती मला वरील प्रसंगातून पुरेपूर आली हे सांगायलाच नको.
…..
आज वरील घटनेनंतर २५ वर्षांनी मी त्याकडे तटस्थपणे बघू शकतो, हे नक्की. परंतु तेव्हा काय वाटले होते त्या ऊर्मितून हे लेखन झाले इतकेच.

********************************
( पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण डिग्रीधारक आहोत आणि तो सतीश डिप्लोमाधारक हा तपशील छापील लेख मायबोलीवर येताना वाढवला- वाचकांच्या माहितीसाठी.
पण आपली आणि त्याची डिग्री कोणकोणती, ते सांगायची गरज नाही. का?
सर्वसामान्य वाचकांना कळणार नाही? त्यांना इतक्या माहितीची गरज नाही? की त्यामुळे लेखाचा अपेक्षित परिणाम साधला जाण्यात बाधा येते?

पण छापून आलेला लेख सतीशनेही वाचला होता, त्यावर तो काही बोलला नाही (म्हणजे त्याला लेखातली भावना मान्य होती) ही माहिती मात्र वाचकांना पुरवली.

असो. वेबमास्तरांनी उडवलेले प्रतिसाद वेबमास्तरांच्याच भूमिकेतून उडवले असावेत, मित्र किंवा काही वेगळा परिचय आहे म्हणून नाही, अशी आशा आहे.

डॉक्टरांनी "आयुष्यात घडलेले" म्हणून सत्यकथन स्वरुपात लिहिले आहे. तेंव्हा त्यांनी उपस्थित केलेल्या शंकांना इथेच उत्तरे देणे अपेक्षित होते (जसे या आधीच्या पण प्रतिक्रियांना त्यांनी दिली आहेत)>>>+१.

१) हा ललित लेख आहे. चर्चेचा विषय म्हणून नाही. एका व्यक्तिच्या वागण्यावरून दुसर्‍या व्यक्तीच्या मनात आलेले विचार आणि त्याला दिलेले लेखनाचे स्वरूप असे याचे स्वरूप आहे.
२) यात कुठेही वैद्यकीय माहिती अशी नाही. वैद्यकीय शिक्षणाबद्दलचे मतभेद (कुठले शिक्षण जास्त चांगले कुठले कमी ), त्याबद्दलची माहिती मायबोलीसारख्या संकेतस्थळावर एका ललित लेखाच्या माध्यमातून आली आहे. त्याला किती महत्व द्यायचे? जर लेखकाला अमूक शिक्षण जेष्ठ/कनिष्ठ वाटले असेल तर आता ते समजावून, त्यावेळेस त्याच्या मनात काय विचार आले ते बदलणार नाहीत.
३) तुमचे लेखन पटले नाही , चुकीचे आहे असे प्रतिसाद येणे साहजिक आहे (आणि ते ठेवले आहेत). अगदी लेख लिहण्याइतकं काय झालं असं म्हणणंही नैसर्गिक आहे. पण अगदी जरी लेखकाची माहिती चुकीची असली तरी केवळ त्यावरून लेख काढूनच टाका असा अट्टाहास करणेही योग्य नाही.
४) सिम्बा यांनी म्हटल्याप्रमाणे
>विचार करू तितके ऑप्शन आणि फाटे फुटत जातील. सोडून द्या सगळे, छान ललित म्हणा आणि move on, Happy

Mast

असा अट्टाहास करणेही योग्य नाही. >>>

योग्य/अयोग्य पेक्षा 'आक्षेपार्ह' काही उडवलेल्या प्रतिसादांत होते का, ह्याचा विचार व्हायला नको का? लेख काढून टाका, असे म्हणणे अयोग्य असेल, तर त्याचा प्रतिवाद व्हावा, पण ह्यात वैयक्तिक हल्ला काही नसेल, तर प्रतिसाद उडवले जाण्याचे पाऊल फारच टोकाचे वाटते. डॉक्टरांनीच दिलेल्या प्रतिसादांवर आणि माहितीवर हे प्रतिसाद आले असताना त्यांना 'हा चर्चाविषय नाही' हे कारण देऊन उडवून लावणे अनुचित आहे, असे माझे मत. लेखकाचे विचार बदलणार नाहीत, म्हणून प्रतिसादच देऊ नयेत, हेही विचित्र वाटते. असो. मी उडालेले सगळे प्रतिसाद वाचलेले नाहीत, त्यामुळे माझी माहिती अपूर्ण असू शकते, हे मान्यच आहे. अनुचित वाटल्यास हाही प्रतिसाद काढून टाकावा.

मी उडालेले सगळे प्रतिसाद वाचलेले नाहीत, त्यामुळे माझी माहिती अपूर्ण असू शकते, हे मान्यच आहे. >> मग अपुर्ण माहिती असताना वेमांचे कसे चुक आहे हे लिहायची घाई का एवढी?

पण अगदी जरी लेखकाची माहिती चुकीची असली तरी केवळ त्यावरून लेख काढूनच टाका असा अट्टाहास करणेही योग्य नाही.>> हे तुम्ही 'त्याउडवलेल्या पोस्टी' ठेवुन देखिल सांगु शकला असता की वेमा! Happy

अट्टाहास नव्हता तो. मला आठवतंय त्यानुसार

"लहान तोंडी मोठा घास घेऊन सांगतो संपादकांना सम्पर्क करून हा लेख उडवायला सांगा"

असे शब्द होते. आणि त्यामागेदेखील लेखकाला चुकीचे साबित ठरवणे हा उद्देश नसून मेडिकल डिग्रीजबद्दल लोकांत चुकीची माहिती जाऊ नये हा उद्देश जास्त होता.

मला वाटतं अरारा आणि कुमार१ दोघांचा भूतकाळ जास्त impacting ठरला प्रतिसाद उडवताना. मला दोघेही आवडतात. दोघांनी लिहित रहावं अस वाटतं. त्यामुळे am closing topic here from my side and moving on.

===
हे तुम्ही 'त्याउडवलेल्या पोस्टी' ठेवुन देखिल सांगु शकला असता की वेमा! >> याच्याशी सहमत आहे.
पण वेमानी प्रतिसाद दिला; i don't owe anybody any kinda explanation म्हणले नाही एवढेच सध्या माझ्यासाठी पुरेसे आहे माबोचं मिपा झालं नाही अजून असे समजायला Wink

===
हा प्रतिसाददेखील उडवला तर चालेल Lol

भास्कराचार्य, विठ्ठल यांच्याची सहमत.

वेबमास्टर यांचा प्रतिसाद Read between lines आहे Happy असो.

मग अपुर्ण माहिती असताना वेमांचे कसे चुक आहे हे लिहायची घाई का एवढी? >> घाई कसली? वेमांनी प्रतिसाद दिल्यावर त्यावरच मी लिहिले आहे. वेमांच्या प्रतिसादात जे दिसले त्यावर लिहिले. इतर काही असेल तर वेमांनीच त्याविषयी काही म्हटलेले नाही, इतकेच.

लेखातील काही मुद्दे प्रश्नांकित केलेल्या आरारा यांच्या प्रतिक्रिया जशा उडवल्या तशीच माझीही प्रतिक्रिया उडवलेली दिसतेय.
थोडक्यात: प्रश्न विचारा, शंका उपस्थित करा. उत्तर फेवरेबल असेल तर ठीक नाहीतर प्रश्नच उडवण्यात येईल Happy

माझी या लेखावरची पहिली प्रतिक्रिया खूप भिन्न होती. पण या सगळ्या चर्चेनंतर माझी प्रतिक्रिया:
माफ करा डॉक्टर पण मला आता मात्र सतीश यांनी जे केले ते कदाचित योग्यही असू शकेल असे वाटू लागले आहे.

Move on तर होऊयाच पण या सगळ्यातून काहीतरी धडा घेऊन!

माझ्या वाचण्यात आलेल्या (आणि नंतर उडवण्यात आलेल्या) प्रतिसादांची भाषा आक्षेपार्ह नव्हती.
असो.
'ललित छान आहे' इतकं बोलून थांबते Wink

<<<असे शब्द होते. आणि त्यामागेदेखील लेखकाला चुकीचे साबित ठरवणे हा उद्देश नसून मेडिकल डिग्रीजबद्दल लोकांत चुकीची माहिती जाऊ नये हा उद्देश जास्त होता.>>>

ललीतलेख वाचून लोक ज्ञान मिळवत असतील तर धन्य आहे अश्या लोकांची!
उद्या रस्त्यावरची टिनपाट मासिके वाचून त्यातले लिहीलेले खरे मानतील.
स्वतःची अक्कल, विचार काही नाही. हा म्हणतो हे खरे, तो म्हणतो ते खरे, असल्या लोकांना बनवून त्यांचे पैसे लुबाडणे हा धंदा उगीच नाही जोरात चालत.

आता गूगल कंपनी बंद करावी लागेल.
वेमा, अभिनंदन. तुम्ही आता मायबोलीचे शेअर्स वॉल स्ट्रीटवर विकायला लागा - बघता बघता अगदी जगातले सर्वात जास्त श्रीमंत व्हाल!

मी पण काल पासून २-३ वेळा लिहू म्हणता म्हणता थांबलो. मलाही नक्की समजत नव्हतं की नेमकी कुठली बाब खटकत आहेत प्रतिक्रिया उडवल्या त्यामागच्या संभाव्य धोरणाविषयी. त्याचं मुख्य कारण हे की वेबमास्टरांची नेमकी लाईन ऑफ थिंकिंग काय आहे तसं करण्यामागे ती कळायला काही मार्गं नव्हता.
आता वेबमास्टरांची पोस्ट आल्यामुळे थोडी क्लॅरिटी आली.
मुद्दा क्र १ आणि २ पटले आणि ते बर्याच लोकांच्या मनात आले असतील पण सगळेच तसा विचार करतील असं नाही. आणि जे करणार नाहीत ते अर्थातच त्यांच्या दृष्टिकोनानुसार मुद्दा क्र ३ मध्ये उल्लेख केलाय त्या अंगानी जाणार्या प्रतिक्रिया देतील (लेख टाकलातच कशाला वगैरे वगैरे...).
आता मुद्दा क्र ३ मध्ये "पण अगदी जरी लेखकाची माहिती चुकीची असली तरी केवळ त्यावरून लेख काढूनच टाका असा अट्टाहास करणेही योग्य नाही." हा जो अट्टाहासाबद्दल विचार आहे, तो परत एखाद्याची प्रतिक्रियाच नाही का? आणि खास करुन जर ती प्रतिक्रिया नीट भाषेत असेल तर ती उडवून टाकण्यामागे काही लॉजिकल कारण असं आजिबात दिसतच नाही. आणि असेल तर मग ते इथे लिहिलेलं बरं म्हणजे मग मेंबरांना मायबोलीचे प्रतिक्रियांबाबतीतचे अधिकृत असे धोरण तरी कळेल.
प्रतिक्रिया देताना त्यात profanity, racism, sexism असू नये आणि ते असल्यास आम्ही प्रतिक्रिया काढून टाकू हे ठोस धोरण/नियम असू शकतो पण "अगदी जरी लेखकाची माहिती चुकीची असली तरी केवळ त्यावरून लेख काढूनच टाका असा अट्टाहास करणेही योग्य नाही आणि म्हणून आम्ही तसे अट्टाहास असलेल्या प्रतिक्रिया काढून टाकू हे धोरण कसं असू शकतं?
एखादा आयडी प्रोफॅनिटी वापरत नसला तरी मुद्दाम खोडसाळ प्रतिक्रिया देऊन लेखक्, वाचक ह्यांना त्रास द्यायला बघत असेल तर तेही ही समजू शकता येतं.
....................................
ही अशी सगळी पोस्ट मी लिहून ठेवली होती पण लिहिता लिहिता अजून एक मुद्दा डोक्यात आला. त्या प्रतिक्रिया ठेवल्या असत्या तर मला वाटतं माबो इतिहास बघता त्या प्रतिक्रियांना धरुनच पुढे वाद-प्रतिवाद सुरु झाले असते. आता तसं झालं तर काय फरक पडतो असंही म्हणू शकतो पण मला वाटतं मायबोलीवर बरीच लोकं काँटेंट बघायला येतात, वाद-विवाद बघायला/करायला नाही आणि त्यामुळे वादाकरता वाद सुरु असलेले धागे वेमा/अ‍ॅडमिननी बंद करतात. हे सगळं करत बसण्यापेक्षा चर्चा डिरेल करणारे प्रतिसाद उडवले की प्रकरण आटोक्यात राहत असावं बहुतेक.
जे तितकं चुकीचं वाटत नाही आता विचार केल्यास.

Pages