‘युरिआ’ हा शब्द उच्चारताच बहुतेकांच्या डोळ्यासमोर शेतीतले ‘युरिआ खत’ येते. साहजिकच आहे, कारण त्याच्या जाहिराती आपण विविध माध्यमांत बघत असतो. हेच युरिआ आपण आपल्या शरीरातही तयार करतो आणि रोज लघवीवाटे उत्सर्जित करतो.
‘क्रिअॅटिनीन’ हा युरिआसारखाच एक नायट्रोजनयुक्त पदार्थ. आपण तो शरीरात तयार करतो आणि तोही लघवीवाटे उत्सर्जित होतो. थोडक्यात हे दोन्ही नायट्रोजनयुक्त पदार्थ एकाच जातकुळीतले आहेत. दोन्हीही आपल्या रक्तात असतात आणि लघवीतून बाहेर पडतात. त्यांच्या रक्तातील पातळीचा आणि मूत्रपिंडाच्या कार्याचा जवळचा संबंध आहे. मूत्रविकाराने ग्रासलेल्या रुग्णांच्या ज्या रक्तचाचण्या नियमित होतात त्यामध्ये हे दोन्ही घटक अग्रस्थानी असतात.
या लेखात आपण या दोघांची मूलभूत माहिती, त्यांच्या वैद्यकीय उपयुक्ततेतील फरक आणि संबंधित मूत्रविकारांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
युरिआ
याचे विवेचन चार भागात करतो :
१. शरीरातील उत्पादन
२. शरीरातून उत्सर्जन
३. आजारांमध्ये वाढलेली युरिआची रक्तातील पातळी, आणि
४. इतर रोचक माहिती
शरीरातील उत्पादन
आपण आहारातून प्रथिने घेतो. त्यांचे पचन होऊन अमिनो आम्ले तयार होतात. ही आम्ले प्रथम शरीरातील प्रथिने तयार करण्यासाठी वापरली जातात. यातून जी बाजूला उरतात त्यांचे पेशींमध्ये विघटन होते आणि त्यातून CO2 आणि अमोनिया बाहेर पडतात. हा अमोनिया रक्तात साठू देणे इष्ट नसते कारण तो मेंदूसाठी खूप घातक असतो. म्हणून अमोनियाचे रुपांतर युरिआ या निरुपद्रवी रसायनात करण्याची जबाबदारी आपले यकृत घेते. अशा तऱ्हेने युरिआ हा न वापरलेल्या नायट्रोजनचा उत्सर्जनीय पदार्थ आहे.
अन्य एका प्रकारेही युरिआची निर्मिती शरीरात होत असते. आपल्या पेशींमध्ये रोज ‘उलाढाल’ चालू असते. त्यात सतत काही प्रथिनांचे विघटन होत असते. त्यांच्या अपचयातून (catabolism) सुद्धा युरिआ तयार होतो.
शरीरातून उत्सर्जन
यकृतात युरिआ तयार झाल्यावर तो रक्तात येतो. आपले सगळे रक्त हे ‘शुद्धीकरणा’साठी मूत्रपिंडात येते. मूत्रपिंड ही एक प्रकारे चाळणी आहे. जेव्हा रक्त त्यातून जाते तेव्हा ‘टाकाऊ’ पदार्थ हे मूत्रमार्गात पाठवले जातात, तर उपयुक्त पदार्थ हे रक्तातच टिकवले जातात. त्यानुसार बराचसा युरिआ हा लघवीत जातो आणि काही प्रमाणात रक्तात उरतो.
मनुष्याच्या शरीरातील नायट्रोजनयुक्त पदार्थांचे पूर्णपणे विघटन झाल्यावर युरिआ हा प्रमुख अंतिम पदार्थ आहे, हे आपण पाहिले. या संदर्भात निसर्गातील अन्य जीवांशी आपली तुलना करण्याचा मोह होतो. मासा हा तर जलचर. तो त्याच्या नायट्रोजनचा शेवट अमोनियात करतो आणि हा पदार्थ भसाभस पाण्यात सोडून देतो, जे त्याच्या भवती मुबलक असते. त्यामुळे त्याला अमोनियाचे युरिआत रुपांतर करण्याची तसदी घ्यावी लागत नाही.
याउलट पक्ष्याचे बघा. तो पडला हवाई प्राणी. त्याच्याकडे पाण्याचे जाम दुर्भिक्ष. त्यामुळे त्याच्या नायट्रोजनचे रुपांतर तो ‘युरीक अॅसिड’ मध्ये करतो. हे रसायन उत्सर्जित करायला पाण्याची फारशी गरज भासत नाही. त्यामुळेच पक्षाची लघवी ही खऱ्या अर्थाने ‘शू’ नसून ‘शी’च असते!
आजारांमध्ये वाढलेली युरिआची रक्तातील पातळी
अशा आजारांचे आपण तीन गटात वर्गीकरण करूया:
१. मूत्रपिंडाचे आजार : जर कोणत्याही कारणाने इथली ‘चाळणी’ यंत्रणा (glomerulus) बिघडली तर मग युरिआ आणि अन्य टाकाऊ पदार्थ रक्तात साठू लागतात.
२. मूत्रमार्गातील अडथळे : यात मूत्राशय व मूत्रनलिकांच्या आजारांचा समावेश होतो. उदा. मूतखडे, प्रोस्टेटची मोठी वाढ, गर्भाशयमुखाचा कर्करोग.
मूतखडे हे मूत्रमार्गातले अंतर्गत अडथळे असतात तर बाकीच्या आजारांनी मूत्रमार्गावर बाहेरून दाब पडतो. अशा अडथळ्यांमुळे मूत्रपिंडाच्या चाळणी यंत्रणेवर ‘उलटा दाब’ (back pressure) येतो आणि चाळणी प्रक्रिया कमी होते.
३. युरिआचे वाढलेले उत्पादन : याची दोन प्रकारची कारणे आहेत :
(अ) उच्च प्रथिनयुक्त भरपूर आहार : समजा एखाद्याने एखादे दिवशी मस्तपैकी एक ‘चिकन हंडी’ फस्त केली, तर पुढचे काही तास युरिआची पातळी बऱ्यापैकी वाढते! आपल्या रोजच्या आहारातील प्रथिनाच्या प्रमाणानुसार युरिआची पातळी बदलती असते.
(आ) जेव्हा कोणत्याही कारणाने पेशींमधला अपचय वाढतो तेव्हा. उदा. उपोषण, मोठा जंतूसंसर्ग इ.
इतर रोचक माहिती
युरिआचे विवेचन संपवण्यापूर्वी आपल्या सार्वजनिक जीवनातील एक प्रसंग सांगतो. समजा, आपण एखाद्या अपरिचित ठिकाणी समारंभास गेलो आहोत. तिथे आपल्याला बराच वेळ काढायचा आहे. काही वेळाने आपल्याला लघवीची जाणीव होते आणि मग आपण ‘ते’ ठिकाण शोधू लागतो. कोणीतरी आपल्याला हातवारे करून ते कुठे आहे ते सांगतो. जसे आपण त्या मूत्रालयाच्या जवळ येतो तसे आपले ‘स्वागत’ होते त्या ‘परिचित’ वासाने ! हा भरून राहिलेला वास असतो अमोनियाचा. अनेक लोक जेव्हा एखाद्या लहान जागेत लघवी करत असतात तेव्हा त्यातील युरिआचे अंश हे त्या मूत्रभांड्यांमध्ये पसरून राहतात. हळूहळू त्या युरिआचे नैसर्गिक विघटन होऊन अमोनिया वायुरूपात पसरू लागतो. तेव्हा आपल्याकडे सार्वजनिक मूत्रालय शोधताना दिशादर्शक पाटीपेक्षा वासाचाच अधिक उपयोग होतो !
जे युरिआ आपल्या शरीरात तयार होते तेच आपण कृत्रिमरीत्या प्रयोगशाळेतही करू शकतो. विज्ञान संशोधनातील हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. आज युरिआचे मोठ्या प्रमाणात औद्योगिक उत्पादन केले जाते. या युरिआचा वापर हा शेती, रासायनिक उद्योग आणि वैद्यकातील औषध म्हणून केला जातो.
* * * *
क्रिअॅटिनीन
हा शब्द युरिआ इतका परिचित नाही याची कल्पना आहे. तो युरिआचा ‘भाउबंद’ आहे हे आपण वर पाहिले. म्हणजेच लघवीतून उत्सर्जित होणारा एक नायट्रोजनयुक्त पदार्थ. रक्तातील त्याची नेहमीची पातळी तर खूप कमी – युरिआच्या साधारण एक तीसांश. नेहमीप्रमाणे त्याचेही विवेचन तीन भागात करतो:
१. शरीरातील उत्पादन
२. उत्सर्जन आणि
३. आजारांमध्ये वाढलेली त्याची रक्तातील पातळी
शरीरातील उत्पादन
आपल्या हाडांवरचे जे स्नायू असतात (skeletal muscle) त्यांच्यात क्रिअॅटिन-पी नावाचे एक उच्च उर्जायुक्त संयुग साठवलेले असते. स्नायुंच्या कार्यादरम्यान त्यातील उर्जा वापरली जाते. मग बाकी उरते ते क्रिअॅटिन. आता यातून पाण्याचा एक रेणू आपोआप निघून जातो आणि तयार होते क्रिअॅटिनीन.
प्रत्येक व्यक्तीमधील स्नायूंचे आकारमान (mass) स्थिर असते. त्या प्रमाणात त्यांच्यात ठराविक क्रिअॅटिन-पी असते. दररोज त्यातील ठराविक क्रिअॅटिनचे क्रिअॅटिनीनमध्ये रुपांतर होते. त्यामुळे क्रिअॅटिनीनची रोजची रक्तपातळी ही युरिआच्या तुलनेत बऱ्यापैकी स्थिर असते. या बाबतीत लिंगभेद मात्र महत्वाचा आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या स्नायूंचे आकारमान कमी असल्याने त्यांची क्रिअॅटिनीनची रक्तपातळी कमी असते.
उत्सर्जन
युरिआप्रमाणेच रक्तातले क्रिअॅटिनीन हे मूत्रपिंडाच्या चाळणी प्रक्रियेतून जाते आणि त्यातले बरेचसे लघवीवाटे बाहेर पडते. त्यामुळे त्याची रक्तपातळी कमी राहते.
आजारांमध्ये वाढलेली त्याची रक्तातील पातळी
वर युरिआच्या विवेचनात मूत्रपिंडाचे आजार आणि मूत्रमार्गातील अडथळे यांचा उल्लेख आला आहे. या दोन्हींमध्ये क्रिअॅटिनीनची रक्तपातळी अर्थातच वाढते. जेव्हा मूत्रपिंडाच्या चाळणी- प्रक्रियेत दोष निर्माण होतो तेव्हा युरिआची रक्तपातळी ही क्रिअॅटिनीनपेक्षा अधिक वेगाने आणि खूप जास्त वाढते.
आता युरिआ व क्रिअॅटिनीनच्या रक्तपातळी संदर्भात एक फरक ध्यानात घेतला पाहिजे. जेव्हा कोणत्याही कारणाने पेशींमधला अपचय वाढतो, तेव्हा फक्त युरिआच वाढते; क्रिअॅटिनीन नाही. जेव्हा क्रिअॅटिनीन वाढते तेव्हा मूत्र-यंत्रणेत नक्कीच कुठेतरी गडबड झालेली असते. त्यामुळे मूत्रपिंड आणि मूत्रमार्गांच्या आजारांमध्ये क्रिअॅटिनीन हा युरिआपेक्षा अधिक संवेदनशील निर्देशांक मानला जातो.
प्रयोगशाळेत आपण जेव्हा युरिआ व क्रिअॅटिनीनच्या रक्तपातळी मोजतो तेव्हा युरिआची चाचणी ही बरीच सरळसोट आहे, तर क्रिअॅटिनीनच्या चाचणीत काही तांत्रिक समस्या आहेत आणि युरिआच्या तुलनेत अचूकता कमी आहे. या कारणासाठी मूत्रविकारांसाठी जेव्हा चाचण्यांची गरज लागते, तेव्हा युरिआ व क्रिअॅटिनीन हे दोन्ही जोडीने मोजले जातात. मूत्र- रुग्णांच्या रिपोर्टस मध्ये हे दोघे अगदी नवराबायकोसारखे वावरत असतात !
युरिआ व क्रिअॅटिनीनच्या मर्यादा
या दोघांची रक्तपातळी मोजणे ही मूत्रविकारांच्या निदानातील प्राथमिक पायरी आहे. याबाबतीत त्यांच्या उपयुक्ततेबरोबरच त्यांच्या काही मर्यादाही लक्षात घ्याव्यात. मूत्रपिंडाच्या अगदी सुरवातीच्या बिघाडाचे निदान करण्यासाठी त्यांचा तसा उपयोग नसतो. जेव्हा चाळणी-यंत्रणेचे काम कमी होत होत निम्म्यावर येते तेव्हाच क्रिअॅटिनीनची रक्तपातळी बऱ्यापैकी वाढते. म्हणजेच क्रिअॅटिनीनची पातळी ‘नॉर्मल’ असली तरी याचा अर्थ ‘मूत्रपिंडाचे कार्य छान चाललेले आहे’, असे नेहमीच म्हणता येणार नाही.
तरीसुद्धा रुग्णाचे थोडेसे रक्त घेऊन करता येणाऱ्या या दोन्ही सुटसुटीत चाचण्या आहेत. त्यामुळेच एक शतकाहून अधिक काळ त्यांनी मूत्र-चाचण्यांच्या यादीत आपले अग्रस्थान टिकवले आहे.
मूत्रपिंडाच्या आजाराची अनेक कारणे असतात. त्यामध्ये दीर्घकालीन मधुमेह आणि उच्च-रक्तदाब ही प्रमुख कारणे आहेत. अशा बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत त्यांना मूत्रपिंड-विकार जडला की तो दीर्घकालीन (chronic) होण्याची शक्यता असते. अशा रुग्णांची देखभाल करताना अनेक चाचण्या नियमित कराव्या लागतात. त्यामध्ये अर्थातच युरिआ व क्रिअॅटिनीनचा समावेश असतो. त्यांच्या पातळीतील चढउतारावरून आजार कितपत नियंत्रणात आहे ते कळते. त्यांचे क्रमशः रिपोर्टस् हे एक प्रकारे रुग्णाचे प्रगतीपुस्तकच असते. त्यानुसार रुग्णाच्या भावी उपचारांची दिशा ठरवता येते.
समारोप
शरीरातील नायट्रोजनयुक्त पदार्थांचे विघटन पूर्ण झाल्यावर युरिआ तयार होतो. यकृतात तयार झालेला युरिआ हा नंतर मूत्रपिंडाद्वारे लघवीत उत्सर्जित होतो.
आपल्या स्नायूंमधल्या क्रिअॅटिनपासून रोज ठराविक क्रिअॅटिनीन तयार होते आणि तेही लघवीत उत्सर्जित होते. मूत्रविकारांच्या निदानामध्ये युरिया व क्रिअॅटिनीनची रक्तपातळी मोजणे या प्राथमिक चाचण्या आहेत. त्यांच्या उपयुक्तता आणि मर्यादा आपल्याला या लेखातून समजल्या असतील अशी आशा करतो.
या लेखाच्या निमित्ताने आपणा सर्वांना आयुष्यभर उत्तम मूत्र-आरोग्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करून थांबतो.
****************************************************************************************
माझे वडील पण किडनी आजाराने
माझे वडील पण किडनी आजाराने ग्रस्त होते. स्वातंत्र्या पूर्वीचा काळ. ते पंडित विनायक बुवांक्डे घरी राहुन गाण्याचे शिक्षण घेत होते. पूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावर. पोटात असह्य दुखायचे. अगदी गडाबडा लोळायचे वेदनेने. पुढे निदान झाल्यावर पन्नासच्या दशकात शस्रक्रिया करून एक किडनी काढली गेली. त्यांच्या पाठीवर ऑपरेशनचा मोठ्हा स्कार होता. पुढे ते ७९ वयात प्रोस्टे ट कॅन्सर ने वारले. एक किडनीवर जगले.
नोंद म्हणून लिहित आहे.
नव्याने अभिप्राय दिलेल्या आणि
नव्याने अभिप्राय दिलेल्या आणि कौटुंबिक अनुभव लिहिलेल्या वरील सर्वांना धन्यवाद !
दीर्घकालीन
दीर्घकालीन मूत्रपिंडविकाराच्या रुग्णांसाठी ज्या रक्तचाचण्या करतात त्यांचा ऊहापोह मागील पानावरील चर्चेत झालेला आहे. त्या सर्व रासायनिक चाचण्यांना आपापल्या मर्यादा आहेत. मूत्रपिंडांच्या अंतर्गत बिघाडासंबंधी अन्य एखाद्या दिशादर्शक संवेदनक्षम चाचणीचा शोध अनेक वर्षे चालू आहे. या संदर्भात एक कुतूहलजनक संशोधन चालू आहे.
डोळ्यांचा दृष्टिपटल आणि मूत्रपिंड या दोघांच्या अंतर्गत रचनेत एक समानता आहे ती म्हणजे, दोघांमध्येही सूक्ष्म रक्तवाहिन्या असतात. दीर्घकालीन मधुमेहामध्ये या दोन्ही अवयवांच्या संबंधित रक्तवाहिन्यांवर एकसारखा परिणाम होतो.
अलीकडे दृष्टीपटलाच्या विविध प्रतिमा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने घेता येतात. (यामध्ये रुग्णाला कुठलाही सुई टोचणे वगैरे त्रास अजिबात नसतो). या प्रतिमांच्या अभ्यासावरून आपल्याला मूत्रपिंड विकाराची प्रगती किंवा अधोगती कितपत होत आहे हे समजण्यास मदत होईल.
एक प्रकारे, दृष्टीपटल हा मूत्रपिंडाच्या आरोग्यदर्शनाची 'खिडकी' असतो असे म्हणता येईल.
>>>डोळ्यांचा दृष्टिपटल आणि
>>>डोळ्यांचा दृष्टिपटल आणि मूत्रपिंड या दोघांच्या अंतर्गत रचनेत एक समानता आहे>>>> चांगली माहिती मिळाली.
Dr kidenyt खराब आहे हे लवकरात
Dr kidenyt खराब आहे हे लवकरात लवकर समजेल अशी कन्फर्म टेस्ट अस्तित्वात आहे का?
सर्व लक्षण दिसू लागल्यावर टेस्ट ची अशी पण गरज नसते.
प्राथमिक अवस्थेत किडनी खराब आहे ह्याची कन्फर्म टेस्ट कोणती?
Dr kidenyt खराब आहे हे लवकरात
Dr kidenyt खराब आहे हे लवकरात लवकर समजेल अशी कन्फर्म टेस्ट अस्तित्वात आहे का?
सर्व लक्षण दिसू लागल्यावर टेस्ट ची अशी पण गरज नसते.
प्राथमिक अवस्थेत किडनी खराब आहे ह्याची कन्फर्म टेस्ट कोणती?
हेमंत
हेमंत
मागच्या पानावर मी या संबंधी सविस्तर प्रतिसाद दिला आहे. एकच अशी चाचणी नसते
सर्वप्रथम रुग्णाची लक्षणे, शारीरिक तपासणी व रक्तदाब हे सगळं पाहिलं जातं. तसेच त्याला दीर्घकालीन मधुमेह आहे का हे विचारणे महत्त्वाचे असते. त्यानुसार कोणत्या प्रकारचा मूत्रपिंड आजार होऊ शकतो याचा एक प्राथमिक अंदाज बांधला जातो आणि मगच चाचण्यांकडे वळतात.
समजा, दीर्घकालीन मधुमेह आहे, रक्तदाबही वाढलेला आहे वगैरे तर अशा परिस्थितीत खालील चाचणी केली असता अगदी सुरुवातीस मूत्रपिंडात झालेला/ होऊ शकणारा बिघाड समजू शकतो :
Microalbumin
(Spot urine for albumin-to-creatinine ratio)
परंतु एकच एक चाचणी असे उत्तर नसते
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यु टी आय) हा विषय इथे अस्थानी आहे का? असल्यास क्षमस्व.
अमेरिकेत यु टी आय चे प्रमाण एवढे का आहे? भारतात तर कधी हा आजार ऐकलाही नव्हता. अजुन एक - क्रॅनबेरी (गोळ्या अथवा फळे) खाल्ल्याने हा आजार 'प्रिव्हेन्ट' होतो का?
की इन जनरल सी व्हायटॅमिन पुरते?
सामो
सामो
विषय इथे अगदी योग्य आणि महत्त्वाचा आहे. सर्वप्रथम लक्षात घ्यावे की हा आजार जगभरात सर्वत्र आहे. भारतातही भरपूर आहे. स्त्रियांमध्ये याचे प्रमाण बऱ्यापैकी असते.
प्रतिबंधाबाबत जरा वेळाने..
मूत्रमार्गदाह : प्रतिबंधात्मक
मूत्रमार्गदाह : प्रतिबंधात्मक उपाय
हा त्रास वारंवार होत असल्यास खालील गोष्टींचा विचार करता येतो
१. भरपूर पाणी आणि द्रव पिणे हा सर्वोत्तम उपाय ! (भारतीय हवामानात 24 तासाला सुमारे अडीच लिटर)
२. स्त्रियांच्या ऋतूसमाप्तीनंतरच्या काळात गरजेनुसार हॉर्मोन उपचार दिले जातात
३. जननेंद्रिय भागाची पुरेशी आणि काळजीपूर्वक स्वच्छता.
४. क्रानबेरीचा रस नियमित पिणे : या संदर्भातील शास्त्रशुद्ध प्रयोग तसे मोजकेच झाले आहेत. काही स्त्रियांना हा रस दररोज सहा महिने घेतल्यानंतर काही प्रमाणात फायदा झालेला दिसला आहे. क्रानबेरीच्या गोळ्या देखील मिळतात. फार तर हा एक पूरक उपचार म्हणता येईल. त्यामागचा शास्त्रीय पाया अद्याप अस्पष्ट आहे.
५. क जीवनसत्वाच्या गोळ्यांचा मात्र तसा उपयोग होत नाही.
माझ्या जवळाच्या तिघांना
माझ्या जवळाच्या तिघांना (त्यातले दोन अतिवृद्ध आणि एक वृद्ध) आताच्या दिवाळीच्या मागेपुढे युटीआय मुळे इस्पितळात भरती व्हावं लागलं होतं.
ताप, हुडहुडी , रक्तदाब वाढणे, थोड्या थोड्या वेळाने लघवी होणे अशी लक्षणे होती.
डायपर वापरणार्या वृद्धांच्याबाबत तेही एक कारण असू शकतं असं डॉक्टरांनी सांगितलं.
सर माझ्या नात्यातील एक मुलगा
सर माझ्या नात्यातील एक मुलगा आहे ८ वर्षाचा. मंगळवारी त्याला उलटी जुलाबचा त्रास सुरु झाला. रीपोर्टनुसार त्याला hymolytic uremic syndrome ( HUS) चे निदान झाले. त्याचे serum creatinine 2.3 होते. सध्या त्याच्यावर hospital मध्ये dialysis , Plazma, blood हे उपचार चालू आहेत. यापूर्वी त्याला असा कसलाच त्रास नव्हता. अचानक असा आजार कसा होऊ शकतो. कृपया माहिती सांगाल का?
हाच प्रश्न मला पण विचारायचा
हाच प्रश्न मला पण विचारायचा होता.
मध्ये मध्ये paper मध्ये बातम्या येत असतात.
बारा तेरा वर्षाच्या मुलाच्या किडन्या अचानक बाद झाल्या.
किडन्या फेल झाल्या.
लहान मुलं मध्ये असे अचानक कसे होते. या
मध्ये माझा creatine 1.3 झाला होता ,तो नॉर्मल च होता.
म्हणून सोनोग्राफी केली.
तेव्हा त्या डॉक्टर सांगत होत्या .
लगवी तुंबवून ठेवणे.
ह्या किडनी च्या आरोग्य साठी घातक असते.
हे खरे आहे का
औषधांचे वाईट साईड इफेक्ट्स
औषधांचे वाईट साईड इफेक्ट्स होतात म्हणजे ती औषधेच नाहीत किंवा गोलमाल आहे किंवा आमच्याकडे औषध नाही म्हणजे जगात दुसरे काही उपाय नाहीत?.
https://www.goodrx.com/health-topic/kidneys/drugs-cause-false-high-creat...
१. डायपर वापरणार्या
१. डायपर वापरणार्या वृद्धांच्याबाबत तेही एक कारण असू शकतं >> +१
...................
२. HUS :
>>>
• लहान मुलांचा आजार
• आतड्यांमध्ये शिरलेल्या एका जंतूच्या विषाशी याचा संबंध बऱ्याचदा असतो
• 60% रुग्णांना मूत्रपिंड-इजा होते
• विशिष्ट उपचार नाहीत.
• 85% रुग्ण पूरक उपचारानंतर बरे होतात
• 20 टक्के रुग्णांना पुढील तीन ते पाच वर्षात उच्चरक्तदाब जडतो.
३.लघवी तुंबवून ठेवणे. किडनी
३.
लघवी तुंबवून ठेवणे. किडनी च्या आरोग्य साठी घातक असते का ?
>>>
ठणठणीत निरोगी व्यक्तीने बराच काळ लघवी दाबून धरली असता तिला भयंकर अस्वस्थता जाणवेल, परंतु त्याचा अंतर्गत दुष्परिणाम होणार नाही.
परंतु,
वाढलेली प्रोस्टेट किंवा अन्य काही कारणांमुळे जर मूत्रमार्गात अडथळा निर्माण झालेला असेल, तर अशा व्यक्तीने लघवी रोखली असता तिला संसर्गदाह होण्याची शक्यता जास्त.
There is evidence that
There is evidence that holding pee for long periods could cause UTIs, perhaps by allowing bacteria in the urinary tract to multiply. A study published in the journal BMC Infectious Diseases in June this year describes a survey of 778 students staying in a hostel in Southern India’s Puducherry. Researchers found that a tendency to hold it was correlated with developing the infection.
https://slate.com/technology/2022/10/urinary-tract-infection-public-toil...
हे याआधीही अनेकदा वाचलंय.
Srd
Srd
तिथला मुद्दा असा आहे :
काही औषधांच्या गुणधर्मामुळे रक्तातील क्रिएटिनीन वाढलेले दिसते, परंतु प्रत्यक्षात त्या औषधांमुळे मूत्रपिंडाला कुठलीही इजा झालेली नसते. त्यातली काही औषधे क्रिएटिनीनच्या मूत्रमार्गातील प्रवासावर परिणाम करतात.
तर अन्य काही औषधे क्रिएटिनीन मोजणीच्या चाचणीमध्ये विघ्न आणतात.
कमी पाणी पिणे आणि लघवी
कमी पाणी पिणे आणि लघवी tumbvun ठेवणे.
ह्या दोन्ही गोष्टी किडनी साठी धोकादायक च
.असे मी अनेक ठिकाणी वाचले आहे
holding pee for long periods
holding pee for long periods could cause UTIs,
>>>
तो मुद्दा अजून निर्विवादपणे सिद्ध झालेला नाही. किंबहुना त्या प्रकारचे शास्त्रशुद्ध झालेले अभ्यास खूप कमी आहेत.
( रोखण्याची सवय किती महिने आहे, प्रत्येक वेळी किती वेळ रोखली जाते.. वगैरे वगैरे बारकाईने पाहावे लागेल).
तूर्तास त्याला गृहीतक म्हणता येईल.
पुरेसे संशोधन झाल्यावरच त्यावर ठाम मत देता येईल असे मला वाटते.
( निरोगी व्यक्तीत संसर्गदाह होतोच असे नाही म्हणता येत; त्याचा धोका वाढू शकतो).
लघवी किंवा संडास.
लघवी किंवा संडास.
काही मर्यादे पर्यंत च रोखून धरू शकतो.
ती मर्यादा ओलांडली की आपले कंट्रोल त्या वर राहत नाही.
ही एक नैसर्गिक क्रिया आहे..
हा धागा यासाठी योग्य नाही, पण
हा धागा यासाठी योग्य नाही, पण इतर कुठे पोस्ट करावे कळले नाही, होणारे दुष्परिणाम किडनीवर होत असल्याने इथे पोस्ट करतोय.
अकोल्यात स्थानिक सौंदर्य प्रसाधनाच्या वापरामुळे किडनी समस्या.
The results from testing the various items, including the creams, at KEM’s Ayurveda laboratory shocked the doctors.
“The levels of mercury in the skin cream was in thousands as against the permissible level of less than 1 ppm (parts per million),’’ said Dr Jamal.
मानव
मानव
अगदी योग्य ठिकाणी लिहिलेत.
पारा आणि अन्य जड धातू जर प्रमाणाबाहेर शरीरात गेले तर मूत्रपिंड आणि मेंदू या दोघांनाही धोका असतो.
लोकांनी सौंदर्यप्रसाधने आणि अप्रमाणित औषधे घेताना या धोक्याचा निश्चित विचार केला पाहिजे.
सौंदर्य प्रसाधने.
सौंदर्य प्रसाधने.
गोरे पना.
स्मूथ पना.
आणि etc Etc.
साठी ठराविक च फॉर्म्युला असणार.
जड धातू तसा परिणाम साध्य करण्यासाठी लागत असतील तर ते सर्व प्रकारच्या क्रीम मध्ये असणार च.
फक्त प्रमाण वेगळे असेल.
प्रमाण जास्त लवकर परिणाम प्रमाण कमी उशिरा परिणाम.
पण परिणाम होणार च.
जाड धातू हे शरीराच्या कार्यासाठी लागत च नाहीत.
त्यांची काही गरज नाही.
Some metal ions, such as Na(I), K(I), Mg(II), and Ca(II), are essential
हेच फक्त शरीराला खूप कमी प्रमाणात लागतात.
बाकी सर्व heavy मेटल नी शरीरात प्रवेश केला की ते शरीराचे नुकसान करणार च.
मग त्याचे परिणाम किती ही कमी असू ध्या
जाड धातू हे शरीराच्या
जाड धातू हे शरीराच्या कार्यासाठी लागत च नाहीत.
त्यांची काही गरज नाही.>>>
हे मंत भाऊ, असा कोणता विषय आहे का की ज्यातलं तुम्हाला काही कळत नाही?
काही आयुर्वेदिक औषधांमध्येही
काही आयुर्वेदिक औषधांमध्येही जड धातूचे प्रमाण जास्त असते आणि ती हानिकारक ठरू शकतात.
Dialysis : कमी वयातच
Dialysis : कमी वयातच मधुमेहींना डायलिसिसचा विळखा!
https://www.google.com/amp/s/www.esakal.com/amp/pune/pune-diabetes-patie...
कुमार सर, डायलिसिस चालू
कुमार सर, डायलिसिस चालू असलेल्या रुग्णाच्या घशातून घरघर असा आवाज का येतो? घरी जो पेशंट आहे तो या आवाजाने त्रस्त झालाय अगदी. धड झोपता पण येत नाही. सतत आपला आवाज येतो.
प्राजू
प्राजू
अशा प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत काही तसा आवाज येणार नाही.
आधी संबंधित रुग्णाला मूळ आजार काय होता, डायलिसिस किती काळ चालू आहे, त्याचे काही जंतुसंसर्गासारखे दुष्परिणाम झाले आहेत का , हे सगळे बघूनच या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल.
संबंधित डॉक्टरच त्याचे योग्य उत्तर देऊ शकतील
अच्छा समजले. मला वाटले की
अच्छा समजले. मला वाटले की कॉमन लक्षण आहे का काय.
लगेच उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.
Pages