सूर नवा ध्यास नवा- कलर्स मराठी

Submitted by संपदा on 15 November, 2017 - 03:02

कलर्स मराठी वर १३ नोव्हेंबरपासून "सूर नवा ध्यास नवा" हा कार्यक्रम सुरू झाला आहे. शाल्मली खोलगडे, महेश काळे आणि अवधूत गुप्ते परीक्षक आहेत तर तेजश्री प्रधान आणि पुष्कराज चिरपुटकर सूत्र संचालन करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाचे लेखन मायबोलीकर वैभव जोशींसह पूनम छत्रे करते आहे.
चला तर चर्चा सुरू करूया.

Group content visibility: 
Use group defaults

द्न्यानेश्वर काका आपल्या कंफर्ट झोनमधून बाहेर पडणारच नाहीत का? त्यांची तीच तीच गाणी ऐकायचा कंटाळा येतो, त्यांना 'काय सारखं सारखं तेच तेच' असं अजिबात वाटत नाही का?

कंफर्ट झोनपेक्षा त्यांच्या आवाजात बाकी गाणी आवडतील का हा मुद्दा मला महत्वाचा वाटतो. काही आवाज सगळ्या जॉनरमध्ये छान सूट होतात तर काही फक्त एकाच जॉनरमध्ये छान वाटतात Happy

भरत ह्यांनी दिलेल्या लिंकवर मला तरी बिग बॉसच्या व्होटींगबद्दल काहीतरी दिसत राहतंय. त्यामुळे आज दुसरीकडे कुठेतरी गेलो होतो. धन्यवाद मनीमोहोर. Happy

कार्यक्रम चांगला होतोय , तेजश्री प्रधानला स्किप करूनच अर्थात. जरा जास्त होतंय मान्य आहे पण त्या कट्यारीने एक खून माफ असता तर पहिला तिचाच होता ( दि.घ्या.)

खूप आभार भरत व मनीमोहोर जी लिंकबद्दल, बरेच दिवसांपासून सारखा मिस होतोय हा कार्यक्रम. तेजश्रीला स्किप कसं करायचं राव... तोंड उघडल्यावर डोक्यात जाते व हसल्यावर तर डोक्यात मुंग्या आणते ती... Uhoh
बाकी महेश काळे व अवधूत ऑल टाईम फेवरेट्स Happy

तेजश्री प्रधान बाकी कालच्या भागात सुंदर दिसत होती , बोलताना लाउड वाटु शकते पण पल्लवी जोशी इतकी खुपत नाही !,
अर्थात याआधी कधी मी ते.प्र. ला इतर कशात पाहिले नाहीये .
तो दाढीवाला माणूस कोण आहे ? Uhoh तो खुपतोय मात्रं !
फास्ट फॉरवर्ड बटन आहे अर्थात, त्यामुळे फक्तं गाणी ऐकते मोस्टली.

बोलताना लाउड वाटु शकते पण पल्लवी जोशी इतकी खुपत नाही !>> पल्लवी जोशी खुपते व ते.प्र. नाही?? Uhoh आवड आपली आपली..

पल्लवी जोशी मला आवडायची, हा ती जरा जास्त होऊन जाऊदेत टाळ्या असं म्हणायची पण तेजश्री मात्र खरंच डोक्यात जाते, कृत्रिम हास्य आणि कृत्रिम बोलते बरेचदा. तिच्यामुळे मी बघत नाहीये. voot वर बघेन म्हणजे फक्त गाणी बघता येतील.

दाढीवाला पुष्कराज चिरपुटकर आहे दीपांजली, दिल दोस्ती दुनियादारी च्या दोन्ही सिझनमध्ये होता, तिथे मस्त केलं होतं, माझा लाडका होता. इथे मला खुपला तोही.

सहमत तेजश्री प्रधान चांगली वाटत आहे . मला ती नेहमीच आवडते . मी हा कार्यक्रम orchestra असाच बघते ... सगळेच चांगले गातात .
आकर्षण मुख्य महेश काळे

कार्यक्रम आवडतोय. कालचा भाग पण आवडला. परिक्षक मंडळींचं गायकाचं गाणं सादर केल्यानंतरचं कौतुक आणि मग दिले जाणारे गुण यात कायम तफावत वाटतीये. भरभरुन कौतुक, पण कमी गुण.. किंवा उलट असं बर्‍याचदा वाटलं.
लता मंगेशकरांची गाणी सादर करायला फार धारीष्ट लागतं. अक्षरा अक्षरांत इतक्या बारीक जागा असतात. त्या समजून उमजून सादर करणं फारच अवघड काम असतं. फार कमी जणींना ते साधता येतं (१००% नाही .. तर बर्‍यापैकी) - विभावरी आपटे, श्रेया घोषाल, आर्या अंबेकर ही काही चटकन आठवणारी नावं... काल 'तिन्ही सांजा' शरयू दातेने मस्तच सादर केलं. कट्यार पुन्हा तिच्याकडेच आली (राहिली).. त्यामुळे बरं वाटलं !
रच्याकने, शरयू दाते ला मागच्या आठवड्यात कट्यार मिळाली, तेव्हा मुद्दाम लिटील चॅम्प मधला तिचा परफॉर्मन्स यूट्यूब वर पाहिला...
आणि सगळ्या लिटील चँप्सचं भरभरून कौतुक करणारी पल्लवी जोशी दिसली. मिस्सिंग पल्लवी जोशी फिलिंग आलं !

शरयुलाही लोकसंगीत थीम मधलं गाणं द्यायला हवं होतं पण !
आधीच्या आठवड्यात बेस्ट म्हणून एलिमिनेशन पसून सुरक्षित हे बरोबर पण म्हणून परफॉर्म न करता डायरेक्ट जुगलबन्दीलाच आणायचा फॉर्मॅट काही पटला नाही !

नमिता,
बुधवार अजुन आलाच नाहीये आमच्याकडे :), देशात सुध्दा सकाळच आहे , एपिसोड झाला नसेल अजुन !

काल 'तिन्ही सांजा' शरयू दातेने मस्तच सादर केलं. >>> नव्हे 'श्रावणात घननीळा' म्हटल. फारच छान गायली Happy

शरयुलाही लोकसंगीत थीम मधलं गाणं द्यायला हवं होतं पण ! >>> + ११११

तेजश्री एक्स्ट्रा ऑर्डिनरीली उंच आहे व तिचा आवाज हाय पिच आहे. तसेच ती बोलतेही फार नाटकी पणे व हसतेही नाकात व कृत्रिम. अजिबात आवडत नाही. "काहीही हं, श्री!" इथपर्यंतच ती ठीक होती...नॉट हिअर!

तिचा आवाज हाय पिच आहे. >>>> उलट नॉर्मल बोलतेय, अजिबात हाय पिच वाटत नाहिये...काय माहीत प्रत्येकाला वेगळ वाटू शकत अर्थात. (मलापण वैताग येतो हाय पिच ऐकायला.)

काल जुईलीचं एकविरेचं गाणं पण छान झालं...पहिल्यांदाच ऐकलं हे गाणं. आज मी सारखं हेच गुणगुणतेय
<,
+१
काय मस्तं होतं गाणं , पहिल्यांदाच ऐकलं आणि आवडलं !

<< काल जुईलीचं एकविरेचं गाणं पण छान झालं...पहिल्यांदाच ऐकलं हे गाणं. आज मी सारखं हेच गुणगुणतेय
<,
+१
काय मस्तं होतं गाणं , पहिल्यांदाच ऐकलं आणि आवडलं !

सेम हिअर! यूट्यूबवर ओरिजिनल सुद्धा ऐकले. ओरिजिनल तुफान फास्ट आहे.

संपदा,
ओरिजनल गाण्याची लिंक दे प्लिज !

हे घे Happy ओरिजिनल गायिकेचं नांव वाचलं होतं , ह्या व्हिडिओत तिचाच आवाज आहे, म्हणजे हाच ओरिजिनल व्हिडिओ असावा.
https://youtu.be/kqsUBnt0La4

व्हिडिओबद्दल धन्यवाद संपदा. तो पाहिल्यावर मला खटकलेली एक गोष्ट पक्की झाली. जुईली एकवीरेतला क पूर्ण उच्चारत नव्हती त्यामुळे ते एक वीरा असं वाटत होतं.

Pages