राष्ट्रीय डिश "खिचडी" पाककृती आणि सन्मानसंहिता

Submitted by सिम्बा on 3 November, 2017 - 01:18

४ नोव्हेंबर ला भारताचे कनवाळू सरकार खिचडी प्रकाराला राष्ट्रीय अन्न म्हणून घोषित करणार आहे.
खिचडी प्रकार आसिंधु-सिंधू आणि अहद राजकोट तहद बंगाल वेगवेगळ्या प्रकाराने खाल्ला जातो. फक्त बरोबरचे तोंडीलावणे दही, चुंदा, टोमातोची चटणी, ते तळलेले मासे असे बदलत जाते, पण सगळ्याच ठिकाणे याच्याकडे कम्फर्ट फूड म्हणून पाहतात.
हेक्टिक दिवसानंतर रात्री समोर आलेली गरम गरम खिचडी , वर तुपाची धार, सोबत पापड कुरडया म्हणजे मला तरी स्वर्ग्प्रप्तीचा आनंद मिळतो.

तर असे हे अल्पमोलि, बहुगुणी अन्न राष्ट्रीय डिश होणार आहे. कुठल्याही “राष्ट्रीय” गोष्टीला असतो तसा मान या डिश ला पण मिळाला पहिलेच, त्यामुळे आपण एक “राष्ट्रीय डिश सन्मान संहिता” तयार करू. (तसेही सरकारी बाबू maayboli वाचतात हे गेल्या नोव्हेंबर मध्ये आम्हाला कळलेच आहे Wink त्यामुळे हि सन्मान संहिता सरकारपर्यंत आज ना उद्या पोहोचेलच)
१) खिचडी हि राष्ट्रीय डिश असल्यामुळे ती सगळीकडे एकाच प्रकारची मिळावी, त्यासाठी घटक पदार्थ आणी त्यांचे प्रमाण आणि शिजवायचा वेळ यांचे प्रमाणीकरण केले जावे. राष्ट्रगीत आपण वाटेल तितका वेळ आणि चालीत म्हणतो का? नाही ना?
२) काही देशद्रोही डाळ तांदूळ एकत्र शिजवून त्यात मटन, सोडे, कडवे वाल असे प्रकार घालतात आणि त्याला त्या पदार्थाची खिचडी म्हणतात, हा प्रकार तत्काळ बंद करावा
३) सरकारी भोजन समारंभ, शाळेतील मध्यान्ह भोजने, कंपन्यातील फोर्मल जेवणे या सगळ्यांचा शेवट २ table स्पून खिचडी खावून व्हावा. हे खिचडी खाताना लोकांनी आदर दाखवायला उभे राहावे. एल्झाक्ट्ली १०७ सेकंद्स मध्ये हि खिचडी खाऊन संपली पाहिजे.
४) खिचडीचे घटक पदार्थ सगळ्यांना मिळावेत म्हणून त्यावर सबसिडी जाहीर केली जावी (खादि वर असते कि नाही? तशीच)
५) प्रत्येक हॉटेल/ खानावळी मध्ये भले ते उडुपी किंवा ५ स्टार हॉटेल असो किंवा सत्यभामा बाईंची घरगुती खानावळ असो खिचडी रोज शिजली पाहिजे आणी ती एका ठराविक किमती मध्ये विकली गेली पाहिजे. यामुळे गरीब लोकांना अन्न सुरक्षा मिळेल. कोणीही कुठेही जाऊन खिचडी मागू शकतो, त्यामुळे समाजात आपोआप समता आणी समरसता रुजेल.
६) अर्थात हि खिचडी विकतघेण्यासाठी आधार नंबर असने गरजेचे आहे.
७) खिचडी राष्ट्रीय अन्न असल्याने “ खिचडी आवडत नाही” म्हंटल्यास राष्ट्रद्रोहाचा गुन्हा लागू केला जाईल आणी रासुका खाली तत्काळ अटक करण्यात येईल.
८) खिचडी संबंधी सर्व नियम पाळले जात आहेत कि नाही हे monitor करायला राष्ट्रीय अन्न सन्मान पथक स्थापित केले जाईल.
९) कोणत्याही वेळी, कोणाच्याही घरात, कोणत्याही समारंभात प्रवेश करायची यांना अनुमती असेल.
१०) घटक पदार्थ आणि एटीकेट्स तपासण्याचे अधिकार या पथकाकडे असतील.
११) कोणत्या प्रसंगी खिचडी बरोबर काय खावे याचे नियम बनवण्यात यावे, (उदा दुपारच्या वेळी खिचडी दह्या बरोबरच खावी, jan ते मार्च काळात कैरीचा छुंदा) भारतीय हवामान आणि आयुर्वेदाचा विचार करून कधी काय खावे याची संहिता बनवण्यासाठी योग गुरूंच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमावी.
१२) नाटक, सिनेम,, म्हणी यात खिचडी शब्द वापरता येणार नाही
१३)
वाढवा पुढे....

चला खूप पाचकळपणा करून झाला फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री च्या मंत्रिण बाईनि असा कोणताही विचार सरकार करत नसल्याचे स्पष्ट केले आहे

आता धाग्याचा मुख्य उद्देश....
वेगवेगळ्या प्रकारच्या खिचड्यांची नावे आणि पाककृती इकडे नोंदवू शकता.
कुणा माबो सुगरणीला इकडे वेगळ्या प्रकारच्या खिचडीची पाककृती द्यावीशी वाटली तर आवर्जून द्यावी.
आधीच लिहिली असेल तर लिंक द्यावी..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Lol
कम्फर्ट फूड म्हणजे मुगडाळीची खिचडी.... बाकी बरेच प्रकार असतील, पण ह्याच्या सारखा साधा , पटकन होनारा, अनै चविष्ट पदार्थ नाही.

खिचडी ऑल टाईम फेवरेट. पण त्यावर सढळ हाताने सोडलेले साजुक तुप अन पिळलेला लिंबु मस्ट.

जुने दिवस आठवले, मी अन माझी मैत्रीण बरेचदा कंटाळा आला की ऑफीसच्या बाजुच्या हॉटेलमध्ये मुगडाळ खिचडी खायला जायचो, निव्वळ अप्रतीम चव असायची त्या खिचडीची अन क्वांटीटी पण ईतकी जास्त असायची की दोघींना संपायची सुद्धा ब नाही .

कम्फर्ट फूड म्हणजे मुगडाळीची खिचडी.... बाकी बरेच प्रकार असतील, पण ह्याच्या सारखा साधा , पटकन होनारा, अनै चविष्ट पदार्थ नाही. >>>> + १

तूरडाळीची पण मस्त होते. डाळ भात एकत्र शिजवायचा. तूरडाळ बरोबरीने घालायची तांदळाच्या व ताटात वाढल्यावर वरुन चरचरीत लसणीची फोडणी, तळलेली लाल मिरची, भाजलेला पापड, गरम कढी!

मला बंगाली लोकांची प्रसादाची खिचडी आवडते. आपला सत्यनारायणाच्या प्रसादाची चव इतरवेळी केलेल्या शिऱयाला येत नाही तसेच ह्या खिचडीच्या बाबतीत आहे. बिहारी लोकांमध्ये शनिवारी खिचडी करणं शुभ मानतात . ती पध्दत /रीत आम्हीही पाळतो.

आई घरी करते ती मूग डाळीचीच करते,
कधी मला करायची वेळ आली तर मी एक्सपरिमेंट्स करतो,
मसूर डाळ, थोडी उडीद डाळ (याने थोडी चिकट होते खिचडी) तूर, मूग, कधी हिरवी मूग डाळ हाताला येईल ते घालतो,
नेव्हर फेल्स Happy

इंदूर ला माझ्या मावशी कडे फक्त तूर डाळ आणि तांदूळ थोडा खडा मसाला घालून शिजवायचे, आणि फक्त मोहोरीची फोडणी वेगळी करायचे आणि वरतून घ्यायचे ,ते पण आवडायचे

Over 800 kg khichdi, a traditional Indian dish relished by both rich and poor, will be prepared live on November 4 at the World Food India event in a bid to create world record and popularise it as brand India food globally.

A giant 'kadhai' (frying pan) of the capacity of 1,000 litres and 7 feet in diameter will be used for slow steam-cooking of more than 800 kg khichdi.
The khichdi will be prepared by Sanjeev Kapoor, who has been roped as brand ambassador of the Great India Food Street for the three-day event

http://www.timesnownews.com/india/article/world-food-day-2017-narendra-m...

मला सोडे घालून करायची आहे. मी सध्या करू शकत नाही कारण सोडे भयंकर महाग आहेत.
कदाचित राष्ट्रद्रोहाचा गुन्हा होऊ नये म्हणूनच ते महाग झाले असतील.

लेख मस्स्त ! Lol सोडे म्हणजे काय ?ते सुकलेल्या स्पंज सारखं दिसत ज्यात खूप प्रोटीन असतं अस म्हणतात ते का ?

हे खिचडी राष्ट्रीय डीश खरं आहे का? Uhoh
मुगडाळ- तांदुळाची खिचडी झटपट आणि टेस्टी.
बाकी आख्खा मसुर, मिक्स डाळी, बटाटा, शेंगदाणे, सोडे, कोळंबी वैगेरे वैगेरे घालुनही छानच होतेच.

सुकवलेली कोलंबी >> ओह मग मी म्हणतेय ते कायतरी वेगळच दिसतंय .. त्याला काय म्हणतात माहित नाही>>>> तुम्ही बहुतेक सोया चंक्स बद्दल बोलताय.

आंगो, तूर डाळीची खरच मस्त होते खिचडी. खानदेशात / खानदेशी लोक खिचडीत तूर जास्त वापरतात. बाकी ठिकाणी मात्र मुग वगैरे. मसूर डाळीची खिचाडी करताना त्यात मी थोडा लसुण ठेचुन घालते. बाकी घरी कधी कधी वरुन लसणाची चरचरीत फोडणी घालते.

तुम्ही बहुतेक सोया चंक्स बद्दल बोलताय.>> हा s s s ते बहुतेक सोया चंक्स .. राईट !! तुम्ही नको "तू " च म्हणा !

हे खिचडी राष्ट्रीय डीश खरं आहे का? Uhoh >> नाही अफवा आहे
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री बादल यांनी ट्विट करून सांगितलं कि अस काही नाहीये
येत्या 4 नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या खाद्य दिनी प्रसिद्ध शेफ संजीव कपूर 800 किलो पेक्षा जास्त मुगाची खिचडी बनवून विश्वविक्रम करणार आहेत. याद्वारे भारतीय खाद्याची जगभरात ख्याती व्हावी असा याचा उद्देश आहे. मात्र याचवेळी मुगाच्या खिचडीला राष्ट्रीय खाद्य जाहीर करण्यात येईल, अशी अफवा पसरली.

हो ही अफवाच आहे,
आणि बादल बाईंचे स्पष्टीकरण लेखात चांगले बोल्ड करून लिहिले आहे,
उगाच जरा टाईमपास लिहायची हौस भागवून घेतली Happy

इतकं अभिमानास्पद वैविध्य असलेल्या भारतात कोणताही एखादाच खाद्यपदार्थ, वस्त्र इत्यादी राष्ट्रीय अमुक ढमुक होणे पटण्यासारखे नाही.

मग काय प्राणी, पक्षी, खेळ वैविध्यपूर्ण नाहीत का? झेंडे, गीते विविध नव्हते का?
आमची खिचडी जिंदाबाद! बाकी खाणे मुर्दाबाद.

>>मला सोडे घालून करायची आहे>>>>>> सई, रेसिपी दे ना!

हा हा देवकी अगं उपहासात्मक होतं ते. Wink
पण करते मी सोडे घालून खिचडी नेहमी.
आपल्याला परवडतील तेवढे सोडे घ्यायचे. आणि ते २०मिनिट पाण्यात भिजवून ठेवायचे.

१ वाटी तांदूळ भिजवून ठेवायचे. आणि १-२ वाटी पाणी उकळायला ठेवायचे.
लसूण आणि धने जिरे पूड करायची
कांदा बारीक चिरून घ्यायचा.
ओलं खोबरं खोऊन घ्यायचं (किंवा फ्रीझर मध्ये असेल तर बाहेर काढून ठेवायचं)
तेलावर फक्त हिंग, हळद (जिरे मोहरी नाही) घालून कांदा परतायचा. गुलाबी झाल्यावर लसूण आणि दाणे जिरे पूड आणि तांदूळ टाकायचे. त्यात उकळलेले पाणी ओतायचे आणि शिजू द्यायचे.
शिजत आल्यावर सोडे घालून ५ मिनिट वाफ आणायची.
मग त्यावर ओले खोबरे आणि कोथिंबीर भुरभुरायची.

अर्थात ही खिचडी अराष्ट्र्रीय आहे कारण यात डाळ नाही. पण सोडे म्हणजे प्रोटीनच की!
अशीच फ्रेश कोळंबीची पण छान होते. तिथे फक्त कोळंबीला हळद, तिखट मीठ लावून ठेवायचे थोडावेळ. भिजवायचे नाही.

सोडयांच्या ऐवजी हरभरे, मूग, राजमा वापरला तर चालेल का?
(अमुक ऐवजी तमुक वापरू का हा माबो वरचा नेहमीचा प्रश्न आहे, ती formality पूर्ण करून टाकतो :))

बाकी परवडतील तितके सोडे घ्यावे>>>> Lol

मुगडाळ, कण्या खिचडी थोडा गोडा मसाला, मीठ, तिखट घालून आणि लसणीची फोडणी करून भाजी कुकरमध्ये करते बरेचदा, फोडणी गाय किंवा साजूक तुपाची करते. मऊसर करायची. साध्या पातेल्यातही पटकन शिजते.

दुसरी बरेचदा केली जाणारी खिचडी म्हणजे पतंजली पुष्टीहार दलियाची, हा मात्र दोन तीन तास कोमट किंवा साध्या पाण्यात भिजवते कारण यातली बाजरी पटकन शिजत नाही. ही करताना मात्र किमान दोन भाज्या घालते. टेस्टी होते. कुकरमध्ये करते जास्त करून. तरी बाजरी किंचित कमी शिजलेली वाटते पण आवडतं तसंही घरात आम्हा तिघांना. भाज्या आवडीनुसार कोबी, फ्लॉवर, मटार, वांगी, सुरण घातला तर कोकम किंवा चिंच टाकावी जराशी किंवा लिंबूरस, बटाटा, कांदा काहीही घालते. तूर शेंगा दाणे, हरबरे शेंगा दाणे पण मस्त लागतात ह्यात. आले तुकडे घालतेच मी आमच्याकडे आवडतात. कडीपत्ता, कोथिंबीर ऑप्शनल. लसूण पण टाकते फोडणीत. ही पण मऊसर करते.

Pages