राष्ट्रीय डिश "खिचडी" पाककृती आणि सन्मानसंहिता

Submitted by सिम्बा on 3 November, 2017 - 01:18

४ नोव्हेंबर ला भारताचे कनवाळू सरकार खिचडी प्रकाराला राष्ट्रीय अन्न म्हणून घोषित करणार आहे.
खिचडी प्रकार आसिंधु-सिंधू आणि अहद राजकोट तहद बंगाल वेगवेगळ्या प्रकाराने खाल्ला जातो. फक्त बरोबरचे तोंडीलावणे दही, चुंदा, टोमातोची चटणी, ते तळलेले मासे असे बदलत जाते, पण सगळ्याच ठिकाणे याच्याकडे कम्फर्ट फूड म्हणून पाहतात.
हेक्टिक दिवसानंतर रात्री समोर आलेली गरम गरम खिचडी , वर तुपाची धार, सोबत पापड कुरडया म्हणजे मला तरी स्वर्ग्प्रप्तीचा आनंद मिळतो.

तर असे हे अल्पमोलि, बहुगुणी अन्न राष्ट्रीय डिश होणार आहे. कुठल्याही “राष्ट्रीय” गोष्टीला असतो तसा मान या डिश ला पण मिळाला पहिलेच, त्यामुळे आपण एक “राष्ट्रीय डिश सन्मान संहिता” तयार करू. (तसेही सरकारी बाबू maayboli वाचतात हे गेल्या नोव्हेंबर मध्ये आम्हाला कळलेच आहे Wink त्यामुळे हि सन्मान संहिता सरकारपर्यंत आज ना उद्या पोहोचेलच)
१) खिचडी हि राष्ट्रीय डिश असल्यामुळे ती सगळीकडे एकाच प्रकारची मिळावी, त्यासाठी घटक पदार्थ आणी त्यांचे प्रमाण आणि शिजवायचा वेळ यांचे प्रमाणीकरण केले जावे. राष्ट्रगीत आपण वाटेल तितका वेळ आणि चालीत म्हणतो का? नाही ना?
२) काही देशद्रोही डाळ तांदूळ एकत्र शिजवून त्यात मटन, सोडे, कडवे वाल असे प्रकार घालतात आणि त्याला त्या पदार्थाची खिचडी म्हणतात, हा प्रकार तत्काळ बंद करावा
३) सरकारी भोजन समारंभ, शाळेतील मध्यान्ह भोजने, कंपन्यातील फोर्मल जेवणे या सगळ्यांचा शेवट २ table स्पून खिचडी खावून व्हावा. हे खिचडी खाताना लोकांनी आदर दाखवायला उभे राहावे. एल्झाक्ट्ली १०७ सेकंद्स मध्ये हि खिचडी खाऊन संपली पाहिजे.
४) खिचडीचे घटक पदार्थ सगळ्यांना मिळावेत म्हणून त्यावर सबसिडी जाहीर केली जावी (खादि वर असते कि नाही? तशीच)
५) प्रत्येक हॉटेल/ खानावळी मध्ये भले ते उडुपी किंवा ५ स्टार हॉटेल असो किंवा सत्यभामा बाईंची घरगुती खानावळ असो खिचडी रोज शिजली पाहिजे आणी ती एका ठराविक किमती मध्ये विकली गेली पाहिजे. यामुळे गरीब लोकांना अन्न सुरक्षा मिळेल. कोणीही कुठेही जाऊन खिचडी मागू शकतो, त्यामुळे समाजात आपोआप समता आणी समरसता रुजेल.
६) अर्थात हि खिचडी विकतघेण्यासाठी आधार नंबर असने गरजेचे आहे.
७) खिचडी राष्ट्रीय अन्न असल्याने “ खिचडी आवडत नाही” म्हंटल्यास राष्ट्रद्रोहाचा गुन्हा लागू केला जाईल आणी रासुका खाली तत्काळ अटक करण्यात येईल.
८) खिचडी संबंधी सर्व नियम पाळले जात आहेत कि नाही हे monitor करायला राष्ट्रीय अन्न सन्मान पथक स्थापित केले जाईल.
९) कोणत्याही वेळी, कोणाच्याही घरात, कोणत्याही समारंभात प्रवेश करायची यांना अनुमती असेल.
१०) घटक पदार्थ आणि एटीकेट्स तपासण्याचे अधिकार या पथकाकडे असतील.
११) कोणत्या प्रसंगी खिचडी बरोबर काय खावे याचे नियम बनवण्यात यावे, (उदा दुपारच्या वेळी खिचडी दह्या बरोबरच खावी, jan ते मार्च काळात कैरीचा छुंदा) भारतीय हवामान आणि आयुर्वेदाचा विचार करून कधी काय खावे याची संहिता बनवण्यासाठी योग गुरूंच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमावी.
१२) नाटक, सिनेम,, म्हणी यात खिचडी शब्द वापरता येणार नाही
१३)
वाढवा पुढे....

चला खूप पाचकळपणा करून झाला फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री च्या मंत्रिण बाईनि असा कोणताही विचार सरकार करत नसल्याचे स्पष्ट केले आहे

आता धाग्याचा मुख्य उद्देश....
वेगवेगळ्या प्रकारच्या खिचड्यांची नावे आणि पाककृती इकडे नोंदवू शकता.
कुणा माबो सुगरणीला इकडे वेगळ्या प्रकारच्या खिचडीची पाककृती द्यावीशी वाटली तर आवर्जून द्यावी.
आधीच लिहिली असेल तर लिंक द्यावी..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी हल्ली खिचडीकरता तांदुळाऐवजी किन्वा वापरते. बाकी रेसिपी तीच, मसाले तेच. बाजूची तोंडीलावणीही तीच.

१०) घटक पदार्थ आणि एटीकेट्स तपासण्याचे अधिकार या पथकाकडे असतील.
पोटात गेलेल्या खिचडीचे घटक पदार्थ तपासण्याचे अधिकार या पथकाला असतील की कोथळा काढायचे आऊटसोर्सिंग केले जाणार आहे?

स्कॉटलंडमध्ये केजरी (kedgeree) नावाचा प्रकार मिळतो. ब्रिटीशांच्या राज्यात भारतात रहात असलेल्या स्कॉटिश लोकांनी मुगाच्या डाळीच्या खिचडीमध्ये स्मोक्ड हॅडॉक वापरायचे ठरविले आणि हा पदार्थ जन्माला आला. स्मोक्ड हॅडॉक, भात, पार्सली, उकडलेली अंडी, मसाला (करी पावडर) आणि क्रीम (अथवा लोणी) वापरून ही स्कॉटिश खिचडी तयार करतात. डाळ मात्र नसते ह्या खिचडीमध्ये. बहुधा व्हिक्टोरिया राणीच्या काळात खिचडीने केजरीपर्यंत प्रवास केला असावा. खूप रुचकर लागते ही खिचडी/केजरी.

भारताची राष्ट्रीय डिश 'चायपाणी' असायला हवी ना? इतक्या आवडीने कोणता पदार्थ आसेतुहिमाचल खाल्ला जातो सांगा?!!

भारी जमलीय खिचडी Lol

माझे तर डोकेच गरगरलेले ती अफवा ऐकून. बरे झाले अफवाच निघाली.
माझ्यासाठी खिचडी म्हणजे आजारी माणसांचे अन्न. मी आजारी असतो आणि तोंडाला काहीच चव नसते तेव्हा मी खिचडी आणि सोबत लोणचे, पापड, भरलेल्या तळलेल्या सुक्या मिरच्या असे खातो. अगदी दिवसातून चार वेळा मिटक्या मारत तेच खातो.
आणि जेव्हा मला त्या खिचडीकडे बघून मळमळायला लागते तेव्हा मी समजतो की येस्स, आता मी पुर्ण बरा झालो आहे Happy

अवांतर - लहानपणी मला खिचडी म्हणजे साबुदाण्याची खिचडी असेच माहीत होते. आमच्याघरी ही अशी डाळीची खिचडी फारसे करायचेही नाही आणि तो शब्द कधी वापरायचेही नाही. मित्रांच्याच तोंडून ऐकायचो आणि त्यांच्याच डब्यात बघायचो. काही लोकं चपात्यांना पोळ्या बोलत त्यांची ईज्जत वाढवतात तसे काही लोकं डाळ घालून शिजवलेल्या भाताला खिचडी बोलत त्याला सन्मान देतात असेच वाटायचे. मग पुढेमागे स्वत:च्या पायावर हॉटेलात जाऊ लागलो आणि मेनूकार्डवर दालखिचडी वाचू लागलो तेव्हा समजले की हा बरेपैकी प्रचलित शब्द आहे.

लहानपणी मला खिचडी म्हणजे साबुदाण्याची खिचडी असेच माहीत होते.

>> आपले लहानपण महाराष्ट्राच्या कोणत्या भागात गेले?

यात एक राहिले ना :
"युनेस्को ने नुकतेच डिक्लेअर केले आहे की खिचडी हे भारताचे राष्ट्रीय अन्न जगातील सर्व देशांच्या राष्ट्रीय अन्नांपेक्षा स्वस्त, मस्त, आणि पौष्टिक असल्याने सर्वश्रेष्ठ आहे!! "

सिम्बा Happy

मै - हो Lol

इन फॅक्ट नासा सुद्धा. कारण नासा हे नावच नाश्त्याला साबुदाणा खिचडी वरून घेतले आहे.

सिम्बा Lol
भारी लिहिलंय. वाचताना हे आता असं झालं तर काय! विचारकरून अल्मोस्ट पोटात गोळाच आला. Happy

यात एक राहिले ना :
"युनेस्को ने नुकतेच डिक्लेअर केले आहे की खिचडी हे भारताचे राष्ट्रीय अन्न जगातील सर्व देशांच्या राष्ट्रीय अन्नांपेक्षा स्वस्त, मस्त, आणि पौष्टिक असल्याने सर्वश्रेष्ठ आहे!! असे विश्वास नांगरे पाटील यांनी जाहीर केले आहे!

लहानपणी मला खिचडी म्हणजे साबुदाण्याची खिचडी असेच माहीत होते. >>
मला पण कोकणात साखी च माहीत होती. खिमट असायचं नुसत्याच तांदळाचं. डाळ घालून भात केलेला आठवत नाही.

अंजू....हो ना पतंजलीच्या दलियात बाजरी शिजत नाही..कचकच लागते. त्यांना कुणीतरी " ब्रोकन बाजरी" घाला असे कळवायला पाहीजे. अदर वाईज मस्त चव आहे त्याची.

सोनू हो..

मुळात कोकणात डाळ कितपत खाल्ली जाते हाच प्रश्न आहे. म्हणजे निदान आमच्या घरी (मुंबईत) तरी मसूरची आमटी, काळ्या वाटाण्याचे सांबार, तांबट्याचे सार, कांद्याचे कालवण, कुळदाची पिठी, दह्याची कढी, कोकमकढी, कटाची आमटी असे वेगवेगळे प्रकार कमीअधिक प्रमाणात केले जातात. त्यात डाळीचा नंबर लागेल तेव्हा लागेल. त्यातही गोडी डाळ सणांपुरती. आंबट वरणही तुलनेत कमीच. तिखट डाळ मात्र तुलनेत जास्त कारण नॉनवेज म्हणजे मच्छी फ्राय वा अंड्याच्या ऑमलेटसोबतही ती खाता येते.

तरी वरच्या लिस्टमध्ये अजून मांसमटण, मच्छी, खेकड्याचे नॉनवेज रस्से तसेच अंड्या शिंपल्यांचे कालवण वगैरे पकडलेच नाहीये. आणि घरी केल्या जाणारया जेवणात 50-60 टक्के जेवण नॉनवेजच असते.

झटपट भात करायचे झाल्यास डाळखिचडीच्या तत्वावरच एकत्र कूकर लावत मसालेभात केला जातो.
नाहीतर ऑलटाईम हिट आणि सर्वांचा फेव्हरेट फोडणीच भात आहेच.
तर या सर्वात पिवळ्या रंगाची दालखिचडी आजारासाठीच राखून ठेवली आहे. ते देखील मोठा झाल्यावर. अन्यथा लहानपणी तिथेही भाताचीच पेज.

शिवसेनेच्या झुणका भाकरची जी अवस्था झाली तिच भाजपाच्या खिचडीची होणार आहे
असेही इतर पक्षातून भष्टाचारी, गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांना सीमिल करून भाजप पक्षाची खिचडी झाली आहे

मुळात कोकणात डाळ कितपत खाल्ली जाते हाच प्रश्न आहे. म्हणजे निदान आमच्या घरी (मुंबईत) तरी मसूरची आमटी, काळ्या वाटाण्याचे सांबार, तांबट्याचे सार, कांद्याचे कालवण, कुळदाची पिठी, दह्याची कढी, कोकमकढी, कटाची आमटी असे वेगवेगळे प्रकार कमीअधिक प्रमाणात केले जातात. त्यात डाळीचा नंबर लागेल तेव्हा लागेल. त्यातही गोडी डाळ सणांपुरती. आंबट वरणही तुलनेत कमीच. तिखट डाळ मात्र तुलनेत जास्त कारण नॉनवेज म्हणजे मच्छी फ्राय वा अंड्याच्या ऑमलेटसोबतही ती खाता येते.तरी वरच्या लिस्टमध्ये अजून मांसमटण, मच्छी, खेकड्याचे नॉनवेज रस्से तसेच अंड्या शिंपल्यांचे कालवण वगैरे पकडलेच नाहीये. आणि घरीकेल्या जाणारया जेवणात 50-60 टक्के जेवण नॉनवेजच असते.झटपट भात करायचे झाल्यास डाळखिचडीच्या तत्वावरचएकत्र कूकर लावत मसालेभात केला जातो.नाहीतर ऑलटाईम हिट आणि सर्वांचा फेव्हरेट फोडणीच भात आहेच.तर या सर्वात पिवळ्या रंगाची दालखिचडी आजारासाठीच राखून ठेवली आहे. ते देखील मोठा झाल्यावर. अन्यथा लहानपणी तिथेही भाताचीच पेज.>>>
ऋच्या या प्रतिसादाशी सहमत...
आमच्या कडे पण खिचडीचा प्रकार जास्त केला जात नाही..
हो पण शाळेत असताना मधल्या सुट्टीत एकमेकांसोबत डब्बे शेयर करताना खाल्ली आहे.

कोकणात अशा प्रकारची खिचडी कमी प्रचलित असली तरी गेल्या 40 वर्षात क्वचित का होईना केली जाते. पण जास्त महत्व गुरगुरीत भात ज्याला मऊभात म्हणतात त्याला, आमटी भात, कुळीथ पिठलं, कोकम सार, सोलकढी, तांदूळ, नाचणी भाकरी याला, पण हल्ली सर्रास पोळ्या होतात. शाकाहारी असल्याने सामिष नसतं आमच्याकडे माहेरी, सासरी त्यामुळे माहिती नाही त्याबद्दल.

सालवाली मुगडाळ खिचडी पण छान लागते, आईमुळे माहितेय, ती बडोद्याची आहे.

अनघा, मूगडाळीची हिरवी आमच्याकडे कधी केली नाही, पण ईतरांकडे बघून माहीती आहे.
कधी आजारी पडलो तर आमच्या घरच्या खिचडीचा फोटो ईथे नक्की टाकतो.

अवांतर - बिरबलाच्या खिचडीत नक्की कोणती खिचडी होती कोणाला काही आयडीया? जेव्हा मी ती कथा लहानपणी वाचलेली तेव्हाही मला साबुदाण्याची खिचडीच वाटलेली. म्हटलं असेल बिरबलाचा उपवास, तसेही एवढ्या मुसलमानांत तो हिंदू होता Happy

शिवसेनेच्या झुणका भाकरची जी अवस्था झाली >>
@ पावसकर झुणका भाकर अतिशय उत्तम योजना होती. आमच्याइथे अजुनही मिळते १० रुपयात . उलट बंद झाल्यामुळे वाईट वाटते.इकडे बाहेरगावचा कामगारवर्ग् प्रचंड असल्याने त्यांना २वेळा पोटभर् खाता येते.

https://economictimes.indiatimes.com/industry/miscellaneous/india-sets-g...

India today set a Guinness world record by cooking 918 kg khichdi, a traditional multi-grain dish, at the ongoing global food event organised by the government in the national capital.

यातले नेमके काय रेकॉर्ड आहे? ९१८ किलो खिचडी ६०००० लोकांना वाटली हे रेकॉर्ड का?
९१८ / ६००० = ०.०१५३ किलो = १५.३ ग्रॅम खिचडी अनाथांना वाटली. हे नक्कीच रेकॉर्ड म्हटले पाहिजे.

अजमेर ला गेलय का कोणी? बडी देग ( कढई) मधे ४८०० किलो भात बनतो तर छोटी देग मधे २४०० किलो. लोकांना भरपेट जेवायला मिळते, प्रसादासारखे हातावर टिचभर देत नाहीत.
http://khawajagharibnawaz.com/DegsLangar.html

Pages