खाद्ययात्रा ४ – गुजराथी थाळी, दाल खिचडी आणि गोड शिरा

Submitted by जिप्सी on 15 July, 2010 - 00:46

==================================================
आजचा मेन्यु:
==================================================
मेन्यु १ – गुजराथी थाळी

मेन्यु २ – दाल खिचडी

मेन्यु ३ – साजुक तुपातला शिरा
=================================================
==================================================

गुलमोहर: 

ठिकाणः

मेन्यु १ – गुजराथी थाळी - चर्चगेट जवळील हॉटेल "सम्राट"
मेन्यु २ – दाल खिचडी - हॉटेल "करीम्स"
मेन्यु ३ – साजुक तुपातला शिरा - घरगुती Happy

लाजो माझ नाव का घेतलस ग? :अओ;

मलापण गुजराथी जेवण आवडत बुवा. कारण ते तिखट नसतं Happy

ते काजु आणि बेदाणे... Happy

ती तळलेली गवार फक्त गुजराथी थाळीतच मिळते . मस्त लागते Happy

अरेरे!! ही थाळी सम्राटमधली आहे????? ताटाच्या कडांवर आणि वाटीवर ती चक्क कसलीतरी पावडर सांडलेली दिसतेय Sad

शिरा छानच Happy

अगं मंजु, ते भाकरीवरचे पिठ आहे, भाकरीपण बघ किती पिठाळ दिसतेय. ही गुजराती डायेट थाळी आहे बहुतेक. मी खाल्लेल्या थाळीतली भाकरीपण तुपात बुडवलेली होती...

गुज्जु थाळी आणि शिरा एकदम झक्कास. असा दिसणारा शिरा खाताना माझ्या मनात डायेटचे विचारही येत नाही. (खाऊन झाल्यावर पोट जड होते तेव्हा मात्र अगणित शिव्या येतात मनात स्वतःसाठी)

अगं वाढताना पडली असेल... एवढे नको बरे मनास लाऊन घेऊ, ही थाळी मी खाईन, तुझ्यासाठी योगेश दुसरी मागवेल.... Happy

मस्त रे आजचा मेन्यू! आता मी कसाबसा कोथिंबीर वडी, पनीर भुर्जी, गाजर कोशिंबीर, ताक, भाकरी, गूळ-तूप ह्यांचा लंच करत आहे, त्यामुळे फार वाईट नाही वाटले आज! Proud